परभणी जिल्हा माहिती मराठी, इतिहास, वैशिष्ट्ये, तालुके | Parbhani information In Marathi

Parbhani marathi mahiti,Parbhani Jilha Mahiti, Parbhani Information In Marathi,Parbhani District Information, Parbhani pin code maharashtra

परभणी जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – Parbhani Information in Marathi

परभणी जिल्हा

परभणी जिल्ह्यातील ठिकाणाचा उल्लेख पुराणात आहे. याशिवाय जैनपूर (जिंतूर) हे गाव सम्राट अशोकाच्या राज्यात समाविष्ट होते. या भागात प्राचीन काळापासून संस्कृती नांदत असल्याचा उल्लेख आढळतो. परभणी शहराचे प्राचीन नाव प्रभावती होते. हे नाव या शहरातील प्रभावती देवीच्या नावावरुन पडले. पूर्वी परभणी हा जिल्हा निजामाच्या अमलाखाली होता.सन १९७६ मध्ये द्वैभाषिक मुंबई राज्यात परभणीचा समावेश करण्यात आला. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर परभणीचा समावेश महाराष्ट्र राज्यात करण्यात आला.

परभणी जिल्हा संक्षिप्त माहिती

१. भौगोलिक स्थान : परभणी जिल्ह्याच्या उत्तरेला हिंगोली; पूर्वेला नांदेड, दक्षिणेला लातूर, बीड व पश्चिमेला बीड व जालना असे जिल्हे आहेत. या जिल्ह्याच्या उत्तर भागात अजिंठ्याच्या डोंगररांगा पसरलेल्या असून, दक्षिणेस सीमा प्रदेशात बालाघाटच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

२. प्रमुख पिके : परभणी जिल्ह्यातील ज्वारी हे प्रमुख पीक असून, , सोबत कापूस, भुईमूग, उदीड, तूर ही पिके खरिपात घेतली जातात व रब्बी हंगामात करडई, हरभरा व गव्हाचे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रात करडईचे सर्वात जास्त उत्पादन या जिल्ह्यात होते.

३. नद्या व धरणे : गोदावरी ही परभणी जिल्ह्याची प्रमुख नदी आहे. तसेच पूर्णा, दुधना, वैनगंगा, आसना, कयाधू आणि इंद्रायणी यासुद्धा जिल्ह्यातील महत्त्वाच्या नद्या आहेत. परभणी जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या गोदावरी-पूर्णा खोऱ्यात मोडतो. परभणी जिल्ह्यातील कापरा नदीवर जिंतुर तालुक्यात धरण बांधण्यात आले असून, गंगाखेड तालुक्यात मासळी नदीवर धरण बांधण्यात आले आहे.

. उद्योग व व्यवसाय : परभणी जिल्ह्यामध्ये मानवत व लोहगाव येथे सहकारी साखर कारखाना आहे. परभणी जिल्ह्यातील मानवत येथे हातमाग व यंत्रमागावर कापड उत्पादन घेतले जाते. मानवत हे परभणी जिल्ह्यातील कापडाची मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. जिंतूर येथे खतांचा कारखाना आहे व गंगाखेड येथे सिमेंटचे खांब बनविण्याचा कारखाना आहे.

५. दळणवळण : परभणी जिल्ह्यामधून कल्याण-नांदेड हा राष्ट्रीय
महामार्ग क्र. २२२ गेला आहे. मनमाड-काचीगुडा या लोहमार्गावरील परभणी हे महत्त्वाचे स्थानक आहे. तसेच परभणीपरळी हा लोहमार्गदेखील जिल्ह्यातून जातो.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

नागपूर जिल्ह्याची वैशिष्ट्ये

  • परभणी येथे १८ मे १९७२ रोजी मराठवाडा कृषी विद्यापीठाची
    स्थापना करण्यात आली.
  • या जिल्ह्यातील जिंतूर येथील पार्श्वनाथ भगवानांची अधांतरी
    असलेली मूर्ती हे एक आश्चर्य मानले जाते.
  • गंगाखेड येथे संत जनाबाईची समाधी असून येथे भारतातील सर्वात मोठे पाऱ्यापासून तयार करण्यात आलेले शिवलिंग आहे.
  • जिंतूर तालुक्यात रोशा नावाच्या गवतापासून सुगंधित व औषधी तेल काढले जाते.
  • जिंतूर तालुक्यातील चारठाणा हे गाव शयना नदीकाठी असलेल्या दगडी झुलता मनोऱ्यासाठी प्रसिद्ध आहे.
  • पालम तालुक्यात जांभूळबेट हे ठिकाण मोरांसाठी प्रसिद्ध आहे.
  • परभणी तालुक्यात त्रिधारा येथे पूर्णा, दुधना व कापरा या तीन
    नद्यांचा संगम आहे.
  • महाराष्ट्रात करडईचे सर्वात जास्त उत्पादन या जिल्ह्यात होते.
  • परभणी जिल्ह्याचे प्राचीन नाव प्रभावती होते.
  • १८ मे १९७२ रोजी परभणी येथे कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.
  • परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे तालुक्याचे ठिकाण ‘दक्षिण
    काशी’ नावाने ओळखले जाते.
  • परभणी तालुक्यात त्रिधारा क्षेत्र प्रसिद्ध आहे. येथे पूर्णा, दुधना व कापरा या तीन नद्यांचा संगम झालेला आहे .

सांखेकिक परभणी

(अ) भौगोलिक माहिती

१. क्षेत्रफळ=६,५१२ चौ.किमी.
२. जंगलाचे प्रमाण =०.७९ %
३. वनोद्याने =हिमायतबा

(आ) प्रशासकीय माहिती

१. आयुक्तालय= औरंगाबाद विभाग
२. जिल्ह्याचे मुख्यालय= परभणी
३. उपविभाग=०४ (परभणी, गंगाखेड, पाथरी व सेलू)
४. तालुके =०९ (परभणी, जिंतुर, सेलू, पाथ्री,गंगाखेड, पालाम, पूर्णा,सोनपेठ, मानवत)
५. पंचायत समित्या= ०९
६. ग्रामपंचायत= ७०४
७. नगरपालिका =०८
८. पोलीस मुख्यालय =०१जिल्हा पोलीस अधीक्षक
९. पोलीस स्टेशनची संख्या= १६

(इ) लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनुसार)

१. लोकसंख्या =१८,३५,९८२
. साक्षरता =७५.२२%
३. लिंग गुणोत्तर =९५८
४. लोकसंख्येची घनता= २९३

हे पण वाचा>>>>>>>>

उस्मानाबाद जिल्हा माहिती

नांदेड जिल्हा माहिती

लातूर जिल्हा माहिती

जालना जिल्हा माहिती

तुम्हाला परभणी जिल्ह्या संपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे अश्याच माहिती साठी MaharashtraBoardSolutions.Net ला नक्की भेट द्या.

Final Word: आम्हाला आशा आहे की तुम्हाला परभणी जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Parbhani District Information In Marathi तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीला हा लेख नक्की शेअर करा आणि Maharashtra Board Solutions ला भेट द्यायला विसरू नका.



Leave a Comment