yavatmal marathi mahiti, yavatmal Jilha Mahiti, yavatmal Information In Marathi, yavatmal District Information, yavatmal pin code maharashtra
यवतमाळ जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – yavatmal Information in Marathi
यवतमाळ जिल्हा
यवतमाळ शहराचे पूर्वीचे नाव ‘यवत’ किंवा ‘यवते’ असे असावे. या ‘यवत’ किंवा ‘यवते’चा माळ (टेकडीवरील सपाटीचा प्रदेश) किंवा ‘यवते’चा महाल (परगणा किंवा विभाग) असा होतो. या शब्दाला माळ हा प्रत्यय लागून ‘यवतमाळ’ हे नाव पडले असावे, असा अंदाज आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे उत्खनन केले असता, या ठिकाणी बृहदाश्मयुग-मौर्य व त्यानंतरच्या
उत्तर काळामधील लोकांची या ठिकाणी वस्ती असल्याचे अवशेष मिळाले आहेत. मौर्यनंतरच्या काळात या प्रदेशावर गोंड, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या घराण्यांच्या सत्ता होत्या.
यवतमाळ जिल्हा संक्षिप्त – माहिती
१.भौगोलिक स्थान : यवतमाळ जिल्हा महाराष्ट्राच्या पूर्वेकडे पसरलेला असून, या जिल्ह्याच्या उत्तरेस वर्धा व अमरावती जिल्हा आहे. दक्षिणेस नांदेड जिल्हा व तेलंगणा राज्याची सीमा लागून आहे. पूर्वेस चंद्रपूर जिल्हा आणि पश्चिमेस परभणी व
अकोला जिल्हा आहे.
२. प्रमुख पिके : यवतमाळ जिल्हा कापसाचा जिल्हा म्हणून
ओळखला जातो. या जिल्ह्यातील वर्धा व पैनगंगेच्या खोऱ्यातील काळ्या कसदार जमिनीमुळे येथे मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन होते. कापसानंतर ज्वारी या पिकाचा क्रमांक लागतो. त्याचबरोबर या जिल्ह्यात तांदूळ, भुईमूग ही खरीप तर गहू, हरभरा ही रब्बी पिके घेतली जातात. पुसद, उमरखेड व महागाव या तालुक्यांत उसाचे पीकही घेतले जाते. येथे काही ठिकाणी द्राक्षांचेही मळे आहेत. राळेगाव, कळंब या भागात संत्र्याच्या व केळीच्या बागा आहेत. लाडखेड, दारव्हा, दिग्रस व उमरखेड या
ठिकाणी विड्याच्या पानांचे मळे आहेत.
३. नद्या व धरणे : यवतमाळ जिल्ह्यातील वर्धा व पैनगंगा या
प्रमुख नद्या असून, अरुणावती, पुस, अडना, वाघाडी, खुनी, विदर्भा, बेंबळा, रामगंगा व निर्गुणा उपनद्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात इसापूर (पैनगंगा), कायर (विदर्भा नदी), सायखेड (खुनी नदी), पुसद (पूस नदी), नवरगाव (निर्गुणा नदी), देवगाव (अरुणावती नदी), गोखी (अडाण नदी), वाघाडी (वाघाडी
नदी) इत्यादी ठिकाणी धरणे आहेत.
४. खनिज संपत्तीः यवतमाळ जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात राजूर,
तालुक्यात राजूर, चनाखा, परमडोह, सिंदोला या भागांत व राळेगाव तालुक्यातील गौराळा व मारेगाव तालुक्यातील मुकुटवन येथेही मोठ्या प्रमाणात चुनखडी सापडते. वर्धा जिल्ह्यातील राजूर, वणी, आष्टोना, चिंचोली, ढाणकी येथे दगडी कोळशाच्याही खाणी आहेत. तसेच पठारी भागात बांधकामाचा काळा दगड सापडतो.
५. उद्योग व व्यवसाय : यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ, लोहारा,
वणी व पुसद येथे औद्योगिक वसाहती आहेत. पांढरकवडा व पुसद येथे सूतगिरण्या आहेत. यवतमाळ येथे अरविंद कंपनीचा कापडाचा मिल आहे. यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, दारव्हा, बाभूळगाव व वणी येथे घोंगड्या व सतरंज्या विणण्याचा उद्योग चालतो. तसेच यवतमाळ तालुक्यात वाघापूर येथे हातकागद तयार केला जातो. यवतमाळ शहरात विड्या वळण्याचा उद्योग चालतो. हाडांपासून खत तयार करण्याचा कारखानाही यवतमाळ येथे आहे. वणी तालुक्यात राजूर येथे चुनाभट्ट्या असून, चुन्याचा
व्यापार चालतो. जिल्ह्यातील पाटणबोरी हे ठिकाण दगडांपासून
फरशी बनविण्याच्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे.
६. दळणवळण : या जिल्ह्यातून खालील राष्ट्रीय महामार्ग गेलेले
आहेत. वाराणसी-कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ आणि रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. २०४ गेलेला आहे. अचलपूर-मूर्तिजापूर- यवतमाळ हा मीटरगेज रेल्वेमार्ग या जिल्ह्यातून जातो.
यवतमाळ जिल्ह्याची वैशिष्ट्ये
- सन १९३२ मध्ये स्थापन करण्यात आलेली प्राचीन भारताच्या इतिहासाचे संशोधन करणारी शारदाश्रम ही संस्था यवतमाळ येथे कार्यरत आहे.
- वणी हे ठिकाण चुन्याच्या व्यापाराकरिता प्रसिद्ध आहे.
- पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी हे ठिकाण दगडापासून फरशी बनविण्याच्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे.
- पुसद हे ठिकाण पूस या नदीकाठावर असून, येथे वाकाटककालीन शिवमंदिराचे अवशेष सापडले आहेत.
- कळंब हे ठिकाण चिंतामणी गणपतीचे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. दर बारा वर्षांनी या मंदिराचा परिसर जलमय होतो. कळंब हे एक पुरातन गाव असून, येथील उत्खननामध्ये सोन्याची नाणी व अनेक मूर्ती सापडल्या आहेत.
- पैनगंगा नदीवर मुरली या गावाजवळ असलेला सहस्रकुंड धबधबा प्रसिद्ध आहे.
- सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदावर राहणारे प्रसिद्ध कृषितज्ज्ञ व
महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईक यांचा जन्म यवतमाळमधील गहुली या गावी झाला. माजी मुख्यमंत्री श्री. सुधाकरराव नाईक यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील आहे. - यवतमाळ जिल्ह्यातील वणी या ठिकाणी दगडी कोळशाच्या खाणी आहेत.
- या जिल्ह्यातील कोलंब (कोलाम) ही आदिवासी जमात केंद्र शासनाने ‘अतिमागास’ म्हणून जाहीर केली आहे.
- महाराष्ट्रात यवतमाळ जिल्हा कापूस उत्पादनासाठी अग्रेसर असल्यामुळे ‘पांढरे सोने पिकविणारा किंवा कापसाचा जिल्हा’ म्हणून ओळखला जातो.
- ब्रिटिश काळात वहाड प्रांतात १८६४ साली या यवतमाळ जिल्ह्याची स्थापना झाली. त्या वेळी हा जिल्हा वणी’ किंवा ऊन’ या नावाने ओळखला जात असे. सन १९०५ मध्ये या जिल्ह्याचे यवतमाळ असे नामांतर झाले.
- वणी तालुक्यात राजूर येथे चुनाभट्ट्या असून चुन्याचा व्यापार चालता. जिल्ह्यातील पाटणबोरी हे ठिकाण दगडापासून फरशी बनविण्याच्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे.
सांख्यिकीक यवतमाळ – सर्व माहिती
(अ) भौगोलिक माहिती
१. क्षेत्रफळ =१३,५८२चौ.किमी.
२. जंगलाचे प्रमाण =२१.७६%
३. अभयारण्ये=०२ (पैनगंगा व टिपेश्वरअभयारण्य)
४. राष्ट्रीय उद्याने =नाही
५. व्याघ्र प्रकल्प =नाही
६. वनोद्याने =नाही
(आ)प्रशासकीय माहिती
१. आयुक्तालय= अमरावती विभाग
२. जिल्ह्याचे ठिकाण =यवतमाळ
३. उपविभाग= ०७ (पुसद, उमरखेड,राळेगाव, यवतमाळ,
दारव्हा, केळापूर, वणी)
४. तालुके =१६ (दारव्हा, यवतमाळ,
पुसद, राळेगाव, वणी, बाभूळगाव, कळंब, मारेगाव, पांढरकवडा, घाटंजी, दिग्रस, नेर, उमरखेड, महागाव,आर्णी, झरी व जामणी.)
५. पंचायत समित्या= १६
६. ग्रामपंचायत =१२०७
७. महानगरपालिका =नाही
८. नगरपालिका =१०
९. पोलीस अधीक्षक= ०१यवतमाळ पोलीस अधीक्षक
१०. पोलीस स्टेशनची संख्या =२६
(इ) लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनुसार)
१. लोकसंख्या=२७,७२,३४८
२. साक्षरता=८२.८२%
३. लिंग गुणोत्तर=९४२
४. लोकसंख्येची घनता=२०४
हे पण वाचा >>
तुम्हाला यवतमाळ जिल्ह्या संपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे अश्याच माहिती साठी MaharashtraBoardSolutions.Net ला नक्की भेट द्या.
Final Word: आम्हाला आशा आहे की तुम्हाला यवतमाळ जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – yavatmal District Information In Marathi तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीला हा लेख नक्की शेअर करा आणि Maharashtra Board Solutions ला भेट द्यायला विसरू नका.