
नमस्कार मंडळी,महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत ‘शिपाई’ (गट-ड) संवर्गातील रिक्त पदांसाठी 10 वी उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आहे.महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे,कोकण,नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती विभागात पदभरती होणार आहे.
DTP Maharashtra Bharti 2023:एकूण 125 रिक्त जागा भरण्यासाठी ही पदभरती होणार आहे. 20 सप्टेंबर 2023 पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.या भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांचे वय अठरा वर्षे पूर्ण असावे आणि चाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे.मागासवर्गीयांसाठी खेळाडूंसाठी / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी / अनाथांसाठी वयामध्ये 5 वर्षांची शिथिलता देण्यात आली आहे.शासनाच्या सेवेत असलेल्या उमेदवारांना वयामध्ये 10 वर्षांची शिथिलता असणार आहे.
पदभरती मध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी
urban.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा
dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज प्रक्रियेला सुरुवात होताच अर्ज करायचे आहे.दि. 20 सप्टेंबर 2023 पासून अर्ज करायची सुविधा वरील संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
भरतीची जाहिरात:येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी:येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट:येथे क्लिक करा
आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 WhatsApp ग्रुपला जॉईन करा-येथे क्लिक करा 💚