नाशिक जिल्हा माहिती मराठी, इतिहास, वैशिष्ट्ये, तालुके | Nashik Information In Marathi

Nashik marathi mahiti, Nashik Jilha Mahiti,Nashik Information In Marathi, Nashik District Information, Nashik pin code maharashtra

नाशिक जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – Nashik Information in Marathi .

नाशिक जिल्हा

नाशिक जिल्ह्याचा परिसर रामायणकाळात दंडकारण्य म्हणून ओळखला जात असे. श्रीराम, लक्ष्मण व सीतामाई तनवासात असताना याच परिसरात पंचवटी भागात निवासाला होते, असे मानले जाते. रावणाची बहीण शूर्पणखेचे नाक लक्ष्मणाने कापल्याने या शहराला नाशिक असे नाव पडल्याचे (नाक-नासिका-नाशिक या संगतीने) सांगितले जाते. ‘टॉलेमी’ या ग्रीक व्यापाराने नाशिकचा उल्लेख हे वैभवशाली प्रसिद्ध नगर असल्याचा दावा केला आहे. गोदावरीच्या दोन्ही तीरांवर गंगापूर ते नांदूर मध्यमेश्वर या ठिकाणी पुरातत्त्वज्ञांनी अश्मारने शोधून काढली आहेत. इतिहासकाळात या भागावर मौर्य व सातवाहन घराण्यांची राजसत्ता असल्याचे दाखले इतिहासात आढळतात. नाशिकच्या सौंदर्यावर फिदा झालेल्या मोगलांनी नाशिकचे नाव गुलशनाबाद असे ठेवले होते. पुढे पेशव्यांनी मूळचेच नाशिक असे नामकरण केले. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नाशिक येथे सन १९०४ मध्ये अभिनव भारत या क्रांतिकारक संघटनेची स्थापना करून आपल्या कार्याची सुरुवात याच जिल्ह्यातून केली. नाशिकमधील काळाराम मंदिरात तत्कालीन अस्पृश्यांना प्रवेश मिळावा, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९३० मध्ये ‘मंदिर प्रवेश सत्याग्रह चळवळ नाशिक येथूनच सुरु केली.

नाशिक जिल्हा संक्षिप्त माहिती

१. भौगोलिक स्थान : नाशिक जिल्ह्याच्या उत्तर- -पश्चिमेस गुजरात राज्याची सीमा असून, पूर्वेस जळगाव जिल्हा व दक्षिण-पूर्वेस औरंगाबाद जिल्हा, उत्तरेस धुळे जिल्हा, पश्चिमेस ठाणे जिल्हा व दक्षिणेस अहमदनगर जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेस सह्याद्री, उत्तरेस सेलवारी व ढोलबारी या डोंगररांगा आहेत. या जिल्ह्यात सप्तश्रृंगी व साल्हेर ही जिल्ह्यातील उंच शिखरे आहेत. साल्हेर हे थंड हवेचे ठिकाण तसेच राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

२. प्रमुख पिके : नाशिक जिल्ह्यातील बाजरी हे येथील प्रमुख पीक असून, येथे द्राक्षे, कांदा, ऊस व डाळिंबाचे पीकदेखील मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. निफाड व लासलगाव तालुक्यात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्याचबरोबर तांदूळ, ज्वारी, भुईमूग, कापूस, बाजरी, गहू, हरभरा, रब्बी ज्वारी व ऊस यांचे पीक घेतले जाते. नाशिकची द्राक्षे प्रसिद्ध असून,

प्रामुख्याने सिन्नर, दिंडोरी, निफाड व नाशिक या भागांत द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. जिल्ह्यातून द्राक्षे परदेशात निर्यातही केली जातात.

३.नद्या व धरणे: जिल्ह्यात गोदावरी, गिरणा, मोसम, कादवा, दारणा या मुख्य नद्या, तर मोसम, पांझरा, कादवा, बाणगगा, दारणा या उपनद्या आहेत. या जिल्ह्यात गोदावरी नदीवर गंगापूर असून हे देशातील पहिले मातीचे धरण होय. तसेच गिरणा नदीवरील चणकापूर व नांदगाव धरण तर दारणा नदीवरील दारणा धरण हे जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प आहेत.

४. उद्योग व व्यवसाय : येवला येथे उद्योग सिन्नर येथे तालुक्यात पंचतारांकित औद्योगिक वसाहत व सातपूर, अंबड, मालेगाव, पेठ व मनमाड या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. जिल्ह्यातील शालू, पैठणी साड्या व पितांबर तयार करण्याचा उद्योग चालतो. जिल्ह्यातील मालेगाव हे राज्यातील हातमागयंत्रमाग उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. द्राक्ष हे या भागातील प्रमुख पीक असल्यामुळे द्राक्षावर आधारित ‘वायनरी’ उद्योग (वाइन निर्मिती) व मनुका तयार करण्याचा उद्योग चालतो. नाशिकजवळील एकलहरे येथे औष्णिक विद्युत केंद्र, ओझर येथे मिग विमान निर्मितीचा कारखाना आहे आणि रावळगाव येथे चॉकलेट्स व टॉफिज तयार करण्याचा उद्योग आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

५. दळणवळण : नाशिक जिल्ह्यातून मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ आणि नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ५० गेला आहे. या जिल्ह्यातून मध्य रेल्वेचा मुंबई-कोलकाता लोहमार्ग आणि मनमाड येथून मनमाड-काचीगुडा व मनमाड-दौंड हे लोहमार्ग गेलेले आहेत.

नाशिक जिल्ह्याची वैशिष्ट्ये

  • महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक शहरात आहे.
  • नाशिक येथे महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी आहे.
  • भारत सरकारद्वारा संचालित भारत सिक्युरिटी प्रेस नाशिक येथे असून, येथे चलनी नोटा व टपाल तिकिटे, इंदिरा विकास पत्रे, किसान विकास पत्रे, पोस्टल ऑर्डर्स, पासपोर्ट व टपाल तिकीट आदींची छपाई केली जाते.
  • पोलीस उप अधीक्षक व पोलीस उपनिरीक्षक आदी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी येथे आहे.
  • देवळाली येथे भारतीय लष्कराचा तोफखाना विभागाची छावणी आहे.
  • नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे.
  • मालेगाव येथील साड्या, येवला येथील शालू, पैठण्या व पितांबर आहे. यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
  • देवीच्या साडेतीन पीठांपैकी सप्तश्रृंगी देवी याच जिल्ह्यात आहे
  • गोदावरी व कादवा या नद्यांच्या संगमाजवळ वसलेले व ‘महाराष्ट्राचे भरतपूर’ म्हणून ओळखले जाणारे नांदूर-मध्यमेश्वर नाशिक जिल्ह्यात आहे.
  • भारतात सनदशीर राजकारणाचा पाया घालणारे न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म याच जिल्ह्यातील निफाडचा होय.
  • भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील होय.
  • नाशिक जिल्ह्यातील निफाड व लासलगाव ही ठिकाणे कांदा व लसूण यांच्या उत्पादनाकरिता प्रसिद्ध आहेत.

सांख्यिकीक नाशिक

(अ) भौगोलिक माहिती

१. क्षेत्रफळ=१५,५८२ चौ. किमी

२. जंगलाचे प्रमाण=७.०१%

३. अभयारण्ये=नांदूर-मधमेश्वर

४. वनोद्याने=गंगापूर व सप्तश्रृंगी

(आ)प्रशासकीय माहिती

१. आयुक्तालय=नाशिक विभाग

२. जिल्ह्याचे मुख्यालय=नाशिक

३. उपविभाग =०९ नाशिक,मालेगाव, येवला ,कळवण, दिंडोरी, चांदवड,निफाड, बागलान, ईगतपुरी

४. तालुके=१५ नाशिक, बागलाण(सटाणा), पेठ, मालेगाव, सुरगाणा, सिन्नर, कळवण, देवळाली. दिंडोरी, चांदवड, नांदगाव, निफाड, येवले, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर.

५. पंचायत समित्या=१५

६. ग्रामपंचायत =१३८१

७. महानगरपालिका= ०२ नाशिक व मालेगाव

८. नगरपालिका =०९

९. नगरपंचायत =०६

१०.कटक मंडळ =०१ देवळाली

११. पोलीस मुख्यालय=०२ शहर पोलीस आयुक्त ग्रामीण पोलीस अधीक्षक

१२. पोलीस स्टेशनची संख्या= शहर पोलीस आयुक्तालय(८)ग्रामीण पोलीस अधीक्षक (३६)

(इ) लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनुसार)

१. लोकसंख्या =६१,०७,१८७

२. साक्षरता =८२.३१%

३. लिंग गुणोत्तर =९३१

४. लोकसंख्येची घनता =३९३

हे पण वाचा>>>>>>>>>

नंदुरबार जिल्हा माहिती

जळगाव जिल्हा माहिती

धुळे जिल्हा माहिती

अहमदनगर जिल्हा माहिती

तुम्हाला नाशिक जिल्ह्या संपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे अश्याच माहिती साठी MaharashtraBoardSolutions.Net ला नक्की भेट द्या.

Final Word: आम्हाला आशा आहे की तुम्हाला नाशिक जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Nashik District Information In Marathi तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीला हा लेख नक्की शेअर करा आणि Maharashtra Board Solutions ला भेट द्यायला विसरू नका.

Leave a Comment