नंदुरबार जिल्हा माहिती मराठी, इतिहास, वैशिष्ट्ये, तालुके | Nandurbar Information In Marathi

Nandurbar marathi mahiti, Nandurbar Jilha Mahiti, Nandurbar Information In Marathi, Nandurbar District Information,Nandurbar pin code maharashtra

नंदुरबार जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास–Nandurbar Information in Marathi .

नंदुरबार जिल्हा =माहिती

नंदुरबार हे शहर पुरातन काळात नंद नावाच्या गवळी राजाने वसवल्याचे मानतात. नंदुरबार जिल्ह्यातील ‘भिल्ल’ या प्राचीन आदिवासी जमातीचा उल्लेख रामायण व महाभारतामध्येही आलेला आहे. सन १९४२ च्या चले जाव आंदोलनात काळात बालक्रांतिकारक शिरीषकुमारने नंदुरबार येथे हौतात्म्य स्वीकारले होते. त्यांच्या स्मृती स्मारकाच्या माध्यमातून आजही येथे जतन करण्यात आल्या आहेत. १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन करून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.

नंदुरबार जिल्हा संक्षिप्त माहिती

१. भौगोलिक स्थान : नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या वायव्य भागात वसलेला आहे. सातपुडा पर्वतरांगांमुळे हा जिल्हा गुजरात व मध्यप्रदेश राज्यांपासून वेगळा झालेला आहे. या जिल्ह्याच्या पूर्वेला मध्यप्रदेश व धुळे जिल्हा, दक्षिणेला धुळे जिल्हा आणि पश्चिमेला गुजरात राज्य आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागात सातपुड्याची पर्वतरांग आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

२. उपविभाग व तालुके : या जिल्ह्यात नंदुरबार, शहादा व तळोदे हे उपविभाग असून नंदुरबार, अक्कलकुवा, तळोदा, नवापूर, शहादा व अक्राणी असे सहा तालुके आहेत.

३. प्रमुख पिके : नंदुरबार जिल्ह्यात तांदूळ, बाजरी, ज्वारी, भुईमूग, गहू, हरभरा ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. येथील मिरची व तूरडाळही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. नंदुरबार व नवापूर या तालुक्यांत मिरची प्रामुख्याने पिकविली जाते. या जिल्ह्यात कांद्याचे, कापसाचे व उसाचे उत्पादन घेतले जाते, तसेच नंदुरबार तालुक्यात केळी व बोर या फळांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. व

४. नद्या : नर्मदा व तापी या नंदुरबार जिल्ह्यातील मुख्य नद्या आहेत. याशिवाय गोमती, उकाई, पाताळगंगा, रत्नावली या महत्त्वाच्या उपनद्या आहेत. या जिल्ह्यातील गोमती नदीवर सुसरी धरण बांधण्यात आले आहे. चार राज्ये मिळून निर्माण झालेल्या नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्पामुळे जिल्ह्यातील काही भागाला नर्मदा प्रकल्पाचा लाभ होतो.

५. उद्योग व व्यवसाय : नंदुरबार जिल्ह्यात तळोदे येथे एकमेव औद्योगिक वसाहत आहे. तळोदे येथील सागाच्या लाकडाची बाजारपेठ जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात रोशा गवतापासून औषधे व सुगंधित तेल बनविण्याचा उद्योग जिल्ह्यात चालतो.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

६. दळणवळण : या जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ गेला असून, महाराष्ट्र व गुजरात या राज्यांना जोडणारा सुरत-भुसावळ लोहमार्ग गेला आहे.

नंदुरबार जिल्ह्याची वैशिश्ट्ये

  • नंदुरबार शहर मिरची व तूरडाळीच्या गोमाती या नद्यांच्या राज्यात प्रसिद्ध आहे.
  • शहादा तालुक्यातील प्रकाश हे गाव तापी व संगमावर वसलेले आहे. महाराष्ट्रातील
  • तोरणमाळ हे सातपुडा पर्वतरांगेच्या कुशीत वसलेले दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण आहे. जिल्हा
  • नंदुरबार जिल्ह्याच्या निर्मितीआधी धुळे जिल्हा आदिवासी म्हणून ओळखला जात होता. परंतु आता आदिवासींची ६० टक्के लोकसंख्या असलेला नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो.
  • २०११ च्या जनगणनेनुसार जिल्हा नंदुरबार येथे सर्वात कमी साक्षरता आहे.
  • १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन करून नंदुरबार या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
  • नंदुरबार जिल्ह्यात ‘तोरणमाळचे पठार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातपुडा पर्वतरांगा आहेत.
  • या जिल्ह्यात रोशा गवतापासून औषधे व सुगंधी तेल बनविण्याचा उद्योग चालतो.

सांख्यिकीक नंदुरबार

(अ) भौगोलिक माहिती

१. क्षेत्रफळ=५,०३५ चौ.किमी.
२. जंगलाचे प्रमाण=४०.१%
३. अभयारण्ये=अनेर अभयारण्य

(आ)प्रशासकीय माहिती

१. आयुक्तालय =नाशिक विभाग .

२.जिल्ह्याचे मुख्यालय=नंदुरबार

३. उपविभाग=०३ नंदुरबार, शहादा व तळोदा

४. तालुके= ०६ नंदुरबार, अक्कलकुवा,तळोदा, नवापूर, शहादा व धडगाव.

५. पंचायत समित्या =०६

६. ग्रामपंचायत= ५०१

७. नगरपालिका =०४

८.पोलीस मुख्यालय =०१ जिल्हा पोलीस अधीक्षक

९. पोलीस स्टेशनची संख्या =११

(इ)लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनुसार)

१. लोकसंख्या= १६,४८,२९५

२. साक्षरता =६४.३८%

३. लिंग गुणोत्तर =९७५

४. लोकसंख्येची घनता= १७६

हे पण वाचा>>>>>>>>

जळगाव जिल्हा माहिती

धुळे जिल्हा माहिती

अहमदनगर जिल्हा माहिती

परभणी जिल्हा माहिती

तुम्हाला नंदुरबार जिल्ह्या संपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे अश्याच माहिती साठी MaharashtraBoardSolutions.Net ला नक्की भेट द्या.

Final Word: आम्हाला आशा आहे की तुम्हाला नंदुरबार जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Nandurbar District Information In Marathi तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीला हा लेख नक्की शेअर करा आणि Maharashtra Board Solutions ला भेट द्यायला विसरू नका.

Leave a Comment