अकोला जिल्हा माहिती मराठी, इतिहास, वैशिष्ट्ये, तालुके | Akola Information In Marathi

Akola marathi mahiti, Akola Jilha Mahiti , Akola Information In Marathi

अकोला जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – Akola Information in Marathi

Akola Information In Marathi
Akola Information In Marathi

अकोला जिल्हा

 या शहराचे नाव अकोलेसिंग नावाच्या सरदारावरून अकोला  असे पडले कारण याच व्यक्तीने अकोला शहराची स्थापना केली, असे म्हटले जाते. सन १६,५७ मध्ये औरंगजेबने अकोला शहराची जहागिरी असद खान या सरदाराला दिली होती. या सरदाराने अकोला शहराच्या चारही बाजूंनी परकोट उभारले होते. सन १९६६० पूर्वी जिल्ह्याचा परिसर पूता मध्य प्रातांत समाविष्ट होता. त्यानंतर १९६० मध्ये महाराष्ट्राच्या स्थापनेबरोबरच अकोला जिल्ह्याला स्वतंत्र जिल्हाचा दर्जा मिळाला.

अकोला जिल्हा संक्षिप्त – माहिती

१. भौगोलिक माहितीः महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागात हा जिल्हा असून, या जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा पर्वत (गाविलगड) असून, काही भागात अजंठा रांग पसरली आहे. सातपुड्याचा उत्तरेकडील उतार हा गाविलगड या नावाने ओळखला जातो. अकोला जिल्ह्याच्या पूर्वेस अमरावती जिल्हा व यवतमाळ जिल्हा आहे. दक्षिणेस वाशीम जिल्हा व पश्चिमेस बुलडाणा जिल्हा आहे. अकोला जिल्ह्याच्या उत्तरेकडील सातपुड्याच्या रांगेमधील पठाराच्या मध्यावरून पूर्णा नदी वाहते. त्यामुळे या भागाला पूर्णा घाट असे म्हणतात.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

२. प्रमुख पिके : कापूस हे अकोला जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक असून, कापसाबरोबर येथील शेतकरी तूर, मूग, भुईमूग इत्यादी खरिपाची पिके आणि गहू व हरबरा ही रब्बीची पिके मोठ्या प्रमाणात घेतात. जलसिंचनाच्या सोयीमुळे या जिल्ह्यात संत्री, ऊस, मिरची यासारखी नगदी पिकेसुद्धा घेतली जातात.

३. नद्या व धरणे : पूर्णा व काटेपूर्णा या अकोला जिल्ह्याच्या प्रमुख नद्या आहेत. पेढी, उमा, काटेपूर्णा, लोणार, मोर्णा, निर्गुणा, मन या उपनद्या आहेत. काटेपूर्णा नदीवर बार्शी-टाकळी तालुक्यात बार्शी सिंचन व तेल्हारा तालुक्यातील बारी-भैरवगड येथे असलेला वान’ प्रकल्प सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आहे.

४. उद्योग व व्यवसाय : अकोला जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या ठिकाणी छोट्या-मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. अकोला येथील खादीचे कापड तसेच आकोट येथे सतरंज्या उद्योग प्रसिद्ध आहे. अकोला जिल्ह्यात तेलगिरण्या आणि शहरात वनस्पती तुपाचा कारखाना : आहे. बाळापूर तालुक्यातील पारस येथे औष्णिक ऊर्जा निर्माण केंद्र आहे.

५. दळणवळण : अकोला जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र.६
गेला असून, अकोला शहरातून मध्य रेल्वेचा कोलकाता-मुंबई रेल्वेमार्ग व जयपूरकडे जाणारा पूर्णा-खंडवा मीटरगेज रेल्वेमार्ग गेला आहे. तिसरा रेल्वेमार्ग अकोला, वाशीममार्गे कूर्गवाडीवरून दक्षिणेकडे गेला आहे. अकोला शहराजवळ शिवणी येथे विमानतळ आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

अकोला जिल्ह्याची वैशिष्ट्ये

 • अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ असून, हे विदर्भातील एकमेव कृषी संशोधन केंद्र आहे.
 • महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे (महाबीज) मुख्यालय अकोला येथे आहे.
 • अकोला जिल्ह्यातील बाळापूर हे ठिकाण हातमागावर तयार होणाऱ्या येथील सतरंज्यांकरिता प्रसिद्ध आहेत. येथील मिझाराजे जयसिंगाची छत्री व किल्ला प्रेक्षणीय आहे.
 • गाविलगडच्या डोंगररांगांत असलेला नरनाळा हा सुमारे २२ चौ. किमी क्षेत्रफळात पसरलेला व सत्तावीस दरवाज्यांचा प्राचीन किल्ला पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. नरनाळा येथील अभयारण्य प्रसिद्ध आहे.
 • या जिल्ह्यातील पातुर या गावाला लागूनच वाकाटककालीन शैवलेणी आहेत.
 • परम संगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात झाला.
 • अकोला शहर हे विदर्भातील कापसाची महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळखले जाते.
 • शंकरपटामध्ये धावणाऱ्या धडधाकट बैलांसाठी हा जिल्हा प्रसिद्ध आहे.
 • अकोला जिल्ह्यातील नरनाळा किल्ला बहामनी राजा यांनी बांधला.
 • पुंडलिक महाराजांची समाधी मूर्तिजापूर येथे आहे.
 • मूर्तिजापूर येथे संत गाडगेबाबांनी स्थापन केलेली धर्मशाळा आहे .
 • अकोला जिल्ह्यातील वारी या गावी रामदास स्वामींनी स्थापन केलेला ६ फूट मारुती प्रसिद्ध आहे.
 • अकोला जिल्हा हा आकारमानाने महाराष्ट्रातील सत्ताविसाव्या क्रमांकाचा जिल्हा आहे
 • अकोला शहर हे विदर्भातील कापसाची महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळखले जाते.
 • अकोला जिल्ह्याचे विभाजन करून वाशीम या जिल्ह्याची निर्मिती १ जुलै १९९८ रोजी करण्यात आली.
 • बाळापूर तालुक्यातील ‘पारस’ येथील औष्णिक विद्युत केंद्र प्रसिद्ध आहे.
 • जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, बाळापूर, मूर्तिजापूर ही सर्व कापूस केंद्रे म्हणून प्रसिद्ध आहेत.
 • पूर्णा नदी अकोला जिल्ह्याची प्रमुख नदी होय.
 • तेल्हारा तालुक्यात बारी-भैरवगड येथील ‘वान-प्रकल्प’ जिल्ह्यातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आहे.
 • मिर्झा राजे जयसिंगाची छत्री बाळापूर आहे
 • अकोला जिल्ह्यातील नरनाळा किल्ला बहामनी राजा यांनी बांधला.
 • महाराष्ट्रातील एकमेव मुष्टियुद्ध (बॉक्सिंग) अकादमी अकोला येथे कार्यरत आहे.
 • अकोला येथे खादीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते.

सांख्यिकीक अकोला सर्व माहिती

(अ) भौगोलिक माहिती

१. क्षेत्रफळ=५,४३१ चौ किमी
.२. जंगलाचे प्रमाण =५.९७%
३. अभयारण्ये =नरनाळा अभयारण्य
४. राष्ट्रीय उद्याने= नाही
५. व्याघ्र प्रकल्प =नाही
६. वनोद्याने= नाही

(आ)प्रशासकीय माहिती

१. आयुक्तालय=अमरावती विभाग
२. जिल्ह्याचे मुख्यालय =अकोला
३. उपविभाग =०४ (अकोला,अकोट,बाळापूर व मूर्तिजापूर)
४. तालुके =०७ अकोट, बाळापूर, तेल्हारा,अकोला, मुर्तिजापूर, पातुर,बार्शी-टाकळी.
५. पंचायत समित्या=०७
६. ग्रामपंचायत= ५४१
७. महानगरपालिका= ०१अकोला महानगरपालिका
८.नगरपालिका=०५(अकोट,तेल्हारा,बाळापूर,पातूर,मूर्तीजापूर)
९. पोलीस आयुक्तालय= ०१ पोलीस अधिक्षक
१०. पोलीस स्टेशनची संख्या=१८

(इ) लोकसंख्या(सन २०११ च्या जनगणनेनुसार)

१. लोकसंख्या =१८,१८,६१७
२.साक्षरता=८७.५५%
३. लिंग गुणोत्तर=९३८
४. लोकसंख्येची घनताया=३३०

तुम्हाला वर्धा जिल्ह्या संपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे अश्याच माहिती साठी MaharashtraBoardSolutions.Net ला नक्की भेट द्या.

Final Word: आम्हाला आशा आहे की तुम्हाला अकोला जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Akola District Information In Marathi तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीला हा लेख नक्की शेअर करा आणि Maharashtra Board Solutions ला भेट द्यायला विसरू नका.

Leave a Comment