
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अहमदनगर जिल्हापरिषदेअंतर्गत पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अहमदनगरमधील जिल्हा परिषदेच्या 19 संवर्गातील 937 जागा भरायच्या आहेत. 937 जागांपैकी 727 जागा या आरोग्य विभागाच्या आहेत, आणि ग्रामविकास विभागाच्या आदेशावरून जिल्हा परिषदेने रिक्त जागांसाठीचा अंतिम आराखडा राज्य सरकारला पाठवण्यात आला आहे.
राज्य सरकारला पाठवलेल्या आराखड्यानुसार जिल्हा परिषदेतील सर्व विभागांच्या गट ‘क’ संवर्गातील 927 जागा भरण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार पहिल्या टप्प्यामध्ये गट ‘क’ मधील रिक्त जागा भरायक्या आहे आणि त्यानंतर गट ड मधील रिक्त जागा विचारा आयबीपीएस कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत घेतल्या जाण्याची शक्यता आहे.
राज्यामधील जिल्हा परिषदांमधील भरती आयबीपीएस कंपनी मार्फत राबविण्यात येणार आहे. आणि भरतीसाठी प्रत्येक जिल्ह्याची स्वातंत्र्य जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आयपीपीएस कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
जर उमेदवार जिल्हा परिषदेत सरळ सेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या पदांसाठी अर्ज करणार असेल तर अशा उमेदवारांना दोन वर्ष वयोमर्यादेमध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे.
🌟व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा-येथे क्लिक करा 💚
जिल्हा परिषद भरतीसाठीची अधिकसूचना परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आणि तसेच या भरतीची जाहिरात वृत्तपत्रामध्ये छापून येणार आहे.

आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुमच्यासाठी खूप खूप उपयुक्त ठरेल.