मुंबई जिल्हा माहिती मराठी, इतिहास, वैशिष्ट्ये, तालुके | Mumbai Information In Marathi

Mumbai marathi mahiti, Mumbai Jilha Mahiti, Mumbai Information In Marathi, Mumbai District Information, Mumbai pin code maharashtra

मुंबई जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – Mumbai Information in Marathi .

मुंबई जिल्हा

प्राचीन काळात मुंबई आणि त्याचा परिसर हा मौर्यांच्या ताब्यात होता. मौर्यानंतर या भागावर सातवाहन, चालुक्य, शिलाहार, अंभीर त्रिकूट वंशांची सत्ता आली. अनिरुद्धपूर येथे कुटकांची राजधानी होती. प्राचीन काळावे अनिरुद्धपूर म्हणजे सध्याचे अंधेरी होय. त्रैकुटकांच्या काळात जोगेश्वरीचे लेणे खोदले गेले. या भागावर मौर्यांची सता असताना मौर्यांनी घारापुरीसारखी लेणी खोदली असा उल्लेख आहे. शिलाहारांच्या काळात वाळकेश्वरची स्थापना झाली. त्यानंतरच्या काळात मुंबई आणि आसपासचा प्रदेश हा मुस्लिम सत्तेच्या अमलाखाली आला. मुसलमानांनंतर या प्रदेशावर पोर्तुगिजांची सत्ता प्रस्थापित झाली. पोर्तुगीज राजाने इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा यास आपली बहीण इन्फंटा कॅथरिन दिली व त्याचबरोबर राजा चार्ल्सला मुंबई हे बेट आंदण म्हणून दिले व दुसऱ्या चासने इ. स. १६६८ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीस हे बेट (वार्षिक दहा पौंड) भाड्याने दिले. त्यानंतरच्या काळापासून ते भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत मुंबई (बेट) इंग्रजांच्याच सत्तेखाली राहिले. महाराष्ट्र राज्य व गुजरात वेगळा होऊन मुंबई महाराष्ट्राची राजधानी झाली.

मुंबई जिल्हा संक्षिप्त माहिती

१. भौगोलिक स्थान : मुंबई शहराच्या उत्तरेस मुंबई उपनगर जिल्हा व दक्षिण-पूर्व-पश्चिम या भागात अरबी समुद्र आहे. एकमेकांना जोडण्यात आलेल्या सात बेटांचा समूह म्हणजे आजचे मुंबई शहर होय. ती सात बेटे म्हणजे मोठा कुलाबा, लहान कुलाबा, मुंबई, माझगाव, परळ, वरळी आणि माहीम अशी होय. ब्रिटिश प्रशासक जेराल्ड अंजिअरास यास ‘आधुनिक मुंबईचा शिल्पकार’ असे म्हटले जाते.

२. प्रमुख पिके : मुंबई शहराचे दाट नागरीकरण झाल्यामुळे सध्या मुंबई जिल्ह्यात शेतीयोग्य जमीन नाही. परंतु, मुंबई जिल्हा हा भारतातील उसाची जननी मानली जाते. एकोणिसाव्या शतकात मुंबईतील फ्रांमजी कासवजी बनाजी व नाना शंकरशेट यांनी आंब्यासोबत मॉरिशसच्या ऊस लागवडीचा यशस्वी प्रयोग केला. आज भारतात पिकविण्यात येणारा ऊस हा प्रामुख्याने मॉरिशस जातीचाच आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

३. खनिज संपत्ती : मुंबईजवळ पश्चिमेला १७६ किमी अंतरावर (समुद्रात) बॉम्बे हाय या ठिकाणी खनिज तेल व नैसर्गिक गॅस मिळतो. या ठिकाणी सागरसम्राट नावाचा तळ उभारण्यात आला आहे. मुंबई जिल्ह्यास सागरी किनारा लाभल्यामुळे या भागात बोंबिल, पापलेट, काटा, वाम, शिंगाडा, दाताळ, रावस यासारखे मासे सापडतात. याशिवाय सागरी मिठाचे उत्पादनही या भागात घेतले जाते.

४. उद्योग, व्यवसाय व मुंबई जिल्ह्यातील प्रसिध्द संस्था :

१) क्रिडा संस्था :मुंबई शहरात वानखेडे स्टेडियम (क्रिकेट), ब्रेबॉर्न स्टेडियम (फुटबॉल व हॉकी), कूपरेज स्टेडियम (फुटबॉल), वल्लभभाई पटेल स्टेडियम (व्यायाम व मैदानी खेळ), भारतीय क्रिडा केंद्र दादर (भारतीय खेळ), कामगार क्रिडा केंद्र एल्फिन्स्टन रोड (भारतीय खेळ) ही खेळांची प्रमुख केंद्रे मुंबईत आहेत. महालक्ष्मी येथील रेसकोर्सवर अश्वशर्यतीं आयोजित केल्या जातात.

२) शैक्षणिक संस्था : मुंबईचा पहीला गव्हर्नर माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांने भारतीयांना साक्षर व शिक्षित करण्यासाठी पुढाकार घेऊन इ. स. १८२४ मध्ये बॉम्बे नेटीव्ह एज्युकेशन सोसायटीद्वारे शाळा सुरू केली. त्याचेच रूपांतर पुढे एल्फिन्स्टन उच्च माध्यमिक शाळा व त्यानंतर एल्फिन्स्टन महाविद्यालयात झाले. भारतातील पहिले व देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत जुने विद्यापीठ म्हणून ओळखले जाणारे मुंबई विद्यापीठ १८५७ मध्ये येथे स्थापन करण्यात आले. पवई येथे जागतिक स्तरावर प्रसिध्द असलेली आयआयटी संस्था आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

३) सैनिक संस्था : सैनिकी प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आय. एन. एस. हमला, आय. एन. एस. राजेंद्र मुंबई येथे आहेत. शिवाय
भारतीय नौदल सेनेचे पश्चिम विभागाचे केंद्र आहे.

३) अन्य संस्था

१. मुंबई येथे उच्च न्यायालय असून त्याचे क्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र व गोवा आहे.

२. विधान भवन, मंत्रालय, यांसारख्या अनेक शासकीय इमारती मुंबई येथे आहेत.

३. भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र प्रायोगिक तत्त्वावर १९२७ मध्ये मुंबईत सुरू करण्यात आले.
मुंबईत डाकसेवा (टपालसेवा) १८५४ मध्ये, ब्रिटिशांच्या काळातच सुरू करण्यात आली. भारतातील सर्वात मोठे तारघर मुंबईत आहे.
टाटा मूलभूत संशोधन संस्था, टाटा सामाजिक विज्ञान संस्था, बाँम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी, हाफकिन संस्था, कॉटन टेक्नॉलॉजी रिसर्च लॅबोरेटरी, फिशरीज एज्युकेशन, जेनेटिक रिसर्च सेंटर, इंड्रोव्हायरस रिसर्च सेंटर, कुलाबा ऑब्झर्वेटरी (वेधशाळा), इत्यादी संस्था मुंबईत आहेत.

४.आर्थिक व औद्योगिक संस्था : रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, भारतीय मिंट, भारतातील याशिवाय टाटा ग्रूप, रिलायन्स, बाँबे डाईंग, वेदांत रिसोर्सेस, आदित्य बिर्ला समुह, गोदरेज, स्टेट बँक ऑफ इंडिया (एस्.बी.आय.) व आय.सी.आय.सी.आय्. ह्या महाउद्योगांची व बँकांची मुख्य कार्यालये भारतातील बहुतेक दूरदर्शन केंद्रांचे (प्रमुख वाहिन्यांचे) जाळे मुंबईत एकवटले आहे. बॉलिवूड’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या हिंदी चित्रपट उद्योगाचे (हिंदी फिल्म इंडस्ट्रीचे) मुंबई 2
हेच प्रमुख केंद्र आहे. शिवाय येथे मोठे चित्रपट निर्मिती करणारे फिल्म स्टुडिओज् आणि प्रॉडक्शन हाउसेसही आहेत.

५. दळणवळण

१) राष्ट्रीय महामार्ग: मुंबई जिल्हातून खालील (राष्ट्रीय महामार्ग सुरु होतात.)

१. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक क्र. ३: हा महामार्ग मुंबईहून ठाणे, नाशिक, धुळ्यावरुन आग्राकडे जातो.

२. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक क्र. ८: हा महामार्ग मुंबईहून सुरु होतो आणि ठाणे, अहमदाबाद वरुन -दिल्लीकडे जातो.

३. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक क्र. ४: हा महामार्ग मुंबईतून रायगड पुणे, सातारा व सांगलीवरुन – बंगळूर – चेन्नईस जातो.

४. राष्ट्रीय महामार्ग क्र . १७: मुंबईहून सुरु होणारा हा कोकणकिनारपट्टने गोव्यास गेला आहे.

२) रेल्वे वाहतूक : खालील ठिकाणी रेल्वे गाड्या धावतात.

१. मध्य रेल्वे : या ठिकाणावरुन कोलकोत्ता, दिल्ली लखनौ गोहाटी चेन्नई या ठिकाणी रेल्वे गाड्या सुटतात.

२ .पश्चिम रेल्वे : या ठिकाणावरुन गुजरात. राजस्थान, दिल्ली व जम्मू काश्मीर राज्यांकरीता गाड्या सुटतात.

३.जलवाहतूक : मुंबई हे भारतातील सर्वात जुने नैसर्गिक बंदर असून या ठिकाणावरुन भारतातील सुमारे ५०% तेल वाहतूक, ३५% धान्याची वाहतूक व ३८% इतर मालाची वाहतूक होते.

मुंबई जिल्ह्याची वैशिष्टे माहिती

 • मुंबई येथे उच्च न्यायालय असून, त्याचे क्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र व गोवा आहे.
 • मुंबई शहर महाराष्ट्राची राजधानी असून, येथे विधान भवन व मंत्रालयसारख्या शासकीय इमारती आहेत.
 • टाटा मूलभूत संशोधन संस्था, टाटा सामाजिक विज्ञान संस्था, बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी, हाफकिन संस्था, कॉटन टेक्नॉलॉजी रिसर्च लॅबोरेटरी, फिशरीज एज्युकेशन, जेनेटिक रिसर्च सेंटर, इंड्रोव्हायरस रिसर्च सेंटर, कुलाबा ऑब्झर्वेटरी (वेधशाळा) इत्यादी संस्था मुंबईत आहेत.
 • भारताचे प्रवेशद्वार गेट वे ऑफ इंडिया याच शहरात आहे. पूर्वीच्या व्हिक्टोरिया टर्मिनल्सचे सध्याचे नाव छत्रपती शिवाजी टर्मिनल्स असून हे ठिकाण मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे.
 • प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम हे म्युझियम व्हिक्टोरियन वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना मानले जाते. याचे बांधकाम १९२३ या वर्षी पूर्ण झाले.
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अंत्यसंस्कार करण्यात आलेला परिसर चैत्यभूमी म्हणून ओळखला जातो. तो दादर या ठिकाणी आहे.
 • मुंबई हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे.
 • हे शहर भारताची आर्थिक व औद्योगिक राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे.
 • मुंबई हे सात बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते. *. भारताचे नैसर्गिक बंदर.
 • मुंबई हे सात बेटाचे शहर म्हणून ओळखले जाते.
 • भारताचे प्रवेशद्वार.
 • आकाराने सर्वात लहान जिल्हा.
 • मुंबईतील मुंबादेवीच्या नावावरून या शहरास मुंबई असे नाव पडले, त्या देवीचे मंदिर मुंबादेवी क्रॉफर्ड मार्केट येथे महात्मा फुले मंडईच्या भागात आहे.
 • मलबार हिल येथील १७८० मध्ये बांधण्यात आलेले श्री बाबुलनाथ मंदिर तेथील शंकराच्या पिंडीसाठी प्रसिद्ध आहे.
 • मुंबई शहरातील महालक्ष्मी येथील श्री महालक्ष्मीचे मंदिर भविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे.
 • मुस्लिम धर्मीयांचे जागृत देवस्थान म्हणून गणल्या गेलेला हाजीअलीचा दर्गा महालक्ष्मीपासून जवळच बांधण्यात आला आहे.
 • सन १८०१ मध्ये बांधण्यात आलेले श्री सिद्धीविनायकाचे मंदिर (प्रभादेवी) जागृत देवस्थान म्हणून प्रचलित आहे. या ठिकाणची मूर्ती उजव्या सोंडेची आहे, हे हिचे एक वैशिष्ट्य मानण्यात येते.

सांख्यिकीक मुंबई

(अ) भौगोलिक माहिती

१. क्षेत्रफळ=१५७ चौ. किमी.

२. जंगलाचे प्रमाण=१.२७%

(आ)प्रशासकीय माहिती

१. आयुक्तालय =कोकण विभाग नवी मुंबई

२. जिल्ह्याचे मुख्यालय= मुंबई

३. महानगरपालिका = ०१ बृहन्मुंबई महानगरपालिका

४. पोलीस मुख्यालय= ०१ मुंबई पोलीस आयुक्तालय

५. पोलीस स्टेशनची संख्या=९३

(इ) लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनुसार)

१. लोकसंख्या =३०,८५,४११

२. साक्षरता=८९.२१%

३. लिंग गुणोत्तर= ८३२

४. लोकसंख्येची घनता=१९,६५२

हे पण वाचा>>>>>>≥>

सोलापूर जिल्हा माहिती

सातारा जिल्हा माहिती

सांगली जिल्हा माहिती

पुणे जिल्हा माहिती

तुम्हाला मुंबई जिल्ह्या संपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे अश्याच माहिती साठी MaharashtraBoardSolutions.Net ला नक्की भेट द्या.

Final Word: आम्हाला आशा आहे की तुम्हाला मुंबई जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Mumbai District Information In Marathi तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीला हा लेख नक्की शेअर करा आणि Maharashtra Board Solutions ला भेट द्यायला विसरू नका.

Leave a Comment