औरंगाबाद जिल्हा माहिती मराठी, इतिहास, वैशिष्ट्ये, तालुके | aurangabad Information In Marathi 2024

Aurangabad marathi mahiti, aurangabad Jilha Mahiti, aurangabad Information In Marathi, aurangabad District Information, aurangabad pin code maharashtra

औरंगाबाद जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – Aurangabad Information in Marathi

Aurangabad Information in Marathi
Aurangabad Information in Marathi

औरंगाबाद जिल्हा

औरंगाबाद हा शब्द पर्शियन भाषेतील असून, त्याचा अर्थशाहीगादीने वसवलेले शहर असा होतो. या शहराला औरंगाबाद हे नाव मुघल बादशाह औरंगजेब यांच्या नावावरून पडले. प्राचीन काळात आशिया व युरोपला जोडणारा महामार्ग सिल्क रूट हा औरंगाबादमधून जात असे. भरजरी कपडालता, मणी लावलेले व नक्षीकाम केलेले कापड हे औरंगाबाद शहराजवळील पैठणमधून ग्रीस, रोम व इजिप्तला निर्यात होत असल्याचा उल्लेख या जिल्ह्याच्या इतिहासात आढळतो. या भागावर सातवाहन, वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकूटसारख्या राजघराण्यांनी राज्य करून औरंगाबाद शहर आर्थिक व सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध केले. गौतमीपुत्र सातकर्णीनंतर सत्तेत आलेल्या पुलुगामाने पैठण येथेच आपली राजधानी केली होती

औरंगाबाद जिल्हा संक्षिप्त – माहिती

१. भौगोलिक स्थान : औरंगाबाद जिल्ह्याच्या उत्तरेस जळगाव
जिल्हा असून, पूर्वेस जालना जिल्हा, दक्षिणेस गोदावरी नदीच्या पलीकडे बीड व पश्चिमेस अहमदनगर व नाशिक जिल्हा आहे. औरंगाबाद जिल्हाचा मध्य व उत्तर भाग डोंगराळ असून, अजंठा
सातमाळ्याच्या रांगांनी बनलेला आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

२. प्रमुख पिके : औरंगाबाद जिल्ह्यातील बाजरी हे प्रमुख पीक
ज्या ठिकाणी सिंचनाच्या सोयी आहेत , तेथे उसाचे पीक
घेतले जाते. याशिवाय कापूस, मूग, तूर, उडीद, सूर्यफूल व
सोयाबीन ही पिकेदेखील घेतली जातात, गहू, हरभरा ,
ज्वारी व सूर्यफूल ही पिके रब्बी हंगामात घेतली जातात .
दौलताबाद येथील पेरू व सीताफळे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत

३. नद्या व धरणे : औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गोदावरी , पूर्णा व
खेळणा प्रमुख नद्या असून , शिवना , कौम , केळणा , बुधना , अंजना , खेळणा , गिरजा , खाम व वाघूर या औरंगाबाद जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत . या जिल्ह्यात गोदावरी नदीवर पैठणजवळ राज्यातील सर्वात मोठा जायकवाडी प्रकल्प आहे . तसेच शिवना नदीवर कन्नड तालुक्यात गडदगड येथे व सिल्लोड तालुक्यात खेळणा नदीवर धरण बांधण्यात आले आहे .

४. उद्योग व व्यवसाय : मुंबई , पुण्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यात
औद्योगिक उद्योग मोठ्या प्रमाणावरआहेत . औरंगाबाद
चिखलठाणा , वाळूज , चितेगाव व पैठण येथे या औद्योगिक वसाहती आहेत . तसेच सोयगाव व खुल्दाबाद येथे लघू औद्योगिक क्षेत्र आहे .

१. वाळूज येथे बजाज ऑटो स्कूटर्स कंपनीचा कारखाना ,
जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी , युनिव्हर्सल लगेजव कोलगेट कंपनीचा कारखाना आहे .

Telegram group मध्ये जॉईन व्हा

२. चितेगाव येथे व्हिडिओकॉन कंपनीचा टी.व्ही., वॉशिंग मशीन,
रेफ्रिजरेटर तयार करण्याचा कारखाना आहे.

३.पैठण येथे हातमाग व यंत्रमागावर रेशीम व जरीचे नक्षीकाम व नजाकतदार पैठणी साडी, हिमरू शाली, महारू, किनखांबी पैठणी तयार करण्याचा उद्योग चालतो. रेशमी पैठण्यांबरोबर मंदिल, तुक्की, दसन्नी व गुजराती फेट्यांसाठीही पैठण प्रसिद्ध आहे. पैठण येथील पैठणी साडी देशातच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध आहे.

५. दळणवळण : औरंगाबाद जिल्ह्यामधून धुळे ते सोलापूर हा
राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ गेला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून मनमाड ते नांदेड असा लोहमार्ग गेला आहे. पुढे हा लोहमार्ग नांदेडवरून दक्षिणेकडे सिकंदराबादला जोडला गेला आहे. औरंगाबादजवळ चिखलठाणा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

औरंगाबाद जिल्ह्याची वैशिष्ट्ये

 • औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठअसून याची स्थापना दिनांक २३ ऑगस्ट, १९५८ रोजी करण्यात आली.
 • पाणी व्यवस्थापन व जमिनीच्या वापराबद्दल माहिती देणारी वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट (वाल्मी) ही राज्यस्तरीय संस्था औरंगाबाद येथे आहे.
 • औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे.
 • औरंगाबाद येथे फळ संशोधन केंद्र असून, वैजापूर येथे ऊस संशोधन केंद्र आहे.
 • औरंगाबाद येथील ‘बीबी का मकबरा’ दख्खनचा ताजमहल म्हणून प्रसिद्ध आहे. येथील १७ व्या शतकातील तयार करण्यात आलेली पाणचक्की ही अभियांत्रिकी क्षेत्रातील एक आश्चर्य मानले जाते.
 • देवगिरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या किल्ल्याची निर्मिती यादव राजांनी केली. महंमद तुघलकाने आपली राजधानी दिल्लीहून देवगिरीस आणून देवगिरीचे नाव ‘दौलताबाद’ असे ठेवले. एकनाथ महाराजांचे गुरू जनार्दन स्वामी यांची समाधी या किल्ल्यावर आहे.
 • खुल्दाबाद येथे औरंगजेब व त्याचे गुरू यांच्या कबरी येथे आहेत.
 • औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ येथील कैलास लेणी जगभर प्रसिद्ध आहेत. हे लेणे राष्ट्रकूट राजा पहिला कृष्ण याने निर्माण केले. येथेच घृष्णेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग प्रसिद्ध आहे.
 • औरंगाबादपासून ११० किमी उत्तरेस जगप्रसिद्ध अजिंठ्याच्या लेण्या असून, या लेण्यांचा शोध एप्रिल १८१९ मध्ये स्मिथ या इंग्रज अधिकाऱ्याने लावला.
 • गोदावरीच्या तीरावरील पैठण हे धार्मिक व ऐतिहासिक ठिकाण म्हणून प्रसिद्ध असून, हे शहर दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी गोदावरी नदीवर जायकवाडी हे फार मोठे धरण
  व या धरणाच्या पायथ्याशी संत ज्ञानेश्वरांचे जन्मस्थान आहे.
  पैठण येथे संत एकनाथ महाराजांचे मंदिर व समाधी आहे.
 • पैठण तालुक्यातील आपेगाव हे संत ज्ञानेश्वरांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी साधारणत: इ.स.पूर्व २५०० पासून मानवी वसाहत असल्याचे उत्खननात सिद्ध झाले आहे.
 • औरंगाबाद हे बावन्न दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखले जात असून, ‘हिमरू’ शालीकरिता प्रसिद्ध आहे.
 • म्हैसमाळ हे या जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे.

सांख्यिकीक औरंगाबाद – सर्व माहिती

(अ) भौगोलिक माहिती
१. क्षेत्रफळ =१०,१०७चौ.किमी.
२. जंगलाचे प्रमाण =९.१५%
३. अभयारण्ये =०२ जायकवाडीपक्षी अभयारण्य
व गौताळा-औटरमघाट
अभयारण्य
४. राष्ट्रीय उद्याने =नाही
५.व्याघ्र प्रकल्प=नाही
६. वनोद्याने =अजिंठा व जायकवाडी

आ) प्रशासकीय माहिती

१. आयुक्तालय=औरंगाबाद विभाग
२. जिल्ह्याचे ठिकाण=औरंगाबाद
३. उपविभाग=०५ (औरंगाबाद, सिल्लोड, पैठण, कन्नड व वैजापूर)
४. तालुके= ०९ (कन्नड, सिल्लोड, पैठण, सोयगाव, खुल्ताबाद, फुलंब्री. वैजापूर, गंगापूर, औरंगाबाद)
५. पंचायत समित्या =०९
६. ग्रामपंचायत =८६१
७. महानगरपालिका= ०१ औरंगाबाद महानगरपालिका
८. नगरपालिका =०६
९. कटकमंडळ =०१
१०. पोलीस आयुक्तालय= ०२ औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालय व जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक
११. पोलीस स्टेशनची संख्या =आयुक्तालय(१२)
जिल्हा ग्रामीण (२४)

( इ) लोकसंख्याविषयी माहिती

१.लोकसंख्या =३७,०१,२८२
२.साक्षरता =७९.०२℅
३.लिंग गुणोत्तर =९२४
४.लोकसंख्येची घनता =३७०

हे पण वाचा >>

अकोला जिल्हा माहिती

बुलढाणा जिल्हा माहिती

यवतमाळ जिल्हा माहिती

वाशिम जिल्हा माहिती

तुम्हाला औरंगाबाद जिल्ह्या संपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे अश्याच माहिती साठी MaharashtraBoardSolutions.Net ला नक्की भेट द्या.

Final Word: आम्हाला आशा आहे की तुम्हाला औरंगाबाद जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Aurangabad District Information In Marathi तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीला हा लेख नक्की शेअर करा आणि Maharashtra Board Solutions ला भेट द्यायला विसरू नका.

Leave a Comment