Washim marathi mahiti, washim Jilha Mahiti, washim Information In Marathi, washim District Information, washim pin code maharashtra
वाशीम जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – washim Information in Marathi
वाशीम जिल्हा
प्राचीन काळी वाशीम हे ठिकाण ‘वत्सलगुम’ या नावाने ओळखले जात असे. महाभारत, वात्सायनाचे कामसूत्र, सुमारे दोन हजार वर्षापूर्वी या प्रदेशावर वाकाटकांनी राज्य केले होते. वाकाटक घराण्याच्या एका शाखेची वत्सलगुम ही त्यांची राजधानी होती. वाशीमवर वाकाटकानंतर राष्टकूट, यादव, मोघल व निझामाची सत्ता होतील निझामाच्या काळात वाशिम येथे टाकसाळ होती. इंग्रजांच्या काळात सन १९०२ पर्यंत वाशीम जिल्ह्याचे मुख्यालय होते. १ जुलै १९९८ रोजी अकोला जिल्ह्याचे विभाजन करून ‘वाशीम’ला जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
वाशीम जिल्हा संक्षिप्त – माहिती
१. भौगोलिक स्थान :वाशीम जिल्ह्याच्या पूर्वेला यवतमाळ जिल्हा असून पश्चिमेला बुलढाणा जिल्हा असून उत्तरेस अकोला व अमरावती आणि दक्षिणेस यवतमाळ व हिंगोली हे जिल्हे आहेत.
२. प्रमुख पिके: कापूस व ज्वारी हे वाशीम जिल्ह्यातील प्रमुख पिके असून, सिंचनाची व्यवस्था असलेल्या भागात संत्री, ऊस व विड्याच्या पानांचे पीकसुध्दा घेतले जाते. ज्वारी व कापूस जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे पीक आहे.
३. नद्या व धरणे: वाशीम जिल्ह्यातील पैनगंगा ही मुख्य नदी असून याशिवाय कास, चंद्रभागा, अरुणावती, अडाण, पूस, काटेपूर्णा व बेंबळा इत्यादी नद्या वाशीम जिल्ह्यातून वाहतात. कारण तालुक्यातील अडाण नदीवरील अडाण प्रकल्प’ हा जिल्ह्यातील मोठा जलसिंचन प्रकल्प आहे.
४.उद्योग व व्यवसाय : या जिल्ह्यात कापसावर आधानि उद्योगधंद्याचे प्रमाण जास्त आहे. या जिल्ह्यात हातमागावा कापड विणण्याचा व्यवसाय फार प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. खादीचे कापड विणण्याचा व्यवसाय मंगरूळपीर तालुक्यात केला जातो.
५.गॅस व रासायनिक कारखाना : या जिल्ह्यातील धनज येथे (कारंजा तालुका) सिलेंडरमध्ये गॅस भरण्याचा प्रकल्प आहे, वाशीम येथे रासायनिक खतांचा कारखाना आहे. वाशीम जिल्ह्यात कातडी वस्तू बनविणे,लाकडी सामान व खेळणी बनविणे, नॉयलॉन दोर तयार करणे तसेच रेशीम निर्मिती, डाल मिल्स, तेल गाळणे इ. व्यवसायल चालतात.
६.दळणवळण : वाशीम जिल्ह्यातून कोणताही राष्ट्रीय महामार्ग जात नाही. मध्य रेल्वेचा अकोला ते कुर्गवाडी हा रेल्वेमार्ग वाशीम जिल्ह्यातून जातो, हा मार्ग खांडवा-पूर्णा या नावाने ओळखला जातो. या मार्गावरील या जिल्ह्यातील वाशीम हे महत्वाचे स्टेशन आहे, या जिल्ह्यास जवळचे विमानतळ अकोला आहे.
वाशीम जिल्ह्याची वैशिष्ट्ये
- पोहरा देवीचे जगदंबा मंदिराचा ‘बंजारा समाजाची काशी’ म्हणून उल्लेख होतो.
- जैनांची काशी म्हणून ओळखले जाणारे शिरपूर जैन हे पुरातन गाव जैन धर्मीयांच्या तीर्थक्षेत्राबरोबर प्रेक्षणीय पर्यटनस्थळ आहे.
- ‘मंगरूळपीर’ हे तालुक्याचे ठिकाण असून येथील बिरबलनाथाची यात्रा प्रसिद्ध आहे.
- ‘डव्हा’ हे ठिकाण मालेगाव तालुक्यात असून येथील नाथ महाराजांचे व ब्रह्मदेवाचे मंदिर प्रसिद्ध आहे.
- वाशीम जिल्ह्यामध्ये आंध, गोंड आणि बंजारा या आदिवासी
जमाती प्रामुख्याने आढळतात. - वाशीम जिल्ह्यातील कारंजा शहराला जैनांची काशी असे म्हणतात.
सांख्यिकीक वाशीम मराठी माहिती
(अ) भौगोलिक माहिती
१. क्षेत्रफळ=५,१५०चौ. किमी.
२. जंगलाचे प्रमाण= ६.४० %
३. अभयारण्ये =काटेपूर्णाअभयारण्य
४. राष्ट्रीय उद्याने= नाही
५. व्याघ्र प्रकल्प =नाही
६, वनोद्याने =नाही
(आ)प्रशासकीय माहिती
१. आयुक्तालय=अमरावती विभाग
२. जिल्ह्याचे ठिकाण= वाशीम
३. उपविभाग= ३ (वाशीम, कारंजा वमंगरूळपीर)
४. तालुके= ०६ (वाशीम,मालेगाव, रिसोड,कारंजा, मंगरूळपीर,
मानोरा.)
५. पंचायत समित्या =०६
६. ग्रामपंचायत= ४९३
७. महानगरपालिका =नाही
८. नगरपालिका= ०४
९. नगरपंचायत =०२(मालेगाव, मानोरा)
१०. पोलीस आयुक्तालय =०० आयुक्तालय नाही
११. ग्रामीण पोलीस =०१ वाशीम पोलीस अधीक्षक
१२. पोलीस स्टेशनची संख्या =९
(इ) लोकसंख्याविषयी माहिती
१. लोकसंख्या= ११,९६,७१४
२. साक्षरता= ७२.५६%
३. लिंग गुणोत्तर =९४३
४. लोकसंख्येची घनता= २५०
हे पण वाचा >>
तुम्हाला वाशीम जिल्ह्या संपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे अश्याच माहिती साठी MaharashtraBoardSolutions.Net ला नक्की भेट द्या.
Final Word: आम्हाला आशा आहे की तुम्हाला वाशीम जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – vashim District Information In Marathi तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीला हा लेख नक्की शेअर करा आणि Maharashtra Board Solutions ला भेट द्यायला विसरू नका.