
Mail Motor Service Recruitment 2023
देशातील सर्वात मोठ्या पोस्टल नेटवर्कपैकी एक असलेल्या इंडिया पोस्ट विभागाने दहा रोमांचक नोकऱ्यांची उपलब्धता जाहीर केली आहे. स्थिर रोजगाराच्या शोधात असलेल्या व्यक्तींसाठी ही एक विलक्षण संधी आणि देशाच्या आवश्यक पोस्टल सेवांमध्ये योगदान देण्याची संधी आहे.चला तर या पदांविषयी संपूर्ण माहिती पाहूयात.मेल मोटार सर्व्हिसने 2023 सालासाठी आपली भर्ती मोहीम जाहीर केली आहे, ज्याने टपाल विभागात सामील होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी नोकरीच्या आकर्षक संधी उघडल्या आहेत.
Mail Motor Service Recruitment 2023: भारतीय पोस्ट विभागामध्ये (India Post office) नोकरी करू इच्छित असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडिया पोस्ट ऑफिस अंतर्गत मेल मोटार सर्विसमध्ये (Mail Motor Service) भरती निघाली असून, यासंदर्भातली अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही भरती मुंबई या ठिकाणी होणार आहे. पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
रिक्त पदांचा तपशील
भारतीय पोस्ट विभागामध्ये एकूण दहा रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ही पदे ‘कुशल कारागीर या पदासाठी भरण्यात येणार आहे. यामध्ये विविध पदे आहेत. कोण-कोणत्या पदासाठी किती जागा निश्चित करण्यात आले आहेत, आपण हे सविस्तर जाणून घेऊ. “मेकॅनिकल” या पदासाठी एकूण 3 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. “वेल्डर” या पदासाठी १ रिक्त जागा भरण्यात येणार आहे. “मोटार वाहन इलेक्ट्रिशन या पदासाठी २ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. “टिनस्मिथ” या पदासाठी १ रिक्त जागा भरण्यात येणार आहे. “टायरमन” या पदासाठी १ रिक्त जागा भरण्यात येणार आहे. पेंटर आणि लोहार या पदासाठी १-१ रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

💚व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा-येथे क्लिक करा💚
शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे:
पोस्ट विभागामध्ये नोकरी करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांच्या पात्रतेविषयी जाणून घ्यायचे झाल्यास, कोणत्याही मान्यता प्राप्त सरकार संस्थेकडून संबंधित विषयाचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. सोबतच उमेदवार इयत्ता आठवी पास आणि संबंधित व्यापारामध्ये एका वर्षाचा अनुभव बंधनकारक आहे. “मेकॅनिक” या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे वाहने चालवण्याचा परवाना असणे बंधनकारक आहे.
वयोमर्यादा जाणून घ्या:
इंडिया पोस्ट विभागात नोकरी करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांचे वय 01 जुलै 2023 रोजी 18 ते 30 या दरम्यान असणे आवश्यक आहे. सरकारी नियमानुसार वयोमर्यादित सूट दिली जाणार आहे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षाची अतिरिक्त सूट मिळणार आहे. SC / ST या प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षाची अतिरिक्त सूट दिली जाणार आहे. SC ST प्रवर्गासाठी ही फारच आनंदाची बातमी आहे.
परीक्षा फी / पगार / नोकरीचे ठिकाण
इंडिया पोस्ट विभागामध्ये भरती होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 19 हजार 900 रुपये पगार दिला जाणार आहे. उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. म्हणजेच तुम्हाला मोफत परीक्षा देता येणार आहे. निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या नोकरीचे ठिकाण हे मुंबईमध्ये असणार आहे. याची सर्व उमेदवारांनी दक्षता घ्यायची आहे.
या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी पात्रता पूर्ण केलेला उमेदवार तसेच ज्या उमेदवारांचे ड्रायव्हिंग लायसन वैद्य आहे, अशा उमेदवारांची एक स्पर्धात्मक चाचणी घेतली जाणार आहे. यामधून जे कारागीर कुशल आहेत अशांची निवड केली जाईल. जे उमेदवार या पात्रतेमध्ये बसणार आहेत, अशा उमेदवारांना पत्राद्वारे अभ्यासक्रम कोणता असेल? आणि परीक्षेची तारीख, त्याचबरोबर स्थळ स्वतंत्रपणे निश्चित केले जाणार आहे. जे उमेदवार पात्र नसणार आहेत, अशांना कोणत्याही प्रकारची सूचना दिली जाणार नाही.
💁असा पाठवा अर्ज:
इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे. व्यवस्थापक, मेल मोटर सेवा, जीपीओ कंपाउंड, सिव्हिल लाइन्स, नागपूर – ४४००१ या पत्त्यावर इच्छूक आणि पात्र उमेदवारांना अर्ज आहे.
सर्व उमेदवारांना सुचित करण्यात येते की अर्जाच्या तारखेच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे तारखे नंतर अर्ज स्वीकारण्यात येत नाहीत.
निष्कर्ष:
भारतीय टपाल विभागाने दहा रिक्त पदांची घोषणा केल्याने एखाद्या प्रतिष्ठित सरकारी संस्थेत नोकरी शोधणाऱ्या व्यक्तींसाठी एक उत्कृष्ट संधी उपलब्ध आहे.“मेकॅनिकल”,’कुशलकारागीर,“वेल्डर”,“मोटार वाहनइलेक्ट्रिशन,“टिनस्मिथ”,”टायरमन”होण्याची इच्छा असेल तर, विविध कौशल्ये आणि आवडीनुसार विविध भूमिका उपलब्ध आहेत. इंडिया पोस्ट डिपार्टमेंटमध्ये सामील होऊन, तुम्ही केवळ देशाच्या पोस्टल नेटवर्कमध्ये योगदान देत नाही तर कार्यक्षमतेने आणि सचोटीने जनतेची सेवा करण्यासाठी वचनबद्ध टीमचा एक भाग बनता. तर, या संधीचे सोने करा आणि आजच इंडिया पोस्टमध्ये एक परिपूर्ण करिअर सुरू करा!
आशा आहे की ,तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुमच्यासाठी खूप खूप उपयुक्त ठरेल.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा💙