Hingoli marathi mahiti, hingoli Jilha Mahiti, hingoli Information In Marathi, hingoli District Information,hingoli pin code maharashtra
हिंगोली जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास –hingoli Information in Marathi 2024
हिंगोली जिल्हा
मराव सत्तेच्या काळात हिंगोली जिल्ह्याच्या भूमीवर सन १८०३ या वर्षी टिपू सुलतान व मराठा यांच्यातील युद्ध चांगलेच गाजले. मराठवाड्यातील हिंगोली हे निझामाच्या लष्कराचे महत्वाचे ठाणे असल्यामुळे, हैदराबाद संस्थानात हिंगोली निझामशाहीचा महत्त्वपूर्ण घटक मानला जात असे. स्वातंत्र्योत्तर काळात सन १९५६ च्या राज्यपुनर्रचना कायद्यानुसार हा जिल्हा मराठवाड्याबरोबर मुंबई प्रांताच्या अधिपत्याखाली आला. त्यानंतर १९६० मध्ये हा भाग परभणी जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आला. पुढे १ मे १९९९ रोजी परभणीचे विभाजन करून हिंगोली हा स्वतंत्र जिल्हा बनविण्यात आला.
हिंगोली जिल्हा संक्षिप्त माहिती
(२) भौगोलिक स्थान : हिंगोली जिल्ह्याच्या उत्तरेला वाशीम, पूर्वेला यवतमाळ व नांदेड; दक्षिणेला परभणी, पश्चिमेला जालना व परभणी आणि वायव्येला बुलडाणा हे जिल्हे आहेत. हिंगोली जिल्ह्याच्या उत्तर भागात अजिंठ्याची डोंगररांग पसरलेली आहे. या डोंगररांगांना हिंगोली टेकड्या असे म्हटले जाते.
(३) उपविभाग व तालुके : सिहगोली जिल्ह्यात हिंगोली, औंढा
नागनाथ व वसमत हे तीन उपविभाग असून, सेनगाव, हिंगोली,
वसमत, कळमनुरी व औंढा नागनाथ हे पाच तालुके आहेत.
(४) प्रमुख पिके : हिंगोली जिल्ह्यातील ज्वारी प्रमुख अन्नधान्याचे पीक असून, हे पीक खरीप व रब्बी या दोन्ही हंगामांत घेतले जाते. या जिल्ह्यातील वसमत तालुका हा ज्वारी उत्पादनात अग्रेसर आहे. कापूस हे नगदी पीक या जिल्ह्यातील दुसरे महत्त्वाचे पीक आहे. ज्या तालुक्यात सिंचनाच्या सोयी आहेत, त्या तालुक्यांमध्ये उसाची लागवड वाढत आहे. या जिल्ह्यातील काही भागातील जमीन ओलावा टिकवून ठेवणारी असल्यामुळे रब्बी हंगामातसुद्धा पिके घेतली जातात.
(५) नद्या व धरणे : जिल्ह्यात कयाधू, पूर्णा, पैनगंगा व
असना या प्रमुख नद्या वाहतात. या जिल्ह्यातील पूर्णा नदीवर सन १९५७ मध्ये येलदरी धरण प्रकल्प उभारण्यात आला आहे व या
ठिकाणी जलविद्युत केंद्र उभारण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यातील दुसरे प्रमुख धरण म्हणजे औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरण होय. अप्पर पैनगंगा धरणाचा उपयोग कळमनुरी तालुक्यातील काही गावांना सिंचनासाठी होतो.
(६)उद्योग व व्यवसाय : या जिल्ह्यात हिंगोली व कळमनुरी येथे सहकारी तत्त्वावरील औद्योगिक वसाहती आहेत. हिंगोली येथे मेंढीच्या लोकरीपासून घोंगड्या विणण्याचा उद्योग, कातडी कमावून त्यापासून वस्तू तयार करण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो.कळमनुरी येथील हातमाग उद्योग व वसमत तालुक्यात रेशीमकिडे जोपासण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो.
(७)दळणवळणः हिंगोली जिल्ह्यामधून राष्ट्रीय महामार्ग जात नाही. मात्र, नांदेड-अकोला, परभणी-यवतमाळ व जिंतूरनांदेड हे महत्त्वाचे राज्यमार्ग (रस्ते) जातात. हिंगोली जिल्ह्याच्या मध्यभागातून अकोला-पूर्णा हा लोहमार्ग जातो.
हिंगोली जिल्ह्याची वैशिष्ट्ये
- महाभारत काळात हिंगोलीचे नाव एकचक्रा नगरी असे होते.
- औंढा नागनाथ हे भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग आहे.
- नरसी हे गाव संत नामदेवांचे जन्मगाव असल्याचे मानले जाते.
- विसोबा खेचर हे एक थोर संत होऊन गेले असून, ते संत नामदेवाचे गुरू होते.
- १ मे १९९९ रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन करून ‘हिंगोली’ हा नवीन जिल्हा अस्तित्वात आला.
- हिंगोली जिल्ह्यात सिद्धेश्वर पूर्णा नदीवर धरणे बांधण्यात आली आहेत.
- सेनगाव तालुक्यातील खैरी घुमट येथे श्री कानिफनाथाचे भव्य असे प्राचीन मंदिर आहे. मंदिर उंच डोंगरावर असून एखाद्या किल्याप्रमाणे त्याची रचना आहे. किल्ल्याच्या आवारात नाथपंथाच्या नऊ गुरूंची घुमट स्वरूपात मंदिरे आहेत.
सांख्यिकीक हिंगोली सर्व माहिती
(अ) भौगोलिक माहिती
१. क्षेत्रफळ=४,५२६ चौ.किमी.
२. जंगलाचे प्रमाण =२.४६%
(आ)प्रशासकीय माहिती
१. आयुक्तालय =औरंगाबाद विभाग
२. जिल्ह्याचे मुख्यालय =हिंगोली
३. उपविभाग= ०३ (हिंगोली, औंढा नागनाथ ववसमत)
४. तालुके= ०५ (सेनगाव, हिंगोली, वसमत,कळमनुरी व औंढा नागनाथ)
५. पंचायत समित्या =०५
६. ग्रामपंचायत= ५६३
७. नगरपालिका= ०३
८. नगरपंचायत =०२(औंढा नागनाथ, सेनगाव)
९. पोलीस मुख्यालय=०१ ग्रामीण पोलीस अधीक्षक
१०. पोलीस स्टेशनची संख्या =१२
(इ)लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनुसार)
१. लोकसंख्या =११,७७,३४५
२. साक्षरता=७८.१६%
३. लिंग गुणोत्तर=९४२
४. लोकसंख्येची घनता=२४४
हे पण वाचा >>
बीड जिल्हा माहिती
औरंगाबाद जिल्हा माहिती
वाशिम जिल्हा माहिती
यवतमाळ जिल्हा माहिती
तुम्हाला हिंगोली जिल्ह्या संपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे अश्याच माहिती साठी MaharashtraBoardSolutions.Net ला नक्की भेट द्या.
Final Word: आम्हाला आशा आहे की तुम्हाला हिंगोली जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – hingoli District Information In Marathi तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीला हा लेख नक्की शेअर करा आणि Maharashtra Board Solutions ला भेट द्यायला विसरू नका.