गोंदिया जिल्हा माहिती मराठी, इतिहास, वैशिष्ट्ये, तालुके | Gondia Information In Marathi

Gondia marathi mahiti, Gondia Jilha Mahiti , Gondia Information In Marathi

गोंदिया जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – Gondia Information in Marathi

गोंदिया जिल्हा

Gondia Information In Marathi
Gondia Information In Marathi

गोंदिया जिल्ह्यात वाकाटकालीन वसाहतीचे अवशेष आढळले असून, महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाने या ठिकाणी उत्खनन करून इस.१व्या शतकातटित वीट मंदिर प्रकाशात आणले. महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचे वास्तव्य या भागात होते, असा उल्लेख आहे. १ मे १९९८ रोजी महाराष्ट्र शासनाने भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

गोंदिया जिल्हा संक्षिप्त – माहिती

१. भौगोलिक स्थान : गोंदिया जिल्ह्याच्या उत्तरेस मध्यप्रदेश व पूर्वेस छत्तीसगड राज्याची सीमा लागलेली आहे. तसेच जिल्ह्याच्या दक्षिणेस गडचिरोली व पश्चिमेस भंडारा हे जिल्हा आहेत.

२. नद्या व धरणे : गोंदिया जिल्ह्यात वैनगंगा, वाघ, बावनवडी, पांगोली, चुलबंद व गाढवी या नद्या आहेत. या जिल्ह्यात गाढवी नदीवर इटियाडोह हा सर्वात मोठा प्रकल्प व शरपूर, पुजारीटोला, कालिसराड ही धरणे आहेत. याशिवाय मानगड, संग्रामपूर, बोदलकसा इत्यादी ठिकाणी छोटी धरणे आहेत. गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तलाव असून, नवेगाव बांध हा या जिल्ह्यातील सर्वाधिक मोठा तलाव आहे. तसेच माजागड, रेंगोपार, चुलबंद, उमरझरी, रिसपार, बोदलकसा, संग्रामपूर, खळबंदा, चोरखमारा इत्यादी छोटे-मोठे तलाव जिल्ह्याच्या सौंदर्यात भर घालतात.

३. प्रमुख पिके : गोंदिया जिल्ह्यात भाताचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. गोंदिया जिल्हा हा तांदूळ उत्पादनात महाराष्ट्रात अग्रेसर आहे. या जिल्ह्यात उत्पादित होणारा सुवर्णा, जया इत्यादी जातींचा तांदूळ परदेशात निर्यातही केला जातो.

४. खनिज संपत्ती : खनिज संपत्तीच्या दृष्टिकोनातून गोंदिया जिल्हा समृद्ध समजला जातो. येथे ग्रेनाईट, मँगनीज, लोह खनिज, क्रोमाईट, कायनाईट, क्वार्टझाईट, सिझियम, व्हॅनडियम ही खनिजे सापडतात.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

५. उद्योग व व्यवसाय : गोंदिया जिल्ह्यात माडगी (तालुका तिरोडा) येथे मँगनीज शुद्धीकरण कारखाना, गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, आमगाव, मुंडिकोटा येथे धान (तांदूळ) गिरण्या आणि चंगेरी (तालुका गोदिया) येथे कागद कारखाना आहे. गोंदिया जिल्ह्यात तलावांची संख्या जास्त असल्याने येथे मत्स्यशेती आणि गोड्या पाण्यातील (तलावातील) मासेमारी मोठ्या प्रमाणात चालते. इटियाडोह व आंभोरा येथे मत्स्यबीज प्रजनन केंद्रे आहेत.

६. दळणवळण : या जिल्ह्याच्या मध्य भागातून हाजिरा-धुळेकोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग क्र.६ गेला आहे. तसेच या जिल्ह्यातून मध्य रेल्वेचा मुंबई-कोलकाता लोहमार्ग आणि गोंदिया-जबलपूर लोहमार्ग गेलेला आहे

गोंदिया जिल्ह्याची वैशिष्ट्ये

  • गोंदिया शहर तांदळाच्या गिरण्या व तेंदूपानाच्या संकलनाचे महत्त्वाचे केंद्र आहे.
  • गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध येथे राष्ट्रीय उद्यान असून, या उद्यानाच्या परिसरात डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य आहे.
  • नागझिरा’ हे ठिकाण गोरेगाव तालुक्यात असून, येथील वन्यप्राणी अभयारण्य प्रसिद्ध आहे.
  • सालेकसा येथे २५,००० वर्षापूर्वीची गुंफा (काचरगड) आहे. तेथे पाषाणयुगातील काही हत्यारे सापडली आहेत. सालेकसा येथील हजरा धबधबा पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.
  • गोंदिया जिल्ह्याची स्थापना १ मे १९९९ रोजी झाली. * गोंदिया जिल्हा ‘तलावांचा जिल्हा’ म्हणून ओळखला जातो.

सांख्यिकीक गोदिया – सर्व माहिती

(अ) भौगोलिक माहिती

१. क्षेत्रफळ =४,८४३चौ किमी
२. जंगलाचे प्रमाण =५०%
३. अभयारण्ये =डॉ.सलीम अली पक्षी अभयारण्य
४. राष्ट्रीय उद्याने नवेगाव बांध
५. व्याघ्र प्रकल्प नवेगांव नागझिरा

आ)प्रशासकीय माहिती

१. आयुक्तालय नागपूर विभाग गोंदिया
२. जिल्ह्याचे मुख्यालय गोंदिया
३. उपविभाग ०४ गोंदिया, तिरोडा,सडक-अर्जुनी व देवरी
४. तालुके०८ गोंदिया, तिरोडा, देवरी,गोरेगाव, आमगाव, सालेकसा, मोरगांव अर्जुनी, सडक-अर्जुनी.
५.पंचायत समित्या ०८
६. महानगरपालिका ०० नाही
७. नगरपालिका ०२ (गोंदिया, तिरोडा)
८. ग्रामपंचायत ५२५
९. पोलीस मुख्यालय०१ पोलीस अधीक्षक
१०. पोलीस स्टेशनची संख्या १४

(इ) लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनुसार)
१. लोकसंख्या १३,२२,५०७
२. साक्षरता ७८.६५%
३. लिंग गुणोत्तर९९६
४. लोकसंख्येची घनता२५३

तुम्हाला गोंदिया जिल्ह्या संपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे अश्याच माहिती साठी MaharashtraBoardSolutions.Net ला नक्की भेट द्या.

Final Word: आम्हाला आशा आहे की तुम्हाला गोंदिया जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Gondia District Information In Marathi तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीला हा लेख नक्की शेअर करा आणि Maharashtra Board Solutions ला भेट द्यायला विसरू नका.

Leave a Comment