मराठी : भाषेचे महत्त्व
भाषा हे संवादाचे एक प्रभावी साधन, माध्यम आहे. बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय. आपले विचार, भावना, कल्पना, अर्थच्छटा नेमकेपणाने व्यक्त करण्यासाठी भाषेवरील प्रभुत्व आवश्यक असते.
हे आपले बोलणे, आपले विचार करणे हे भाषेच्या माध्यमातूनच घडत असते. भाषेचे महत्त्व आपण लक्षात घेतले पाहिजे. भाषेमुळे आपले सर्व जीवनव्यवहार सुरळीत होत असतात. भाजी मंडईतील भाजी आणण्यापासून एखाद्या ग्रंथाच्या अभ्यासापर्यंत भाषा आपल्याला साथ करते.
आयुष्यभर भाषा आपल्याला आपल्या विकासासाठी मदत करते. व्यक्तीच्या विकासाबरोबरच समाजाच्या विकासातही भाषेचे योगदान मोठे आहे. समाजाच्या विकासात अनेक विचारवंत, तत्त्वज्ञ, कवी, लेखक यांचा सहभाग असतो. त्यांचे विचार जतन करण्याचे काम भाषा करते.
विविध लहानमोठी कामे करणारी माणसे समाजात असतात. अशा असंख्य माणसांच्या जडणघडणीत भाषेचे योगदान असते.
आपली संस्कृती भाषेच्या माध्यमातून विकसित होत असते.शालेय अभ्यासात किंवा महाविद्यालयीन अभ्यासात विद्यार्थी अनेक विषयांचा अभ्यास करतात. गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, जमाखर्च, पत्रव्यवहार, स्थापत्य शास्त्र, कायदा, न्यायव्यवस्था, औषधशास्त्र इत्यादी विषयांचा अभ्यास भाषेच्याच माध्यमातून आपण करतो. म्हणून भाषेचे महत्त्व लक्षात घेऊन त्या भाषेच्या अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
तुम्हाला हे आर्टिकल नक्कीच आवडले असेलच अशी मला खात्री आहे असेच मराठी आर्टिकल वाचण्यासाठी आमच्या >>>> maharashtraboardsolutions.net वेबसाईट ला नक्की भेट द्या इथे तुम्हाला सर्व Questions Paper, Digest, maharashtra board solutions, Marathi Books, Maharashtra Board Textbook Solutions आणि आणखी या संबंधी सर्व माहिती मिळेल.