धुळेजिल्हा माहिती मराठी, इतिहास, वैशिष्ट्ये, तालुके | Dhule Information I n Marathi

Dhule marathi mahiti, Dhule Jilha Mahiti, Dhule Information In Marathi, Dhule District Information, Dhule pin code maharashtra

धुळे जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – Dhule Information in Marathi .

धुळे जिल्हा

इतिहासकाळात धुळे जिल्ह्याचा परिसर मौर्य साम्राज्यात समाविष्ट होता. तसेच सातवाहन राज्यकाळातील अनेक वसाहती या भागात मिळतात. वाङ्मयीन उल्लेखावरुनही हे स्पष्ट होते. सातवाहनांच्या नंतर अभिरांनी या भागावर राज्य केले. हे लोक ‘अहिराणी’ भाषा बोलत असावे, असा कयास आहे. बहामनी काळात हाच प्रदेश खाणांचा देश म्हणून खान्देश’ या नावाने ओळखला जाऊ लागला. ब्रिटिश काळात धुळे व जळगाव हे सध्याचे जिल्हे मिळून खान्देश हा एकच जिल्हा होता. १९६१ मध्ये पश्चिम खान्देशचे धुळे जिल्हा’ असे नामकरण करण्यात आले. पूर्वी या जिल्ह्याला धूलिया म्हणून ओळखले जात असे.

धुळे जिल्हा संक्षिप्त माहिती

१. भौगोलिक माहिती : धुळे जिल्ह्याच्या उत्तरेस नंदुरबार जिल्हा व मध्य प्रदेशचा मेवाड जिल्हा, पूर्वेस जळगाव जिल्हा, पश्चिमेस नंदुरबार जिल्हा व गुजरात राज्य, तसेच दक्षिणेस नाशिक जिल्हा आहे. धुळे जिल्ह्यात सातपुडा व त्याच्या उपरांगा पसरलेल्या आहेत. या महत्त्वाच्या पर्वतरांगेत पहिल्या रांगेत तोरणमाळ हे सर्वोच्च ठिकाण आहे. .

Telegram group मध्ये जॉईन व्हा

. प्रमुख पिके : भुईमूग हे धुळे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून, हा जिल्हा राज्यातील भुईमुगाच्या उत्पादनात आघाडीवर असलेल्या जिल्ह्यांपैकी एक आहे. तसेच ज्वारी, बाजरी, तीळ, कापूस व मूग ही पिकेदेखील जिल्ह्यात घेतली जातात. केळी, पपई, पेरू, खरबूज यासारख्या फळांचेही उत्पादन येथे होते.

. नद्या व धरने : धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागातून वाहणारी तापी ही या जिल्ह्याची प्रमुख नदी आहे. तसेच पांझरा, बुराई, अनेर, अरुणावती याही नद्या धुळे जिल्ह्यातून वाहतात. या जिल्ह्यात पांझरा नदीवर सय्यदनगर, अक्कलपाडा येथे, बुराई नदीवर फोफर आणि अनेर नदीवरील धरणे, अशी धरणे आहेत. गेल्या काही वर्षांत जलसिंचनासाठी वैशिष्ट्यपूर्ण असा नदीजोड प्रकल्प धुळे जिल्ह्यांतर्गत राबविण्यात आला आहे.

४. उद्योग-व्यवसाय : धुळे, शिरपूर व पिंपळनेर येथे इमारती
लाकडाशी संबंधित उद्योग आहेत. धुळे येथे औद्योगिक वसाहत आहे. धुळ्यासह ब्राह्मणवेल, नरडाणे, उभारांडी व रायपूर या ठिकाणीही उद्योग क्षेत्रे आहेत. धुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी विड्या वळणे, हातमागावर लुगडी विणणे, भुईमूग व तीळ या तेलबियांपासून तेल काढणे इत्यादी उद्योग चालतात. या जिल्ह्यात दुग्धोत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने हा जिल्हा ‘दुधातुपाचा जिल्हा’ म्हणून ओळखला जातो. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे भारतातील सर्वात पहिला सोने शुद्धीकरण प्रकल्प
सुरू झाला आहे.

५.दळणवळणः धुळे जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र.६ आणि
राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ गेलेला आहे. धुळे जिल्ह्यामधून भुसावळशिंदखेडा-नंदुरबार-सुरत हा एकपदरी लोहमार्ग या जिल्ह्यातून जातो. तसेच चाळीसगाव-धुळे हा लोहमार्गही जिल्ह्यात आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा
     धुळे जिल्ह्याची वैशिष्ट्ये
 • धुळे शहरात प्रसिद्ध इतिहासकार राजवाडे यांनी स्थापन केलेले राजवाडे संशोधन केंद्र आहे.
 • साक्री हे ठिकाण प्रागैतिहासिक अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे.
 • दोंडाईचा येथे स्टार्चचा कारखाना असून, मिरचीच्या व्यापारासाठी दोंडाईचा विशेष प्रसिद्ध आहे.
 • मराठी विश्वकोशाचे संस्थापक लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा जन्म
  धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे झाला.
 • भुईमुगाचे अधिक क्षेत्र व उत्पादन असणारा जिल्हा म्हणून धुळे जिल्हा ओळखला जातो.
 • ‘अहिराणी’ ही बोलीभाषा धुळे जिल्ह्यात बोलली जाते.
 • १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन करून ‘नंदुरबार या स्वतंत्र जिल्ह्याची निर्मिती केली गेली.
 • नकाणे व डेडरगाव तलाव ही सहलीची स्थळे आहेत.
 • मराठीतील आद्य व्यंगचित्रकार रघुनाथ बाळकृष्ण केळकर यांचा जन्म धुळे येथे झाला.

सांख्यिकीक धुळे

(अ) भौगोलिक माहिती

१. क्षेत्रफळ =८०६३चौ.किमी.
२. जंगलाचे प्रमाण =२८.७३%
. वनोद्याने =तोरणमाळ कंडेश्वर

(आ)प्रशासकीय माहिती

. आयुक्तालय =नाशिक विभाग
. जिल्ह्याचे मुख्यालय =धुळे
३. उपविभाग= ०२ धुळे व शिरपूर.
. तालुके= ०४ (शिंदखेड, साक्री, धुळे व शिरपूर
५. पंचायत समित्या=०४
. ग्रामपंचायत =५५०
७. महानगरपालिका =०१ धुळे महानगरपालिका
८. नगरपालिका =०२ (शिरपूर, दोंडाईचा)
९. पोलीस मुख्यालय =०१ धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक
१०. पोलीस स्टेशनची संख्या =१४

(इ) लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनुसार)

. लोकसंख्या =२०,५०,८६२
२. साक्षरता =७२.८०%
. लिंग गुणोत्तर =९७२
४. लोकसंख्येची घनता =२५०

हे पण वाचा>>>>>>>>

अहमदनगर जिल्हा माहिती

परभणी जिल्हा माहिती

उस्मानाबाद जिल्हा माहिती

नांदेड जिल्हा माहिती

तुम्हाला धुळे जिल्ह्या संपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे अश्याच माहिती साठी MaharashtraBoardSolutions.Net ला नक्की भेट द्या.

Final Word: आम्हाला आशा आहे की तुम्हाला धुळे जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Dhule District Information In Marathi तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीला हा लेख नक्की शेअर करा आणि Maharashtra Board Solutions ला भेट द्यायला विसरू नका.

Leave a Comment