जालना जिल्हा माहिती मराठी, इतिहास, वैशिष्ट्ये, तालुके | Jalna information In Marathi

Jalna marathi mahiti, Jalna Jilha Mahiti, Jalna Information In Marathi, Jalna District Information, Jalna pin code maharashtra, Jalna tourism, rajur ganpati jalna

जालना जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – Jalna Information in Marathi

Jalna Information In Marathi
Jalna Information In Marathi

जालना जिल्हा

मराठवाड्यातील जालना हा एक प्राचीन जिल्हा असून, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनस्पनि पूनीत झालेला जिल्हा आहे. जालना जिल्ह्याचा मुलुख निजामाकडून मराठ्यांनी जिंकून घेतला व त्यानंतर १८०३ मधील जाफराबाद तालुक्यातील असईच्या युद्धात मराठ्यांना हा जिल्हा इंग्रजांच्या ताब्यात द्यावा लागला. पुढील काळात हा हैदराबादच्या निजामाच्या राज्यावा एक भाग होता. दिनांक १ मे, १९८२ रोजी औरंगाबाद व परभणी या जिल्ह्यांची पुनर्रचना करून जालना जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.

जालना जिल्हा संक्षिप्त माहिती

१. भौगोलिक माहिती : जालना जिल्ह्याच्या उत्तरेस जळगाव जिल्हा, पूर्वेस परभणी जिल्हा असून, ईशान्येस बुलडाणा जिल्हा, दक्षिणेस बीड, पश्चिमेस औरंगाबाद जिल्हा व नैऋत्येस अहमदनगर जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या वायव्येकडील भाग अजिंठ्याच्या डोंगररांगांनी व्यापलेला आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

२. प्रमुख पिके : जालना जिल्ह्यातील ज्वारी मुख्य पीक असून, , ते दोन्ही हंगामांत घेतले जाते. या जिल्ह्यातील खरीप हंगामात ज्वारी, बाजरी, कापूस, मूग, तूर, उडीद, भुईमूग ही पिके घेतली जातात आणि रब्बी हंगामात गहू, ज्वारी, करडई व सूर्यफुलासारखी गळिताची पिके घेतली जातात. महाराष्ट्रात मोसंबीखाली सर्वात जास्त क्षेत्र जालना जिल्ह्यात आहे. Jalnaज्या भागात जलसिंचनाच्या सोयी आहेत, तसेच त्या भागात उसाचे पीक घेतले जाते. याशिवाय डाळिंब, केळी, द्राक्षे आदी बागायती पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. भोकरदन व जाफराबाद तालुक्यात पानमळे (विड्याच्या पानांचे) आहेत.

३. नद्या व धरणे : गोदावरी, पूर्णा व दुधना या जालना जिल्ह्याच्या महत्त्वाच्या नद्या असून, गिरजा, खेळणा, जीवरेखा, धामणा, दुधना, कल्याण या उपनद्या आहेत. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील जीवरेखा, अंबड तालुक्यातील गल्हाटी, भोकरदान तालुक्यातील जुई व धामना, जालना तालुक्यातील कल्याण,पीरकल्याण ही जिल्ह्यातील प्रमुख धरणे आहेत.

४.उद्योग व्यवसाय : या जिल्ह्यात जालना, परतूर, अंबड, , भोकरदन, जाफराबाद व जालना येथे औद्योगिक वसाहती असून, जालना शहर हे जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. जालना व आष्टी येथे हातमाग व यंत्रमाग उद्योग चालतो. जालना येथे धातू उद्योगासह विडी व्यवसायही मोठ्या प्रमाणावर चालतो.

५. दळणवळण : जालना जिल्ह्यामधून धुळे ते सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ गेला असून, मनमाड-काचीगुडा हा लोहमार्ग पुढे सिकंदराबादला दक्षिणेत गेला आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

जालना जिल्ह्याची वैशिष्ट्ये

  • जालना हे शहर बी-बियाणांच्या उत्पादनासाठी व व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.
  • अंबड या ठिकाणी मत्सोदरी नामक लेणे मंदिर आहे. अंबा ऋषींनी या मंदिराचे निर्माण केले, अशी कथा आहे.
  • अंबड तालुक्यातील गोंदी येथे हैदराबाद मुक्ती संग्रामाचे नोते स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म झाला.
  • जालना जिल्ह्यातील जांब हे ठिकाण समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान आहे.
  • जालना जिल्ह्यातील दावळवाडी येथे महिको ही संकरित बियाणे उत्पादन करणारी कंपनी आहे.
  • जालना जिल्ह्यातील इंदेवाडी या गावात आंतरराष्ट्रीय उपग्रह अनुश्रवण भूकेंद्र (इंटरनॅशनल सॅटेलाइट मॉनिटरिंग अर्थ स्टेशन) उभारण्यात आले आहे.
  • हेमाडपंती शिल्पकलेचे प्रणेते हेमाद्रीपंत यांचे मंठा तालुक्यातील हेलस हे गाव असून, हे ठिकाण प्राचीन अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे.
  • जालना जिल्ह्यात धाडसी लमाणी व भिल्ल जमाती आहेत.
  • जालना जिल्ह्यातील मंठा हे तालुक्याचे ठिकाण असून, येथील गुरांचा बाजार प्रसिद्ध आहे.
  • भारतातील एकमेव जांबुवंताचे मंदिर जांबुवंतगड येथे आहे.

सांख्यिकीक जालना सर्व माहिती

१. क्षेत्रफळ=७,६१२ चौ. किमी
२. जंगलाचे प्रमाण=०.८४%

(आ)प्रशासकीय माहिती

१. आयुक्तालय=औरंगाबाद विभाग

२. जिल्ह्याचे मुख्यालय= जालना

३. उपविभाग =४ (जालना, अंबड,भोकादन, परतूर)

४. तालुके= ८ (जालना, अंबड, भोकरदन,जाफराबाद, परतूर, मंठा,बदनापूर, घनसावंगी.

५. पंचायत समित्या =८

६. ग्रामपंचायत= ७८१

७. नगरपालिका= ०४ (जालना, भोकरदन, परतूर, अंबड

८. पोलीस मुख्यालय=०१ ग्रामीण पोलीस अधिक्षक

९. पोलीस स्टेशनची संख्या =१६

(इ) लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनुसार)
१. लोकसंख्या= १९,५८,०००
२. साक्षरता =७३.६%
३. लिंग गुणोत्तर =९३७
४. लोकसंख्येची घनता =२५४

हे पण वाचा >>>>>>>>>>>>

हिंगोली जिल्हा माहिती

बीड जिल्हा माहिती

औरंगाबाद जिल्हा माहिती

वाशिम जिल्हा माहिती

तुम्हाला जालना जिल्ह्या संपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे अश्याच माहिती साठी MaharashtraBoardSolutions.Net ला नक्की भेट द्या.

Final Word: आम्हाला आशा आहे की तुम्हाला जालना जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Jalna District Information In Marathi तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीला हा लेख नक्की शेअर करा आणि Maharashtra Board Solutions ला भेट द्यायला विसरू नका.

Leave a Comment