MSF Bharti 2023: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत पदभरती लवकरच होणार!ही संधी सोडुच नका!शेवटची तारीख जवळ!

Table of Contents

MSF Bharti 2023 New update:

MSF Bharti 2023: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत पदभरती लवकरच होणार!ही संधी सोडुच नका!शेवटची तारीख जवळ!

MSF Bharti 2023: नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आजची नवीन अपडेट म्हणजेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुख्यालय मुंबई येथे महामंडळाच्या मुख्यालयात “संगणक तंत्रज्ञ “या पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून,भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जर मित्र- मैत्रिणींनो तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी सोडू नका.

💁‍♀️MSF Bharti 2023 online form date:

🔸अर्ज सुरू दिनांक : 11 सप्टेंबर 2023 रोजी पासून ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत.

🔸अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत :-
२२.०९.२०२३ पर्यंत वेळ १८.०० वाजेपर्यंत.

💁‍♀️अर्ज सादर करण्याची पध्दत :-

१. इच्छुक व पात्र उमेदवार https://forms.gle/Mc3ppBb2nBQa1AxX7 या लिंकवर जाऊन आपला अर्ज सादर करावा. तसेच अर्ज सादर केल्यानंतर त्याची पोचपावती (Acknowledgment) empanelment.mssc@gmail.com या ई मेल आयडी वर पाठवावेत. ऑनलाईन (Online)पद्धतीनें अर्ज स्विकारण्यात येणार आहेत.

💁‍♀️मुलाखतीसाठी हजर रहावयाचे ठिकाण व दुरध्वनी क्र. :-

पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – १, ३२ मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई ४०० ००५.
दूरध्वनी: (०२२) २२१५ १८४७, फॅक्स : (०२२) २२१५१८६७.)

💁‍♀️मुलाखतीवेळी उमेदवारांनी सादर करावयाची कागदपत्रे :-

१) वैयक्तिक माहिती ( BIO-DATA)

२) शैक्षणिक कागदपत्रे.

३) अनुभव प्रमाणपत्र

४) ०२ पासपोट साईज आकाराचे फोटो / पॅन कार्ड / आधार कार्ड.

💁‍♀️निवड प्रक्रिया :-

१. उमेदवारांच्या प्राप्त कागदपत्रानुसार मुलाखतीसाठी बोलाविण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल. किमान अर्हता प्राप्त उमेदवारांना मुलाखतीची वेळ दिनांक याबाबत भ्रमणध्वनी तसेच ई-मेलव्दारे कळविण्यात येईल..

२. उमेदवारांची महामंडळाचे कार्यालयात मुलाखत घेतली जाईल.

३. मुलाखत, अनुभव इ. वर आधारित उमेदवारांची नामिकासुची (प्रतिक्षाधीन यादी) तयार करण्यात येईल आणि महामंडळात उपलब्ध जागेनुसार या सूचीमधील गुणानुक्रम विचारात घेऊन नियुक्ती दिली जाईल.

४. निवडलेल्या उमेदवारास महामंडळाच्या अटी व शर्तीसह नियुक्ती पत्र दिले जाईल.

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा💚

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 💙

💁‍♀️नियुक्ती किती वर्षांसाठी असणार:

दिली जाणारी नियुक्ती ही करार पध्दतीने कंत्राटी तत्वावर ०१ वर्षांसाठी असेल व महामंडळाची आवश्यकता आणि प्रस्तुत कर्मचऱ्यांची क्षमता, आत्मसात केलेले ज्ञान व इतर निकष यानुसार करार नुतनीकरण करण्यात येईल.

💁‍♀️इतर सुचना :-

१. मुलाखतीसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर राहावे लागेल.

२. प्रस्तुत जाहिरातीत नमुद करण्यात आलेली पदसंख्या यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

३. सदर निवड प्रक्रिया कोणत्याही वेळी / कोणत्याही कारणास्तव / कोणत्याही टप्प्यावर / पुर्णत: किंवा
अंशतः रद्द करण्याचा / फेरबदल करण्याचा अधिकार महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई यांचेकडे
राखून ठेवण्यात आलेला आहे.

४. उमेदवारांच्या नेमणुकीबाबत अंतिम निर्णय महामंडळाचा असेल.

सविस्तर जाहिरात व अधिक माहिती करिता maharashtra.gov.in वेबसाईटला भेट द्यावी.

💁‍♀️मासिक वेतन : 25,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.

🟨जाहिरात:येथे क्लिक करा
🟥अर्ज:येथे क्लिक करा
🟨अधिकृत संकेतस्थळ:येथे क्लिक करा

Leave a Comment