रत्नागिरी जिल्हा माहिती मराठी, इतिहास, वैशिष्ट्ये, तालुके | Ratnagiri Information In Marathi 2024

Ratnagiri marathi mahiti, Ratnagiri Jilha Mahiti, Ratnagiri Information In Marathi, Ratnagiri District Information, Ratnagiri pin code maharashtra

रत्नागिरी जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – Ratnagiri Information in Marathi .

रत्नागिरी जिल्हा

सन पौराणिक कथांमध्ये रत्नागिरीचा उल्लेख देवभूमी या नावाने आढळतो. रत्नागिरीपासून पूर्वेकडे ५ किमी महामार्गावर असलेल्या हातखंबा येथे एका नैसर्गिक गुहेमध्ये मध्याश्मयुग कालीन अश्मास्त्र व मौर्यकाळातील काही अवशेष या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. मौर्यानंतर सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव यांनी या प्रदेशावर राज्य केले. मध्ययुगीन काळात या भागावर विजापूरच्या आदिलशहाची सत्ता होती. नंतरच्या काळात या भागावर शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची १८१८ मध्ये पेशवाई संपुष्टात आल्यानंतर या भागावर इंग्रजांचे राज्य प्रस्थापित झाले.

रत्नागिरी जिल्हा संक्षिप्त माहिती

(२) भौगोलिक स्थान : रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा, पूर्वेस सातारा, सांगली, कोल्हापूर व उत्तरेस रायगड जिल्हा- अशा जिल्ह्याच्या सीमा आहेत. या जिल्ह्यास सुमारे १७० किमी लांबीचा किनारा लाभला आहे. उत्तर ते दक्षिण असे पाहता बाणकोट खाडी, दाभोळ खाडी, जयगड खाडी, भाटे-पूर्णगड-जैतापूरची खाडी व विजयदुर्ग खाडी या खाड्या रत्नागिरीच्या पश्चिम सीमेवर आहेत.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

(३) उपविभाग व तालुके : या जिल्ह्यात चिपळूण, रत्नागिरी, खेड, राजापूर व दापोली असे पाच उपविभाग असून, रत्नागिरी, गुहागर, दापोली, मंडणगड, खेड, चिपळूण, संगमेश्वर (देवरूख), लांजे व राजापूर असे नऊ तालुके आहेत.

(४) प्रमुख पिके : भात किंवा तांदूळ हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. या जिल्ह्याच्या पूर्व भागात डोंगर उतारावर नाचणीचे पीक घेतले जाते. संगमेश्वर व चिपळूण हे तालुके नाचणीच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. दापोली, गुहागर, राजापूर या काही भागात वरईचे उत्पादनही घेतले जाते. आंबा, फणस, काजू, नारळ, रातांबे व सुपारी ही जिल्ह्यातील प्रमुख फळपिके आहेत. येथे कोळंबीची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. या जिल्ह्यातील सिट्रानेला गवत प्रसिद्ध आहे. या गवतापासून तेलाची निर्मिती केली जाते.

(५) नद्या : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सावित्री, वशिष्ठी, अंबा, जगबुडी, शास्त्री, रत्नागिरी, जैतपूर, मुचकुंदी या मुख्य नद्या वाहतात. चिपळूण तालुक्यात कामथे व रत्नागिरी तालुक्यात पानवल, काळझोंडी व हरचिरी येथे छोटे बंधारे आहेत. मध्यम जलप्रकल्प नातूवाडी येथे आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना प्रकल्पातील पाण्यावर चिपळूण तालुक्यात पोफळी येथे जलविद्युत निर्मिती केंद्र कार्यरत आहे.

(६) खनिज संपत्ती : धान्य दळण्यासाठी जे जाते वापरले जाते, ते जाते बनविण्यासाठी वापरला जाणारा कुरूंद दगड हा याच जिल्ह्यात सापडतो. मंडणगड व दापोली या तालुक्यांमध्ये बॉक्साईटचे साठे सापडतात. तसेच मालगुंड ते पूर्णगड यादरम्यान किनारी प्रदेशात इल्मेनाईटचे साठे आढळतात. रत्नागिरी जिल्ह्यात जैतापूर येथे अणुविद्युत प्रकल्प प्रस्तावित आहे. दाभोळजवळ एनरॉन या बहुराष्ट्रीय कंपनीचा एनरॉन वीज प्रकल्प आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

(७) उद्योग व व्यवसाय : रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण, पोफळी, खाडपाडी, खेरडी, लोटेमाळ, रत्नागिरी, जयगड, देवरूख, दापोली, राजापूर या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. पावसजवळ फिनोलेक्स ही शेतीसाठी लागणारे पाईप्स तयार करणारी कंपनी आहे. मासेमारी करणे, मासे पकडणे, मत्स्योत्पादने हवाबंद करणे हा उद्योग दाभोळ, हर्णे, रत्नागिरी या ठिकाणी चालतो. रत्नागिरी जिल्ह्यात फळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. आंबा उत्पादनात महाराष्ट्रात रत्नागिरीचा क्रमांक पहिला लागतो. आंब्याचा रस हवाबंद करण्याचा उद्योग चिपळूण, राजापूर, रत्नागिरी येथे मोठ्या प्रमाणावर आहे. येथे कोकमपासून आमसूल तयार करण्याचा उद्योगही चालतो. कोकम सरबत, आंबा पोळी, नाचणीचे पीठ आदी खास कोकणी उत्पादनांना महाराष्ट्रातून मोठी मागणी असते, तर काजू उत्पादनात रत्नागिरी दुसऱ्या क्रमांकावर आहे.

(८) दळणवळण : या जिल्ह्यातून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ आणि रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २०४ गेलेला आहे. या जिल्ह्यातून कोकण रेल्वेचा लोहमार्ग गेलेला आहे. या जिल्ह्यातील वैभवसंपन्न प्राचीन बंदर दाभोळ आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर दाभोळइतके जुने व प्रसिद्ध बंदर दुसरे नव्हते. जगप्रसिद्ध वैज्ञानिक टॉलेमीच्या सर्वात जुन्या नकाशात दाभोळचा उल्लेख आढळतो. या बंदरामधून मालाची वाहतूक होते.

रत्नागिरी जिल्ह्याची वैशिष्ट्ये

 • रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे.
 • रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र कार्यरत आहे.
 • ‘फुरसे’ या नावाने ओळखला जाणारा विषारी साप रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतो.
 • भारतातील सर्वात मोठा अँल्युमिनियम प्रकल्प रत्नागिरी येथे विकसित होत आहे.
 • रत्नागिरी हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची किनारपट्टी लाभलेला जिल्हा आहे.
 • रत्नागिरीजवळ कुरबुडे येथे सुमारे ६.५ किमी लांबीचा सर्वात
  लांब रेल्वे बोगदा आहे.
 • रत्नागिरी हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची किनारपट्टी लाभलेला जिल्हा आहे.
 • रत्नागिरी हीच सावरकरांच्या सामाजिक कार्याची सावरकरांनी इ. स. १९२९ साली बांधलेले पतितपावन मंदिर याच ठिकाणी आहे
 • दापोली येथील थंड हवामानामुळे हे ठिकाण ‘रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर’ म्हणून ओळखले जाते.
 • छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ही डेरवण येथे शिवसृष्टी उभारण्यात आली आहे.
 • राजापूर हे गंगेचे स्थान मानले जात असून, ही गंगा ठरावीक काळानंतर ( साधारण तीन-चार वर्षांनी) जमिनीवर अवतीर्ण होऊन सभोवतीच्या चौदा कुंडांमधून वाहू लागते. उन्हवरे (दापोली तालुका) येथील गरम पाण्याचे झरे प्रसिद्ध आहेत. तसेच मार्लेश्वर हे ठिकाण धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.
 • मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर हे रत्नागिरीचे असून, त्यांनी सन १९३७ ते ३९ व १९४६ ते ५२ या काळात मुंबई प्रांताचे मुख्यमंत्रिपद भूषविले होते.
 • रत्नागिरी जिल्ह्यास सुमारे १७० कि.मी. लांबीचा किनारा लाभला आहे. हा सर्वाधिक लांबीचा किनारा आहे.
 • रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर येथे अणुविद्युत प्रकल्प प्रस्तावित आहे
 • रत्नागिरी जिल्ह्यातील हापूस आंबा सर्वत्र प्रसिद्ध असून या आंब्याची परदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते.

सांख्यिकीक रत्नागिरी

(अ) भौगोलिक माहिती

१. क्षेत्रफळ=८,२०८ चौ. किमी.

२. जंगलाचे प्रमाण=५१.१५%

आ)प्रशासकीय माहिती

१. आयुक्तालय=कोकण विभाग नवी मुंबई)

२. जिल्ह्याचे मुख्यालय=रत्नागिरी

३. उपविभाग=०५ (चिपळूण, रत्नागिरी, खेड, राजापूर व दापोली)

४. तालुके=०९ (रत्नागिरी, गुहागर, दापोली, मंडणगड, खेड, चिपळूण, संगमेश्वर (देवरूख), लांजा, राजापूर.)

५.पंचायत समित्या= ०९

६.ग्रामपंचायत= ८४४

७. नगरपालिका =०४

८.पोलीस मुख्यालय=०१ जिल्हा पोलीस अधीक्षक

९. पोलीस स्टेशनची संख्या=१६

(इ) लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनुसार)

१. लोकसंख्या= १६,१५,०६९

२. साक्षरता =८२.१८%

३. लिंग गुणोत्तर =११२३

४. लोकसंख्येची घनता =२१०

हे पण वाचा >>>>>>>>>>>

रायगड जिल्हा संपूर्ण माहिती

उपनगर मुंबई जिल्हा संपूर्ण माहिती

मुंबई जिल्हा संपूर्ण माहिती

सोलापूर जिल्हा संपूर्ण माहिती

सातारा जिल्हा संपूर्ण माहिती

तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्या संपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे अश्याच माहिती साठी MaharashtraBoardSolutions.Net ला नक्की भेट द्या.

Final Word: आम्हाला आशा आहे की तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Ratnagiri District Information In Marathi तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीला हा लेख नक्की शेअर करा आणि Maharashtra Board Solutions ला भेट द्यायला विसरू नका.

Leave a Comment