सिंधुदुर्ग जिल्हा माहिती मराठी, इतिहास, वैशिष्ट्ये, तालुके | Sindhudurg Information In Marathi

Sindhudurg marathi mahiti, Sindhudurg Jilha Mahiti, Sindhudurg Information In Marathi, Sindhudurg District Information, Sindhudurg pin code maharashtra

सिंधुदुर्ग जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास
=Sindhudurg Information in Marathi .

सिंधुदुर्ग जिल्हा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी अश्मयुगीन तसेच ताम्र -पाषाणयुगीन अवशेष सापडले आहेत. संस्कृत वाङ्मयामधून वसई ते बाणकोट या प्रदेशाचा किरात असा उल्लेख आढळतो. प्राचीन काळी या चालुक्यांची राजवट असावी, असे नेरुर येथे सापडलेल्या चालुक्यकालीन शिलालेखावरुन अनुमान काढता येते. मराठी सत्तेच्या सुरक्षिततेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुरटे बेटावरील सुमारे पन्नास एकर जागेवर सिंधुदुर्ग या किल्ल्याची उभारणी केली. या भागात मराठेशाहीपूर्वी आदिलशाही राजवट अस्तित्वात होती. याची साक्ष आदिलशाही राजवटीमध्ये उभारल्या गेलेल्या काही वास्तूंची साक्ष देतात. भारतात स्वातंत्र्य आंदोलनातही या जिल्ह्यातील जनतेने हिरीरीने भाग घेतला. इ. स. १९३० मध्ये या जिल्ह्यात मिठाचा सत्याग्रह झाला होता व १९४२ च्या चळवळीमध्ये या जिल्ह्याने सक्रिय सहभाग घेतला होता. १ मे १९८१ रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन सिंधुदुर्ग जिल्हा अस्तित्वात आला.

सिंधुदुर्ग जिल्हा संक्षिप्त माहिती

१. भौगोलिक स्थान : सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील दक्षिणेकडील जिल्हा असून, या जिल्ह्याच्या उत्तरेस रत्नागिरी जिल्हा, पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस गोवा व कर्नाटक राज्य, पूर्वेस सह्याद्री पर्वतरांगेला लागून कोल्हापूर जिल्हा आहे. या जिल्ह्यास १२१ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

२. प्रमुख पिके : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तांदूळ मुख्य पीक असून, या पिकांबरोबर या जिल्ह्यात नाचणी, वरई, कुळीथ ही प्रमुख पिके घेतली जातात. या जिल्ह्यातील जमीन व हवामान फळास अनुकूल असल्यामुळे या जिल्ह्यात नारळ, रातांबे, फणस, सुपारी, आंबा व काजू ही तेथील प्रमुख फळपिके होत. देवगडचा हापूस आंबा जगप्रसिद्ध आहे. हा आंबा येथून निर्यात केला जातो.

३. नद्या व धरणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शुक व तेरेखोल महत्त्वाच्या नद्या असून देवगड, आचरा, गडनदी, कर्ली व तिल्लारी या नद्या वाहतात. कुडाळ तालुक्यात कर्ली नदीवर उभारण्यात येणारा ताळंबा हा जिल्ह्यातील एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. जिल्ह्यातील घोणसरी (तालुका कणकवली) हे धरणदेखील मोठे आहे. तसेच गोवा राज्याच्या सहकार्याने तिलारी नदीवर तिलारी प्रकल्प उभारण्यात येत आहे.

४. खनिज संपत्ती : खनिज संपत्तीचा विचार करता, सिंधुदुर्ग जिल्हा समृद्ध मानला जातो. वेंगुर्ले तालुक्यात रेडी येथे मोठ्या प्रमाणात लोहखनिज सापडते. तसेच कणकवली तालुक्यात फोंडा येथे मँगनीजचे साठे मोठ्या प्रमाणात आहेत. या जिल्ह्यात
इल्मेनाईट, क्रोमाईट, बॉक्साईट, अभ्रक, चुनखडी, रंग निर्माण करण्यासाठी लागणारा गेरू ही खनिजे सापडतात.

४.उद्योग व्यवसाय= सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी व कणकवली येथे सहकारी व विकास महामंडळाच्या औद्योगिक वसाहती आहेत. काजू बियांपासून काजूगर काढण्याचे अनेक कारखाने आहेत, तसेच आंबे भरण्याच्या पेट्यांचे कारखाने वेंगुर्ला व देवगडला आहेत. वेंगुर्ले, मालवण या ठिकाणी काथ्या बनविण्याचे व काथ्यापासून ब्रश, दोरखंड यासारख्या वस्तू बनविण्याचे कारखाने आहेत. सावंतवाडी हे ठिकाण लाकडी रंगीत खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील सर्वात पहिला पवन ऊर्जा प्रकल्प देवगड तालुक्यात उभारण्यात आला आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

५. दळणवळण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोलच्या खाडीवरील पुलामुळे महाराष्ट्र व गोवा ही दोन राज्ये जोडली गेली आहेत. मुंबई-गोवा हा राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ याच जिल्ह्यातून गेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून गोव्याकडे कोकण रेल्वे गेली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याची वैशिष्ट्ये

  • वेंगुर्ले येथे प्रादेशिक फळ संशोधन केंद्र असून, येथे आंबा व काजू या फळांचे संशोधन केले जाते.
  • आंबोली हे ठिकाण सावंतवाडी तालुक्यापासून २० किमी अंतरावर असून, हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचे आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते.
  • वेंगुर्ले तालुक्यात रेडी येथे लोहखनिज मोठ्या प्रमाणावर सापडते. तसेच कणकवली तालुक्यात फोंडा येथे मँगनीजचे साठे मोठ्या प्रमाणावर आढळले आहेत. या जिल्ह्यात आढळणारे आणखी एक महत्त्वाचे खनिज म्हणजे इल्मेनाईट.
  • रेडी हे वेंगुर्ले तालुक्यात असून, बंदरातूनच या जिल्ह्यात मिळणारे लोहखनिज निर्यात केले जाते.
  • निवती बीच येथे डॉल्फिन माशांना बघण्यासाठी देशी-विदेशी पर्यटक येतात. मालवणपासून अवघ्या ७ किमी अंतरावर तारकर्ली येथे स्कूबा डायव्हिंग सुरू करण्यात आले आहे.
  • ‘सावंतवाडी’ हे ठिकाण लाकडी रंगीत खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे.
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमसांडे (देवगड) येथे महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प उभारण्यात आला आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील पहिले व एकमेव सागरी उद्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण परिसरामध्ये असून, त्या उद्यानाचे नाव ‘राजा शिवछत्रपती सागरी उद्यान’ असे आहे.
  • सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे.
  • २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा असलेला जिल्हा आहे.
  • रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील हापूस आंबा प्रसिध्द आहे.
  • भारतातील पहिला इगव्हर्नन्स जिल्हा म्हणून या जिल्ह्यास मान मिळाला आहे.
  • हा जिल्हा महाराष्ट्रातील पहिला १०० % साक्षर झालेला जिल्हा म्हणून ओळखला जातो.
  • सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात पहिला ई-गव्हर्नन्स जिल्हा म्हणून ओळखला जातो.
  • लाल रंग निर्माण करण्यासाठी लागणारा गेरूचा दगड सिंधुदुर्ग जिल्ह्यातच सापडतो.
  • काजू हे या जिल्ह्यातील प्रमुख फळपिक आहे.
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडचा हापूस आंबा जगप्रसिद्ध आहे. हा आंबा येथून निर्यात केला जातो.
  • या जिल्ह्यातील सावंतवाडी हे ठिकाण लाकडी रंगीत खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे.
  • महाराष्ट्रातील सर्वात पहिला पवन ऊर्जा प्रकल्प देवगड तालुक्यात उभारण्यात आला आहे.
  • गोवा राज्याच्या सहकार्याने उभारण्यात आलेला तिलारी नदीवरील तिलारी प्रकल्प याच जिल्ह्यात आहे.
  • सिंधुदर्ग जिल्ह्यास गोवा राज्याची सीमा भिडली आहे.

सांख्यिकीक सिंधुदुर्ग

(अ) भौगोलिक माहिती

१. क्षेत्रफळ=५,२०७ चौ. किमी.

२. जंगलाचे प्रमाण=१०.६७%

३. अभयारण्ये =मालवण सागरी अभयारण्य

४. वनोद्याने= नरेंद्र डोंगर व आंबोली

(आ)प्रशासकीय माहिती

१. आयुक्तालय =कोकण विभाग नवी मुंबई

२. जिल्ह्याचे मुख्यालय =ओरोस बुद्रुक

३. उपविभाग=०३ (कुडाळ, सावंतवाडी व कणकवली)

४. तालुके =०८ (कुडाळ,देवगड, सावंतवाडी,कणकवली, मालवण, वेंगुर्ले, वैभववाडी, दोडामार्ग.)

५. पंचायत समित्या =०८

६. ग्रामपंचायत=४३३

७. नगरपालिका=३

८. पोलीस मुख्यालय =०१ जिल्हा पोलीस अधीक्षक

९. पोलीस स्टेशनची संख्या= १०

(इ) लोकसंख्या(सन २०११ च्या जनगणनेनुसार)

१.लोकसंख्या=८,४९,६५१

२. साक्षरता=८५.०६%

३. लिंग गुणोत्तर=१०३६

४. लोकसंख्येची घनता =१६०

हे पण वाचा >>>>>>>>>>

रत्नागिरी जिल्हा संपूर्ण माहिती

रायगड जिल्हा संपूर्ण माहिती

उपनगर मुंबई जिल्हा संपूर्ण माहिती

मुंबई जिल्हा संपूर्ण माहिती

सोलापूर जिल्हा संपूर्ण माहिती

तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्या संपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे अश्याच माहिती साठी MaharashtraBoardSolutions.Net ला नक्की भेट द्या.

Final Word: आम्हाला आशा आहे की तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Sindhudurg District Information In Marathi तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीला हा लेख नक्की शेअर करा आणि Maharashtra Board Solutions ला भेट द्यायला विसरू नका.

Leave a Comment