Bhandara marathi mahiti, Bhandara Jilha Mahiti , Bhandara Information In Marathi
भंडारा जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – Bhandara Information in Marathi
भंडारा जिल्हा संक्षिप्त – माहिती
१. भौगोलिक माहिती : भंडारा जिल्हा राज्याच्या पूर्व भागात असून, या जिल्ह्याच्या उत्तरेला मध्य प्रदेश राज्य, पूर्वेला गोंदिया जिल्हा, दक्षिणेला चंद्रपूर जिल्हा व पश्चिमेला नागपूर जिल्हा वसलेला आहे.
२. नद्या व धरणे : वैनगंगा ही भंडारा जिल्ह्यातील सर्वात मोठी नटी असून, या जिल्ह्यातून वाघ, चुलबंद, बावनथडी, अंबागड, बोदलकसा, गाढवी, सूर, मरू इत्यादी नद्या वाहतात. भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ४०० वर्षांपूर्वीपासून कोहली जमातीच्या लोकांनी पारंपरिक पद्धतीने पाणी अडविणे, जिरविणे याकरिता तलाव निर्माण केलेत, त्यामुळे हा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.
३. प्रमुख पिके : तांदूळ भंडारा जिल्ह्याचे प्रमुख पीक असून, या , पिकांबरोबर या जिल्ह्यात ऊस, तूर, सोयाबीन, ज्वारी, मूग, गहू, हरभरा, जवस ही पिके घेतली जातात. काही ठिकाणी उडदाचेही पीक घेतले जाते.
४. खनिज संपत्ती : खनिज संपत्तीच्या दृष्टीने भंडारा जिल्हा हा राज्यातील एक समृद्ध जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या उत्तर भागात मँगनीज हे खनिज मुबलक प्रमाणात सापडते. तुमसर व कवडसी येथे पांढरी माती मुबलक सापडते. शिवाय इतर खनिजेही जिल्ह्यात काही प्रमाणात मिळतात. मँगनीज, क्रोमाइट, क्वार्टझाइट, सिलिमनाइट, कायनाइटच्या खाणी आहेत. : १
५. उद्योग व व्यवसाय : या जिल्ह्यात गाडेगाव व तुमसर येथे औद्योगिक वसाहती आहेत. भंडाऱ्याजवळ जवाहरनगर येथे युद्धसाहित्य निर्मितीचा कारखाना आहे. तेंदूच्या पानांपासून विड्या बनविणे व धातूंची भांडी बनविणे येथील प्राचीन उद्योग आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे ट्रकची जुळणी करण्याचा कारखाना आहे.
६. राष्ट्रीय महामार्ग : या जिल्ह्यांतून हाजिरा-धुळे-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांकह६ जातो व मध्य रेल्वेचा मुंबई-नागपूरकोलकाता लोहमार्ग व नागपूर-चंद्रपूरहून चेन्नईला जाणारा लोहमार्ग पवनी तालुक्यातून गेला आहे –
भंडारा जिल्हा संक्षिप्त
भंडारा जिल्ह्याची वैशिष्ट्ये
- भंडारा येथील गवळी राजाच्या राजवटीतील ‘खांब तलाव’ व प्राचीन किल्ला प्रसिद्ध आहे.
- भंडारा जिल्ह्यातील तुमसर हे ठिकाण तांदळाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. येथे मँगनीज शुद्धीकरण कारखाना आहे. लाकूडकटाई, बिडी उद्योग, धानगिरण्यांसाठी तुमसर हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
- पवनी येथे सातवाहन पूर्वकाळापासूनची मोठी वसाहत असल्याचे पुरावे येथील उत्खननात मिळाले आहेत. प्राचीन काळी या नगरीला पद्मावती नगरी म्हणूनही ओळखले जात असे.
- भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द येथे वैनगंगा नदीवर इंदिरासागर हा महत्त्वपूर्ण प्रकल्प विकसित होत आहे.
- भंडारा जिल्ह्यात तेंदूपानापासून बिड्या बनवण्याचा उद्योग हा अतिशय जुना उद्योग आहे.
- भंडारा जिल्ह्यात मँगनीजच्या व क्रोमाईटच्या खाणी आहेत.
- भंडारा जिल्ह्यात जवाहरनगर येथे युद्ध साहित्य सामग्री तयार
करण्याचा कारखाना १९६४ साली स्थापन झाला - भंडारा जिल्ह्यात तुमसर येथे राज्यातील तांदळाची प्रमुख बाजारपेठ आहे.
सांख्यिकीक भंडारा – सर्व माहिती
(अ) भौगोलिक माहिती
१.क्षेत्रफळ=३.७१६ चौ किमी
२. जंगलाचे प्रमाण =१६.९३%
(आ) प्रशासकीय माहिती
१. आयुक्तालय =नागपूर विभाग (नागपूर)
२. जिल्ह्याचे मुख्यालय=भंडारा
३. उपविभाग= भंडारा ०३ तुमसर व साकोली
४. तालुके= ०७ भंडारा,साकोली,पवनी, मोहाडी, तुमसर,
लाखांदूर, लाखनी.
५. पंचायत समित्या= ०७
६. नगरपालिका= ०४ (भंडारा,पवनी,तुमसर, साकोली)
७. ग्रामपंचायत =५४२
८. पोलीस मुख्यालय=.०१ जिल्हा पोलीस अधीक्षक
९. पोलीस स्टेशनची संख्या =१२
(इ) लोकसंख्या(सन २०११ च्या जनगणनेनुसार)
१. लोकसंख्या= १२,००,३३४
२. साक्षरता =७८.५%
३. लिंग गुणोत्तर =९८३
४. लोकसंख्येची घनता=२९४
तुम्हाला भंडारा जिल्ह्या संपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे अश्याच माहिती साठी MaharashtraBoardSolutions.Net ला नक्की भेट द्या.
Final Word: आम्हाला आशा आहे की तुम्हाला भंडारा जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Bhandara District Information In Marathi तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीला हा लेख नक्की शेअर करा आणि Maharashtra Board Solutions ला भेट द्यायला विसरू नका.