नांदेड जिल्हा माहिती मराठी, इतिहास, वैशिष्ट्ये, तालुके | Nanded Information In Marathi

nanded marathi mahiti, nanded Jilha Mahiti, nanded Information In Marathi, nanded District Information, nanded pin code maharashtra.

नांदेड जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – nanded Information in Marathi

Nanded image

नांदेड जिल्हा

आजचे नांदेड हे पुराणकाळात नऊ ऋषींचे निवासस्थान होते. यामुळे या ठिकाणास ‘नवदंडी’ हे नाव पडले. नांदेडचा उल्लेख पुराणांमध्ये सापडतो. प्राचीन काळात या भागावर आंध्रभृत्य, सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, खिलजी, बहामनी व मोगल यांची कालानुक्रमे राजवट होती. सन १९५६ या वर्षी द्वैभाषिक राज्यनिर्मितीनुसार मराठवाडा मुंबई प्रातांत सामील जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. झाला. तेव्हा नांदेड महाराष्ट्रातील

नांदेड जिल्हा संक्षिप्त – माहिती

१. भौगोलिक स्थान : नांदेड जिल्हा हा गोदावरीच्या खोऱ्यात आग्नेय महाराष्ट्रात वसला असून, हा जिल्हा आग्नेय बाजूने कर्नाटक व तेलंगणा राज्यांशी जोडतो. यवतमाळ, लातूर, परभणी व हिंगोली हे जिल्हे नांदेड जिल्ह्याच्या सीमेस लागून आहेत. या जिल्ह्याचा उत्तर व ईशान्य भाग सातमाळाचे डोंगर व मुदखेडच्या टेकड्यांनी व्यापलेला असून, जिल्ह्याच्या दक्षिण-नैऋत्य सीमेवर बालाघाटचे डोंगर आहेत.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

. प्रमुख पिके : या जिल्ह्यातील ज्वारी व कापूस ही प्रमुख पिके असून, काही भागात केळीचे पीकदेखील घेतले जाते. किनवट तालुक्यातील जंगलांत बांबूची वने आहेत.

. नद्या व धरणे : नांदेड जिल्ह्यातील गोदावरी, मांजरा व पैनगंगा या प्रमुख नद्या असून आसना, सीता, सरस्वती व मांजरा, कयाधू, लेंडी, मनार या उपनद्या आहेत. नांदेडजवळ विष्णुपुरी उपसा जलसिंचन असून हा राज्यातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प आहे. नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यातील मन्याड नदीवरील मन्याड, तसेच लेंडी नदीवरील पेठवडज व महालिंगी, मुखेड तालुक्यातील कुंद्राळा, देगलूर तालुक्यातील करजखेड, किनवट तालुक्यातील नाझरी व डोंगरगाव इत्यादी अन्य महत्त्वाची धरणे या जिल्ह्यात आहेत.

. उद्योग व व्यवसाय : या जिल्ह्यात नांदेड, देगलूर, कंधार, हदगाव, भोकर व मुदखेड येथे औद्योगिक वसाहती आहेत. नांदेड जिल्ह्यातील वाजेगाव येथे कापडगिरणी असून, नांदेड, धर्माबाद, मुखेड, देगलूर, कुंडलवाडी येथे हातमाग चालतो.

. दळणवळण : नांदेड जिल्ह्यामधून कल्याणवरून तेलंगणास जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२, रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. २०४ गेलेला आहे. नांदेड जिल्ह्यातून मनमाडकाचीगुडा व पूर्णा- आदिलाबाद लोहमार्ग पुढे दक्षिणेकडे सिकंदराबादला जातो. नांदेड येथे छोटे विमानतळ आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

नांदेड जिल्हा संक्षिप्त

  • या जिल्ह्यातील माहूर हे ठिकाण रेणुकादेवीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असून, हे स्थान देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे
  • महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण व अशोकराव चव्हाण हे याच जिल्ह्यातील आहेत.
  • १७ सप्टेंबर, १९९४ रोजी नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.
  • नांदेड शहरात शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंहजी यांची समाधी आहे. पैनगंगा नदीच्या खोऱ्यात किनवट अभयारण्य आहे.
  • संस्कृत कवी वामन पंडित हे नांदेड जिल्ह्यातीलच होते.
  • केंद्र शासनाने नांदेड जिल्ह्यातील ‘कोलाम’ ही जमात ‘अतिमागास’ म्हणून घोषित केली आहे. सांख्येकीक नांडेड

(अ) भौगोलिक माहिती

१. क्षेत्रफळ= १०,४२२ चौ. किमी
२. जंगलाचे प्रमाण =८.६८%
. अभयारण्ये =किनवट अभयारण्य
. वनोद्याने =येळदरी, बहादूरपुरा व पंडित नेहरू वनोद्यान आहे.

(आ) प्रशासकीय माहिती

१. आयुक्तालय= औरंगाबाद विभाग
२. जिल्ह्याचे मुख्यालय =नांदेड
३ उपविभाग= ०८ (नांदेड, कंधार, किनवट, हदगाव, देगलूर, धर्माबाद, भोकर, बिलोली)
४. तालुके =१६ (किनवट, हदगाव, नांदेड, मुखेड, भोकर, कंधार, लोहा, बिलोली, देगलूर, मुदखेड, उमरी, हिमायतनगर, धर्माबाद, माहूर, नायगाव (खैरगाव), अर्धापूर.)
५. पंचायत समित्या= १६
६. ग्रामपंचायत =१३०९
७. महानगरपालिका =०१ नांदेड वाघाडा १२
८. नगरपालिका =१२
९. नगरपंचायत =४ ( माहूर, अर्धापूर, नायगाव, हिमायत नगर )
१०. पोलीस मुख्यालय= ०१ नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक
११. पोलीस स्टेशनची संख्या= ३४

(इ) लोकसंख्या ( सन २०११ च्या जनगणनेनुसार)
१. लोकसंख्या =३३,६१, २९२
२. साक्षरता= ७५.४५%
३. लिंग गुणोत्तर=९४३
४. लोकसंख्येची घनता=३२०

हे पण वाचा>>>>

लातूर जिल्हा माहिती

जालना जिल्हा माहिती

हिंगोली जिल्हा माहिती

बीड जिल्हा माहिती

तुम्हाला नांदेड जिल्ह्या संपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे अश्याच माहिती साठी MaharashtraBoardSolutions.Net ला नक्की भेट द्या.

Final Word: आम्हाला आशा आहे की तुम्हाला नांदेड जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Nanded District Information In Marathi तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीला हा लेख नक्की शेअर करा आणि Maharashtra Board Solutions.
Net ला भेट द्यायला विसरू नका.

Leave a Comment