ठाणे जिल्हा माहिती मराठी, इतिहास, वैशिष्ट्ये, तालुके | thane Information In Marathi

Thane marathi mahiti, thane Jilha Mahiti, thane Information In Marathi, thane District Information, thane pin code maharashtra

ठाणे जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – thane Information in Marathi .

ठाणे जिल्हाl

पश्चिम भारताच्या समुद्री व्यापारामध्ये ठाणे अग्रेसर राहण्याचे कारण म्हणजे या जिल्ह्यातील सोपारा, कल्याण व ठाणे ही प्राचीन बंदरे होय. प्राचीन काळापासून या बंदरांतून युरोपमध्ये व्यापार चालत असे. पांडवकालीन शूरक म्हणजेच हल्लीचे ‘सोपारा’ असे म्हटले जाते. सोपारा येथे सम्राट अशोकांचा शिलालेख त स्तूप आहे. या भागावर मौर्य, शिलाहारानंतर तेराव्या शतकात देवगिरीच्या राजा रामदेव याच्या पुत्राची विंब राजाची सत्ता होती. बिंबांच्या कारकिर्दीमध्ये ठाणे शहरामध्ये लष्करी तळ होता. लष्करी तळाला स्थानक असे म्हणत. यावरून या शहराला ‘ठाणे’ हे नाव पडले, असा समज आहे. इ. स. १८०२ मध्ये दुसरा बाजीराव पेशवा व इंग्रज यांच्यामध्ये वसईचा तह झाला. या तहामुळे मराठी सत्ता जवळजवळ संपुष्टात आली.

ठाणे जिल्हा संक्षिप्त=माहिती

१. भौगोलिक स्थान : महाराष्ट्र राज्यात ठाणे हा जिल्हा वायव्य दिशेला आहे. ठाणे जिल्ह्याच्या उत्तरेस पालघर जिल्हा आहे. पश्चिमेला अरबी समुद्र, दक्षिणेला रायगड जिल्हा, पूर्वेस सह्याद्री पर्वतरांगेला लागून नाशिक व अहमदनगर हे दोन जिल्हे आहेत.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

२. प्रमुख पिके : ठाणे जिल्ह्य प्रामुख्याने नागरी भागात मोडतो. डोंगराळ प्रदेश, खाड्यांचा प्रदेश व वाढते नागरीकरण यामुळे ठाणे जिल्ह्यात शेतजमिनीचे (कृषी क्षेत्राचे) प्रमाण कमी आहे. भात हे या जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, मुरबाड व कल्याण इत्यादी तालुक्यांत भाताचे पीक घेतले जाते. जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात नाचणी व वरीचेही पीक घेतले जाते.

३. नद्या व धरणे : ठाणे जिल्ह्यात उल्हास व वैतरणा या नद्या आहेत. वैतरणा नदी नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वरजवळ सह्याद्रीत उगम पावते व उल्हास नदी भोर तालुक्यामध्ये उगम पाऊन रायगड जिल्ह्यामध्ये वाहून पुढे ठाणे जिल्ह्यातून वाहत जावून वसईच्या खाडीमध्ये समुद्राला मिळते. बार्वी, भातसा, काळू या तिच्या उपनद्या आहेत. ठाणे जिल्ह्यात दतिवऱ्याची, वसईची, ठाण्याची, मनोर अशा प्रमुख खाड्या आहेत. ठाणे जिल्ह्यात वैतरणा नदीवर मोडकसागर धरण बांधण्यात आले आहे. शहापूर तालुक्यात तानसा नदीवर तानसा धरण व भातसई नदीवर भातसा हा जलप्रकल्प उभारण्यात आला आहे. भातसा, तानसा, मोडकसागर या सर्व प्रकल्पांतून मुंबई शहराला पाणीपुरवठा होतो.

४. उद्योग : ठाणे जिल्हा औद्योगिकदृष्ट्या विकसित असून, या जिल्ह्यात ठाणे, ठाणेवाडी, कळवा, मीरा, वागळे इस्टेट, डोंबिवली, अंबरनाथ, कल्याण, कल्याण-भिवंडी रोड, ठाणे-बेलापूर रोड, बदलापूर व शहापूर या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत.
भिवंडी हे ठाणे जिल्ह्यातील कापड उद्योगाचे प्रमुख कद्र आहे. ठाणे-अंबरनाथ-बेलापूर हा औद्योगिकदृष्ट्या देशातील महत्त्वाचा पट्टा मानला जातो. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे रेशमी तयार केले जाते. अंबरनाथ येथे दारूगोळा व शस्त्रनिर्मितीचा भारत सरकारचा उपक्रम आहे.

५. दळणवळण : ठाणे जिल्ह्यामधून मुंबई-आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३, मुंबई -बंगळुरू हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ४, मुंबईअहमदाबाद हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ आणि मुंबई-कल्याणनांदेड हा राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ गेलेला आहे. भारतातील स्थानकांदरम्यान पहिली रेल्वे १८५३ या वर्षी मुंबई ते ठाणे या धावली. ठाणे जिल्ह्यातून मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि कोकण रेल्वे असे एकूण तीन प्रमुख लोहमार्ग गेलेले असून, या लोहमार्गावरून मुंबई-चेन्नई, मुंबई-कोलकाता, मुंबई-दिल्ली आणि मुंबई-गोवा या ठिकाणांकडे गाड्या जातात

Telegram group मध्ये जॉईन व्हा

ठाणे जिल्ह्याची वैशिष्ट्ये

  • माळशेज घाट हा ठाणे जिल्ह्याच्या आग्नेय सीमेवरील सह्याद्रीच्या रांगेतील हा घाट. हे स्थळ निसर्गरम्य असून, या भागातील वनांमध्ये ‘रोहित’ (फ्लेमिंगो) पक्षी आढळतात.
  • शिलाहार राजाच्या काळातील अंबरेश्वराच्या क्षेत्रामुळे या ठिकाणाला अंबरनाथ हे नाव पडले. या ठिकाणी दारूगोळा व शस्त्रास्त्रे यांचा कारखाना आहे.
  • कल्याणपासून ३२ किमी अंतरावर मलंगगड डोंगर असून, या डोंगरावर हाजी मलंगबाबांचा दर्गा आहे. येथील किल्ला शिलाहार राजाने बांधला. तसेच येथे मच्छिंद्रनाथांचे पुरातन मंदिरही आहे.
  • टिटवाळा येथे श्रीमहागणपतीचे जागृत स्थान असून, या गणपतीस विवाहविनायक असेही म्हणतात.
  • ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी येथे औषधी गुणधर्म असलेले गरम पाण्याचे झरे आहेत.
  • ठाणे खाडीच्या पलीकडील वाशी या ठिकाणी नवी मुंबई हे सुरचित शहर वसविले आहे.
  • सागरी किनारा लाभलेल्या या जिल्ह्यात जलदुर्ग, किनारी दुर्ग, गिरीदुर्ग व वनदुर्ग असे चार प्रकारचे किल्ले आहेत.
  • महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका ठाणे जिल्ह्यात आहेत. (सहा महानगरपालिका)
  • सन २०११ च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा ठाणे आहे.
  • ‘मुशी’ जातीचे गवत महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते.
  • ‘आगरी’ या इतर मागास वर्ग जातीचे लोक ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने आढळतात.
  • ठाणे जिल्ह्यातील ‘मुंब्रा’ हे प्रसिद्ध रेतीबंदर आहे.
  • उल्हासनगर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून हे उल्हास नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे.
  • ठाणे खाडीच्या पलीकडील वाशी या ठिकाणी नवी मुंबई हे सुरचित शहर वसविले आहे.
  • माळशेज घाट हा ठाणे जिल्ह्याच्या आग्नेय सीमेवरील सह्याद्रीच्या गंगेतील घाट असून या घाटाद्वारे ठाणे जिल्ह्यातून पुणे व अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रवेश करता येते. हे स्थळ निसर्गरम्य असून हे एक पर्यटन केंद्र म्हणून प्रेक्षणीय स्थळ आहे.
  • ठाणे जिल्ह्यातील भिवंडीच्या पूर्वेला लोनाड येथे प्राचीन लेण्यांचा समूह आहे. येथे रामेश्वराचे भव्य पुरातन मंदिर आहे. .
  • या जिल्ह्यातील वसई येथे वज्रेश्वरीचे मंदिर असून हे मंदिर चिमाजी अप्पांनी वसईचा किल्ला जिंकल्यानंतर बांधले. या ठिकाणचे गरम पाण्याचे झरे प्रसिद्ध आहेत.

सांख्यिकीक ठाणे

(अ) भौगोलिक माहिती

१.क्षेत्रफळ=४२१४ चौ. किमी.

२. जंगलाचे प्रमाण =३६.२१%

३. अभयारण्ये =तानसा अभयारण्य

४. वनोद्याने=अर्नाळा

(आ)प्रशासकीय माहिती

१. आयुक्तालय =कोकण विभाग नवी मुंबई)

२. जिल्ह्याचे मुख्यालय =ठाणे

३. उपविभाग=०४ ठाणे, कल्याण, उल्हासनगर,भिवंडी

४. तालुके=०७ शहापूर, भिवंडी, मुरबाड,
ठाणे, कल्याण, अंबरनाथ,उल्हासनगर.

५. पंचायत समित्या= ०५

६. ग्रामपंचायत =४३०

७. महानगरपालिका=०६(ठाणे,नवी मुंबई,कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर, व भिवंडी निझामपूर,)

८. नगरपालिका या=०२

९. नगरपंचायत =०२

१०.पोलिस मुख्यालय= ०२ शहर पोलिस आयुक्तालय व जिल्हा पोलिस अधीक्षक

(इ) लोकसंख्या(सन २०११ च्या जनगणनेनुसार)

१. लोकसंख्या=८०,७०,०३२

२. साक्षरता =८७.२%

३. लिंग गुणोत्तर =८८६

४. लोकसंख्येची घनता=११५७

हे पण वाचा>>>>>>>>>>>>

सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्ण माहिती

रत्नागिरी जिल्हा संपूर्ण माहिती

रायगड जिल्हा संपूर्ण माहिती

उपनगर मुंबई जिल्हा संपूर्ण माहिती

मुंबई जिल्हा संपूर्ण माहिती

तुम्हाला ठाणे जिल्ह्या संपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे अश्याच माहिती साठी MaharashtraBoardSolutions.Net ला नक्की भेट द्या.

Final Word: आम्हाला आशा आहे की तुम्हाला ठाणे जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – thane District Information In Marathi तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीला हा लेख नक्की शेअर करा आणि Maharashtra Board Solutions ला भेट द्यायला विसरू नका.

Leave a Comment