Mumbai Police Bharti 2023

Mumbai Police Bharti 2023
मुंबई पोलीस भरती आजची सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजेच मुंबई पोलीस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला आहे. ही भरती प्रक्रिया राज्य सुरक्षा मंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने 11 महिन्यांसाठी भरती घेण्यात येणार असून गृह खात्याने पहिल्यांदाच अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे.ही भरती प्रक्रिया राबविण्यामगील कारण म्हणजेच मुंबई पोलिसांकडे मनिष्यबळाची कमतरता भासत आहे.
आपल्याला माहीतच आहे की,राज्य सरकारी सेवेत कंत्राटी भरतीवरून वाद झाला आणि याचाच पर्याय म्हणून आता पोलीस दलातही कंत्राटी भरती राबविण्यात येणार आहे.आणि गृह खात्याच्या निर्णयानुसार मुंबई पोलीस दलासाठी शिपाई ते सहाय्यक निरीक्षक यांची ४०,६२३ पदे मंजूर करण्यात आली आहेत.आणि या सर्व पदांपैकी १० हजार पदे रिक्त आहे.
मित्रांनो, राज्य सरकारने २१ जानेवारी २०२१ रोजी ७,०७६ शिपाई आणि ९९४ वाहनचालकांच्या भरतीला मंजुरी दिली आहे.आणि ही भरतीप्रक्रिया आणि तसेच शिपायांचे प्रशिक्षण पूर्ण व्हायला आणि ते मनुष्यबळ पोलिस खात्यात दाखल होण्यास दोन वर्षे लागणार आहेत.आणि तोपर्यंत ही समस्या दूर करण्यासाठी कंत्राटी पोलिसांची नियुक्ती ११ महिन्यांसाठी केली जाणार आहे.
पोलिस दलात मनुष्यबळाची तीव्र टंचाईचे कारण काय?
उत्तर:पोलीस दलात मनुष्यबळाची तीव्र टंचाईचे कारण म्हणजेच
राजकीय नेत्यांच्या संरक्षण आणि तसेच दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, रमजान, दिवाळी या सर्व सणाच्या काळामध्ये
बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांची गरज भासते. ही पोलिस खात्यातील पोलीस दलात मनुष्यबळाची तीव्र टंचाईचे कारण आहे.
⭕अधिकृत वेबसाईट=येथे क्लिक करा | टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙 |
Jobs येथे क्लिक करा | 💚व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा 🪀 |
आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.