Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter Solutions मुलाखत लेखन (Mulakhat Lekhan Notes) Textbook Exercise Important Questions and Answers.
Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter मुलाखत लेखन
12th Marathi Guide Prashn uttar Chapter मुलाखत लेखन Textbook Questions and Answers.
★कृती.
★ कृती १. – (अ)
खालील मुद्द्यांविषयी माहिती लिहा.
(अ) मुलाखतीची पूर्वतयारी. (सप्टें., २०२१)
(आ) मुलाखतीचा समारोप.(सप्टें., २०२१; मार्च, २०२२)
उत्तरःमुलाखतीची पूर्वतयारी : मुलाखत हे व्यक्तीला समजून घेण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. मुलाखती च्या निमित्ताने समाज जीवनातील ‘त्या’ व्यक्तीच्या जीवनाचा व कर्तृत्वाचा वेध घेतला जातो. मुलाखत चांगली होण्यासाठी पूर्वतयारीच्या गृहपाठाची आवश्यकता असते. मुलाखतीच्या पूर्वतयारीमध्ये खालील बाबींचा समावेश होतो.
मुलाखत हा दोन व्यक्तींमधला पूर्वनियोजित असा संवाद असतो. म्हणूनच मुलाखत घेणाऱ्याने संबंधित व्यक्तीशी विचारविनिमय करून मुलाखतीचा दिवस, वेळ, स्थळ यांबरोबरच मुलाखतीचा विषय, उद्दिष्ट अशा बाबी अगोदर निश्चित कराव्यात.
ज्या व्यक्तीची मुलाखत घ्यावयाची आहे त्यांच्याबद्दलची आवश्यक ती माहिती मुलाखत घेण्यापूर्वी मिळवावी. यात त्या व्यक्तीचे संपूर्ण नाव, असल्यास टोपणनाव, जन्मदिवस, जन्मस्थळ, पत्ता, शिक्षण, कौटुंबिक माहिती, कर्तृत्व, सध्याचे कार्य, मिळालेले मान-पुरस्कार इत्यादींची माहिती मिळवावी.
मुलाखतीचा विषय व उद्दिष्ट लक्षात घेऊन, प्रत्यक्ष मुलाखतीत विचारावयाचे नेमके प्रश्न तयार करावेत. मुलाखतीचा वेळ लक्षात घेऊन प्रश्नसंख्या निश्चित करावी.
मुलाखतीचे स्वरूप –
प्रकट, लिखित, मौखिक वा ध्वनिमुद्रित कशा प्रकारचे आहे हे मुलाखतकाराने लक्षात घ्यावे. मुलाखत प्रत्यक्ष श्रोत्यांसमोर आहे, की रेडिओ-टि.व्ही. साठी आहे हे माहीत करून घ्यावे व त्यासाठी आवश्यक नियोजन काय करावे लागेल – जसे बैठकव्यवस्था, ध्वनिक्षेपक व्यवस्था इत्यादीबाबात विचार करावा. मुलाखतीत सादर माहितीबाबत आवश्यक ते संदर्भग्रंथ, चित्रे अगोदरच पाहून ठेवावी. आवश्यक असेल तर मुलाखत देणाऱ्यांना अगोदर भेटावे, त्यांच्याशी चर्चा करावी.
करावयाच्या स्वरूपाच्या मुलाखतीत वाचकवर्ग व रेडिओ,
लिखित टि.व्ही. साठी असलेल्या श्रोतृवृदांचा विचारही मुलाखत घेण्यापूर्वी करणे आवश्यक आहे.
मुलाखत घेण्यापूर्वी मुलाखतीची पूर्वतयारी केल्यास मुलाखत घेणे सुकर, सुलभ व सोपे होते.
(आ) मुलाखतीचा समारोप:
आकर्षक प्रारंभ विषयाशी संबंधित नेमक्या प्रश्नातून पुढे सरकणाऱ्या मुलाखतीत योग्य समारोपही महत्त्वाचा असतो. सुरुवात, मध्य व समारोप या क्रमाने मुलाखत प्रक्रिया पार पडत असते. उत्तरोत्तर रंगतदार होत चाललेल्या मुलाखत प्रक्रियेत मुलाखतीचा सामारोपही अत्यंत महत्त्वाचा आहे. मुलाखतकाराने योग्य ठिकाणी थांबणे आवश्यक आहे. मुलाखतीच्या समारोप प्रक्रियेचे स्वरूप कळसाध्यायाचे असावे.
मुलाखतकाराने आपले सारे भाषिक कौशल्य पणाला लावून मुलाखतीत श्रोत्यांच्या समाधानाचे अनेक रंग भरले असले तरी समारोपाचा तो क्षण महत्त्वाचा आहे. ‘अरे फारच लवकर संपली मुलाखत’ अशी प्रतिक्रिया श्रोत्यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. मुलाखतीचा समारोप करताना प्रश्नांऐवजी प्रभावी परिणामकारक निवेदन योग्य असा परिणाम नक्कीच साधते.
मुलाखत योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी संपवावी. मुलाखत वाचणाऱ्या / ऐकणाऱ्या श्रोत्यांना जराही अंदाज येणार नाही इतक्या अनपेक्षितपणे मुलाखतीचा समारोप झाला पाहिजे. मुलाखत अजूनही हवीहवीशी असतानाच तिचा योग्य प्रकारे समारोप व्हावा. मुलाखत निमित्ताने खूप काही भरभरून मिळाल्याचे समाधान श्रोते / वाचकांना मिळावे. मुलाखतीतील काही अविस्मरणीय संवादांना आठवत श्रोते / वाचक मुलाखत विश्वातून बाहेर पडावेत. म्हणजे मुलाखत यशस्वी झाली असे अवश्य म्हणता येईल. वाचक, श्रोत्यांच्या मनात राहणारी मुलाखत यशस्वी होते. यासाठी मुलाखतीचा समारोप परिणामकारक पद्धतीने करणे आवश्यक आहे.
★ कृती – २. थोडक्यात उत्तरे लिहा. (सप्टें., २०२१)
(अ) मुलाखतीचे प्रमुख हेतू तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर : वृत्तपत्रे, मासिके, दिवाळी अंक, आकाशवाणी, दूरदर्शन इत्यादी प्रसारमाध्यमांसाठी नानाविध मुलाखती घेतल्या जातात, मुलाखत घेण्यासाठी मुलाखतकाराचे अनेक हेतू असतात. मुलाखत देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे नानाविध पैलू समजून घेण्यासाठी, त्या व्यक्तींच्या जीवन संघर्षाची भाषा मुलाखत निमित्ताने जनसामान्यांपर्यंत पोहचते. मुलाखत देणाऱ्या व्यक्तीच्या कर्तृत्वाबरोबरच त्या व्यक्तीच्या आत दडलेला माणूस समजून घेण्यासाठी मुलाखत घेतली जाते. समाजजीवनातील विचारवंतांची विविध विषयांवरील मते जाणून घेण्यासाठी, एखादया तज्ज्ञ व्यक्तीकडून नवीन माहीत करून घेण्यासाठी मुलाखत घेतली जाते. अनेकदा एखादी घटना सखोलपणे समजून घेण्यासाठी घेतली जाते. याबरोबरच मुलाखत समाजाचे प्रबोधन करण्यासाठी, जनजागृतीसाठी, विविध कलांचा उत्तम रसास्वाद घेण्यासाठी मुलाखती घेतल्या जातात. थोडक्यात, व्यक्तीला समजून घेण्यासाठी, जनजागृतीसाठी मुलाखती घेतल्या जातात.
(आ) व्यक्तीमधील ‘माणूस’ समजून घेण्यासाठी मुलाखत असते, हे स्पष्ट करा.
उत्तरः मुलाखत हे व्यक्तीला समजून घेण्याचे अत्यंत प्रभावी असे माध्यम आहे. मुलाखत लोकप्रतिनिधी, कलावंत, खेळाडू, वैज्ञानिक, डॉक्टर, अध्यापक, व्यावसायिक उदयोजक, वकील, विशेषज्ञ, तंत्रज्ञ, लेखक, कवी, गिर्यारोहक, वैमानिक, ज्येष्ठ नागरिक, विचारवंत अशा अनेक कर्तृत्वसंपन्न व्यक्तींची घेतली जाते. ज्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात विशेष असा ठसा उमटविला आहे, जगावेगळी आव्हाने पेलून असामान्य कर्तृत्व गाजवले आहे अशा व्यक्तींचीही मुलाखत घेतली जाते.
ज्यांच्याजवळ सांगण्यासारखे काही आहे. ज्यांच्याजवळ ऐकण्यासारखे काही आहे अशा व्यक्तींची मुलाखत घेऊन त्या व्यक्तीच्या आत दडलेला माणूस समजून घेण्यासाठी प्रायः मुलाखत घेतली जाते. अनेकदा सामान्य माणसांचीही मुलाखत घेतली जाते. माणूस समजून घेणे म्हणजेच त्या व्यक्तीचे वेगळेपण समजून घेणे. समाजासाठी त्यांनी केलेले काम समजून घेणे. जीवनातील संघर्ष जाणून घेणे म्हणजेच त्यांच्यातील माणसाला समजून घेणे होय.
( इ )मुलाखत म्हणजे पूर्वनियोजन संवाद हे स्पष्ट करा.
उत्तर: मुलाखत म्हणजे व्यक्ती-व्यक्तींमधील संवाद, अर्थातच हा संवाद सहेतूक स्वरूपाचा असतो. मुलाखत स्वरूपातील हा संवाद पूर्वनियोजित स्वरूपाचा असतो. मुलाखतीच्या निमित्ताने होणाऱ्या संवादासाठी व्यक्ती, दिवस, वेळ, स्थळ, विषय, कालावधी इत्यादी बाबी अगोदरच ठरवल्या जातात आणि नंतरच मुलाखत प्रक्रिया होत असते.
मुलाखत घेण्याअगोदर त्या व्यक्तीची आवश्यक माहिती मुलाखतकाराला मिळवावी लागते. त्या व्यक्तीचे संपूर्ण नाव, असल्यास टोपणनाव, जन्मदिनांक, जन्मस्थळ, पत्ता, शिक्षण, कौटुंबिक माहिती, कार्यकर्तृत्व, मिळालेले मानसन्मान व पुरस्कार यांबाबतची माहिती मिळवावी लागते. त्या व्यक्तींची वैचारिक, सामाजिक पार्श्वभूमी समजून घ्यावी लागते. या व अशा सर्व माहितीनंतरच मुलाखतीची प्रक्रिया होत असते. म्हणूनच मुलाखत म्हणजे पूर्वनियोजित असा संवाद असतो असे म्हटले जाते.
(ई) मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी लिहा.
उत्तर: मुलाखत ही विषय/ उद्दिष्ट यांच्या परिघाबाहरे जाऊ नये यासाठी प्रथम मुलाखत देणाऱ्या व्यक्तीची अधिकाधिक माहिती मिळवली जाते. मुलाखत निमित्ताने प्रश्न तयार केले जातात. मुलाखतीत चुकीचे वा अप्रस्तुत प्रश्न टाळावे. मुलाखत देणाऱ्या व्यक्तीचा अवमान होईल असे प्रश्न विचारू नयेत. प्रश्न क्लिष्ट, अवघड स्वरूपाचे नसावे. विचारलेल्या प्रश्नांमुळे सामाजिक ताणतणाव, संघर्ष निर्माण होणार नाही याबाबतची योग्य काळजी घ्यावी. प्रश्नांची पुनरावृत्ती होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. मुलाखतीसाठी आवश्यक पूर्वतयारी न करता, अतिआत्मविश्वासाच्या आहारी जाऊन मुलाखत घेण्यास जाणे टाळावे.
मुलाखत हा दोन व्यक्तींमधील संवाद असला तरी या संवादात मुलाखत देणाऱ्याला महत्त्व असल्याने मुलाखतकाराने स्वतः खूप बोलणे टाळावे. मुलाखत देणाऱ्या व्यक्तीकडून आवश्यकती माहिती, नेमकेपणाने काढावी. मनमोकळेपणाने त्याला बोलता येईल याचे सदैव भान राखणे आवश्यक आहे.
मुलाखत पूर्वनियोजित वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रश्न संख्या मर्यादित असावी. रटाळ, कंटाळवाणे, प्रभावहीन प्रश्न विचारणे टाळावे. मुलाखतीचे गांभिर्य टिकवण्यासाठी मुलाखतीदरम्यान मुलाखतकाराने हास्यास्पद हावभाव करू नयेत. योग्य प्रकारे काळजी घेतल्यास मुलाखत निश्चितपणे चांगल्या प्रकारे पार पडत.
(उ) उमेदवार ‘आतून’ जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे, हे सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर: नोकरीसाठी वा एखादया अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनेक उमेदवार स्पर्धेत असतात. उमेदवाराच्या बाह्य गोष्टींपेक्षा आलेला उमेदवार आतून जाणणे महत्त्वाचे असते. त्याचे व्यक्तिमत्त्व कितपत विकसित झालेले आहे, या नोकरीसाठी वा प्रवेशासाठी तो योग्य कसा आहे यासाठी त्याला आतून जाणणे आवश्यक असते. आलेल्या उमेदवाराला आतून जाणण्यासाठी नानाविध प्रश्न विचारले जातात. वर्तनाशी संबंधित प्रश्न विचारण्यावर भर दिला जातो. उमेदवाराचा जीवनाविषयक दृष्टिकोन समजेल असे प्रश्न विचारले जातात. उमेदवाराची बौद्धिक, तांत्रिक हुशारी यांबरोबर त्यांच्यातील निर्णयक्षमता पाहिली जाते. त्याचे उठणे, बसणे, पोशाख, भाषेवरील प्रभुत्व यांसोबत त्याच्यातील आत्मविश्वास, स्पर्धेत टिकून राहायची वृत्तीही पारखली जाते. गटकार्य, गटनेतृत्व करण्याची क्षमता, अडीअडचणी सोडविण्याबाबतचा दृष्टिकोन, स्वतः त:ची चूक मान्य करण्याबाबत मनाचा मोठेपणा उमेदवारात आहे की नाही यालाही महत्त्व दिले जाते. इतरांचे विचार, सूचना स्वीकारण्याची वृत्ती, दुसऱ्यांच्या भावनांचा आदर राखण्याचा गुण उमेदवारात असणे आवश्यक आहे.
(ऊ) उत्तर मुलाखत ही व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाची ओळख असते, हे स्पष्ट करा. (मार्च, २०२२)
प्रसारमाध्यमांसाठी मुलाखत घेण्यामागचे अनेक हेतू असतात. मुलाखत देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू मुलाखतीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतात. मुलाखत ही मुलाखत देणाऱ्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाची सर्वांगांनी होणारी ओळख असते. समाजजीवनात अनेक व्यक्ती संघर्ष करीत यशाचे सर्वोच्च शिखर गाठतात. त्यांच्या जीवनातील जीवन संघर्षातून अनेकांना प्रेरणा मिळते. जीवनातील संकटांशी सामना करण्याचे मनोधैर्य त्यांच्या मनात निर्माण होते.
सामान्यतः कर्तृत्वसंपन्न व्यक्ती, ज्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात विशेष कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. अशा व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या जातात. जगावेगळी आव्हाने पेलून असामान्य कर्तृत्व गाजवणारी व्यक्तिमत्त्वेही समाजात असतात समाजात ज्यांच्याबद्दल विशेष आदर आणि कुतूहल असते. अशा व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या जातात. लोकप्रतिनिधी, कलावंत, खेळाडू, वैज्ञानिक, डॉक्टर, अध्यापक, व्यावसायिक, उदयोजक, विशेषज्ञ, तंत्रज्ञ, लेखक, कवी, आदर्श शेतकरी, विचारवंत, सर्वश्रेष्ठ कामगार यांसोबत दैनंदिन जीवन संघर्ष करणारा प्रत्येक सामान्य माणूसही मुलाखत निमित्ताने इतरांसमोर येतो. त्याच्या कार्य-कर्तृत्वाच्या दर्शनातून अनेकांना एक वेगळी प्रेरणा मिळते.
(ए) मुलाखतीच्या प्रारंभाबाबत तुमचे मत लिहा.(मार्च, २०२२)
उत्तर :: मुलाखत म्हणजे पूर्वनियोजित संवाद असतो. त्यासाठी मुलाखतीचा प्रारंभच मुळात आकर्षक, थेट श्रोते किंवा वाचकांच्या मनाला भिडणारा झाला पाहिजे. मुलाखतकाराच्या सुरुवातीच्या बोलण्यातच श्रोते/ वाचक यांचे लक्ष वेधले गेले पाहिजे. काहीतरी रोचक ऐकायला मिळणार अशी त्यांची खात्री पटली पाहिजे. ही गोष्ट सहज साध्य नाही. त्यासाठी मुलाखतकाराला मुलाखतदात्याचा स्वभाव, शैली माहीत असणे आवश्यक आहे. मुलाखतदात्याच्या संदर्भात घडलेला एखादा प्रसंग, ताजा किस्सा सांगून शेवटी नेमकेपणाने प्रश्न विचारता आला पाहिजे. शिवाय या विचारण्यात सहजता हवी, ओघवती शैली हवी, कृत्रिमता टाळून नैसर्गिकपणे पुढे जाता आले पाहिजे. अशी हलकी-फुलकी आणि दिलखुलास सुरुवात झाल्यामुळे कुठल्याही प्रकारचा ताण न राहता वातावरण मोकळे, हलके होते. मुलाखतीची नांदी जितकी सहज, श्रवणीय होईल तितकीच मुलाखत पुढे रंगत जाते, मुलाखतकाराचा आत्मविश्वास वाढतो, मुलाखतदाताही मोकळेपणाने बोलू लागतो आणि मुख्य म्हणजे श्रोते / वाचक या मुलाखतीत गुंतून राहतात.
कृती – ३. मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी ते खालील मुद्द्यांच्या आधारे लिहा.
(अ) मुलाखतदात्याची वैयक्तिक माहिती
(आ) मुलाखतदात्याचे कार्य
(इ) मुलाखतीच्या अनुषंगाने वाचन
(ई) प्रश्नांची निर्मिती
उत्तर: (अ) मुलाखतदात्याची वैयक्तिक माहिती: मुलाखत उत्तम व्हावी यासाठी मुलाखतीच्या पूर्वतयारीचा गृहपाठ चांगल्या प्रकारे करणे आवश्यक असते. मुलाखतीच्या पूर्वतयारीच्या गृहपाठामध्ये मुलाखतदात्याची वैयक्तिक माहिती करून घेणे आवश्यक असते. जसे मुलाखतदात्याचे संपूर्ण नाव, असल्यास त्याचे टोपननावही माहीत करून घ्यावे. याबरोबरच मुलाखत देणाऱ्या व्यक्तीचे वय, जन्मदिनांक, जन्मस्थळ, पत्ता, शिक्षण, कौटुंबिक माहिती, कर्तृत्व, सध्याचा हुद्दा, मिळालेले मानसन्मान, पुरस्कार इत्यादींची माहिती मुलाखती अगोदर मिळवणे आवश्यक आहे. मुलाखतदात्याच्या वैयक्तिक माहितीच्या आधारे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू समजण्यास मदत होते, त्या व्यक्तीच्या कार्यावर प्रकाश टाकणारे प्रश्न तयार करण्यास मदत होते.
मुलाखतदात्याची वैचारिक पार्श्वभूमी माहीत करून घेतल्यास तशा प्रकारचे प्रश्न मुलाखतीसाठी तयार करता येतात. त्यांचे लेखनकार्य माहीत करून घेतल्यास त्याबाबतची अधिक माहिती प्रश्ननिमित्ताने जाणून घेता येते. मुलाखतदात्याच्या वैयक्तिक माहितीच्या आधारे मुलाखत यशस्वी होण्यास खूप मदत होते.
(आ) मुलाखतदात्याचे कार्य : समाजजीवनातील अनेक
व्यक्तींच्या कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी प्रायः मुलाखत घेतली जाते. लोकप्रतिनिधी, कलावंत, खेळाडू, वैज्ञानिक, डॉक्टर, अध्यापक, व्यावसायिक, उद्योजक, विशेषज्ञ, तंत्रज्ञ, लेखक, कवी, संपादक, गिर्यारोहक, सैनिक, विचारवंत, शेतमजूर, कामगार अशा अनेक कर्तृत्वसंपन्न व्यक्ती आपआपल्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्त्वाचा विशेष असा ठसा उमटवतात.
मुलाखतदात्याचे कार्य व कर्तृत्व समाजातील लोकांसमोर यावे. त्यांच्या या कार्यातून एक नवी प्रेरणा मुलाखत वाचणाऱ्यांना / ऐकणाऱ्यांना मिळावी यासाठी मुख्यतः मुलाखती घेतल्या जातात.
(इ) मुलाखतीच्या अनुषंगाने वाचन : मुलाखतीच्या पूर्वतयारीमध्ये मुलाखतीच्या अनुषंगाने वाचनालाही अत्यंत महत्त्व आहे. मुलाखतदात्याच्या कार्य कर्तृत्वावर नेमका प्रकाश टाकण्यासाठी चांगलीच मदत होते. बऱ्याचदा अनेक क्षेत्रांतील व्यक्तींबद्दल योग्य ती माहिती वाचनातून आपल्याला मिळते. अनेक लेखक, कवी, साहित्यिक, विचारवंत यांची माहिती वाचनातून आपल्यापर्यंत पोहोचते. मुलाखतीच्या अनुषंगाने वाचन केल्यास अनेक संदर्भ आपणास समजतात. आपल्या ज्ञानात भर पडते. मुलाखत घेताना त्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकतील असे प्रश्न तयार करण्यास मदत होते. मुलाखत रूपातील संवाद प्रभावीपणे होण्यासाठी, नेमके प्रश्न तयार करण्यासाठी वाचन अत्यंत महत्त्वाची बाब आहे.
(ई)प्रश्नांची निर्मिती : मुलाखत हा दोन वा अनेक व्यक्तींमधील प्रश्नोत्तर स्वरूपाचा संवाद असतो. अनेकांजवळ ‘सांगण्यासारखे’ खूप काही असते. मुलाखत देणाऱ्या व्यक्तीला खूप काही सांगता यावं यासाठी योग्य प्रश्नांची निर्मिती महत्त्वाची असते. मुलाखतीचा विषय व उद्दिष्ट लक्षात घेऊन योग्य प्रश्न मुलाखतकाराने तयार केले पाहिजेत. मूळ विषयाला सोडून असंबद्ध प्रश्न टाळले पाहिजे. मुलाखत घेणाऱ्याने आपल्या मर्यादांची जाणीव ठेवून समोरच्या व्यक्तीला प्रश्न विचारावेत. अप्रस्तुत, चुकीचे प्रश्न विचारून मुलाखतदात्याचा अवमान होणार नाही याकडे गांभिर्याने लक्ष दयावे. मुलाखतीदरम्यान विचारलेल्या प्रश्नांमुळे सामाजिक ताणतणाव, आपआपसांत संघर्ष निर्माण होणार नाही यांबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी. प्रश्नांची निर्मिती करताना अवघड, क्लिष्ट स्वरूपाचे प्रश्न विचारणे टाळावे. रटाळ, कंटाळवाणे व प्रभावहीन प्रश्न विचारू नयेत. मुलाखत देणाऱ्याने विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर दिलेच पाहिजे याबाबत मुलाखतकाराची आग्रही भूमिका नको. प्रश्नांची निर्मिती जाणीवपूर्वक केल्यास मुलाखतही रंगतदार होत जाते.
★ कृती ४. खालील व्यक्तींची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा.
(अ) भाजीवाला (आ) पोस्टमन (इ) परिचारिका
उत्तरः(अ) भाजीवाला: आमच्या गावात घरोघर जाऊन भाजीपाला विकणाऱ्या श्री शंकर मोहिते या भाजी विक्रेत्याची मुलाखत: प्रश्नावली.
नमस्कार, शंकर काका
- तुम्ही हा व्यवसाय तुम्ही कधीपासूlन करीत आहात ?
- भाजी खरेदी करण्यासाठी तुम्ही सकाळी किती वाजता घराबाहेर पडता ?
- भाजीपाला खरेदी करताना कोणकोणत्या अडचणी येतात ?
- भाजीपाल्याची विक्री करताना कोणत्या समस्या प्रामुख्याने जाणवतात ?
- खरेदी करताना पिशवी मागणाऱ्या ग्राहकाचे समाधान तुम्ही कशा प्रकारे करता ?
- हातगाडीवरील भाजीपाला ताजा, टवटवीत राहण्यासाठी कशाप्रकारची काळजी तुम्ही घेता ?
- भाजी- विक्रीसाठी तुमचा परिसर, प्रभाग निश्चित आहे का ?
- या व्यवसायात घरातील सदस्यांची मदत होते का ? कशाप्रकारे ?
- आवश्यक वजन, काटा यांची नोंद तुम्ही दरवर्षी करता का ?
- या व्यवसायासाठी नगरपंचायतीस कर दयावा लागतो का? किती ?
- सांगितलेल्या भावापेक्षा आणखी स्वस्तात भाजीपाला मागणाऱ्या ग्राहकाचे समाधान तुम्ही कशाप्रकारे करता ?
(आ) पोस्टमन : आमच्या विभागात काम करणारे पोस्टमन श्री. भांगरे दादा यांची मुलाखत : प्रश्नावली
- या खात्यात आपण कधीपासून कार्यरत आहात ?
- कामाचे साधारणपणे स्वरूप कसे असते ?
- हे काम करण्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे ?
- पत्रवाटप करताना कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते ?
- ‘कुरिअर’ सेवेमुळे तुमचे काम कमी झाले आहे का ?
- दिवाळी निमित्त आपणास ‘बक्षीशी’ स्वेच्छेने लोक देतात का ?
- तुम्ही तुमच्या कामात समाधानी आहात काय ?
- नव्याने येणाऱ्या पोस्टमनांना तुम्ही काय सांगाल ?
- एखादा आठवणीत राहिलेला अनुभव सांगा.
(इ)परिचारिका : मुलाखत: प्रश्नावली.
- नमस्कार ताई. आपलं हे काम नक्कीच समाजासाठी आदर्श आहे. पण हा व्यवसाय निवडावा हे आपण ठरवण्यामागे नेमके कोणते कारण होते ?
- या क्षेत्रातील आदर्श व्यक्ती म्हणून आपण कोणाकडे पाहता ?
- रजनीताई, आपली रुग्णसेवा केव्हापासून सुरू झाली ?
- परिचारिका म्हणून काम करण्यासाठी कोणती पदवी व प्रशिक्षण घ्यावे लागते ?
- रुग्णसेवा व स्वत:चे घर यांचा मेळ तुम्ही कशा प्रकारे बसविता ?
- रुग्णालयात कधी डॉक्टर उपलब्ध नसताना जर अत्यवस्थ अवस्थेतील रुग्ण इस्पितळात आला तर आपण ही परिस्थिती कशी हाताळता ?
- काही रुग्णांचे दीर्घकाळ वास्तव्य इस्पितळात असते. त्यांच्याशी नक्कीच जिव्हाळ्याचे नाते तयार होत असेल, असे रुग्ण इस्पितळ सोडून जाताना तुमची मानसिकता कशी असते ?
- रुग्ण बरे होऊन गेल्यावरही ओळख ठेवतात का ?
- या सेवेत कामाच्या ठरावीक वेळा नसतात. त्यामुळे शरीरावर नेमका काय परिणाम होतो ?
- इथे संसर्गजन्य रोगांची लागण होण्याची दाट शक्यता नेमकी कशी असते . मग तुम्ही स्वतःची काळजी घेता ?
- अगदी वाईट / गलिच्छ अवस्थेतील रुग्णांची सेवा करताना मनाला नेमके कसे समजावता? त्यासाठी स्वतःची मानसिकता कशी तयार करता ?
- रुग्णसेवेतील अनोखा आनंददायक असा अनुभव आला का? कशा प्रकारे ?
कृतिपत्रिका
- खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती सोडवा.
नोकरीसाठी, एखादया अभ्यासक्रमाच्या………………………
…….मुलाखतींचे वैशिष्ट्यं झाले आहे. (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ९० )
प्र. १. (अ) सध्याच्यायुगात मुलाखत घेताना उमेदवाराकडून केल्या जाणाऱ्या अपेक्षा –
(१)……………………. (२) ……………………………
(३)…………………….. (४)……………………………
उत्तर: (१) सध्याच्या युगात उमेदवार टिकून राहिला का ?
(२) अपेक्षित उद्दिष्टे उमेदवार गाठू शकेल का?
(३) गटकार्य आणि गटनेतृत्व करण्याचे कौशल्य उमेदवाराकडे आहे का ?
(४) अडचणींना उमेदवार कसा आणि किती तोंड देऊ शकतो ?
(आ) सध्याच्या मुलाखतींचे वैशिष्ट्य कोणते ?
उत्तर: उमेदवार बाह्य गोष्टींपेक्षा ‘आतून’ कसा आणि कितपत विकसित झालाय हे जाणून घेणे सध्याच्या मुलाखतींचे वैशिष्ट्य झाले आहे.
प्र. २. (अ) पूर्वीच्या काळी मुलाखतींमध्ये उमेदवारांच्या कोणत्या गोष्टी पारखल्या जायच्या?
(२)…………… (१)………………… (३)………………
उत्तर : (१) उमेदवाराची बौद्धिक क्षमता.
(२) उमेदवाराची ज्ञानाची पातळी.
(३) उमेदवाराचा कल कोणत्या गोष्टीकडे आहे ते पाहणे.
(आ) आताच्या काळात मुलाखत घेताना उमेदवाराचे कोणते दोन दृष्टिकोन तपासले जातात –
(१)……………….(२)…………………………..
उत्तर : (१) नोकरीविषयक दृष्टिकोन
(२) जीवनाविषयक दृष्टिकोन
प्र. ३. स्वमत / अभिव्यक्ती.
- पूर्वी नोकरीसाठी घेतल्या जाणाऱ्या मुलाखती आणि सध्याच्या काळात नोकरीसाठी घेण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती यांतील भेद तुमच्या शब्दात खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा.
(पूर्वी बौद्धिक क्षमता, ज्ञान, उमेदवाराचा कल याला महत्त्व) आता त्याच्या ज्ञानाबरोबर त्याचा जीवनविषयक दृष्टिकोन पाहिला जातो. नेतृत्वगुण, आव्हानांचा सामना करताना हवी असलेली मानसिकता, निर्णयक्षमता याला प्राधान्य)
उत्तर: अलिकडच्या काळात नोकरीसाठी किंवा एखादया अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या मुलाखतींचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. आज ग्लोबलायझेशनच्या जगात व्यावसायिक, नोकरीतील आव्हाने ही पूर्वीपेक्षा भिन्न आहेत. त्यामुळे पूर्वी ज्ञान, बौद्धिक क्षमता आणि उमेदवाराचा एकूण कल एवढ्याच गोष्टींना महत्त्व दिले जायचे. पण आताच्या काळात मात्र नवीन आव्हाने पेलण्यासाठी यापेक्षा अधिक कौशल्य उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे. आता बऱ्याचशा कंपन्या या देशात नव्हे तर परदेशातही कार्यान्वित असतात. जगभरात त्यांच्या शाखा पसरलेल्या असतात. अशा आंतरराष्ट्रीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी फक्त ज्ञानाचा वापर करून उपयोग नसतो. अनेक लोकांबरोबर संवाद साधावा लागतो. टिममध्ये एकत्रितपणे काम करावे लागते. अशा वेळी या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी नेतृत्व गुण असणे, टिममधील सहकाऱ्याबरोबर चांगले संबंध असणे, इतरांचे विचार, भावना समजून घेण्याची कुवत, इतरांच्या सूचनांचा स्वीकार करण्याची मानसिकता, स्वतःची चूक मान्य करण्याचा मोठेपणा या सगळ्या कौशल्यांचा, क्षमतांचा कस लागतो. म्हणून आताच्या काळात उमेदवारांची केवळ बुद्धिमत्ता विचारात न घेता तो उमेदवार अंतर्बाह्य कसा आहे हे तपासले जाते. त्यासाठी विविध मापन चाचण्यांचा वापर केला जातो. थोडक्यात आताच्या काळात उमेदवार बाहेरून कसा दिसतो यापेक्षा तो आतून कितपत विकसित आहे हा विचार केंद्रस्थानी ठेवला जातो. स्पर्धा परीक्षांमध्ये म्हणूनच मुलाखतीचा टप्पा अनेकांना पार पाडता येत नाही. कारण ‘सुवर्णपदक’ विजेता विदयार्थी भावनिक, मानसिकदृष्ट्या सक्षम असतोच असे नाही. असे विद्यार्थी मग ‘ट्रिकी’ प्रश्नात फसले जातात आणि मुलाखतीमध्ये बाद होतात.
मुलाखत – नमुने
(१) राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक
मिळविणाऱ्या विद्यार्थ्याची मुलाखत.
ही व्यक्तिगत मुलाखत प्रकारातील मुलाखत आहे हे लक्षात घ्या. राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल प्रथम मनःपूर्वक अभिनंदन करावे.
मुलाखत: प्रश्नावली:
•या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेण्याची प्रेरणा तुला कशा प्रकारे मिळाली ?
•तू या स्पर्धेसाठी आवश्यक ती तयारी कशा प्रकारे केलीस ?
•निवड चाचणीत यशस्वी होण्यासाठी तू कोणकोणत्या गोष्टी केल्यास ?
•तू संदर्भ, माहिती कशाप्रकारे मिळवलीस ?
•घरातील सदस्य, महाविदयालयातील प्राध्यापकांनी तुला कशा प्रकारे मदत केली ?
•वक्तृत्व स्पर्धेतील सभाधीटपणा तू कशा प्रकारे आत्मसात केलास ?
•नियोजित वेळेमध्ये तुझ्या बोलण्यातील सर्व मुद्दे तुला मांडता आले का?
•तुझ्या या यशाचे श्रेय कोणाला देतोस ?
शेवटी – तुझ्या या देदीप्यमान यशाबद्दल पुन्हा एकवार अभिनंदन! तू यशवंत हो, कीर्तिवंत हो !
(२) वृक्षमित्र समितीच्या अध्यक्षांची (व्यक्तिगत मुलाखत) मुलाखत
मुलाखतः प्रश्नावली:
नमस्कार,
•आपल्या वृक्षमित्र समितीबद्दल आमच्या वाचकांना परिचय करून दया.
•वृक्षसंवर्धनाचे काम आपली समिती कशा प्रकारे करते ?
•वृक्षसंवर्धन समितीचा सभासद होण्यासाठी काही अटी आहेत का ?
•वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन या संदर्भात भावी काळासाठी काय योजना आहेत ?
•वृक्षमित्र समिती या संस्थेच्या बोधचिन्हाचा अर्थ काय आहे ?
•वृक्षमित्र चळवळीला गतिमान करण्यासाठी विदयार्थी सहभाग आवश्यक आहे का ?
•जनजागृतीसाठी, वृक्ष वाचविण्यासाठी वृक्षमित्र समितीकडे कोणत्या नवीन कल्पना आहेत ?
(३) नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवडल्या गेलेल्या व्यक्तीची मुलाखत. (व्यक्तिगत मुलाखत)
नमस्कार सम्मलेलो प्रषामतः तुमचे मनःपूर्वक अभिनंदन
मुलाखत: प्रश्नावली:
•मराठी रंगभूमीवरील एक प्रतिथयश कलावंत मा. अनिल दामले यांची ९० व्या मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली त्याबाबत त्यांची घेतलेली मुलाखत.
•मातेस्मभूमेवर एक उलावले म्हणून आपल्या सत्यप्रवासस प्रारंभ केव्हा झाला है
•सत्यक्षेत येण्यासावे को पूर्वस्यारी आपण केलो होती का?
•प्रारंभीच्या उमेदवारांच्या कालखंडात नाट्यक्षेत्रातील अनुभवी कलावेकडुन अपणाला कोणकोणत्या गोष्टी सट्यक्षेत्रलेल आपले आदर्श कलावंत कोणते?
•स्पेभूमेवरील कलावंत हे नाट्यदिग्दर्शक हा आपल्या प्रवास कसा झाला?
•नाट्यक्षेत्रातील तुम्हांस खटकणाऱ्या बबे कोणत्या २
•मराठी रंगभूमीवरील कलावंतासाठी तुमच्या मनातील त्या योजना कोणत्या आहेत है
•या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या नवीन कलकारांना आपण कोणता संदेश दयाल ?
•राज्यशासनाने नाट्य कलावंतना प्रोत्साहन देण्यासाठी काय करणे आवश्यक आहे असे आपणास वाटते ? धन्यवाद! दामलेजी.
(४) गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची मुलाखत. (व्यक्तिगत मुलाखत)
मुलाखत: प्रश्नावलीः
नमस्कार सर,
•तुमच्या नाविन्य गणेश मंडळाची स्थापना केव्हा झाली ?
•दरवर्षीप्रमाणे या वर्षाचा आपला नाविन्यपूर्ण देखावा कशावर आधारित आहे ?
•निधी संकलनाचे वा वर्गणी जमा करण्याचे काम केव्हा सुरू होते ?
•गणेशोत्सव काळात आपण कोणकोणत्या गोष्टीची विशेष दक्षता घेता?
•समाजास उपयुक्त असणारे कोणकोणते उपक्रम तुम्ही वर्षभर राबविता?
•“एक गाव एक गणपतो” या योजनेबाबत तुमचे मत काय आहे?
•आदर्श गणेशोत्सवाची तुमची कल्पना थोडक्यात विषद करा.
•उत्सव काळात सर्वांचे सहकार्य कशाप्रकारे मिळते ?
•विसर्जन मिरवणुकांचे नियोजन एक क्रियाशील कार्यकर्ता म्हणून तुम्ही कशाप्रकारे करता ?
(५) ‘निरोगी बालक अभियान ‘ चालविणाऱ्या बालरोगतज्ज्ञाची मुलाखत.(व्यक्तिगत मुलाखत)
मुलाखत: प्रश्नावली:
नमस्कार डॉक्टर,
•’निरोगो बालक अभियान’ सुरु करण्याची प्रेरण आपणास कशी मिळाली ?
•बालकांना अचानकपणे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्या कोणत्या ?
•या आरोग्यविषयक समस्यांची कारणे कोणती 2 बालकांच्या दृष्टीने गंभीर आजार कोणते ?
•अस्वच्छ पारिसार, वाढते प्रदुषण यामुळे बालकांना कोणते आजार होऊ शकतात?
•अमीण व शहरी भागात राहणाऱ्या बाल्कच आरोग्यासंदर्भात काही फरक जामवतात का ?
•स्वच्छता व योग्य आहार बावर आपल्या अभियानात विशेष भर दिला आहे याबाबतची अधिक महितं सविस्तरपणे सांगाल का?
•आपल्या या अभियानास पालकांकडून कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो?
•शासनाने या संदर्भात काय करावे ,अशी आपली अपेक्षा आहे?
प्रास्ताविक:
एखादया व्यक्तीच्या जीवनाचा आणि कर्तृत्वाचा वेध घेण्यासाठी मुलाखत घेतली जाते. लिखित, दृक-श्राव्य आणि श्राव्य अशा तीनही माध्यमांतून मुलाखती घेतल्या जातात. मूळ अरबी भाषेतील ‘मुलाकात’ या शब्दावरून ‘मुलाखत’ हा शब्द रूढ झाला. मुलाखत घेणे आणि देणे ही एक कौशल्यपूर्ण प्रक्रिया आहे. आजच्या काळात हे कौशल्य आत्मसात करणे गरजेचे ठरते.
स्वरूप:-
•मुलाखत म्हणजे पूर्वनियोजित संवाद असतो.
•मुलाखतीच्या प्रक्रियेमध्ये मुख्य तीन घटक असतात.
•मुलाखत देणारा (मुलाखतदाता)
•मुलाखत घेणारा (मुलाखतकार) आणि
•मुलाखत ऐकणारा, (आकाशवाणीवरून वा श्राव्यफितीच्या द्वारे) पाहणारा (दूरचित्रवाणीवरून वा दृक्-श्राव्य फितीद्वारे) किंवा वाचणारा (वृत्तपत्रांतून वा मासिक, नियतकालिकांतून.) ही प्रक्रिया पुढील आकृतीवरून अधिक स्पष्ट होईल.
••मुलाखतदाता
1मुलाखतकार
2श्रोते, प्रेक्षक, वाचक
•जेव्हा क्रमबद्ध प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे जीवन आणि कर्तृत्व श्रोत्यांसमोर उलगडून दाखवते, तेव्हा त्यांच्यात झालेला संवाद म्हणजेच मुलाखत होय.
•मुलाखतीसाठी व्यक्ती, दिवस, वेळ, स्थळ, विषय कालावधी, उद्दिष्ट इत्यादी गोष्टी अगोदर ठरवल्या जातात.
•कधी कधी मुलाखत देणारी व्यक्ती एक असते किंवा एकापेक्षा जास्तही असू शकते. फोनवरूनही मुलाखत घेता येते.
•मुलाखत लिखित, मौखिक, ध्वनिमुद्रित वा प्रकट अशा विविध स्वरूपाची असते.
•मुलाखती विचारप्रवर्तक, भावनाप्रधान, श्रोत्यांचे कुतूहल राबवणाऱ्या, एखादया विषयाच्या सर्व बाजू स्पष्ट करणाऱ्या, अनुभव कथन करणाऱ्या, वाङ्मयीन सौंदर्य उलगडून दाखवणाऱ्या पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या इत्यादी स्वरूपाच्या असतात.
•ज्या व्यक्तींनी आपापल्या कार्यक्षेत्रात काही विशेष कामगिरी केलेली असते किंवा सामान्य परिस्थितीत असामान्य कार्य केलेले असते. अशा व्यक्तींची मुलाखत घेतली जाते. उदाहरणार्थ – कलावंत, लेखक, कवी, सैनिक, पुरस्कार विजेते इत्यादी.
मुलाखतीचा हेतू:
•मुलाखत देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे (मुलाखतदात्याचे) विविध पैलू समजून घेणे.
•त्या व्यक्तींच्या (मुलाखतदात्याच्या) कार्यावर प्रकाश टाकणे. त्या व्यक्तीचा (मुलाखतदात्याचा) जीवनसंघर्ष जनसामान्यांपर्यंत पोहचविणे.
•थोर व्यक्तींच्या (मुलाखतदात्याच्या) आत दडलेला ‘माणूस’ जाणून घेणे.
•विचारवंतांची विविध विषयांवरील नवीन माहिती | जाणून घेणे. तज्ज्ञ व्यक्तींकडून त्या क्षेत्रातील नवीन माहिती मिळवणे.
•एखादी घटना सखोलपणे समजून घेणे. व्यक्तीची (मुलाखतदात्याची) कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक जडणघडण जाणून घेणे.
•थोर व्यक्तींच्या कार्याद्वारे सामाजिक प्रबोधन आणि जनजागृती घडवून आणणे.
•विविध कलांचा रसास्वाद घेणे.
•इत्यादी अनेक हेतूंची पूर्तता करण्यासाठी मुलाखती घेतल्या जातात.
मुलाखतीची पूर्वतयारी:
•ज्यांची मुलाखत घ्यायची आहे त्यांच्याबद्दलची आवश्यक ती माहिती मिळविणे ही पहिली पायरी. उदा. पूर्ण नाव, टोपणनाव, वय, जन्मदिनांक, जन्मस्थळ, पत्ता, शिक्षण, कौटुंबिक माहिती, कर्तृत्व, सध्याचा हुद्दा, मिळालेले मानसन्मान पुरस्कार, लेखनकार्य इत्यादी माहिती उपलब्ध करून घ्यावी.
• ज्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची आहे तिच्या कार्यक्षेत्रासंबंधी वा विषयासंबंधी सखोल वाचन करावे. मुलाखतीचे उद्दिष्ट स्पष्टपणे जाणून घ्यावे व त्यानुसार पूर्वतयारी करावी.
•मुलाखतीचा विषय व उद्दिष्ट लक्षात घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीत विचारायचे प्रश्न तयार करावेत.
•मुलाखतीसाठी उपलब्ध कालावधी किती असणार आहे हे लक्षात घेऊन त्यानुसार प्रश्नसंख्या निश्चित करावी. हे करीत असताना प्रश्नांचा क्रमही योग्य असला पाहिजे याकडे लक्ष दयावे लागते.
•मुलाखत ही प्रकट आहे हे सुद्धा लक्षात घ्यावे, त्याप्रमाणे आखणी करावी.
•श्रोता वर्ग किंवा वाचक गट कोणत्या प्रकारचा असणार आहे याचीही माहिती घेऊन ठेवावी. उदा. विदयार्थी वर्ग, ज्येष्ठ नागरिक, केवल महिला इत्यादी.
•मुलाखत प्रत्यक्ष श्रोत्यांसमोर आहे, की रेडिओसाठी आहे की टी. व्ही साठी आहे हे सुद्धा निश्चित करून घ्यावे. त्यानुसार पूर्वतयारी करावी.
•मुलाखतीसाठी आवश्यक बैठक व्यवस्था, ध्वनिक्षेपण व्यवस्था, वातावरण निर्मिती, संदर्भ ग्रंथ, चित्रे, वादये, वस्तू इत्यादी गोष्टीही अगोदर तयार ठेवणे आवश्यक ठरते.
•शक्य असल्यास मुलाखत देणाऱ्या व्यक्तीस अगोदर भेटून चर्चा करावी. त्यामुळे प्रत्यक्ष मुलाखत घेणे सुलभ होते.
•आकाशवाणीवरील, दूरदर्शनवरील वा प्रत्यक्ष मुलाखती पाहाव्यात किंवा ऐकाव्यात ज्यामुळे पूर्वतयारीसाठी मार्गदर्शन मिळते.
मुलाखत कशी घ्यावी
•मुलाखतीची सुरुवात :
•मुलाखतीचा प्रारंभच मुळात आकर्षक, ( धमाकेदार सुरुवात) थेट श्रोते किंवा वाचकांच्या मनाला भिडणारा झाला पाहिजे.
•मुलाखतकाराच्या सुरुवातीच्या बोलण्यातच श्रोते/ वाचक यांचे लक्ष केंद्रित झाले पाहिजे. काहीतरी रोचक (interesting) ऐकायला मिळणार अशी त्यांची खात्री पटली पाहिजे.
•ही गोष्ट सहज साध्य नाही. त्यासाठी मुलाखतकाराला मुलाखतदात्याचा स्वभाव, शैली माहीत असली पाहिजे. मुलाखतदात्याच्या संदर्भात घडलेला एखादा प्रसंग, ताजा किस्सा सांगून शेवटी नेमकेपणाने प्रश्न विचारता आला पाहिजे. शिवाय या विचारण्यात सहजता हवी, ओघवता हवी, कृत्रिमता टाळून नैसर्गिकपणे पुढे जाता आले पाहिजे.
•अशी हलकी-फुलकी आणि दिलखुलास सुरुवात झाल्यामुळे कुठल्याही प्रकारचा ताण राहत नाही. वातावरण मोकळे, हलके होते.
•मुलाखतीची नांदी जितकी सहज, श्रवणीय होईल तितकीच मुलाखत पुढे रंगत जाते, मुलाखतकाराचा आत्मविश्वास दुणावतो, मुलाखतदाताही मोकळेपणाने बोलू लागतो आणि मुख्य म्हणजे श्रोते/ वाचक या मुलाखतीत गुंतून राहतात.
•मुलाखतीचा मध्य :
•तयार प्रश्नावली डोळ्यांसमोर असली तरी एक प्रश्न मग त्याचे उत्तर नंतर दुसरा प्रश्न पुन्हा त्याचे उत्तर अशी पद्धत खूप रटाळ होईल किंवा यंत्रवत वाटेल. म्हणून प्रश्न जरी समोर तयार असले तरी मुलाखतदात्याने दिलेल्या उत्तरातून पुढील प्रश्नाची पेरणी कशी करता येईल यासाठी मुलाखतकाराने आपले कौशल्य पणास लावले पाहिजे.
•यासाठी तयार करून आणलेले प्रश्न थोडे लवचिक असू दयावेत, आयत्या वेळी त्यात गरजेनुसार बदल करण्याची कसरत मुलाखतकाराला करावी लागते पण सरावाने तो ते करू शकतो.
•सर्वात महत्वाचे म्हणजे प्रश्नांची यादी केवळ मुलाखतकाराला माहीत असते, श्रोत्यांना नाही त्यामुळे मुलाखतकार त्यात आपल्या सोईनुसार बदल करू
•प्रश्नाची गुंफण अशी असावी की त्याद्वारे मुलाखतदात्याचे व्यक्तिमत्व अलगदपणे उलगडत जाईल, मुलाखतदाता बोलता झाला पाहिजे,
•मात्र हे करत असताना मुलाखतीचा मुख्य हेतू विसरता कामा नये, मुख्य उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच मुलाखत पुढे घेऊन जावी,
●विचारलेल्या प्रश्नांच्या माध्यमातून मुलाखत स्कूलत जायला हवी, एका मुदूदयाला भ्ररून मुलाखतीने तिचं सर्वोच्च टोक गाठले पाहिजे. त्या विषयाचे, व्यक्तिमत्वाचे, विचारधारेचे सर्व कंगोरे स्पष्ट झाले पाहिजेत, श्रोत्यांचे किंवा प्रेक्षकांचे समाधान झाले पाहिजे, >मुलाखतीच्या टण्यावर मुलाखतकाराने मुलाखतदात्याला व्यक्त होण्यास अधिक वेळ, वात्र दवावा प्रश्नांची रचना आणि गुंफण अशी असावी की मुलाखतदात्यांचा उत्साह वाढीस लागेल,
● याच टाण्यावर एकूण मुलाखतीतील सर्वात जास्त महत्त्वाचे विषयाशी थेट संबंधित प्रश्न विचारावेत, श्रीत, वाचक वा प्रेक्षकांची अपेक्षापूर्ती करणारा हा टप्पा असावा.
●मुलाखतीचा समारोप:
●मुलाखतीच्या प्रारंभाइतकाच त्याचा समारोपही महत्वाचा असतो. मुलाखतीचा आतापर्यंत प्रवास अतिशय यावर्धक, उत्साहाने ओतप्रोत भरलेला, श्रोत्यांचे कुतूहल शमवणारा असा सुरू असताना तिला तय समारोपाकडे नेताना खरं तर मुलाखतकाराची थोडी कसरत होणारच, पण हीच त्याच्यासाठीची कसोटी असते. मुलाखतकाराने या टण्यावर प्रश्न विचारायचे थांबवून एकंदर परिणामकारक, प्रभावी निवेदन करणे महत्वाचे असते. मुलाखत न रंगाळता योग्य वेळी योग्य ठिकाणी संपवावी. मुलाखत आता शेवटच्या टण्यात आलेली आहे याचा अंदान प्रेक्षकांना श्रोत्यांना मुळीच येता कामा नये, ‘मुलाखत देताना है नक्की करावे
●आपल्या मर्यादांची जाणीव ठेवून मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने प्रश्न विचारावेत.अशा आणी ती संपली पाहिजे, परंतु याचा अर्थ ती अपूर्ण
●वा अर्धवट राहायला नको, श्रोत्यांना ती आणखी हवीहवीशी वाटली पाहिजे, जे ऐकण्यासाठी घेण्यासाठी ते आले होते है त्यांना भरभरून देता आले तर खऱ्या अर्थाने मुलाखत ही प्रक्रिया पूर्ण झाली असे म्हणता येईल. श्रोत्यांच्या मनात पुनर्भेटी देत आलं पाहिजेत, जाताना मुलाखतीतील एखादा अविस्मरणीय संवाद मनात आठवत तो बाहेर पडला म्हणजे मुलाखतकाराला उत्तम मुलाखत घेता आली असे म्हणता येईल.
नोकरीसाठी प्रवेशासाठीची मुलाखत:
नोकरीसाठी किंवा एखाट्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी उमेदवाराची मुलाखत घेणे हे आजच्या काळात अधिक आव्हानात्मक झाले आहे. उमेदवाराकडे असलेले ज्ञान, बौद्धिक क्षमता, त्याचा कल केवळ एवढेच महत्त्वाचे राहिलेले नाही तर त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन आज मुलाखतीद्वारे केले जाते.
उमेदवाराचा जीवनविषयक दृष्टिकोन, त्याच्या अपेक्षा, निर्णयक्षमता, त्याचा मुलाखती दरम्यानचा वावर एकूण एक गोष्टींचा मुलाखतकाराला अंदाज येईल अशी मुलाखत घ्यावी लागते, केवळ ज्ञानार्जित व्यक्ती म्हणून नव्हे तर एकंदर माणूस म्हणून उमेदवार कसा आहे हे जाणून घ्यावे लागते. त्यासाठी त्याची विचारसरणी, सर्वांमध्ये उठून दिसणारे त्याचे व्यक्तिमत्त्व, सर्वांना सामावून घेत पुढे जाण्याची प्रवृत्ती, नवं शिकण्याची तयारी, चूक मान्य करण्याची आणि सुधारण्याची त्याची मानसिकता इत्यादींचा विचार या प्रकारच्या मुलाखतीत होत असतो. म्हणूनच उमेदवाराचे दिसणे, त्याचा पेहराव याहीपेक्षा तो आतून कसा आणि कितपत विकसित झाला आहे हे जाणून घेणे अधिक महत्त्वाचे ठरते.
●मुलाखत घेतांना हे नक्की करावे:
•मुलाखत देणाऱ्याच्या प्रश्नांची उत्तरे देण्याच्या किंवा न देण्याच्या स्वातंत्र्याला बाधा आणू नये.
•मुलाखतीचे सादरीकरण श्रवणीय, ओघवते आणि उत्स्फूर्त असावे,
•मुलाखतीच्या वेळी औपचारिकता असू नये आणि सकारात्मक वातावरण निर्माण करावे.
•’हो’, ‘नाही’, ‘माहीत नाही किंवा नंतर सांगेन अशी उत्तरे येतील असे प्रश्न तयार करू नयेत. संयम, विवेक आणि नैतिकतेचे पालन यांना खुशखुशीतपणाची जोड देऊन मुलाखत रंगतदार करावी.
मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी:
•चुकीचे, अप्रस्तुत प्रश्न विचारू नयेत.
•मुलाखत देणाऱ्याचा अपमान होईल असे प्रश्न विचारणे टाळावे.
•ज्या प्रश्नांद्वारे ताणतणाव आणि संघर्ष निर्माण होईल असे प्रश्न विचारू नयेत.
•अपेक्षित उत्तर सूचित होईल असे सूचक प्रश्न विचारू नयेत.
•बोजड, अवघड प्रश्न विचारू नयेत.
•प्रश्नांची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी घ्यावी. अतिआत्मविश्वासाच्या आहारी जाऊन पूर्वतयारी आणि पूर्वाभ्यास न करता मुलाखत घेणे टाळावे. रटाळ, कंटाळवाणे आणि प्रभावहीन प्रश्न विचारू नयेत.
•मुलाखतीच्या वेळी हास्यास्पद हावभाव टाळावे. मुलाखत घेणाऱ्याने मुलाखत देणाऱ्यापेक्षा स्वतः जास्त बोलू नये. “
•नियोजित वेळेत मुलाखत पूर्ण करावी.