उस्मानाबाद जिल्हा माहिती मराठी, इतिहास, वैशिष्ट्ये, तालुके | osmanabad information In Marathi

osmanabad marathi mahiti,osmanabad Jilha Mahiti, osmanabad Information In Marathi,Latur District Information, osmanabad pin code maharashtra

उस्मानाबाद जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – osmanabad Information in Marathi

उस्मानाबाद जिल्हा

उस्मानाबाद जिल्ह्याचे मूळ नाव धाराशिव’ किंवा ‘धारापूर’ असे होते. इ.स. १९१० मध्ये मीर-उस्मान अली या नावाच्या निझामाने या शहरास स्वत:चे नाव देऊन ‘उस्मानाबाद’ असे नामकरण केले. या भागावर मौर्य, सातवाहन, राष्ट्रकूट व यादव घराण्यांची सत्ता असल्याचे दाखले इतिहासात आढळतात. प्राचीन पेरिप्लसच्या पुस्तकात या तेर गावाचा उल्लेख ‘तगर’ म्हणून करण्यात आला आहे. टॉलेमीनेही आपल्या पुस्तकात या ठिकाणाचा उल्लेख तगर हे मोठे व्यापारी केंद्र असल्याचा केला आहे. प्राचीन काळी तगर ते प्रतिष्ठान व भरूकच्छ असा व्यापारी मार्ग होता. मध्ययुगीन काळात उस्मानाबाद जिल्ह्याच्या काही भागांवर दिल्लीचे सुलतान, बहामनी, निजामशाह व आदिलशाह यांनी राज्य केले. स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळापर्यंत हा भाग निजामाच्या अमलात होता.

उस्मानाबाद जिल्हा संक्षिप्त =माहिती

. भौगोलिक स्थान : आग्नेय महाराष्ट्रात असणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या उत्तरेला बीड, पूर्वेस लातूर, आग्नेयास व दक्षिणेस बिदर व गुलबर्गा (कर्नाटक), नैऋत्येस व पश्चिमेस सोलापूर व वायव्येस अहमदनगर हे जिल्हे आहेत. या जिल्ह्याचा काही भाग बालाघाटच्या पठारी प्रदेशात मोडतो.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

. उपविभाग व तालुके : उस्मानाबाद जिल्ह्यात भूम, उस्मानाबाद, कळंब व उमरगा असे एकूण चार उपविभाग असून परांडा, भूम, उस्मानाबाद, तुळजापूर, कळंब, उमरगा, वाशी व लोहारा असे > आठ तालुके आहेत.

. प्रमुख पिके : या जिल्ह्यातील कापूस व ज्वारी हे महत्त्वाचे पीक आहे. या जिल्ह्यात रब्बी हंगामात घेतली जाणारी ज्वारी (शाळू) प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात तांदूळ, ज्वारी, भुईमूग, उडीद, तूर व रब्बी हंगामात गहू, हरभरा आणि उसाचे उत्पादन घेतले जाते. उस्मानाबादमध्ये जिरायती पिकाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे.

. प्रमुख नद्या : या जिल्ह्यातील तेरणा, सिना आणि बोरी या मुख्य नद्या असून, बाणगंगा, बेणीतुरा, बोरी, हरणी, भोगावती, उल्पा, चांदणी, खैरी व बाणगंगा या उपनद्या वाहतात. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तेरणा नदीवरील तेर प्रकल्प वाटेफळ येथे रामगंगा व बाणगंगा ही धरणे आहेत. चांदणी व खासापूर येथील धरणे, बेनिथोरा, जकेनूर, निम्न तेरणा व तुरोरा ही धरणे आहेत.

. उद्योग व व्यवसाय : या जिल्ह्यात उस्मानाबाद, भूम व कळंब या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. ढोकी, तामलवाडी येथे सूतगिरणी, दूध शीतकरण प्रकल्प आहे. तेरखेड्याचा फटाक्यांचा
पारंपरिक उद्योगही फार प्रसिद्ध आहे. येडशी येथे ३०० एकरांवर टाटा इंटरनॅशनल कंपनीचा लेदर पार्क आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

. दळणवळण : या जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र. २११, राष्ट्रीय महामार्ग क्र. २०४ व राष्ट्रीय महामार्ग क्र. ९ गेलेला आहे. उस्मानाबाद शहर मनमाड-सिकंदराबाद या रुंदमापी (ब्रॉडगेज) लोहमार्गाशी जोडण्यात आले असून, लातूर-कुडूवाडी हा लोहमार्गही जिल्ह्यातून जातो.

उस्मानाबाद जिल्ह्याची वैशिष्ट्ये

  • तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे खंडोबाचे मंदिर आहे.
  • १६ ऑगस्ट, १९८२ रोजी उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र लातूर जिल्हा अस्तित्वात आला.
  • ‘तुळजापूर’ हे तुळजाभवानीचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. सुप्रसिद्ध अशी विजापूर येथील ‘मुलूखमैदान’ ही तोफ मूळची परांडा या उस्मानाबाद जिल्ह्यातील होती असे म्हटले जाते.
  • भूम तालुक्यातील कुंथलगिरी येथे जैन मुनी शांतिसागर यांची समाधी आहे.
  • कळंब हे तालुक्याचे ठिकाण मांजरा नदीकाठी वसलेले असून सय्यद जाफरअली तहसीलदार यांचा दर्गा या ठिकाणी आहे.
  • येडशी-रामलिंग मंदिर या प्रदेशाला रामलिंग अभयारण्य म्हणून घोषित केले आहे.

सांखेकिक उस्मानाबाद

(अ) भौगोलिक माहिती

१. क्षेत्रफळ=७,५६९ चौ. किमी.
. जंगलाचे प्रमाण=०.९५ %
३. अभयारण्ये =येडशिराम अभयारण्य

  (आ)प्रशासकीय माहिती

. आयुक्तालय=औरंगाबाद विभाग
. जिल्ह्याचे मुख्यालय= उस्मानाबाद
. उपविभाग=०४ (भूम, उस्मानाबाद, कळंब व उमरगा)
. तालुके =०८ (परांडा,भूम, उस्मानाबाद,तुळजापूर, कळंब, उमरगा,वाशी, लोहारा.)
५. पंचायत समित्या=०८
६. ग्रामपंचायत =६२२
. नगरपालिका= ०
. पोलीस मुख्यालय =०१ जिल्हा पोलीस अधीक्षक
९. पोलीस स्टेशनची संख्या= १७

(इ) लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनुसार) 

१. लोकसंख्या =१६,३८,८१८
. साक्षरता= ६८.५९%
. लिंग गुणोत्तर= ९२०
. लोकसंख्येची घनता= २२०

हे पण वाचा.>>>>>>>

नांदेड जिल्हा माहिती

लातूर जिल्हा माहिती

जालना जिल्हा माहिती

हिंगोली जिल्हा माहिती

तुम्हाला उस्मानाबाद जिल्ह्या संपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे अश्याच माहिती साठी MaharashtraBoardSolutions.Net ला नक्की भेट द्या.

Final Word: आम्हाला आशा आहे की तुम्हाला उस्मानाबाद जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – osmanabad District Information In Marathi तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीला हा लेख नक्की शेअर करा आणि Maharashtra Board Solutions ला भेट द्यायला विसरू नका.

osmanabad Information In Marathi,
osmanabad District information in marathi,
osmanabad in marathi, उस्मानाबाद मराठी माहिती, उस्मानाबाद नकाशा, जिल्हा, osmanabad Jilha, Maharashtra Districts,

Leave a Comment