Police Bharti 2023

नमस्कार, मित्र आणि मैत्रिणींनो तुमच्यासाठी आज आम्ही एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. तर, आजची आनंदाची बातमी म्हणजेच पदवीधर उमेदवारांसाठी 1876 जागांवर भरती प्रक्रिया होणार आहे. या भरतीद्वारे पोलीस उपनिरीक्षकांची पदे भरण्यात येणार आहे. चला तर बघुयात या भरती प्रक्रियेविषयीची संपूर्ण माहिती.
परीक्षेचे नाव: दिल्ली पोलीस & CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2023
💁♀️बघुयात कोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत.
या भरतीमध्ये दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी)
पुरुष उमेदवारांची एकूण 109 पदे भरण्यात येणार आहे.तर
दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) महिला उमेदवारांची एकूण 53 पदे भरण्यात येणार आहे.CAPF मधील उपनिरीक्षक (GD) या पदासाठी 1714 जागा भरायच्या आहे. पदवीधर उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत. आणि या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना भारतभर कुठेही नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा-येथे क्लिक करा 💚
💁♀️बघुयात माहिती वयोमर्यादा विषयी
वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 25 वर्षे. SC/ST उमेदवारांसाठी पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे.तर OBC उमेदवारांसाठी तीन वर्षाची सूट देण्यात आलेली आहे.
💁♀️अर्ज शुल्काविषयी माहिती:
General/OBC उमेदवारांसाठी शंभर रुपये फी आहे. तर SC/ST/EXSM /महिला उमेदवाराणा फी देण्याची आवश्यकता नाही.
💁♀️परीक्षा विषयीची माहिती:
परीक्षा CBT मोडवर ऑक्टोबर 2023 मध्ये होणार आहे.15 ऑगस्ट 2023 (11:00 PM)पर्यंत तुम्ही या भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
