Marathi Bhasha Information In Marathi – मराठी भाषा : इतिहास : माहिती

मराठी भाषा माहिती – Marathi Language Information

मराठी भाषा एक समृद्ध अशी भाषा आहे. संस्कृत भाषा ही मराठीची जननी होय.

मराठी भाषेतील पहिला शिलालेख कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील श्रीगोमटेश्वराच्या मूर्तीखाली आढळतो.

‘श्री चावुण्डरायें करवियलें’ ही शिलालेखातील ओळ म्हणजे मराठीतील पहिले उपलब्ध वाक्य होय. इ. स. ९८३ च्या सुमारास हे वाक्य तेथे कोरले गेले असावे.

मराठी भाषेतील वाङ्मयाची प्रदीर्घ अशी परंपरा आहे. लिखित वाङ्मयाबरोबरच लोकवाङ्मयाचीही परंपरा आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

“माझा मऱ्हाटाची बोलू कवतिके।
परी अमृतातेही पैजेसी जीके।
ऐसी अक्षरेंची रसिके | मेळवीन ।। “

अशी प्रतिज्ञा ज्ञानदेवांनी केली आणि ती तडीस नेली. ‘विवेकसिंधु’ हा ग्रंथ लिहिणारे आद्यकविकीर्ती मुकुंदराज, ‘श्री ज्ञानदेवी’ आणि

‘अमृतानुभव’ हे अलौकिक ग्रंथ लिहिणारे श्री ज्ञानदेव यांनी मराठी भाषा संपन्न केली. ‘लीळाचरित्र’ हा आद्य गद्य ग्रंथ लिहिणारे म्हाइंभट मराठीतील प्रारंभीच्या काळातील प्रसिद्ध ग्रंथकार होत.

‘मराठी असे आमुची मायबोली’

असे प्रत्येक मराठी भाषकाने अभिमानाने म्हटले पाहिजे. मराठीतून बोलणे, मराठीतून पत्रव्यवहार करणे, मराठीतून व्यवहार करण्याचा आग्रह धरणे, मराठी वृत्तपत्रे, मराठी ग्रंथ यांचे वाचन करणे, गराठी माध्यमातून शिक्षण घेणे हे आपणा सर्वांचेच कर्तव्य आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे. आपली मराठी भाषा आपण बिनचूक बोलणे आवश्यक आहे. तसेच मराठीतून बिनचूक लिहिताही आले पाहिजे.

शास्त्रीय ग्रंथ, वैचारिक वाङ्मय, शासकीय पत्रव्यवहार, वृत्तपत्रे, सभासंमेलने, व्याख्याने, आकाशवाणी, दूरदर्शन इत्यादी ठिकाणी जी मराठी भाषा सामान्यपणे वापरली जाते ती प्रमाण भाषा मानली जाते.

मराठी मातृभाषा असलेले आपले बांधव मराठीची कोणती तरी बोली बोलत असतात. आदिवासी किंवा डोंगराळ भागात बोलली जाणारी मराठीची बोली खूपच निराळी असते. त्या सर्व मराठी भाषेच्याच बोली होत.

या बोलीभाषाही प्रमाण भाषेइतक्याच महत्त्वाच्या आहेत. त्या प्रमाणभाषेपेक्षा वेगळ्या आहेत. त्या कमी प्रतीच्या नाहीत. आपण त्याही बोली ऐकल्या पाहिजेत. समजूनही घेतल्या पाहिजेत. अशा बोलीभाषेचा उपयोग करून निर्माण झालेले साहित्यही वाचले पाहिजे.

तुम्हाला हे आर्टिकल नक्कीच आवडले असेलच अशी मला खात्री आहे असेच मराठी आर्टिकल वाचण्यासाठी आमच्या >> maharashtraboardsolutions.net वेबसाईट ला नक्की भेट द्या इथे तुम्हाला सर्व Questions Paper, Digest, maharashtra board solutions, Marathi Books, Maharashtra Board Textbook Solutions आणि आणखी या संबंधी सर्व माहिती मिळेल.

Leave a Comment