लातूर जिल्हा माहिती मराठी, इतिहास, वैशिष्ट्ये, तालुके | Latur information In Marathi

Latur marathi mahiti,Latur Jilha Mahiti, Latur Information In Marathi,Latur District Information, Latur pin code maharashtra

लातूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – Latur Information in Marathi

Latur Information in Marathi
Latur Information in Marathi

लातूर जिल्हा

राष्ट्रकूट राजा अमोघवर्ष पहिला याच्या शिलालेखामध्ये लातूरचा उल्लेख ‘लतल्लुर’ असा करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातील खरूसा (ता. औसा) येथील काही लेणी, अंबेजोगाई येथील लेण्या तसेच व धाराशिव लेण्यातील २-३ लेणी या आद्य राष्ट्रकुटांच्या काळातील आहेत. राष्ट्रकुटांच्या राजवटीनंतर यादव राजवटीने या प्रदेशावर राज्य केले. पुढे या प्रदेशावर आदिलशहा व निजामशाही या शाह्यांच्या अंमल होता. औरंगजेबाने १६८१ मध्ये आदिलशाही नष्ट करून या प्रदेशावर आपली सत्ता प्रस्थापित केली. त्यानंतर भारताला स्वातंत्र्य प्राप्त होईपर्यंत हा प्रदेश निजामाच्या ताब्यात होता.१६ ऑगस्ट १९८२ रोजी उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र लातूर जिल्हा निर्माण करण्यात आला.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

लातूर जिल्हा संक्षिप्त माहिती

१. भौगोलिक स्थानः लातुर जिल्ह्याच्या पूर्वेस व काहीशा आग्नेयास कर्नाटक राज्यातील बिदर जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या उत्तरेस परभणी जिल्हा असून, उत्तरेस व पूर्वेस नांदेड जिल्हा पसरला आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेस व दक्षिणेस उस्मानाबाद जिल्हा असून, बीड जिल्हा वायव्येस पसरला आहे. लातूर जिल्ह्याचा पश्चिम भाग व मध्य भाग बालाघाट डोंगररांगांनी व्यापलेला आहे.

२. प्रमुख पिके : लातूर जिल्ह्यातील ज्वारी हे प्रमुख पीक असून, , जेथे सिंचनाच्या सोयी आहेत, तेथे उसाची लागवड केली जाते. औसा तालुक्यामध्ये द्राक्षाचे पीक घेतले जाते. कापूस, दूध व मध या उत्पादनांसाठी हा जिल्हा प्रसिद्ध आहे.

३. नद्या व धरणे : या जिल्ह्याच्या मांजरा, मण्याड या मुख्य नद्या असून तेरणा, तावरजा, धरणी, लेंडी, तेरणा तीरू या इतर उपनद्या आहेत. या जिल्ह्यात मांजरा, तेरणा, धरणी, तावरजा, तीरू व मन्याड या नद्यांवर धरणे बांधण्यात आली आहेत.

४. उद्योगधंदे व व्यवसाय : लातूर जिल्ह्यात लातूर, निलंगा व
औसा या ठिकाणी औद्योगिक वसाहती असून, उद्गीर येथे दुधाची भुकटी तयार करण्याचा कारखाना आहे. तसेच ऑइल मिल्स (टिना, कीर्ती) व डालमिल हे उद्योगसुद्धा जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्रातील सर्वांत मोठी अडत बाजारपेठ लातूर येथे
आहे. लातूर येथे दिल्लीनंतरचे भारतात दुसऱ्या क्रमांकाचे प्लॉस्टक बूट व चप्पल निर्मितीचे केंद्र आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

(७) दळणवळण : लातूर जिल्ह्यामधून रत्नागिरीह्ननागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. २०४ गेला असून, लातूर शहर मनमाड-सिकंदराबाद या रुंदमापी (ब्रॉडगेज) लोहमार्गाशी जोडण्यात आले असून, लातूर-कुडूवाडी हा लोहमार्ग सुरू झाला आहे. त्यामुळे या शहराला पुणे व मनमाडवरून जोडणारा लोहमार्ग तयार झाला आहे. लातूरजवळ एक विमान धावपट्टीही आहे.

लातूर जिल्ह्याची वैशिष्टये

लातूरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र व चाकूर येथे सीमा सुरक्षा दलाचे(बीएसएफ) प्रशिक्षण केंद्र आहे.

  • लातूर जिल्ह्यातील खरोसा हे गाव इ. स. ५ ते ८ व्या शतकादरम्यानच्या हिंदू व बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे.
  • लातूर जिल्ह्यातील औसा येथील औरंगजेबाने बांधलेली मशीद प्रसिद्ध आहे.
  • औसा तालुक्यात किल्लारी हे गाव आहे. ३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या फार मोठ्या भूकंपामुळे प्रसिद्धीला आले होते.
  • लातूर जिल्ह्यातील देवणी या तालुक्यातील ‘देवणी’ जातीचा बैल प्रसिद्ध आहे.
  • सूर्यफुलाच्या खाद्यतेलाच्या उत्पादनात लातूर भारतात आघाडीवर आहे.
  • ‘वडवळ बेट’ चाकूर तालुक्यात असून, हे बेट औषधी वनस्पतीसाठी प्रसिद्ध आहे.
  • ‘हलती दीपमाळ’ रेणापूर येथे आहे.

सांख्येकीक लातूर

अ) भौगोलिक माहिती

१. क्षेत्रफळ=७,१५७ चौ.किमी

२. जंगलाचे प्रमाण.= ०.०७%

(आ) प्रशासकीय माहिती

१. आयुक्तालय= औरंगाबाद विभाग
२. जिल्ह्याचे मुख्यालय =लातूर
३. उपविभाग =०५ (लातूर, चाकूर,उद्गीर,अहमदपूर व निलंगा)
४. तालुके= १० (लातूर, अहमदपूर,निलंगा, उद्गीर, चाकूर, देवणी, शिरूर-आंतपाळ,रेणापूर जळकोट)
५. पंचायत समित्या=१०
६. ग्रामपंचायत =७८७
७. महानगरपालिका =०१लातूर महानगरपालिका
८. नगरपालिका= ०४
९. नगरपंचायत =०४
१०.पोलिस मुख्यालय =१०जल्हा पोलीस अधीक्षक
११. पोलीस स्टेशनची संख्या= २१

(इ) लोकसंख्या(सन २०११ च्या जनगणनेनुसार)

1. लोकसंख्या =२४,५४,१९६
2. पोलीस मुख्यालय= ०१
3. साक्षरता =७७.२६%
4. लिंग गुणोत्तर =९२४
5. लोकसंख्येची घनता =३४०

हे पण वाचा >>

जालना जिल्हा माहिती

हिंगोली जिल्हा माहिती

बीड जिल्हा माहिती

औरंगाबाद जिल्हा माहिती

तुम्हाला लातूर जिल्ह्या संपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे अश्याच माहिती साठी MaharashtraBoardSolutions.Net ला नक्की भेट द्या.

Final Word: आम्हाला आशा आहे की तुम्हाला लातूर जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Latur District Information In Marathi तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीला हा लेख नक्की शेअर करा आणि Maharashtra Board Solutions ला भेट द्यायला विसरू नका.

Leave a Comment