MSRTC Dhule Bharti 2023:परिवहन महामंडळ धुळे अंतर्गत १० वी पास उमेदवारांसाठी पदभरती! 21 ते 43 वयोगटातील उमेदवारांना करता येणार अर्ज! अर्जासाठी थोडेच दिवस शिल्लक!

MSRTC Dhule Bharti 2023:परिवहन महामंडळ धुळे अंतर्गत १० वी पास उमेदवारांसाठी पदभरती! 21 ते 43 वयोगटातील उमेदवारांना करता येणार अर्ज! अर्जासाठी थोडेच दिवस शिल्लक!

Table of Contents

MSRTC Dhule Bharti

नमस्कार, मित्र आणि मैत्रिणींनो तुमच्यासाठी आम्ही आज एक धमाकेदार अपडेट घेऊन आलेलो आहोत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे अंतर्गत एकूण 50 जागा भरण्यासाठी पदभरती होणार आहे आणि या पदभरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ही भरती “ड्रायव्हर (प्रशिक्षणार्थी)” या पदासाठी होणार आहे.१० वी पास उमेदवार या पदासाठी अर्ज करायला पात्र आहेत चला तर मग बघुयात या पदभरतीची संपूर्ण माहिती.

MSRTC Dhule Bharti 2023:ऑफलाइन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज सादर करायचे आहेत.23 ऑक्टोबर 2023 पर्यंत दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

शनिवार 07 ऑक्टोबर 2023 रोजी प्रकाशित झालेल्या जाहिरातीनुसार, राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागात, फक्त धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील अनुसूचित जमातीचे रहिवासी उमेदवार ‘ड्रायव्हर आणि कंडक्टर” या पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. 21 ते 43 वर्षांच्या दरम्यान असणारे उमेदवारी या भरतीसाठी पात्र आहेत.

💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

MSRTC Dhule Bharti mahiti 2023:

1️⃣ पदाचे नांव: चालक तथा वाहक (प्रशिक्षणार्थी) (प्रतीक्षा यादीकरिता)
2️⃣ जागा: 50 (मात्र पन्नास) फक्त अनुसूचित जमातीचे उमेदवारांसाठी
3️⃣ प्रशिक्षण कालावधी: 6 (सहा) महिने
4️⃣ विद्यावेतन: रुपये 450/- दरमहा
5️⃣ शैक्षणिक अर्हता: इयत्ता 10 वी (दहावी/एस.एस.सी.) पास असणे आवश्यक.
6️⃣ वयोमर्यादा: उमेदवारांचे वय कमीत कमी 21 वर्षे व जास्तीत जास्त 43 वर्षे
7️⃣ शारीरिक पात्रता (उंची): कमीत कमी 160 सें.मी. व जास्तीत जास्त 180 सें.मी.
8️⃣ दृष्टी: चष्मा विरहीत 6/6 निर्दोष दृष्टी (रंग आंधळेपणा किंवा रातांधळेपणा हा दोष असल्यास अपात्र)
9️⃣ वाहन चालविण्याचा परवाना: परिवहन अधिकारी यांचेकडील अवजड वाहन चालविण्याचा नियमित अथवा शिकाऊ परवाना अथवा 1 वर्षांचे हलके मोटार वाहन चालविण्याचा वाहतूक परवाना आवश्यक आहे.

उमेदवारांना देण्यात आलेल्या महत्त्वाच्या सूचना:

🌟 जाहिरातीतील पदसंख्येत बदल करण्याचा अथवा जाहिरात रद्द करण्याचा अधिकार रा.प. महामंडळास राहिल.

🌟 उमेदवारांची निवड रा.प. महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार रिक्त जागा व आरक्षण विचारात घेऊन करण्यात येईल.

🌟अर्जातील संपूर्ण माहिती खरी व अचूक भरणे आवश्यक आहे.तसेच रिक्त पदाच्या उपलब्धतेनुसार आणि आवश्यकतेनुसार नेमणुका करण्यात येईल.

अर्ज विचारात घेतला जाणार नाही:

🔸 अर्ज विहीत नमुन्यात सर्व दृष्टीने पूर्ण असावा. (अर्जाचा नमुना सोबत जोडलेला आहे) अपूर्ण माहिती दिली असल्यास किंवा आवश्यक ते प्रमाणीत दाखले जोडले नसल्यास अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

🔸अलीकडच्या काळात काढलेले पासपोर्ट आकारातील स्वतःचे छायाचित्र स्व-स्वाक्षरीसह अर्जावर नमूद केलेल्या ठिकाणी चिकटवावे.

🔸पत्र व्यवहाराचा पत्ता आणि कायमस्वरूपी पत्ता सुस्पष्ट व पोष्टाचा पिनकोडसह व्यवस्थित वाचता येईल, असा लिहावा…

🔸 उमेदवाराने अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक अर्हता पासची गुणपत्रिका, वाहन चालविण्याचा परवाना, जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राच्या दाखल्याच्या साक्षांकित प्रती स्पष्ट दिसतील अशा स्वरुपात जोडणे आवश्यक आहे..

🔸 उमेदवारांने समक्ष अथवा योग्य त्या साधानाद्वारे (टपालाने) अर्ज पाठवावा. टपालाद्वारे पाठविलेले अर्ज विहीत मुदतीत प्राप्त होतील अशा बेताने पाठविण्यात यावे. टपाल खात्यामुळे अर्ज वेळेत प्राप्त न झाल्यास त्यांस रा.प. महामंडळ जबाबदार राहणार नाही.

🔸निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवाराने चुकीची माहिती प्रमाणपत्र / कागदपत्रे किंवा कोणतीही माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची उमेदवारी कुठलीही पूर्व सुचना न देता रद्द करण्यात येईल.

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

🔸 उमेदवाराने भरती प्रक्रिया शुल्क म्हणून रुपये २५०/- मात्र एम. एस. आर. टी. सी. फंड अंकाऊन्ट, धुळे या नावाने राष्ट्रीयकृत बँकेचा मागणी धनाकर्ष (डिमांड ड्रॉप्ट)/ पोस्टल ऑर्डर अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. भरती प्रक्रिया शुल्क इतर कोणत्याही स्वरुपात स्विकारले जाणार नाही. मागणी धनाकर्ष (डिमांड ड्रॉप्ट) चा मागे उमेदवाराने त्यांचे संपूर्ण नाव व पत्ता आणि दुरध्वनी क्रमांक लिहीणे आवश्यक आहे. उमेदवारांने
पाठविलेले भरती प्रक्रिया शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.

🧑🏻‍💼अर्जदारांना खालील सर्व सूचनांचे पालन करावे लागणार:

☑️ अंतिम निवड करण्यात आलेल्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना त्यांचे जमातीचे वैधता प्रमाणपत्र तसेच वाहकाचा परवाना व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच नेमणूक देण्यात येईल.

☑️ अंतिम निवड करण्यात आलेल्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना त्यांचे जमातीचे वैधता प्रमाणपत्र तसेच वाहकाचा परवाना व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच नेमणूक देण्यात येईल.

☑️ रा.प. महामंडळ धुळे विभागाने कोणत्याही इतर व्यक्तीला अथवा संस्थेला अर्ज विकणे/स्विकारणे इ. अधिकार दिलेले नाहीत यांची नोंद घ्यावी.

☑️ एखाद्या उमेदवाराने भरतीचा कोणत्याही टप्प्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला किंवा अनुचित माध्यमाचा अवलंब केला किंवा तोतया व्यक्तीचा माध्यमातुन अनुचित प्रकार चुकीचे/खोटे दस्ताऐवज सादर केल्याचे आढळून आल्यास त्या उमेदवारास भरती प्रक्रियाच्या कोणत्याही टप्प्यातून अथवा निवडीतून अपात्र घोषित करण्यात येईल.

☑️ कोणताही अर्ज कोणतेही कारण न देता नाकारणे वा स्वीकारणे किंवा सदर जाहिरात पूर्णतः वा अशंतः रद्द करण्याचे अधिकार रा.प. महामंडळ राखून ठेवीत आहे.

☑️ निवड झालेल्या उमेदवारास यशस्वी प्रशिक्षणाअंती परिस्थीतीनुसार तसेच रा.प. महामंडळाच्या धोरणानुसार महाराष्ट्र राज्यात कोणत्याही विभागात नेमणुक देण्यात येईल.

☑️ अर्ज स्विकारण्याची अंतीम मुदत दिनांक २३.१०.२०२३ (सोमवार) १७:०० पर्यंत राहील. मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज कोणत्याही परिस्थीतीत स्विकारले जाणार नाहीत. तसेच पोस्टाने किंवा तत्सम माध्यमाने झालेल्या विलंबाची जबाबदारी रा.प. महामंडळाची राहणार नाही, यांची नोंद घ्यावी.

☑️ सदर जाहिरातीस म.रा.मा.प. महामंडळाच्या सरळसेवा भरती धोरणानुसार सर्व नियम, अटी व शर्ती लागू राहतील.

☑️ जाहिराती सोबत जोडण्यात आलेल्या विहित नमुन्यातील छापील अर्जातच अर्ज सादर करण्यात यावा. इतर नमुन्यातील अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

🔗PDF जाहिरात: CLICK HERE.

🔗ऑनलाईन अर्ज करा: CLICK HERE.

🔗अधिकृत वेबसाईट: CLICK HERE.

📣एक पाऊल प्रगतीच्या दिशेने:
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙


💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

Leave a Comment