Jalgaon marathi mahiti, Jalgaon Jilha Mahiti, Jalgaon Information In Marathi, Dhule District Information, Jalgaon pin code maharashtra
जळगाव जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – Jalgaon Information in Marathi .
जळगाव जिल्हा
खान्देश म्हणून ओळखल्या जाणारा जळगाव जिल्हा पूर्वी ‘ऋषिक’ या नावाने ओळखला जात असे. या प्रदेशावर सातवाहनांपासून, मराठे व त्यानंतर इंग्रजांपरीत अनेक राजवटी स्थापन झाल्या. हा जिल्हा अजिंठ्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो. १९०६ मध्ये जेव्हा खान्देशाची विभागणी झाली, तेव्हाचे पूर्व खान्देश हे सध्याचा जळगाव बनला. महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर जळगाव राज्यात दाखल झाला.
जळगाव जिल्हा संक्षिप्त माहिती
१. भौगोलिक स्थान : जळगाव जिल्ह्याच्या दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा, आग्नेय कोपऱ्यात जालना जिल्हा, चांदवड-सातमाळाचे डोंगर व अजिंठ्याच्या रांगांनी दक्षिणेकडील सीमा मर्यादित आहे. धुळे व नाशिक जिल्हे पश्चिमेला आहेत. उत्तरेस मध्यप्रदेश असून, संपूर्ण जिल्हा दख्खनच्या पठारावर वसलेला आहे.
२. प्रमुख पिके : भारतातील १६ % केळीचे उत्पादन एकट्या जळगाव जिल्ह्यातच होते. जळगाव जिल्ह्यातील रावेर व यावल हे तालुके केळीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. केळी खालोखाल या जिल्ह्यात कापूस व ज्वारी हे सर्वात महत्त्वाचे पीक आहे. हा जिल्हा तेलबियांच्या उत्पादनातदेखील आघाडीवर आहे.
३.नद्या व धरणे : तापी व पूर्णा या जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून पांझरा, भोकर, सुकी, मोर, गुळी, हडकी व अनेर या उपनद्या आहेत. तापी व पूर्णा या दोन नद्यांचा संगम ‘चांगदेव’ येथे झाला आहे. .
४. उद्योग व व्यवसाय : या जिल्ह्यात वरणगाव येथे युद्धसाहित्य निर्मितीचा कारखाना आहे. भुसावळजवळच फेकरी येथे दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र आहे. पिंप्राळे येथे कृत्रिम रेशमी कापडाची गिरणी आहे. वनस्पती तेल, वनस्पती तूप, साबण, खताचा कारखाना याच जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यातील जैन पाईप्स उद्योग भारतभर प्रसिद्ध आहे. जळगाव जिल्ह्यातील उत्राण हे उत्कृष्ट प्रतीच्या लिंबांसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणी लिंबाचा रस काचेच्या बाटल्यांमध्ये भरण्याचा कारखाना असून, उत्राणची लोणची प्रसिद्ध आहे.
५. दळणवळण: या जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ व राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ गेला आहे. या जिल्ह्यातून मध्य रेल्वेचा मुंबई-कोलकाता लोहमार्ग व गुजरातला जाणारा भुसावळसुरत, चाळीसगाव-धुळे व पाचोरे-जामनेर लोहमार्ग गेला आहे.
जळगाव जिल्ह्याची वैशिष्ट्ये
- जळगाव येथे सन १९९० मध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे.
- जळगाव शहर अजिंठ्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते.
- ‘पाल’ (रावेर तालुका) हे सातपुडा पर्वतरांगेत वसलेले थंड हवेचे ठिकाण व पर्यटन केंद्र आहे.
- येथील चोपडा तालुक्यात उपनदेव-सुपनदेव या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत.
- चाळीसगाव या ठिकाणी प्राचीन काळातील गणितज्ज्ञ भास्कराचार्य यांनी ‘लीलावती’ ग्रंथ लिहिला, असे म्हटले जाते.
- एरंडोल तालुक्यात फरकांडा येथील झुलते मनोरे प्रसिद्ध आहे.
- पारोळा हे ठिकाण झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे हे माहेर होय.
- चाळीसगावच्या उत्तरेस गिरणा नदीकाठी वसलेले बहाळ हे गाव ताम्र-पाषाणयुगीन अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे.
- बालकवी हे टोपणनाव असलेले त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे १८९० मध्ये झाला.
- प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म जळगाव जिल्ह्यात झाला. त्यांची काव्यरचना अहिराणी बोलीभाषेत आहे.
सांख्यिकीक जळगाव
(अ) भौगोलिक माहिती
१. क्षेत्रफळ=११,७६५ चौ. किमी.
२. जंगलाचे प्रमाण=१६.९४%
३. अभयारण्ये =०२ गौताळा-औटरामघाट व यावल अभयारण्य
४. वनोद्याने= पाल, पाटणदेवी व पद्मालय
(आ)प्रशासकीय माहिती
१. आयुक्तालय =नाशिक विभाग
२. जिल्ह्याचे मुख्यालय =जळगाव
३. उपविभाग=७ चोपडा, पाचोरा, चाळीसगाव,अमळनेर, जळगाव, भुसावळ,फैजपूर
४. तालुके=१५ चोपडा, यावल, अमळनेर, एंडोल, रावेर, पाचोरा, पारोळा, जळगाव, भुसावळ, भडगाव, मुक्ताईनगर (एदलाबाद), जामनेर, चाळीसगाव, धरणगाव, बोदवड.
५. पंचायत समित्या =१५
६. ग्रामपंचायत = ११५१
७. महानगरपालिका =०१ जळगांव महानगरपालिका ८. नगरपालिका= १३
९. पोलीस मुख्यालय =०१ जिल्हा पोलीस अधीक्षक
१०. पोलीस स्टेशनची संख्या =३३
(इ) लोकसंख्या(सन २०११ च्या जनगणनेनुसार)
१.लोकसंख्या =४२,२९,९१७
२. साक्षरता =७८.२०%
३. लिंग गुणोत्तर =९३३
४. लोकसंख्येची घनता=३१३
हे पण वाचा>>>>>>>>
तुम्हाला जळगाव जिल्ह्या संपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे अश्याच माहिती साठी MaharashtraBoardSolutions.Net ला नक्की भेट द्या.
Final Word: आम्हाला आशा आहे की तुम्हाला जळगाव जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Jalgaon District Information In Marathi तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीला हा लेख नक्की शेअर करा आणि Maharashtra Board Solutions ला भेट द्यायला विसरू नका.