Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 10. Solutions दंतकथा ( Dantkatha Notes) Textbook Exercise Important Questions and Answers.
Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10: दंतकथा
12th Marathi Guide Prashn uttar Chapter 10: दंतकथा Textbook Questions and Answers.
कृती
कृती- १. (अ) कारणे शोधा व लिहा.
(१) लेखकाला दातांबद्दल अजिबात प्रेम नाही, कारण •••••
उत्तर : लहानपणी त्यांना दात येत असताना त्यांनी घरातल्या माणसांना रडवले होते.
(२) दातदुखीच्या काळात दाते किंवा दातार यांना भेटू नये असे लेखकाला वाटते, कारण ••••••
उत्तर : दातदुखीच्या काळात त्यांची सहनशक्ती खलास झालेली असते व त्यामुळे दातांशी जवळीक दाखवणाऱ्या माणसांना भेटू नये असे वाटते.
(इ) खालील चोकटी पूर्ण करा.
(१) लेखकाच्या मते सहावे महाभूत -••••••••••
उत्तर: -लेखकाच्या मते सहावे महाभूत =दात
(२) लेखकाने दुसऱ्या दाताला दिलेली उपमा – ••••••••
उत्तर : लेखकाने दुसऱ्या दाताला दिलेली उपमा =खलदंत
(३) ऐटीत चालणारा परशा म्हणजे जणू-••••••••••
उत्तर : ऐटीत चालणारा परशा म्हणजे जणू =वनराजच
(४) लेखकाच्या मते जन्मात एकही दात न दुखणारा माणूस
असा असतो -•••••••••••
उत्तर : लेखकाच्या मते जन्मात एकही दात न दुखणारा माणूस –
माणूस असा असतो =कमनशिबी
(५) लेखकाच्या मते कवीने दाताला दिलेली उपमा-•••••••••
उत्तर : लेखकाच्या मते कवीने दाताला दिलेली उपमा=कुंदकळ्या
★ कृती ३. व्याकरण
(अ) खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा.
(१) चार दिवसांनी दात दुखायचा थांबतो.
उत्तर : कर्तरी प्रयोग
(२) सगळे खूष होतात.
उत्तर : कर्तरी प्रयोग
(३) त्याने माझ्या हिरड्यांत इंजेक्शन दिले.
उत्तर :कर्मणी प्रयोग
(४) डॉक्टरांनी लीलया दात उपटला.
उत्तर: कर्मणी प्रयोग
(इ) खालील वाक्यात दडलेला वाकप्रचार शोधा व लिहा.
(१) माणसाला शरण आणताना तृण धरायला एखादी चांगली
जागा असावी, म्हणून दातांची योजना झालेली आहे.
उत्तर : शरण आणणे.
(ई) खालील वाक्याचे कनसातील सुचनेनुसार वाक्यपरिवर्तन करा.
( १ ) परशाने प्रश्न नम्रपणे विचारला नव्हता. (होकारार्थी करा.)
उत्तर :परशाने प्रश्न उर्मटपणे / उद्धटपणे विचारला होता.
(२)शिंव्हाला काय भ्या हाय व्हय कुणाचं ? (विधानार्थी करा.)
उत्तर:शिंव्हाला कुणाचं भय नाही.
(३) तुझ्या अंगात लई हाडं हैत. (उद्गारार्थी करा.)
उत्तर: लई हाडं हैत तुझ्या अंगात !
★कृती-४. स्वमत.
(अ) पाठातील विनोद निर्माण करणारी पाच वाक्ये शोधा. ती तुम्हांला का आवडली ते सकारण लिहा.
उत्तर:लेखक दातांविषयीच्या त्यांच्या भावना करताना म्हणतात त्यांना ‘दातांबद्दल दातांत धरता येईल एवढासुद्धा आदर नाही.’ ‘प्रेयसीच्या दातांत जीव अडकवून तिच्या प्राप्तीसाठी झगडणाऱ्या प्रियकराचे उदाहरण माझ्या ऐकीवात नाही. तसेच दातांविषयीची त्यांची कल्पना सांगताना ते म्हणतात जे न घासल्याबद्दल लहानपणी मार मिळतो, तरुणपणी जे फार घाशीत बसल्याबद्दल वडील माणसांची बोलणी खावी लागतात, व्यवहारात जे कोण केव्हा पाडील याचा भरवसा नसतो, अशी वाक्ये मला आवडली कारण यात लेखकांनी दातांविषयी त्यांच्या मनातील स्थान सांगताना शाब्दिक कोट्या केलेल्या आहेत. साधी सोपी उदाहरणे विनोदी माध्यमातून मांडून ‘दात’ कसे माणसाला त्रासदायक आहेत हे सांगितले आहे.
(आ) लेखकाने दुखऱ्या दाताची तुलना अक्राळविक्राळ राक्षसाशी केलेली आहे, याबाबत तुमचे मत लिहा.
उत्तर:दातदुखी ही सगळ्यात वाईट हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. कारण दात एकदा दुखू लागला की त्याचा ठणका थांबेपर्यंत त्या व्यक्तीला काहीच सुचत नाही. अशा या दातदुखीविषयी आपले विचार मांडताना लेखक म्हणतात. दुखऱ्या दाताला लहानसा स्पर्शसुद्धा खपत नाही. असे वाटते की एखादा लाकूडतोड्या दाताच्या मुळाशी घाव घालीत आहे. यापुढे जाऊन ते म्हणतात अवयव माणसासारखाच असावा. दिवसा अधून मधून सभ्यपणे दुखणारा दात रात्री राक्षसासारखा अक्राळविक्राळ होतो. रात्रीच्या वेळी दातदुखीचा ठणका जास्त जाणवू लागतो व तो सहन होत नाही. म्हणून त्यांना रात्रीच्या वेळी जाणवणारा ठणका अक्राळविक्राळ राक्षसासारखा भयंकर वाटतो.
(इ) लेखकाच्या दातदुखीबाबत शेजाऱ्यांनी दिलेल्या
प्रतिक्रियांच्या संदर्भात एक छोटे टिपण तयार करा.
उत्तर : लेखकांच्या दातदुखीच्या काळात रात्रभर लेखक झोपत नाहीत व त्यांच्या ओरडण्याने आळीतील लोकांनाही झोप मिळत नाही. रात्री आळीतील लोक आळीपाळीने त्यांच्या घरात डोकावून, ‘फक्त दातदुखीच ना?’ असा सवाल करतात. लेखकांना दातदुखी सहन होत नाही व त्यांचा ओरडण्याचा आवाज खूप मोठा असतो. त्यांना या काळात दाते, दातार यासारख्या दातांशी संबंध असणाऱ्या आडनावाच्या लोकांनी आलेले आवडत नाही. पण नेमके याच काळात दाते त्यांना भेटायला नेहमी येतात.
त्यांच्या विव्हळण्याने शेजारीपाजारी गोळा होतात आणि त्यांच्या दाताच्या अध्यक्षतेखाली दातदुखी, ती का होते, टाळावी कशी, झाल्यावर कोणते उपचार करावेत यावर परिसंवाद होतो. दातदुखीवर उपचार लेखकांना व त्यांच्या पत्नीला पाठ झाले असल्याने बऱ्याच उपचारानंतर कोणत्यातरी उपचाराने दातदुखी थांबते व प्रत्येकाला तुम्ही दिलेल्या उपायानेच गुण आल्याची कबुली देऊन लेखक मोकळे होतात. अर्थात यातून आळीतील लोकांचे लेखकावरील प्रेमच दिसून येते. म्हणून ते जातीने चौकशी करायला लेखकांकडे येत असतात.
★कृती ५ अभिव्यक्ती.
(अ) प्रस्तुत पाठ तुम्हांला आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहा.
उत्तर :लेखक वसंत सबनीस यांनी ‘दंतकथा’ हा विनोदी ललित लेख लिहिलेला आहे. ‘दात दुखणे’ हा विचार घेऊन त्यांनी अख्खी एक दंतकथाच लिहिली आहे. दातासारख्या एका छोट्या विषयावर विनोदी लेख लिहिता येईल याचा आपण विचारही करू शकत नाही. त्यांच्या लेखणीतून त्यांचा मराठी भाषेचा अभ्यास, मराठी , मराठी भाषेत दातांबद्दल मंगल भावना व्यक्त झाली नाही. दात हाशब्दांची योग्य पकड व त्यांचा योग्य वापर दिसून येतो. विविध म्हणी, वाक्ये, मौखिक साहित्याचा वापर त्यांनी पाठात केलेला दिसतो. ‘दात’ हाच अवयव दोनदा पाठ उगवतो
सर्वात वेगळा, महत्त्वाचा अवयव असून तो परशासारख्या पहेलवानालासुद्धा चारी मुंड्या चीत करायला लावतो व स्वतः लेखकांनी दातदुखीचे घेतलेले अनुभव त्यावर चाळीतल्या लोकांचे सल्ले या सर्वांची गुंफण लेखकाने खूप छान या पाठात केली आहे. व त्यामुळे हा लेख वाचनीय झाला आहे. म्हणून मला हा आवडला आहे.
प्र. २. कारणे शोधा व लिहा.
(१) मानवी देहाची रचना पूर्ण केल्यानंतर परमेश्वराला सहा-सात महिन्यांनी दाताची कल्पना सुचली असावी कारण …
उत्तर : इतर सर्व अवयव एकदम फुटत असताना दातच तेवढे एखादया सभेच्या मुख्य पाहुण्यासारखे मागाहून का यावेत ?
(२) लेखक म्हणतात, ‘आता मी दिसेल त्याला मुळीच चावत नाही’, कारण ..
उत्तर : चावल्याची हौस अनेकदा त्यांनी स्वतःचीच मनगटे चावून चावून भागली आहे.
प्र. ३. स्वमत
★लेखक दाताला सहावे महाभूत म्हणतात त्याविषयी तुमचे विचार लिहा.
उत्तर : मानवी देह हा पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पाच मूल तत्त्वांनी बनलेला आहे असे म्हटले जाते. लेखकाच्या मते आपण कोणीच यातील तथ्य जाणत नाही. आपण कोणीच खरंच शरीर या तत्त्वांनी बनले आहे का? हे बघितलेले नाही. पण ज्यांना कोणाला, ज्ञानी व्यक्तींना याचा उलगडा झाला त्यांना ‘दात’ हे सहावे महाभूत दिसले नाही का? असे ते विनोदाने म्हणतात कारण दात हाच अवयव माणसाच्या जन्मानंतर सात-आठ महिन्यानंतर येऊ लागतो. बाकी सर्व अवयव आपल्या जन्मापूर्वीच बनलेले असतात. तसेच बाकी कुठले अवयव निर्माण होताना आपल्याला त्याची जाणीव झालेली नसते पण दात येतांना खूप त्रास होतो. तसेच दात हा एकच अवयव तुटल्यानंतरही पुन्हा उगवतो. कारण माणसाला दात दोनदा येतात. दात हा शरीरातील महत्त्वाचा अवयवही आहे. ते त्रास दिल्याशिवाय येत नाहीत. ते येताना ताप होतो व ते गेल्यावरही पश्चात्ताप होतो. कारण दाताशिवाय कोणतेही पदार्थ चावून खाता येत नाहीत. मग असे हे ‘दात’ हा शरीरातील इतर अवयवांपेक्षा वेगळे वैशिष्ट्य असलेला अवयव आहे म्हणूनच लेखकांना तो सहावे महाभूत वाटत असेल.
(आ ) लेखकांनी कथेला ‘दंतकथा’ हे नाव देण्यामागील
लेखकाचा विचार तुमच्या शब्दांत वर्णन करा.
उत्तर: लेखक वसंत सबनीस हे एक विनोदी लेखक आहेत. त्यांनी आपल्या ‘दंतकथा’ या लेखात ‘दात’ या माणसाच्या अवयवावर विनोदी कोट्या केल्या आहेत. दात हा अवयव लेखकांच्या मते अवयवांपेक्षा वेगळा आहे. कारण तो सर्व अवयव पूर्ण आल्यानंतर सावकाश सात-आठ महिन्यांनी उगवतो. ते एकदा पडून पुन्हा येतात. तसेच ते येताना ताप होतो व ते गेल्यावर पश्चात्ताप होतो. एकूणच ‘दात’ हा सामान्य अवयव नाही असे लेखकांना वाटते तसेच साधारणपणे प्रत्येकाला आयुष्यात दातदुखी अनुभवायला मिळते व दातदुखीच्या वेदना असहय असल्याने ब्रम्हांड आठवते.
स्वतःला वनराज समजणारा परशासारखा पहेलवानसुद्धा दात दुखू लागल्यानंतर त्याची अवस्था वाईट होते. लेखकांना तर दातदुखी सहनच होत नाही. ते अख्खी चाळ डोक्यावर घेतात. दातदुखीमुळे माणसाची अवस्था कशी दयनीय होते याचे वर्णन करणारा हा विनोदी लेख असल्यामुळे लेखकांनी या कथेचे नाव ‘दंतकथा’ असे ठेवले असावे.
कृतिपत्रिका – २
प्र. १. खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती सोडवा.
(१) लेखकांविषयीचा लोकापवाद – ••••••••••••
उत्तर : लेखकांच्या दातदुखीच्या काळात सबंध आळीला रात्रभर झोप मिळत नाही.
(२) दातदुखीच्या काळात लेखकांच्या चेहऱ्यावरील भाव-••••••••
उत्तर :कुणीतरी नुकतीच थोबाडीत मारल्याचा भाव
प्र. २. खालील चौकटी पूर्ण करा.
(१) दात हा अवयव अशाच माणसांसारखा असावा•••••••••
उत्तर : दिवसा सभ्य दिसणारी माणसे रात्री आपल्या खऱ्या रूपात फिरतात तशा माणसांसारखा.
(२) दातांत व यांच्यात साम्य असते•••••••••••••
उत्तर : चोरात
उतारा: असे म्हणतात, की दिवसा सभ्य दिसणारी .मी फारच * मोठ्याने ओरडत होतो. (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ४५)
प्र. ३. स्वमत
(अ) लेखकांच्या दातदुखीची तुम्हांला जाणवलेली वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर: लेखकांना जोपर्यंत दातदुखी झाली नव्हती तोपर्यंत ते दात दुखणाऱ्या लोकांना पाहून त्यांच्यावर हसत असत. त्यांनी दातदुखीमुळे एका पेहेलवानासारख्या सिंहाला बकरी झालेले पाहिले आहे. त्यांची घमेंड दूर झालेली पाहिली आहे. पण काही काळानंतर जेव्हा त्यांना दातदुखीचा सामना करावा लागला तेव्हा त्यांना ब्रम्हांड आठवले. ज्यांची ज्यांची त्यांनी दातदुखीमुळे अवहेलना केली होती त्या सर्व माणसांची त्यांनी त्यांच्या दातांसकट माफी मागितली. त्यांना वाटू लागले दाताला मूळ नाही तर झाडांसारख्या मुळ्या असतात ज्या सर्वत्र हिरड्यांत पसरलेल्या असतात. दात हा दिवसापेक्षा रात्री अधिक ठणकू लागतो. त्याक्षणी त्यांना संसार, सुंदरी काही जाणवत नाही.
दातदुखीच्या काळात त्यांना दातदुखी सहन न झाल्याने ते जोरात ओरडतात व त्यामुळे अख्ख्या आळीतील लोकांना झोप येत नाही ते दोन्ही हातांत गाल धरून एका कोपऱ्यात बसून राहतात व त्यांच्या बायकोच्या मते लहान मुलासारखे थैमान घालतात. या काळात दाते, दातार यांसारख्या दातांशी संबंधित आडनावे असलेल्या माणसांनादेखील भेटू नये असे त्यांना वाटते. शेजारी पाजारी येऊन त्यावर वेगवेगळे उपाय सांगतात. त्यातील काही उपाय त्यांना पाठ झाले आहेत. काही उपाय केल्यानंतर कधीतरी दातदुखी थांबते व प्रत्येक शेजारी आपल्या उपायानेच ती थांबली याची पुष्टी लेखकांकडून करून घेतात. ही लेखकांच्या दातदुखीची वैशिष्ट्ये आहेत.
(आ) लेखकांना दंतवैदयाकडे गेल्यावर आलेले अनुभव तुमच्या शब्दांत वर्णन करा.
उत्तर : लेखकांना दातदुखीने ब्रम्हांड आठवते. दातदुखीसारखे, त्रासदायक दुसरे दुखणे नाही. म्हणून लेखक याचा कायमचा निकाल लावायचा ठरवतात. अनेकांचा सल्ला घेऊन अनेक दंतवैदयांचे चेहरे पाहून त्यातल्या त्यात बऱ्यापैकी दंतवैदय ते गाठतात. दात काढायलाही पैसे दयावे लागतात याचे लेखकांना वाईट वाटले. दंतवैदयाची खुर्ची, दात उपटण्याची क्रिया या सर्व गोष्टींबद्दल त्यांच्या मनात भीती होती. पण प्रत्यक्षात दंतवैदयांनी लेखकांच्या हिरड्यांत इंजेक्शन दिले व इतका लीलया दात उपटला की लेखक आश्चर्यचकित झाले. दात उपटण्याची क्रिया इतकी सोपी असेल असे त्यांना वाटले नव्हते. ‘दात उपटून हातात ठेवीन’, ‘दात घशात घालीन’ अशा शक्ती प्रदर्शन करणाऱ्या धमक्यांना काहीच अर्थ नाही. असे त्यांना वाटू लागले. दंतवैदयांनी उपटलेला दात बघून हाच तो खलदंत, नतद्रष्ट याला शासन दिले
पाहिजे असे त्यांना वाटले. पुन्हा ठणका लागणार नाही. पुन्हा दातात बोळे धरावे लागणार नाहीत व पुन्हा बायकोचा उपदेश ऐकावा लागणार नाही या विचारांनी ते आनंदी झाले व तो दात दंतवैदयालाच अर्पण करून घरी आले. दारातूनच ओरडून शेजाऱ्यांना सांगितले की, “तो तुम्हांला जागवणारा दात गेला. यापुढे दंतसप्ताह नाही. “
लेखक परिचय:
लेखक वसंत सबनीस यांचे मूळ नाव रघुनाथ दामोदर सबनीस वसंत सबनीस विनोदी लेखन करणाऱ्यांच्या पंगतीतील एक अग्रगण्य नाव. त्यांचे ‘चिल्लरखुर्दा’, ‘भारूड’, ‘मिरवणूक’, ‘पंगत’, ‘आमची मेली पुरुषाची जात’ हे प्रसिद्ध लेखसंग्रह आहेत. ‘एकटा जीव सदाशिव’, ‘सोंगाड्या’ हे | त्यांचे दादा कोंडके निर्मित चित्रपट प्रसिद्ध आहेत. तसेच ‘अशी ही बनवाबनवी’, ‘एकापेक्षा एक’, ‘गंमत-जंमत’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी’ इत्यादी गाजलेल्या चित्रपटांच्या कथा-पटकथा या सबनीसांनीच लिहिलेल्या आहेत.
‘दंतकथा’ हा विनोदी ललित लेख त्यांच्या ‘सबनिसी’ या पुस्तकातून घेतला आहे. या लेखात ‘दातदुखी’ या असह्य वेदनेचे वर्णन लेखकाने नर्मविनोदी शैलीत मार्मिकपणे टिपले आहे.
पाठ परिचय:
मानवी देह जर पंचमहाभूतांचा बनलेला आहे तर लेखकाच्या मते मानवी देहातले सहावे भूत ज्याला सामान्यांच्या भाषेत ‘दात’ असे म्हणतात ते होय. दात ही परमेश्वराने मारून ठेवलेली मेख आहे असेही त्यांना वाटते कारण देहाची सर्व रचना परिपूर्ण झाल्यानंतर दातच तेवढे सभेच्या मुख्य पाहुण्यासारखे मागाहून येतात. शरीरातील कोणताही अवयव गळून पडला तर तो अवयव पुन्हा येत नाही. पण दात दोनदोनदा उगवतात. दुसरा कुठलाही अवयव उगवताना त्रास होत नाही. पण दात उगवताना त्रास होतो. ते येताना ताप आणि गेल्यावर पश्चात्ताप होतो. लेखकांना तर दातांबद्दल मुळीच प्रेम नाही. कारण लहानपणी त्यांना दात येत असताना त्यांनी घरातल्यांना रडवले होते. त्यांना दाताबद्दल दातात धरता येईल एवढासुद्धा आदर नाही व त्यांच्याप्रमाणेच मराठी भाषेलाही दातांबद्दल मंगल भावना नाही. कारण मराठीत दातांशी निगडित ज्या म्हणी व शब्दप्रयोग आहेत. त्या दारिद्र्य, भिकारपणा, असभ्यपणा यांचे प्रत्यंतर घडवणाऱ्या आहेत. दातांविषयीची लेखकाची कल्पना म्हणजे जे लहानपणी घासत
बसल्याबद्दल वडील माणसांची बोलणी खावी लागतात, व्यवहारात जे कोण केव्हा पाडील याचा भरवसा नसतो आणि पाडतात ते दात.
जे दंतवैद्याकडे जायला भाग दातदुखीबद्दल बोलताना लेखक परशा पहेलवानाचे उदाहरण देतात. परशा पहेलवान म्हणजे वनराजच तो स्वत:ला ‘शिंव्ह’ म्हणायचा असा हा सिंहासारखा उग्र व बलदंड परशा एके दिवशी केविलवाणा चेहरा करून बसलेला दिसल्यावर लेखकाला कळले की तो दातदुखीने हैराण आहे. लेखकाला त्यावेळी परशाचे हसू आले. पण काही काळानंतर जेव्हा लेखकांना दातदुखीचा अनुभव घेता आला तेव्हा मात्र त्यांना ब्रम्हांड पाहण्याचा योग आला. त्यावेळी त्यांनी सर्व माणसांची ज्यांची त्यांनी अवहेलना केली होती. त्यांच्या दात व दाढांसकट मनातल्या मनात क्षमा मागितली तेव्हा त्यांना वाटू लागले. दाताला झाडांसारख्या मुळ्या असतात ज्या जबड्यात सर्वत्र पसरलेल्या असतात. कारण त्यांचे सर्वच दात त्यांच्या दातदुखीने ठणकत होते. त्यांना दातात व चोरांत साम्य वाटते. कारण दोघेही रात्रीच गडबड करतात.
लेखक दात दुखण्याने आध्यात्मिक चिंतनही करतात. त्यांना दात हेच सत्य आहे व बाकी सर्व मिथ्या आहे असेही वाटते. शेंगदाणे दगडासारखे बेचव लागतात. बायको व मुले केवळ भास वाटतात. एखादी सुंदरी डोळ्यांना जाणवतच नाही. लेखकांच्या दातदुखीच्या काळात संबंध आळीला रात्रभर झोप मिळत नाही. या काळात ते फारच मोठ्याने ओरडत असतात. दातदुखीच्या काळात त्यांची सहनशक्ती पार खलास झालेली असते. दाते किंवा दातार ह्या दातांशी जवळीक दाखवणाऱ्या माणसांनाही भेटू नये असे त्यांना वाटते.
दातदुखीच्या काळात शेजारीपाजारी गोळा होतात व वेगवेगळे उपचार सांगतात. त्यातील काही उपचार त्यांना व त्यांच्या पत्नीला पाठ झाले आहेत. अनेक उपचार केल्यानंतर कधीतरी दातदुखी थांबते व प्रत्येकाला त्यांच्या उपचारानेच ती थांबली असल्याची कबुली दयावी लागते. या सगळ्याला कंटाळून शेवटी त्यांनी हा प्रश्न कायमचा सोडवण्याचा निश्चय केला. दंतवैद्याकडे जाऊन दात काढून घेतल्यावर ‘दात उपटणे’ एवढे सोपे असते हे त्यांना जाणवले व ते आनंदाने घरी आले.
कठीण शब्द
मेख – न सुटणारे कोडे, गोम (mystery),पश्चात्ताप- उपरती (repentance, remerse), उपद्रव- त्रास (trouble, annoyance), मंगल शुभ (auspicious), दारिद्र्य -गरीबी (poverty), असभ्य – शिष्टाचार न पाळणारा, अशिष्ट (mannerless), अवहेलना-निंदा (contempt, disregard), उर्मट- उद्धट, फाजील (arrogant), विकट – भयंकर (terrible), घमेंड – गर्व (arogance), दणका – ठोसा, जोराचा फटका (Bump), मिथ्या – खोटे (false), निष्कर्ष – अनुमान (conclusion), कमनशिबी – कपाळकरंटा, वाईट नशीब असलेला (unfortunate), funct दगलबाज (traitor), सोशिकपणा सहनशीलपणा (patience), परिसंवाद एका विषयावर अनेकांचे विचार मांडणे (seminar), विव्हळणे कण्हणे (to scream), दंतवैदय – दातांचे बहुमत (majority), कुंदकळ्या-मिटलेल्या कळ्या – डॉक्टर (dentist), मतैक्य नतद्रष्ट (buds). – – खाष्ट, दृष्ट
वाक्प्रचार:
हीनदीन अवस्था होणे – वाईट अवस्था होणे.
चारीमुंड्या चीत होणे – पराभूत होणे.
पाक पशार होणे – पळून जाणे.
नक्षा उतरणे -अहंपणा उतरणे.
शंख करणे -आरडाओरड करणे.
खल करणे -कट करणे.
कोटी करणे -विनोद करणे.
कबुली देणे -मान्य करणे.
फितूर होणे – दगाबाजी करणे.
विरुदद्याथी शब्द :
★असभ्य x सभ्य
★मंगल x अमंगल
★मतैक्य × मतभेद
★मिथ्या × सत्य
★आधार x निराधार
★दारिद्र्य x श्रीमंती
टिपा:
••पंचमहाभूते – पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ही पाच मूलतत्त्वे.
••दंतकथा – कल्पित कथा, दाताशी संबंधित कथा.