Maharashtra Board class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12: रंगरेषा व्यंगरेषा(Rangresha vyangresha )

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 12. Solutions रंगरेषा व्यंगरेषा ( Rangresha vyangresha Notes) Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12: रंगरेषा व्यंगरेषा
12th Marathi Guide Prashn uttar Chapter 12: रंगरेषा व्यंगरेषा Textbook Questions and Answers.

(ई) लेखकाला लागू पडणाऱ्या व्यक्तिवैशिष्ट्यांसमोर (✓) अशी
खूण करा.

(१) लेखकामध्ये जबरदस्त निरीक्षणशक्ती होती. ()

Telegram group मध्ये जॉईन व्हा

(२) लेखकाच्या व्यंगचित्रांना सहजासहजी प्रसिद्धी मिळाली. ()

(३) लेखकामध्ये प्रयोगशीलता पुरेपूर भरलेली होती. ()

(४) अपेक्षित उत्तर मिळेपर्यंत ते विचारांचा पाठलाग करत.

(५)व्यंगचित्रातला नवा ट्रेंड स्वीकारण्याची वृत्ती नव्हती. ()

Telegram group मध्ये जॉईन व्हा

(६)प्राप्त प्रसंगांतून आणि भेटलेल्या व्यक्तींकडून शिकत
राहण्याची वृत्ती होती. ()

(७)नवनिर्मितिक्षमता हा त्यांचा गुण होता. ()

(८) इतरांच्या आधाराने पुढे जाण्याची त्यांची वृत्ती नव्हती. ()

★कती २. वर्णन करा.

(अ) वाई येथील प्रदर्शनाला भेट देणारा शेतकरी कुटुंबप्रमुख.

उत्तर: लेखकांच्या चित्रांचे ‘वाई’ या गावी प्रदर्शन भरले होते. प्रदर्शनाचा दुसरा दिवस होता व प्रदर्शनाच्या वास्तूजवळ एक ट्रॅक्टरट्रॉली थांबली त्यात २०, २२ मंडळी होती. त्यांच्या सोबत सत्तरीच्या आसपासचा कुटुंबप्रमुख होता. पांढऱ्या मिशा, काळाकभिन्न रंग, डोक्याला मोठं मुंडासं बांधलेला व नखशिखान्त शेतकरीपणात वागणारा तो आणि त्याच्या घरातील मुलं नातवंडांसोबत प्रदर्शन बघत होता व लेखकांच्या प्रत्येक चित्रासमोर उभा राहून त्याच्यामागे उभ्या असलेल्या सर्व कुटुंबातील माणसांना तो त्या चित्राचा अर्थ समजावून सांगत होता.

(आ) स्त्रीभ्रूणहत्येबद्दलचे लेखकाने तयार केलेले पोस्टर.

उत्तर: लेखक एका कार्यक्रमाला गेले असतात तेव्हा रिवाजाप्रमाणे त्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले जाते. लेखक ते श्रीफळ, शाल टेबलावर समोर ठेऊन कार्यक्रम ऐकत असतात तेव्हा त्यांचे लक्ष टेबलावरील नारळाकडे जाते. नारळ बघून त्यांना असे वाटते की जणू एका छोट्या मुलीचे ते डोके आहे. हा विचार त्यांच्या मनात घोळत राहिला. रात्री सर्व कामे संपवून ते चित्र काढण्यास बसले. त्यांनी एक पुरुषी हात काढला ज्याच्या हातात नारळ आहे व तो हात खालील दगडावर नारळ देवासमोर आपटून फोडतात तसा फोडण्यासाठी उगारला आहे. त्यांनी त्या नारळाच्या कानात एक डूल दाखवला मुलीचे प्रतीक म्हणून व उगारलेल्या हाताला थांबवणारा अजून एक हात दाखवला. यातील उगारलेला हात स्त्रीअर्भकाची हत्या करू पहात आहे तर दुसरा हात ते रोखण्याचा प्रयत्न करीत आहे.

(इ) लेखकाने आईविषयी रेखाटलेले काव्यात्म चित्र.

उत्तर:लेखकांना वाटते की एखादी काव्यात्म कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते. त्यासाठी लेखकांनी आईचं नातं व्यक्त करणारं चित्र रेखाटलं. आईचं नातं हे सगळ्या जगातलं एकमेव खरं आणि सुंदर नातं आहे. बाकीची नाती ही जोडलेली असतात. माणसांमध्ये जर ईश्वराचा अंश दिसत असेल तर तो आईमध्ये दिसतो असे त्यांना वाटते. म्हणून त्यांनी काढलेल्या चित्रात उन्हाळ्यातला वैशाख वणवा दाखवला. त्यात एक सुकलेलं झाडपण आहे. एकही पान नसलेल्या त्या झाडाला फांदीवर एका पक्ष्यानं घरटं केलेलं आहे. त्या घरट्यात चोच उघडून आकाशाकडे बघणारी तीन-चार पिल्लं आहेत आणि त्या पिल्लाची कणसदृश्य आई पार आकाशात गेलीय. दूरवर सापडलेला एक पावसाचा ढंग ती चोचीने घरट्याच्या दिशेनं ओढून आणतेय. आईचं नातं या चित्रासारखं शब्दातून व्यक्त करता येणार नाही.

कृती ३. व्याकरण

(अ) खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.
(१) या चित्रांचे स्त्रोत मला सापडतात.
(२) हा संदेश मला पोहोचवता आला.
(३) त्यांनी ती सातआठ चित्रं पुन्हा चितारून दाखवली.
(४) मार्गदर्शन संपवून चहा मागवला.

उत्तर:
(१) भावे प्रयोग

(३) भावे प्रयोग

(२) कर्मणी प्रयोग

(४) कर्मणी प्रयोग

उत्तरे:

(१) अशी माणसं नेहमी सापडत नाहीत.
(२) जुनी कौलारू वास्तू होती ती!
(३) तुम्ही मला बोलू दया.

(ई) कंसात समासांची नावे दिलेली आहेत. खाली दिलेल्या सामासिक शब्दांसमोर त्यापैकी योग्य समासाचे नाव लिहा.

(विभक्ती तत्पुरुष समास, कर्मधारय समास, द्विगू समास, इतरेतर दवंद्व समास, वैकल्पिक वंदव समास, समाहार वंदव समास)

(१) चहापाणी-•••••••••••••••

(२) सद्गुरु-••••••••••••••••

(३) सुईदोरा-•••••••••••••••

(४) चौघडी-•••••••••••••••

(५) कमीअधिक -•••••••••••

(६) जलदुर्ग-•••••••••••••••

कृती- ४.स्वमत.

(अ) ‘एखादे व्यंगचित्र हे प्रत्यक्ष भाषेपेक्षा संवादाचे प्रभावी माध्यम असू शकते.’ या विधानाशी तुम्ही सहमत वा असहमत आहात ते सकारण स्पष्ट करा.

उत्तर: भाषा हे माणसाचे भावना व्यक्त करण्याचे, संवादाचे प्रभावी माध्यम आहेच पण अनेकवेळा असे वाटते जेव्हा एखादी भावना शब्दांकीत करता येत नाही. तेव्हा ती चित्रातून व्यगचित्रातून गीतातून विविध माध्यमांतून व्यक्त करता येते. व्यगंचित्र ही नि:शब्द भाषा आहे. या रेषांना शब्द नाहीत तरीही ते प्रभावी माध्यम आहे. लेखकांनी पाठात उदाहरण दिलेले व्यंगचित्र ज्यात स्त्रीभ्रूण हत्येची समस्या मांडली आहे. जी शब्दांपेक्षा बोलकी आहे. तसेच लेखकांनी आपल्या वडिलांविषयी श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी काढलेल्या व्यंगचित्रातून वडिलांचे प्रत्येकाच्या जीवनातील स्थान, महत्त्व अतिशय प्रभावीपणे व्यक्त होते. त्यांनी काढलेल्या काव्यात्मता व्यक्त करणाऱ्या चित्रांपैकी त्यांच्या आईविषयीचे चित्र ‘आई’ प्रत्येकासाठी काय असते हे सांगणारे, आईचे आपल्या मुलांवरील प्रेम व्यक्त करणारे बोलके व्यंगचित्र आहे. एकूणच व्यंगचित्र हे संवादाचे प्रभावी माध्यम आहे.

(आ) ‘वाहत्या आयुष्यामध्ये सावधगिरीनं उभं राहिलं तर व्यंगचित्राची कल्पना अगदी जवळून जाते’, या

विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

उत्तर :व्यंगचित्रातून ज्या भावना, प्रसंग, समस्या व्यक्त केल्या जातात, त्या जीवनातील प्रसंगाशी जवळीक साधणाऱ्या असतात. या सर्व घटकांना चित्रकार आपल्या कल्पनांची साथ देत व्यंगचित्र रेखाटताना दिसतात. मासेमारी करणाऱ्या एका जमातीचे उदाहरण लेखकांनी पुस्तकात दिले आहे. जी जमात वाहत्या पाण्यात सावध उभी राहते व जवळ एखादा मासा आला की हातानेच झपाटून तो पकडते. माणसाचे आयुष्यही वाहत्या पाण्यासारखे असते. ते स्थिर नसते. प्रत्येक क्षण, प्रत्येक प्रसंग माणूस या आयुष्यात नव्याने अनुभवत असतो. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे जर जागरूकपणे पाहिले तर खूप काही शिकता येण्यासारखे असते. लेखक, कवी, चित्रकार यांसारख्या कलाकारांना रोजच्या अनुभवातून खूप काही कल्पना शिकता येण्यासारख्या असतात. म्हणूनच वाहत्या आयुष्यामध्ये सावधगिरीनं उभं राहिलं तर व्यंगचित्राची कल्पना सापडते,

(इ) लेखकाने व्यंगचित्रांतून वडिलांना वाहिलेली श्रद्धांजली तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर: व्यंगचित्र हे भावना मांडण्याचे एक प्रभावी साधन आहे. लेखक मंगेश तेंडुलकर यांनी आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक व्यंगचित्र काढले. ज्यात डोक्यावर ‘बाबा’ अशी मोठी अक्षरे आहेत ज्यामुळे पाऊस त्या मुलाच्या दोन्ही बाजूंनी पडत आहे. म्हणजेच लहानपणी आपण सर्व आपल्या वडिलांच्या छत्रछायेखाली सुरक्षित असतो. दुसऱ्या चित्रात पण पावसात उभी असलेली पंच्याहत्तरी पूर्ण केलेली व्यक्ती आहे. जो तो लहान मुलगा मोठा झालेला आहे. तो ही पावसात उभा आहे. आता त्याच्या डोक्यावर ‘बाबा’ ही अक्षरे नाहीत पण बाबांनी जे त्यांच्यासाठी निर्माण करून ठेवले आहे त्यामुळे ते आजही पावसात उभे असले तरी त्यांचे संरक्षण होत आहे. खूप मोठा विचार या चित्रात आहे. वडील आपल्या मुलांसाठी, त्यांच्या जीवनाच्या संरक्षणासाठी सतत झटत असतात. त्यांनी घेतलेल्या कष्टांमुळे त्यांनी आपल्याला जे घडवले असते. त्यामुळेच आज आपण कोणत्याही संकटकाळात, आपल्या जीवनात पाय रोवून घट्ट उभे असतो. याची जाणीवही कित्येकवेळा आपल्याला होत नसते. लेखकांनी या चित्रातून वाहलेली श्रद्धांजली ही मनाला स्पर्श करून जाते.

  • कृती -५. अभिव्यक्ती.

(अ) ‘स्त्री भ्रूणहत्या एक अपराध’ याविषयी तुमचे विचार स्पष्ट करा.

उत्तर: एका ठिकाणी विचार लिहिले होते जे मनाला स्पर्शन गेले,

‘प्रत्येकाला मैत्रीण पाहिजे, बहीण पाहिजे,

आई पाहिजे, मग मुलगी का नको?’

खरंच! विचार करायला लावणाऱ्या या ओळी आहेत. स्त्री ही आई, बहीण, मैत्रीण, बायको, सासू, सून, नणंद, भावजय विविध भूमिका पार पाडत असते. या सर्व कौटुंबिक भूमिकांमध्ये तर ती कमी पडत नाहीच उलट आज तर प्रत्येक क्षेत्रात ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढत असते. स्त्रीशिवाय घराची कल्पनाच करू शकत नाही. असे असताना आजही समाजात मुलगा पाहिजे हा अट्टाहास दिसून येतो, का तर मुलगा हा वंशाचा दिवा असतो. पण जर मुलगी ही कोणत्याही बाबतीत मुलापेक्षा कमी नाहीतर फक्त वंश वाढावा म्हणून मुलगा हवा! बरं! हा विचार समाजात का दिसत नाही की, जर प्रत्येकाने मुलगी नको असे म्हटले तर, बाकी सर्व नाती निभावण्यासाठी स्त्रियाच नसतील. केवळ ते स्त्री अर्भक आहे म्हणून त्याची हत्या करणे ही किती क्रूर मनोवृत्ती आहे. अशांना तर कडक शासन होणे जरूरी आहे. स्त्री भ्रूणहत्या हा एक अपराधच आहे.

(आ) ‘आईचं नातं सगळ्या जगातलं एकमेव खरं आणि सुंदर नातं आहे’, या वाक्यातील आशयसौंदर्य उलगडून दाखवा.

उत्तर: ‘आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही’ या ओळी आईचे
प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्व सांगतात.
आपल्या जीवनातील आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. हे सत्य आहे. ‘स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी’ आईचे प्रेम, माया यांची तुलना कोणत्याच गोष्टींशी करता येणार नाही. पोटात नऊ महिने सांभाळण्यापासून ती आपल्या मुलांसाठी सतत कष्ट सहन करत असते, त्रास काढत असते. सतत आपल्या मुलांना चांगल्यात चांगली प्रत्येक गोष्ट मिळावी, त्यांना कोणत्याही गोष्टीचा त्रास सहन करावा लागू नये म्हणून ती सतत झटत असते. आपल्याला घडवण्यात, सुसंस्कारी बनवण्यात तिचा मोठा वाटा असतो. वेळप्रसंगी ती स्वतः त्रास सहन करते पण आपल्या मुलांना त्याची झळ पोहोचू देत नाही. तिच्या कुशीत गेल्यावर सर्व दुःख विसरायला होतात. अशी मायेची सावली असते ती, आपल्या चुका दाखवून त्यांना योग्य मार्ग दाखवणारी आईच असते. आईच अशी व्यक्ती असते जिच्यापासून आपण काहीच लपवू शकत नाही म्हणून आईचं नातं सगळ्या जगातलं एकमेव खरं आणि सुंदर नातं आहे.

उत्तरः व्यंगचित्र बोलके असते. व्यंगचित्राजवळ उ करते आहे. तिच्या या निस्वार्थी वृत्तीने व निरागसपणाने

थोडा वेळ रेंगाळले तर त्या चित्राच्या अर्थाचा बोध होतो. मंगेश तेंडुलकरांच्या या व्यंगचित्रात कुऱ्हाडीचा दांडा जमिनीत खुपसलेला आहे व त्याला एक छोटी मुलगी पाणी घालते आहे. कुऱ्हाडीच्या पात्याला पालवी फुटली आहे. या चित्राकडे प्रथमदर्शनी पाहता वृक्षरोपाचा संदेश असेल असे वाटते. पण नीट निरीक्षण केल्यावर त्यातील मतितार्थ कळतो. लहान निरागस मुलगी, तिला माहीत नाही कुऱ्हाड कशासाठी वापरतात. ती त्याचा लाकडी दांडा जमिनीत खोवलेला पाहून झाड समजून त्याला पाणी देते आहे. निरपेक्ष भावनेने, प्रेमाने ती हे कार्य

कुऱ्हाडीचे पातेही पाझरले आहे व त्यालाही पालवी फुटली आहे. आपण जर प्रेमाने सतत एखादया गोष्टीचा पाठपुरावा केला तर पाषाणहृदयी व्यक्तीच्या मनालाही पाझर फोडू शकतो. त्यातून चांगल्या विचारांची पालवी फुटू शकते. असा या व्यंगचित्रातून मला कळलेला अर्थ आहे. अर्थात प्रत्येकाच्या चित्राकडे बघण्याच्या भावना वेगळ्या असू शकतात. त्यामुळे यातून काही अजून वेगळे अर्थही निघू शकतात.

प्र. २ कारणे लिहा.

(१) लेखकांनी नारळाला बारीकसा कानातला डूल
दाखवला, कारण…………………….

उत्तर: लेखकांनी नारळाला बारीकसा कानातला डूल दाखवला,
कारण नारळ हे चिमुरड्या मुलीचं डोकं आहे हे सूचित व्हावं.

(२) वाहत्या आयुष्यामध्ये सावधगिरीनं उभं राहणं आवश्यक
आहे, कारण………….

उत्तर: वाहत्या आयुष्यामध्ये सावधगिरीनं उभं राहणं आवश्यक आहे, कारण आयुष्यात व्यंगचित्राची कल्पना जवळून जात असते. ती तिथून उचलून कागदावर उतरवता यावी.

उतारा : मी बऱ्याच कार्यक्रमांना जात असतो…खूप मनापासून श्रद्धांजली वाहिली. (पाठ्यपुस्तक. पृ. क्र. ५४, ५५ )

प्र. ३. स्वमत.

१) वडील हे प्रत्येकाच्या जीवनातील आधारस्तंभ असतात. याविषयी तुमचे मत व्यक्त करा.

उत्तर: आई प्रेमळ, मायेने समजावणारी तर बाबा कडक शिस्तीचे साधारण असे समीकरण असते. म्हणजे बाबा प्रेम करत नाहीत असे अजिबात नाही. बाबासुद्धा मुलांवर आईएवढेच प्रेम करत असतात. पण बाबा हे सतत आपला मुलांना समाजात, बाहेर वावरताना काही समस्या येऊ नयेत हा विचार करून मुलांना मार्गदर्शन करत असतात. उद्या त्यांना आपल्या पायावर उभे राहता यावे. त्यांना चांगली नोकरी, पद मिळवता यावे यासाठी ते सतत झटत असतात. चांगल्यात चांगले शिक्षण मिळावे यासाठी ते आपल्या मुलांना तयार करतात व म्हणूनच तर नंतर आपले जीवन सुखी होते. मोठे झाल्यानंतरही प्रत्येक क्षणी ते आपल्या पाठीशी उभे असतात. म्हणूनच प्रत्येकाच्या जीवनातील बाबा हे आधारस्तंभ असतात.

(२) ‘व्यंगचित्र रेखाटण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता
असते.’ यासंबंधी तुमचे विचार लिहा.

उत्तर: व्यंगचित्र ही एक कला आहे. भावना मांडण्याचे ते एक प्रभावी माध्यम आहे. व्यंगचित्राचा वापर केवळ हसवण्यासाठी नसतो तर अनेकवेळा त्यातून समाजातील समस्यांवर प्रकाश टाकला जातो किंवा

टिका केली जाते. व्यंगचित्रकाराची निरीक्षण शक्ती ही अतिशय चांगली असावी लागते. यात सफाईदार रेषा म्हणून व्यंगचित्र काढणे सोपे नाही.

असतात. या चित्रांपाशी थोडं थांबलं तर त्यात काहीतरी विचार सांगितलेला असतो. अनेक वेळा एखादयाच्या दिसण्याची, हसण्याची, राहणीमानाची हुबेहुब नक्कल केलेली इथे दिसते. पण ते एखादयाचे रेखाटलेले हुबेहुब व्यक्तिचित्र नसते. ही चित्र बोलकी असतात. त्यातून चित्रकाराला जो संदेश लोकांपर्यंत पोहोचवायचा असतो त्यासाठी अनेकवेळा त्या भावना, ते भाव चित्रातील पात्रांच्या चेहऱ्यावर व्यक्त व्हावे लागतात. काही वेळा प्रतिकात्मकता वापरलेली असते. पण ही प्रतीके भावना मांडण्यासाठी तेवढी योग्य असावी लागतात. एकूणच व्यंगचित्राचा एक वेगळा अभ्यास आहे. व्यंगचित्रकाराच्या प्रत्येक चित्रातून तो जाणवत असतो. म्हणून व्यंगचित्र काढणे सोपे नाही.

प्र.२.स्वमत.

(१)’व्यंगचित्र हे सामान्य चित्रांपेक्षा वेगळे असते’, या विषयी तुमचे
विचार मांडा.

उत्तर: प्रत्येक कलेत विविध पैलू . प्रकार असतात. चित्रकलेचेही खूप प्रकार आहेत. व्यंगचित्र हा त्यांपैकीच एक प्रकार आहे. आपण लहानपणापासून फूल, पान, घर, आकाश, निसर्ग यांची चित्र काढत असतो. मोठे झाल्यावर त्यात नियोजितपणा येतो. एखादया निसर्गाचे, व्यक्तीचे जसेच्या तसे चित्र काढण्याचा आपण प्रयत्न करतो. एखादे सामान्य चित्र हे बघून काढलेले किंवा कल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न असतो. अशा चित्रांना काही अर्थ असतोच असे नाही. केवळ ती एक कलाकृती असू शकते. पण व्यंगचित्र काढण्याच्या काही विशिष्ट पद्धती आहेत. त्यात बारीकसारीक गोष्टींचे टिप्पण असते व खूप वेळा त्यात काहीतरी संदेश, अर्थ असतो. आपण अनेक व्यंगचित्र पाहतो. ‘चिटू’ सारख्या पुस्तकांमधील व्यंगचित्र मालिका एखादी गोष्ट कथन करत असते या व्यंगचित्राच्या प्रकाराला हास्यचित्र म्हणतात.

तर आपण वर्तमानपत्रांतून अनेक वेळा राजकीय व्यंगचित्र पाहतो. त्यांचे निरीक्षण केले तर व्यक्ती हुबेहुब रेखाटलेली असते. काहीवेळा त्या चित्रांच्या बाजूला किंवा खाली शब्दांतून संदेश दिलेला असतो. तर अनेक वेळा एखादे चित्रच संदेशात्मक असते, बोलके असते. व्यंगचित्र काढण्याचे काही नियम असतात जे सामान्य चित्रांमध्ये असतातच असे नाही. म्हणून दोन्ही चित्रे वेगळी आहेत.

(२) तुम्हांला माहीत असलेल्या व्यंगचित्रकारांविषयी थोडक्यात
माहिती लिहा.

उत्तर: व्यंगचित्र ही एक कला आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. शि. द. फडणीस, श्याम जोशी, आर. के. लक्ष्मण, हंगेरियन चित्रकार रेबर व अमेरिकन चित्रकार डेव्हिड, लँग्डन हे काही व्यंगचित्रकार प्रसिद्ध आहेत. प्रत्येकाच्या चित्रशैलीचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे.
लहानपणी गणिताच्या पुस्तकात जाड रेषांनी लहान मुलं काढलेली चित्र असायची. खास करून चौथीपाचवीच्या पुस्तकात गणिताची भीती घालवण्यासाठी ही चित्र दिलेली असत. ही चित्र शि. द. फडणीस या ज्येष्ठ चित्रकारांची होती. श्याम जोशी या हास्यचित्रकारांच्या व्यंगचित्रांची रेषा ही नाजूक व लवचिक होती. त्यांच्या व्यंगचित्रात हुबेहुब नक्कल केलेली दिसते. रांगणारे मूल, थोडे मोठे मूल यांच्या हालचाली, दिसणे यातील हुबेहुबता इथे दिसते. आर. के. लक्ष्मण हे जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार. त्यांची वर्तमानपत्रांतून व मासिकांतून खूप चित्रे पहायला मिळतात. व्यक्तीचा हुबेहुबपणा, ठेवण, दिसणे व त्यांच्या चेहऱ्यावरील भावभावना जशाच्या तशा रेखाटणे व त्यातून भाव प्रेक्षकांपर्यंत पोहचणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. जेवढी जास्त व्यंगचित्र आपण पाहतो तेवढा त्यातील वेगळेपणा, खोलपणा आपल्याला जाणवतो.

प्र. २ वाक्यांचे रुपांतर करा.

(१) व्यंगचित्राची कल्पना सुचणं ही प्रक्रिया मजेदार आहे. (नकारार्थी करा.)

उत्तरः व्यंगचित्राची कल्पना सुचणं ही प्रक्रिया कंटाळवाणी नाही.

(२) व्यंगचित्रातून एखादया माणसाबद्दलची भावना करता व्यक्त येते का ? (विधानार्थी करा.)

उत्तरः व्यंगचित्रातून एखादया माणसाबद्दलची भावना व्यक्त करता येते.

(३) तुम्ही मला बोलू देणार आहात की नाही ? (आज्ञार्थी करा.)

उत्तर: तुम्ही मला बोलू दया.

(४) व्यंगचित्रातला नवा ट्रेंड असा आहे (उद्गारार्थी करा.)

उत्तर: असा आहे हा व्यंगचित्रातला नवा ट्रेंड!

(५) हे चित्र छान आहे. (उद्गारार्थी करा.)

उत्तर: वा! किती छान चित्र आहे !

उपक्रम :

  • •’बेटी बचाओ, बेटी पढाओ ।’ या विषयाशी संबंधित पाघोषवाक्ये तयार करा.

उत्तर:(१) ‘कन्या! हे तर परमेश्वराकडून मिळालेले वरदान हीचा आपण सगळे मिळून करूया सन्मान !’

(२) ‘आनंदी आनंद गडे जेव्हा मुलगी अंगणात बागडे!’

(३) ‘मुलींना शिकवून स्वयंसिद्धा बनवूया, !’

त्यांना त्यांच्या पायावर उभं रहायला शिकवूया

(४) ‘मुलीचा गर्भातच करताय नाश, अटळ आहे सर्वांचा विनाश !’

(५) ‘स्त्रीभ्रूण हत्या थांबवा, लेक वाचवा!’

लेखकाचा परिचय

सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार, नाट्यसमीक्षक, अभिनेता, लेखक, दिग्दर्शक व सामाजिक कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध. ‘संडेमूड’, ‘तेंडुलकरी स्ट्रोक्स’, ‘भुईचक्र’. ‘रंगरेषा व्यंगरेषा’ ही त्यांची प्रसिद्ध पुस्तके.

पाठ परिचय :

राजकीय, विनोदी व्यंगचित्रांबरोबरच समाजकारण व सामाजिक समस्यांवर भाष्य करणारी व्यंगचित्रे रेखाटणारे मंगेश तेंडुलकर यांनी या लेखात व्यंगचित्रकार म्हणून स्वत: च्या जडणघडणीच्या काळातील काही प्रसंग रेखाटले आहेत तर व्यंगचित्राविषयी त्यांच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या मते व्यंगचित्र ही निःशब्द भाषा आहे. शब्दांपेक्षा अत्यंत मार्मिकरित्या अभिव्यक्त होण्याची ताकद म्हणजे व्यंगचित्र असते.

लेखकांना व्यंगचित्रांसाठी अखंडपणे विषय मिळत राहतात. लेखकांना पाठलाग करता करता मूळ विषय हाती लागला नाही | तरी काहीतरी नवीन सापडत जातं. लेखक कार्यक्रमांना जात असतात तिथेही अनेक वेळा व्यंगचित्रांचे स्त्रोत त्यांना सापडतात. त्याविषयी लेखकांनी एक अनुभव सांगितला आहे. लेखक एका साध्याशा कार्यक्रमाला गेले होते तेथे प्रथेप्रमाणे त्यांना पुष्पगुच्छ आणि नारळ दिला. लेखकांना त्या टेबलावरच्या नारळाकडे बघता बघता तो नारळाची शेंडी, नारळाचा तो लहानसा आकार पाच-सात वर्षांच्या मुलीच्या डोक्यासारखा वाटायला लागला. नारळाची शेंडी मुलीच्या पोनीटेलसारखी वाटायला लागली. घरी आल्यानंतर सर्व कामे आटपून लेखक ड्रॉईंगपेपर घेऊन बसले व त्यावर त्यांनी चित्र चितारले. देवळासमोर दगडावर आपटून नारळ फोडतात. नारळ फोडणारा हात पुरुषी चितारला व नारळ नसून ते चिमुरड्या मुलीचं डोकं आहे हे सूचित करण्यासाठी त्यांनी नारळाला बारीकसा कानातला डूल दाखवला. दुसरा एक हात नारळ फोडण्यास उगारलेल्या पुरुषी हाताला धरून ठेवलाय यातून ‘स्त्रीभ्रूणहत्येचे’ एक पोस्टर तयार झालं. त्यातून ज्यांना लिहिता वाचता येत नाही. त्यांच्यापर्यंतही संदेश पोहोचवता आला.

हाताने मासे पकडणाऱ्या माणसाप्रमाणे आपण वाहत्या आयुष्यामध्ये जर सावधगिरीनं उभं राहिलो तर व्यंगचित्राची कल्पना रेखाटताना अचानकपणे एखादी सुप्त इच्छा त्या चित्रात स्वतंत्र रूप घेऊन उतरते. लेखकांच्या मते व्यंगचित्र ही निःशब्द भाषा आहे. त्या रेषांना शब्द नाहीत पण तरीही ती एक प्रभावी भाषा आहे. व्यंगचित्राच्या भाषेला जी मार्मिकता आहे ती शब्दाहून प्रभावी आहे.

आईविषयी रेखाटलेल्या चित्राबद्दल बोलताना ते म्हणतात. माणसांमध्ये मला जर कुठे ईश्वराचा अंश दिसत असेल तर तो आईमध्ये दिसतो. हे नातं व्यक्त करण्यासाठी त्यांनी उन्हाळ्यातला वैशाख वणवा आहे. त्यात एक सुकलेलं झाडपण आहे. एकही पान नसलेल्या त्या झाडाच्या फांदीवर एका पक्ष्यानं घरटं केलेलं आहे. त्या घरट्यात चोच उघडून आकाशाकडे बघणारी तीन-चार पिल्लं आहेत आणि त्या पिल्लाची कणसदृश्य आई आकाशात गेलीय. दूर सापडलेला एक पावसाचा ढग ती चोचीनं घरट्याच्या दिशेनं ओढून आणतेय, असे व्यंगचित्र रेखाटले आहे. आईविषयी एवढं चांगलं शब्दांमधूनही लिहिता येणार नाही.

आपल्या वडिलांना व्यंगचित्रांमधून श्रद्धांजली वाहिलेल्या चित्राबद्दल बोलतात. या चित्रात त्यांनी एक मुलगा पावसात उभा आहे असे दाखवले. त्याच्या डोक्यावर ‘बाबा’ अशी अक्षरे आहेत जी त्याचे पावसापासून संरक्षण करत आहेत. त्यात त्यांनी त्यांचं लहानपण दाखवले आहे. तर दुसऱ्या चित्रात लेखक वयाची पंचाहत्तरी पूर्ण केलेले आहेत. आता त्यांच्या डोक्यावर ते शब्द नाहीत पण तरीही पाऊस त्यांच्या दोन्ही बाजूंनी पडतो आहे. बाबांनी जे काही त्यांच्यासाठी निर्माण करून ठेवलं आहे ते आजही त्यांना आश्रय देत आलं आहे. लेखकांच्या व्यंगचित्रांची प्रदर्शनं भरवली जातात. त्यातील त्यांनी वाईसारख्या शहरातला अनुभव सांगितला आहे. त्यांचे तेथे लोकमान्य वाचनालयामध्ये प्रदर्शन भरवलं होतं तेव्हा त्या कौलारू छोट्या वाचनालयासमोर एका शेतकरी कुटुंबाची ट्रॅक्टर ट्रॉली थांबली. त्यातील मंडळी ट्रॉलीमधून उतरून जिना चढून वर प्रदर्शनाकडे आली.

त्यातील सत्तरीच्या आसपासचा असलेला कुटुंबप्रमुख त्याच्यामागे उभ्या राहिलेल्या त्याच्या घरातील माणसांना अर्थ समजावून सांगत होता. व्यंगचित्राच्या प्रसिद्धीसाठी प्रारंभीच्या काळात त्यांनी खूप धडपड केली. तेव्हा ते मासिकं, नियतकालिकं यांना चित्र पाठवायचे व ती सतत परत यायची. त्यांची स्वतंत्र ओळख तयार होत नव्हती. या काळात तीन संपादकांनी त्यांना हात दिला त्यांपैकी एक दिनानाथ दलाल होते. त्यांना पोस्टकार्ड टाकून ते भेटायला गेले. त्यानंतर ‘दीपावली’ मासिकासाठी खास चित्रं त्यांनी तयार केली व ते त्यांना ऑफिसमध्ये भेटायला गेले व त्यांनी काढलेली व्यंगचित्र दलालांना दाखवली. ती बघून दलालांनी लेखकांचीच चित्र नवीन ट्रेंडने काढून दाखवली व त्यातील खोली कशी घ्यायची हेही दाखवलं. दलालांनी लेखकांना विजय तेंडुलकर तुमचे कोण असे विचारले होते पण लेखकांनी कोणी नाही असे आधी सांगितले नंतर जेव्हा दलालांनी लेखक खोटे बोलत आहेत हे पकडले तेव्हा लेखक म्हणाले ते माझे मोठे भाऊ: पण मला त्यांच्या खांद्यावर उभं राहून मोठं नाही व्हायचं, भेटीनंतर लेखकांनी पुण्याला येऊन दोन दिवसात त्यांना हवी तशी चित्रं तयार केली व पाठवली. ती सर्व चित्रे त्यांनी आपल्या ‘दीपावली’ मासिकामध्ये प्रसिद्ध केली.

इंग्रजी शब्दांचे अर्थ:
इझेल – चित्र काढण्याचा कागद अडकवण्याची फळी / चित्रकलेसाठी वापरायचे लाकडी स्टँड
परस्पेक्टिव्ह -दृष्टिकोन

विरुद्धार्थी शब्द:

सुदैव × दुर्दैव

गाफील × सावध

स्मरण x विस्मरण

सुरक्षित असुरक्षित

आधार x निराधार

वाक्यप्रचार:

सूचित करणे= सुचवणे.

गाफील राहणे=बेसावध राहणे.

पाठलाग करणे=मागोवा घेणे.

झडप घालने=झेप घेणे.

स्वारस्य नसणे =स्वाभाविक, नैसर्गिक इच्छा नसणे.

शब्दार्थ:

क्षितिज -जेथे आकाश जमिनीला स्पर्श झालेले दिसते ती रेषा (horizon), स्त्रोत -उगम प्रवाह (Source), प्रत्यंतर अनुभव (experience), स्वारस्य -आवड, गोडी (interest), चितारणे- चित्र काढणे (To draw), स्त्रीभ्रूण – स्त्री अर्भक (embryonic), गाफील -बेसावध | (inattentive), सुप्त- लपलेली दडलेली ( hidden), मार्मिकता – मर्मज, खुबीदार (touching), वैशाख -एक मराठी महिना (Marathi month), वणवा- जंगलात लागलेली आग (forest fire), कणसदृश्य- कणाएवढे छोटे (micro), वास्तू – राहण्याची जागा (house), मुंडासं -पागोटे (turban), नखशिखान्त -पायाच्या नखापासून शेंडोपर्यंत (complete body), तफावत- (difference), मनस्ताप मनाला येणारी बैचेनी (guilty), औपचारिक -शिष्टाचार (formal), अतोनात – अपरिमित ((infinite), श्रद्धांजली फरक,- अंतर आदरांजली (tribute), क्वचित- केव्हातरी ( rarely) –

Leave a Comment