पालघर जिल्हा माहिती मराठी, इतिहास, वैशिष्ट्ये, तालुके | Palghar jilha Information In Marathi

Palghar jilha marathi mahiti, Palghar jilha Mahiti, Palghar jilha Information In Marathi, Palghar jilha District Information, Palghar jilha pin code maharashtra

पालघर जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – Palghar jilha Information in Marathi .

पालघर जिल्हा

पालघर जिल्ह्याचा भाग प्राचीन काळातसुद्धा हा वैभवशाली होता. पश्चिम भारताच्या समुद्री व्यापारामध्ये ठाणे जिल्ह्यातील सोपारा, कल्याण व ठाणे या प्राचीन बंदराकडे जाणारा रेशीम मार्ग पालघर जिल्ह्यामधूनच जात होता. या जिल्ह्यावर मौर्य, शिलाहार, बिंब इत्यादी राजवटींनी राज्य केले. इ. स. १८०२ मध्ये दुसरा बाजीराव पेशवा व इंग्रज यांच्यामध्ये वसईचा तह झाला. या तहामुळे एक प्रकारे इंग्रजांना या भागात सत्तेचे दरवाजे खुले झाले. या जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्या आदिवासी आहे. येथे वारली ही प्रमुख आदिवासी जमात राहते. या जिल्ह्यातील आदिवासींचे ‘तारपा नृत्य’ आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. १ ऑगस्ट २०१४ राजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन पालघर जिल्हा निर्माण करण्यात आला. हा महाराष्ट्रातील ३६ वा जिल्हा होय. पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्याचाच भाग असल्यामुळे दोन्ही जिल्ह्याचा इतिहास जवळजवळ सारखाच आहे.

पालघर जिल्हा संक्षिप्त= माहिती

१. भौगोलिक माहिती: पालघर जिल्ह्याच्या दक्षिणेला ठाणे जिल्हा असून या जिल्ह्याच्या उत्तरेस गुजरात राज्य व दादरनगरहवेली हा संघशासित किंवा केंद्रशासित प्रदेश, पश्चिमेला अरबी समुद्र , पूर्वेस सह्यांद्री पर्वतरांगेला लागून नाशिक व अहमदनगर हे दोन जिल्हे आहेत.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

२. प्रमुख पिके: पालघर जिल्हा सह्याद्रीचा डोंगराळ प्रदेश व जंगलानी व्यापलेला आहे. भात हे या जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. एकूण लागवडीखाली असलेल्या क्षेत्रापैकी ५०% हून अधिक क्षेत्र भाताच्या लागवडीखाली आहे. पालघर, शहापूरै विक्रमगड आणि वाडा तालुक्यात भाताचे अधिक उत्पादन घेतले जाते. जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात नाचणी व वरीचेही पीक घेतले जाते. वसई तालुक्यात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. वसई भागात फुले, भाज्या (फळभाज्या, पालेभाज्या) यांचेही उत्पादन केले जाते. डहाणू तालुक्यात चिक्कू, पेरू, अननस, पपई इ. फळपिके अधिकतर घेतली जातात. जिल्ह्यातील वसईची केळी व डहाणूचे चिक्कू राज्यात प्रसिद्ध आहेत. गेल्या काही वर्षापासून या जिल्ह्यामध्ये हळद व रेशीमाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे.

३. नद्या व धरणे : ठाणे जिल्ह्यातील उल्हास आणि वैतरणा या मुख्य नद्या असून देहेरजा, मुर्या, पिंजळ, तानसा या उपनद्या शहापूर व वसई तालुक्यातून वाहतात व वैतरणेला मिळतात.

४. उद्योग व्यवसाय : पालघर जिल्हा औद्योगिकदृष्ट्या बराच पिछाडीवर आहे. या जिल्ह्यातील तारापूर या ठिकाणी एकमेव औद्यौगिक वसाहत आहे. पालघर जिल्ह्यात तारापूर येथे
भारतातील सर्वात मोठे अणुऊर्जा केंद्र आहे. तसेच डहाणू येथे भात गिरण्या आणि दापचरी, डहाणू येथे दूध प्रक्रिया केंद्रं आहे. पालघर जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात सागरी किनारा लाभला असून या भागात मासेमारी चालते. या भागातून बाँबे डक, पापलेट, सुरमई इत्यादी जातींचे मासे मोठ्या प्रमाणात मिळतात. यापैकी पापलेट या माशांना त्याच्या चवीमुळे सर्वत्र मागणी असते.

५. दळणवळण : पालघर जिल्ह्यातून मुंबई-आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग क्र.३ व मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ गेलेला आहे. या जिल्ह्यातून पश्चिम रेल्वेचा लोहमार्ग गेला असून तो पुढे गुजरात राज्यात प्रवेश करतो.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

पालघर जिल्ह्याची वैशिष्ट्ये

 • सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असलेल्या या गिरीस्थानाला ‘ठाणे (आताचे पालघर) जिल्ह्याचे महाबळेश्वर’ म्हणून ओळखले जाते. येथे पर्यटक मावळतीच्या सूर्याचा देखावा पाहण्यास गर्दी करतात.
 • डहाणू तालुक्यातील बोर्डी येथे पारशी लोकांचे पवित्र स्थळ असून येथे मध्ययुगीन काळापासून अग्नी किंवा ज्योत तेवत ठेवण्यात आली आहे.
 • वसई हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून या ठिकाणी तिन्ही बाजूंनी समुद्र असलेला ऐतिहासिक किल्ला प्रसिद्ध आहे. पोर्तुगिजांकडून चिमाजी अप्पांनी इ.स.१७३९ मध्ये हा किल्ला जिंकला होता.
 • डहाणू हे पालघर जिल्ह्यातील हे एक छोटे बंदर प्रसिद्ध आहे.
 • पालघरजवळील ‘तारापूर’ येथे भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प उभारण्यात आला आहे.
 • पश्चिम भारताच्या समुद्री व्यापारामध्ये ठाणे जिल्ह्यातील सोपारा, कल्याण, ठाणे व संजन ही प्राचीन बंदरे प्रसिद्धीला आली होती. या ठिकाणी जाणारा मार्ग पालघर जिल्ह्यामधूनच जात होता.
 • पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात चिक्कू, पेरू, अननस, पपई इ. फळपिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. जिल्ह्यातील वसईची केळी व डहाणूचे चिक्कू राज्यात प्रसिद्ध आहेत. गेल्या काही वर्षांपासून या जिल्ह्यामध्ये हळद व रेशीमाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे.
 • पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे भारतातील सर्वात पहिले सुरू करण्यात आलेले अणुऊर्जा केंद्र आहे.
 • पालघर जिल्ह्यात आदिवासी जमातीची संख्या मोठ्या प्रमाणात असून यामध्ये महादेव कोळी व वारली या आदिवासी जमातीची संख्या सर्वात जास्त आहे.
 • पालघर जिल्ह्यात वारलींसह कातकरी, ठाकर, धोंडि मल्हारकोळी, भिल्ल, काथोडी इत्यादी आदिवासी जमाती या जिल्ह्यात आढळतात. डहाणू, जव्हार, मोखाडे या तालुक्यातील डोंगराळ भागात आदिवासी जास्त संख्येने राहतात.
 • वारली या आदिवासींचे तारपा नृत्य आणि वाटली पेंटिंग आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे.
 • या जिल्ह्यातील तारापूर या ठिकाणी एकमेव औद्योगिक वसाहत आहे.
 • पालघर येथे मासेमारीचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे.
 • जव्हार येथील जलविलास राजवाडा प्रेक्षणीय असून हे ठिकाण जिल्ह्यातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे.
 • १ ऑगस्ट २०१४ रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून जिल्हा निर्माण करण्यात आला. हा पालघर महाराष्ट्रातील ३६ वा जिल्हा होय.
 • डहाणू तालुक्यातील बोर्डी हे ठिकाण डहाणूपासून सतरा कि.मी. अंतरावर असून समुद्रकिनारी असलेले हे एक रम्य स्थळ आहे. या ठिकाणी असलेला किल्ला प्रेक्षणीय असून येथे मध्ययुगीन काळापासून अग्नी किंवा ज्योत तेवत ठेवण्यात आली आहे.
 • विरार येथे जीवदानी गडावर जीवदानी माता या देवीचे जागृत स्थान आहे. हे एक्कावन्न शक्तिपीठांपैकी एक स्थान आहे. डोंगरावर सुमारे १४०० पायऱ्या चढून जावे लागते.

सांख्यिकीक पालघर

(अ) भौगोलिक माहिती

१. क्षेत्रफळ=५,३४४ चौ. कि. मी.
२. जंगलाचे प्रमाण=३०.४७%
३. अभयारण्ये=तुंगारेश्वर अभयारण्य
४. वनोद्याने =वज्रेश्वरी

(आ)प्रशासकीय माहिती

१. आयुक्तालय =कोकण विभाग नवी मुंबई)
२. जिल्ह्याचे मुख्यालय =पालघर
३. उपविभाग=०५ वसई, पालघर, डहाणू, जव्हार व वाडा
४. तालुके =०८ डहाणू, मोखाडा, जव्हार,
पालघर, वाडा, वसई,तलासरी व विक्रमगढ
५. पंचायत समित्या=०८
६. ग्रामपंचायत=४७३
७. महानगरपालिका =०७वसई-विरार
८. नगरपालिका=०३ पालघर, डहाणू, जव्हार
९. नगरपंचायत =०४
१०. पोलीस मुख्यालय= ०१ ठाणे जिल्हा पोलीस अधीक्षक
११. पोलीस स्टेशन=२८

(इ) लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनुसार)

१. लोकसंख्या=२९,९०,११६
२. साक्षरता=६६.६५%
३. लिंग गुणोत्तर=८८०
४. लोकसंख्येची घनता=५६०

हे पण वाचा>>>>>>>>

ठाणे जिल्हा माहिती

सिंधुुदूर्ग जिल्हा माहिती

रत्नागिरी जिल्हा माहिती

रायगड जिल्हा माहिती

तुम्हाला पालघर जिल्हा संपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे अश्याच माहिती साठी MaharashtraBoardSolutions.Net ला नक्की भेट द्या.

Final Word: आम्हाला आशा आहे की तुम्हाला पालघर जिल्हा जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – palghar District Information In Marathi तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीला हा लेख नक्की शेअर करा आणि Maharashtra Board Solutions ला भेट द्यायला विसरू नका.

Leave a Comment