पुणे जिल्हा माहिती मराठी, इतिहास, वैशिष्ट्ये, तालुके |Pune Information In Marathi

Pune marathi mahiti,Pune Jilha Mahiti, Pune Information In Marathi, Pune pin code maharashtra

पुणे जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – Pune Information in Marathi .

पुणे जिल्हा

टॉलेमीने आपल्या लिखाणात पुणे शहराचा ‘पुन्नाय’ असा उल्लेख केला आहे. राष्ट्रकुटांच्या काळात पुण्याचा उल्लेख ‘पुनवडी’ असा केला जात असे. मोगलांच्या काळात ‘कसबे पुणे’ असा पुण्याचा उल्लेख केल्याचे आढळते. पुण्याच्या भागावर आंध, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, निजामशाही व आदिलशाही इत्यादी राजवटींचा अंमल होता. परंतु, पुणे प्रसिद्धीला आले मराठेशाहीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण व पेशव्यांच्या काळात पुणे हे भारतातील प्रमुख घडामोडींचे केंद्र होते. बाजीराव पेशव्यांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवारवाडा ही भव्य, सुसज्ज, किल्लासदृश वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. नानासाहेबांनी पुण्याचा सर्वांगीण विस्तार व विकास केला व पुण्याची आर्थिक घडी नीट बसविली. सुशोभिकरणाकडे लक्ष दिले. सन १८१८ मध्ये मराठेशाहीचा व पेशवाईचा अस्त झाल्यानंतर ब्रिटिशांचा युनियन जॅक पुण्याच्या शनिवारवाड्यावर फडकला. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये पुणे शहर मध्यवर्ती ठिकाण होते. राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक संस्थेचा संस्थात्मक पाया पुण्यातच घातला गेला.

पुणे जिल्हा संक्षिप्त

१. भौगोलिक स्थान : पुणे जिल्ह्याच्या उत्तर व पूर्वेस अहमदनगर जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा, दक्षिणेस सातारा जिल्हा आहे. आग्नेयास सोलापूर तर वायव्येस ठाणे जिल्हा आहे. जिल्ह्यातील काही भाग डोंगर व सपाट प्रदेश आहेत. पूर्व भागातील सपाटीच्या प्रदेशात मधूनमधून टेकड्यांची रांग आढळते.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

. प्रमुख पिके : पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने बाजरी, तांदूळ, गहू, हरभरा, खरीप व रब्बी ज्वारी त्याबरोबर ऊस (बारामती, भोर, इंदापूर) व द्राक्षे (बारामती, इंदापूर) ही नगदी पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. आंबेमोहोर हा भोर तालुक्यातील सुवासिक तांदूळ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

. नद्या व धरणे : पुणे जिल्ह्यातील मुख्य नदी भीमा नदी असून, घोड, इंद्रायणी, मुळा, मुठा, मांडावी निरा, कुकडी, मीना या नद्या पुणे जिल्ह्यातून वाहतात. पुणे जिल्ह्यात वेळवंडी नदीवर भाटघर धरण (येसाजी कंक जलाशय), अंबी नदीवर (मुठेची उपनदी) पानशेत धरण, मुळशी नदीवर खडकवासला धरण, कुकडी, घोड कुकडी प्रकल्प, डिंभे धरण चिंचणी (शिरूर) व डिंभे (आंबेगाव) इत्यादी धरणे आहेत.

. उद्योग व व्यवसाय : पुणे शहर व आसपासच्या परिसरात पिंपरी-चिंचवड, भोसरी, चाकण, हिंजवडी, रांजणगाव, कुरकुंभ, बारामती, जेजुरी येथे औद्योगिक वसाहती आहेत. पुणे जिल्ह्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, टेल्को, फिलिप्स, किर्लोस्कर, क्रॉम्प्टन ग्रीव्हज इत्यादी ऑटोमोबाईल क्षेत्रात उत्पादन घेणाऱ्या कंपन्या आहेत. जुन्नर तालुक्यात मेंढीच्या केसांपासून घोंगड्या बनविण्याचा उद्योग चालतो.

५. दळणवळण : पुणे जिल्ह्यातून पुणे-मुंबई सुपर हायवे हा द्रुतगती महामार्ग (एक्स्प्रेस हायवे), मुंबई-पुणे-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग क्र. ४, राष्ट्रीय महामार्ग क्र. ९ आणि नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ५० गेलेला आहे. या जिल्ह्यातून मुंबईपुणे-कोल्हापूर रेल्वेमार्ग, मुंबई-पुणे-सोलापूर रेल्वेमार्ग आणि मनमाड-दौंड असा लोहमार्ग गेलेला आहे. पुणे येथे लोहगाव विमानतळ आहे. येथून सध्या दुबई, सिंगापूर आदी ठिकाणी आंतरराष्ट्रीय सेवाही उपलब्ध आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

पुणे जिल्ह्याची वैशिष्ट्ये

 • पुणे येथे सावित्रीबाई फुले विद्यापीठ व परम संगणक निर्माण करणारी संस्था प्रगत संगणन विकास केंद्र (सीहडॅक) आहे.
 • फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही चित्रपट व दूरदर्शन क्षेत्रातील प्रशिक्षण देणारी राष्ट्रीय स्तरावरील संस्था आहे.
 • पुणे जिल्ह्यातील आर्वी येथे उपग्रह दळणवळण केंद्र आहे.
 • आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेले असून, येथे असलेले महादेवाचे देवस्थान हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते.
 • जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यामध्ये शिवरायांचा जन्म झाला. * खेड तालुक्यात आळंदी देवाची येथे संत ज्ञानेश्वरांची समाधी आहे. * हवेली तालुक्यातील देहू येथे संत तुकाराम महाराजांची समाधी आहे.
 • मुंबई-पुणे रस्त्यावरील लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण असून, याच भागात कार्ले, भाजे व बेडसा या ठिकाणी प्राचीन लेणी आहेत. लोणावळा येथे आयएनएस शिवाजी हे नौदल प्रशिक्षण केंद्र आहे.
 • चाकण हे ठिकाण खेड तालुक्यात असून, येथे कांद्याची मोठी बाजारपेठ आहे.
 • पुण्याजवळ खडकवासला येथे ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ आहे. * नॅशनल फिल्म अर्काइव्हचे कार्यालय महाराष्ट्र राज्यात पुणे येथे आहे.
 • पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात भाटघर येथे १९२८ मध्ये येळवंडी नदीवर बांधण्यात आलेल्या धरणास तत्कालीन मुंबई इलाख्याचा गव्हर्नर लॉइड यांचे नाव देण्यात आले.
 • नॅशनल केमिकल लेबॉरेटरी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी व इंडियन ड्रग लेबॉरेटरी या संस्था पुणे शहरात आहेत.
 • अष्टविनायकांच्या आठ स्थानांपैकी मोरेश्वर (मोरेगाव), श्री विघ्नेश्वर (ओझर), महागणपती (रांजणगाव), गिरिजात्मक (लेण्यांद्री), चिंतामणी (थेऊर) ही पाच ठिकाणे याच जिल्ह्यात आहेत.
 • पुण्याजवळ भोसरी येथे राष्ट्रीय एड्स अनुसंधान संस्था’ ही राष्ट्रीय स्तरावरील एड्ससंदर्भात संशोधन कार्य करणारी संस्था आहे.
 • महाराष्ट्र राज्यात पुणे शहराचा ‘विद्येचे माहेरघर’ म्हणून गौरव केला जातो.

सांख्यिकीक पुणे

(अ) भौगोलिक माहिती

. क्षेत्रफळ=१५,६४२ चौ.किमी.

. अभयारण्ये =०२ भीमाशंकर अभयारण्य व मयूरेश्वर

. जंगलाचे प्रमाण=११.०७%

. वनोद्याने=०७ बनेश्वर, सिंहगड, पांचगावपर्वती, भांबुर्डा, मुळा-मुठा, शिवनेरी व उजनी-भिगवण

(आ)प्रशासकीय माहिती

१. आयुक्तालय=पुणे विभाग(कार्यालय-पुणे)

. जिल्ह्याचे मुख्यालय=पुणे

३. उपविभाग=०८ जुन्नर-आंबेगाव, खेड, मावळ-मुळशी, पुणे-शिरूर, भोर-वेल्हे, दौंड-पूरंदर, बारामती-इंदापूर.

.तालुके=१३ जुन्नर, आंबेगाव, खेड, इंदापूर, शिरूर, मावळ (वडगाव), वेल्हे, पुणे-शिरूर, दौंड भोर, हवेली, मुळशी (पौंड), पुरंदर (सासवड), बारामती.

५.पंचायत समित्या=१३

. ग्रामपंचायत=१४०७

७. महानगरपालिका=०२ पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका

८. नगरपालिका=१३

९. कटकमंडळे =०३

१०. पोलीस मुख्यालय=०२ पुणे शहर पोलीस आयुक्तालय व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक

११. पोलीस स्टेशनची संख्या= पुणे शहर आयुक्तालय(१७) व ग्रामीण पोलीस(२९)

{इ} लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनुसार)

१. लोकसंख्या= ९४,२६,९५९

. साक्षरता= ८६.२%

३. लिंग गुणोत्तर= ९१०

४. लोकसंख्येची घनता= ९१५

हे पण वाचा>>>>>>>>>>

कोल्हापूर जिल्हा माहिती

नाशिक जिल्हा माहिती

नंदुरबार जिल्हा माहिती

जळगाव जिल्हा माहिती

तुम्हाला पुणे जिल्ह्या संपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे अश्याच माहिती साठी MaharashtraBoardSolutions.Net ला नक्की भेट द्या.

Final Word: आम्हाला आशा आहे की तुम्हाला पुणे जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Pune District Information In Marathi तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीला हा लेख नक्की शेअर करा आणि Maharashtra Board Solutions ला भेट द्यायला विसरू नका.

Leave a Comment