Hsc exam date ,ssc exam date ,
12th Exam date:21 February to 20 march
10th Exam date: 2 march to 25 march
12th Timetable : www.mahahsscboard.in संकेत स्थळावर दी.19.9.2022पासून उपलब्ध करून देण्यात आले आहे .
दहावी व बारावीच्या परीक्षेची तारीख बोर्ड द्वारे सुचित करण्यात आली आहे फेब्रुवारी व मार्च मध्ये दहावी व बारावीच्या परीक्षा होईल असे सांगितले नक्की सांगितले आहे. दहावी बारावी ची परीक्षा फेब्रुवारी मार्च मधे आहे अशी माहिती बोर्डाने दिली आहे .तर दोन पेपर मधे एका दिवसाची सुट्टी देण्याचाही बोर्डाचा विचार सुरू आहे यंदाची बोर्डाची परीक्षा ही 100% आभ्यास क्रमावर आधारित असेल त्यासाठी विद्यार्थ्यांवर परीक्षेचा तनाव येऊ नये त्यांना अभ्यासाचं ओझ वाटू नये . म्हणून बोर्डाने विद्यार्थ्यांना 2 पेपरमधे ऐका दिवसाची सुट्टी देण्याचीही बोर्डाने ठरवल आहे. या वर्षी खुप स्ट्रिक पेपर होणार असही बोर्डाने ठरवलेलं आहे .31 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी 6,000 केंद्र सज्ज असतील.100% आभ्यास क्रमावर आधारित प्रश्नपत्रिका असणार आहे. दहावीची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत होणार आहे तसेच बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च या कालावधीत होणार आहे .पुढील वर्षी होणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले त्यामुळे विद्यार्थ्यांना आभ्यासाचे नियोजन करता येईल. मात्र दहावी बारावीच्या परीक्षेसाठी कोरोना काळात दिलेल्या सवलती शिक्षण मंडळाने रद्द केल्या आहेत .
कोरोणा काळातील सर्व सवलती आता रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोना काळात विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच परिक्षा केंद्र देण्यात आले होते. तसेच 30 मिनिटाचा अतिरीक्त वेळ देण्यात आला होता.ही सवलत शिक्षण मंडळाने रद्द केली आहे, अशी माहिती शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली कोरोना काळात शाळा व महाविद्यालये बंद होती .शिक्षण ऑनलाईन सुरू होते त्यामुळे परीक्षेसाठी विशेष नियम तयार करण्यात आले होते .पहिली नववीची परीक्षा ऑनलाईन झाली .तसेच बोर्डाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेत परीक्षा घेण्यात आली होती त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला होता . मात्र आता कोरोनाचे नियम शिथील झाले आहेत. ऑनलाईन शिक्षण बंद झाले आहेत. शाळा व माविध्यालये सुरू झाली आहे. त्यामुळे कोरोना काळात देण्यात आलेल्या सर्व सवलती आता सरकार द्वारे बंद करण्यात आल्या आहेत. परीक्षेसाठी कोरोनाच्या आधी असलेले नियम पुन्हा लागू करण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचीच शाळा परीक्षा केंद्र म्हणून न देता पूर्व प्रमाणे स्वतंत्र परीक्षा केंद्र दिल्या जाईल .तसेच परीक्षेसाठी देलेला 30मिनिटाचा अतिरीक्त वेळही रद्द करण्यात आला आहे ,अशी माहिती शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.