Maharashtra Board class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8: रेशीमबंध ( Reshimbandh )

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 8. Solutions रेशीमबंध ( Reshimbandh Notes) Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 8 रेशीमबंध

12th Marathi Guide Prashn uttar Chapter 8 रेशीमबंध Textbook Questions and Answers

★ कृती – २. कारणे शोधा.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

(अ) पाखरांचा चिवचिवाट सुरू झालेला नसतो,
कारण…………..
(सप्टें., २०२१)
उत्तरः पाखरांचा चिवचिवाट सुरू झालेला नसतो, कारण आता फक्त पहाटेचे तीन-साडेतीन तर वाजलेले असतात.

(आ) मानवाला निसर्गाची ओढ लागते, कारण…………..

उत्तरः मानवाला निसर्गाची ओढ लागते, कारण निसर्ग व मानव यांच्यातील रेशीमबंध आदिम आहेत. युगानयुगांपासून नात्यांचे रेशीमबंध चालत आले आहेत.

(आ) वर्णन करा.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

(१) उत्तररात्रीचे आगमन :

उत्तर: मध्यरात्र उलटून गेल्यावर उत्तररात्र आकाशात आपले पाऊल हलकेच ठेवते. उत्तररात्रीचं आगमन खूपच हळुवारपणे, अलगदपणे होते. उत्तररात्रीचं आगमन इतकं मुलायम असतं की, त्याबाबतची चाहूलही कोणाला लागत नाही. उत्तररात्रीची मंद मंद पावलांची स्पंदनं लेखकाच्या मनावर मात्र उमटत राहतात. लेखकाला त्यामुळे झोप लागत नाही.

(२) पहाट व पाखरे यांच्यातील नाते : (मार्च, २०२२)

उत्तर:पहाट झाली की, बागतेल्या पाखरांना सर्वात आधी जाग येते. गुलमोहोराच्या घरट्यांतून, जॅक्रांडाच्या फांदयांवरून ती पहाट झाली की नाही हे डोळे किलकिले करून पाहू लागतात. पहाटेच्या प्रकाशकिरणांनी खुणावण्यास सुरुवात केली की, आपआपसात पहाट झाली काय ? याबाबत हलकेच कुजबूज करू लागतात. पहाटेचं आणि पाखरांचं अत्यंत जवळीकीचं नातं आहे. पाखरांचे पंख फडफडल्याशिवाय पहाटदेखील आकाशात येत नाही. पाखरांच्या पंखांची फडफड ऐकली, की पहाटेलादेखील राहवत नाही. आकाशात हलकेच पाऊल टाकत ती येत असते.

★ कृती ४. व्याकरण

(अ) खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा.

(१) मन समेवर येणे (सप्टें., २०२१) – तृप्तीचे अनोखे समाधान मिळणे / मन शांत व एकरूप होणे.

वाक्य: मन समेवर आल्याखेरीज कोणत्याही कृतीतील निखळ असा आनंद मिळत नाही.

(२) साखर झोपेत असणे – सुखकर झोपेचा आनंद मिळणे.

वाक्य: हिवाळ्याच्या दिवसात, उबदार पांघरुणातील साखर झोपेतून उठणे प्रत्येकाच्याच जीवावर येते.

(आ) खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.

(१) खरं तर पहाटच त्यांना विचारत असते की मी येऊ का तुम्हांला भेटायला

उत्तर:’खरं तर पहाटच त्यांना विचारत असते, की मी येऊ का तुम्हांला भेटायला ?’

(२) निशिगंध म्हणजे निशिगंधच

उत्तर: निशिगंध म्हणजे निशिगंधच!

! =उद्गगारचीन्ह

● कृती-५. स्वमत.

(अ) मानवाला निसर्गाची जी ओढ युगानुयुगांपासून लागून राहिली आहे, ती या आदिम, ऋजु, स्नेहबंधांमुळे तर नाही ?…. या विधानासंबंधी तुमचे मत लिहा.

उत्तर:निसर्ग ही देवाने प्राणिमात्रांसाठी दिलेली अत्यंत सुंदर अशी देणगी आहे. निसर्ग व मानव यांचा संबंध आदिम काळापासून चालत आलेला आहे. आपल्या भोवतालच्या निसर्गाशी प्रत्येकाचं स्वतःचं असं आपलं नातं आहे. तो कधी आपला सखा, सोबती, वाटाड्या असतो. तर कधी मायेनं सांभाळ करणारी आईही असते. तर कधी अनुभवांनी जगाचे टक्केटोणपे शिकविणारा बापही असतो. आपण ज्या चष्म्यातून त्याच्याकडे बघू तसा तो आपल्याला दिसतो, जाणवतो. अगदी लहानपणापासून आपल्या प्रत्येकाच्या मनात निसर्गाची ओढ असते.

निसर्गाच्या सहवासातच मानवाच्या थकल्या भागल्या जीवाला एक नवचेतना मिळत असते. दैनंदिन जीवनातल्या चिंता काळज्यांचा खऱ्या अर्थाने विसर पडत असतो. वृक्ष, वेली, फुले, पाखरे, डोंगर, दऱ्या, अथांग सागर अशा नानाविध घटकांबद्दलची ओढ मानवाच्या मनात असते. निसर्गाच्या सहवासातच मानवाच्या मनाला निर्भेळ असा आनंद मिळत असतो. निसर्गाची बिनभिंतीची उघडी शाळा आपल्याला खूप काही शिकवते. निसर्गातले लाखो गुरु जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींसोबतच आपआपसांतील व्यवहारही अप्रत्यक्षपणे शिकवतात. निसर्गातील नानाविध रंग-रूपे आपल्याला अनोखा आनंद देतात. निसर्गातले जिवंत संगीत मनावरची मरगळ दूर करते.

निसर्गाबद्दलची ओढ प्रत्येकाच्या मनात असते. निसर्गात रममाण होणे सर्वांनाच आवडते. निसर्ग आपल्याला अनेक गोष्टी सढळ हाताने नेहमीच देत असतो. आपणही हक्काने सर्व काही घेत असतो. आपण निसर्गाला काय दिलं ? हा प्रश्न आजही संभ्रमात टाकतो. ऋजू वा सरळ स्वभावाच्या निसर्गाला आपल्या मनातील स्वार्थाचे कपट कळलेच नाही. निसर्ग व मानव यांच्यातील स्नेहबंध हे युगानयुगांपासून चालत आले आहेत व पुढेही चालत राहणार आहेत. नात्याचे हे रेशीमबंध अतूट असे आहेत.

(आ) ‘रेशीमबंध’ या शीर्षकाची समर्पकता तुमच्याशब्दांत लिहा.

उत्तर: आपल्या भोवतालच्या निसर्गाशी, त्यातील नानाविध घटकांशी प्रत्येकाचं, स्वतःचं असं खास नातं असतं. वृक्ष, वेली, फुले, पाखरे यांच्याबद्दलची एक आत्मिक ओढ प्रत्येकाच्या मनात असते. युगानुयुगांपासून हे रेशीमबंधाचं नातं प्रत्येकाने आपआपल्या परीनं जपलेलं असतं. वृक्ष, वेली, फुले, पाखरे यांच्याशी असणाऱ्या नात्याला लेखकाने ‘रेशीमबंध’ असे सुंदर नाव दिले आहे. ते सर्वार्थाने योग्य असंच आहे. ‘रेशीमबंध’ म्हणजे एक हवंहवंसं वाटणारं, आपुलकी वा जिव्हाळ्याचं असं अतूट नातं. रेशमाचे हे नाजूक, मुलायम बंध प्रत्येकजण आपल्या मनात हळुवारपणे जपत असतो. लेखकाच्या मनातही वृक्ष, वेली, फुले पाखरे यांच्याशी रेशीमबंधाचं नातं आहे.

लेखकाने ते आजही आपल्या मनात निष्ठेने जपलं आहे. म्हणूनच त्यांच्या सहवासात एक वेगळाच आनंद लेखकाने अनुभवला आहे. रेशीमबंधाची ही जवळीकच लेखकाच्या मनात त्यांच्या भेटीबाबतची एक अनावर अशी ओढ निर्माण करते. निसर्गाच्या नानाविध रंग, रूपात रंगून गेल्याशिवाय निसर्गातील सौंदर्याचा खऱ्या अर्थाने साक्षात्कार होत नाही. निसर्गाचे खरे रंग, रूप आपल्याला समजत नाही. युगानुयुगांपासून निसर्ग व मानव यांच्यातील रेशीमबंधाचं नातं चालतं आलं आहे. रेशीमबंधाच्या नात्याचा ललितरम्य शैलीत लेखकाने आपल्याला साक्षात्कार घडविला आहे.

  • कृती ६.अभिव्यक्ती.

(अ) निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्परसंबंध तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. (सप्टें., २०२१)

उत्तर: निसर्ग आणि मानव यांच्यातील मैत्रीचं नातं अनादि
काळापासून चालत आलं आहे. निसर्गाशी मैत्री केल्याखेरीज खऱ्या अर्थाने निसर्ग आपल्याला समजत नाही. उत्तररात्र, पहाट आणि सकाळ या प्रहरांचे ललितरम्य शैलीतील वर्णन डॉ. यू. म. पठाण यांच्या

रेशीमबंध’ पाठात आहे. निसर्गाला समजून घेण्यासाठी संवेदनक्षम मनाची आवश्यकता आहे. उत्तररात्रीच्या आगमनाची स्पंदनं अनुभवणारं संवेदनक्षम मन लेखकाचं आहे उत्तररात्रीपासून पहाटेपर्यंतची नीरव शांतता आणि निद्रिस्त भवताल यांच्याशी असणारं आपलं नातं शोधण्याचा प्रयत्नही लेखकाने केला आहे. आदिमत्वाकडे ओढून नेणारे हे रेशीमबंध आहेत. युगानुयुगांपासून निसर्ग घटकांबद्दलची ओढ मानवी मनात आहे. पहाटेनंतर होणारी सकाळ, वृक्ष, वेली, फुले, पाखरे यांना येणारी जाग, आत्मिक ओढ व निसर्गाशी आपले युगानुयुगांचे नाते आहे याची जाणीव लेखकास होते.

पाखरे व पहाट परस्परांना भेटण्यासाठी उत्सुक झाली आहेत याची जाणीव लेखकास होते. निसर्गातील इवल्या इवल्या पाखरांचं व पहाटेचं जवळीकीचं नातं आहे. पाखरांच्या पंखांची फडफड ऐकली की पहाटेलादेखील राहवत नाही असे लेखकाला वाटते. बागेतील उमललेल्या फुलांचा व त्यांच्या सुगंधाचा मोह लेखकाच्या मनाला होतो. सुगंधाचं व आपलं आदिम नातं पुन्हा जाणवतं. निसर्गघटकांबद्दलची लेखकाच्या मनाला असणारी ओढ पुन्हा एकदा रेशीमबंधाच्या आदिम नात्याचे स्पष्टीकरण करते. निसर्गाने आपले वैभव भरभरून मानवाला दिले आहे. निसर्गाबद्दलची ओढ प्रत्येकाच्या मनात आहे. निसर्ग व मानव यांच्यातील रेशीमबंध युगानुयुगांपासून चालत आले आहेत.

(आ) डॉ. यू. म. पठाण यांच्या लेखनाची भाषिक वैशिष्ट्ये पाठाधारे स्पष्ट करा.

उत्तर: साहित्यिक, संतसाहित्याचे गाढे अभ्यासक, संशोधक, संपादक व नामवंत वक्ते म्हणून डॉ. यू. म. पठाण सर्वपरिचित आहेत. ‘रेशीमबंध’ या ललितलेख संग्रहातील ‘शीर्षक लेख’ पाठ्यपुस्तकात आहे. उत्तररात्र, पहाट आणि सकाळ या प्रहरांचे ललितरम्य शैलीतील वर्णन ‘रेशीमबंध’ पाठात आहे.
उत्तररात्र – पहाट आणि सकाळ यांची संवेदनक्षम मनाने टिपलेली जिवंत शब्दचित्रे वाचकाला निसर्गातील ‘साऱ्या अनोख्या चैतन्याचा परिसस्पर्श घडवतात. ‘उत्तररात्रीनं हलकेच आकाशात पाऊल ठेवलेलं असत’. ‘तिच्या पावलांनी मंद मंद नाजूक स्पंदनं’. झाडांचा साऱ्या वेलींचादेखील डोळा लागलेला’, ‘ही इवली इवली पाखरं गुलमोहोराच्या घरट्यांतून, जॅक्रांडाच्या फांद्यांवरून हळूहळू डोळे किलकिले करून पाहातात’. ‘पाखरांचा चिवचिवाट ऐकूनच सायली जागी होते’ असे अनेक अनुभव अनुभवण्यासारखे आहेत. चित्रमय अशा शैलीला एका वेगळ्याच चैतन्याचा स्पर्श आहे.

डॉ. पठाणांच्या ललित गदय स्वरूपाच्या लेखनातील संवादात्मकता व त्यातील नाट्यही प्रत्ययकारी आहे. पाखरं कुजबूजू लागतात. ‘पहाट झालीय काय? असं विचारूलागतात.’ पहाटही त्यांना विचारत असते की ‘मी येऊ का तुम्हांला भेटायला ?’, चाफ्यांचं एकमेकांशी चाललेलं हितगुज शब्दाविना प्रकट झालं आहे. ‘पाण्याच्या थेंबांचा स्पर्श झाल्यावर पानं कशी तरारतात’ हे अनुभवण्यासारखं आहे. अत्यंत तरल असे निसर्ग अनुभव शब्दांकित करण्याचे लेखकाचे वैशिष्ट्य लक्षणीय आहे. दृश्यात्मकतेतील गती- ‘मी हलकेच उठतो. चूळ भरतो. डायनिंग टेबलाजवळ येतो. त्याच्याजवळची खिडकी हलकेच उघडतो.’ सारे चित्र एका विशिष्ट पद्धतीने उभे करते. ललितरम्य शैली, चित्रात्मक वर्णनपद्धती वाचकांना निसर्गातील चैतन्याचा खराखुरा अनुभव निश्चितच देते.

(इ) संत तुकाराम महाराज यांनी वृक्षवल्लींना ‘सोयरी’ असे म्हटले आहे, यामागील तुम्हांला समजलेली कारणे लिहा.

उत्तर : वारकरी पंथातील संत तुकाराम महाराज यांचा ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे’ हा प्रसिद्ध अभंग आहे. निसर्गावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या मनाला वृक्ष, वेली हे आपले ‘सोयरी’ वा नातेवाईक वाटतात. निसर्गातील वृक्ष, वेली, फुले, पाखरे यांच्याबद्दलचा एक वेगळाच जिव्हाळा प्रत्येकाच्या मनात असतो. निसर्ग व निसर्गातील घटक आणि मानव यांचं नातं युगानुयुगापासून चालत आलं आहे. आदिमकाळापासून निसर्गघटकांशी आपले ‘स्नेहंबंध’ आहेत. निसर्गघटकांशी आपल्या सर्वांचं जवळीकीचं नातं आहे. त्यांच्याजवळ गेल्याशिवाय, अनुभव घेतल्याशिवाय त्याची जाणीव आपल्याला नक्कीच होत नाही.

निसर्गाचा सर्वांगाने अनुभव घेतल्याशिवाय निसर्ग आपल्याला कळत नाही. निसर्गाच्या सान्निध्यातच एकांताचे सुख व आपलाच आपल्या मनाशी संवाद सुरु होत नाही. ऐहिक जीवनातील अनेक गोष्टींची निरर्थकता निसर्गाच्या सहवासातच मनाला पटते. निसर्गातील पशुपक्ष्यांच्या आवाजाचे सुमधुर संगीत मनाला वेगळाच आनंद देते. वर आकाश व खाली पृथ्वीचे आसन याव्यतिरिक्त कोणत्याच गोष्टी आवश्यक रहात नाहीत. निसर्गाच्या सहवासातच परमेश्वराच्या नामस्मरणाचं चिंतन संत तुकाराम महाराजांना स्वादिष्ट भोजनाचा आनंद देऊन जाते. सुंदर निसर्गरम्य अशा वातावरणातच संत तुकोबांचा आपल्याच मनाशी संवाद सुरू होतो. मनाशी वाद-विवाद घालीत प्रत्येक प्रहर खऱ्या अर्थाने सार्थकी लागतो.

लेखकालाही आपली झोप पुरेशी झाली आहे हे उत्तररात्री जाणवते. पहाटेच्या नीरव शांततेचा व पहाटेनंतरच्या सकाळपर्यंतच्या काळात वृक्ष-वेलीपाखरांना येणारी जाग, उमलणारी फुले, त्यांचे रंग, गंध असा नानाविध बाबींचा आनंददायक, मनाला प्रसन्न करणारा अनुभव लेखकास होतो.

कृतीपत्रीका.१

प्र. १. (अ) खालील उताऱ्याच्या आधारे सुचनेनुसार कृती करा.

(१) योग्य कारण शोधा व लिहा.

(i) उत्तर: लेखक डायनिंग टेबलजवळची खिडकी हलकेच उघडतो, कारण………………….. (सप्टें., २०२१)

उत्तर :लेखक डायनिंग टेबलजवळची खिडकी हलकेच उघडतो, कारण रात्रीच्या नीरव शांततेची निद्रा भंग होऊ नये म्हणून.

(ii) पहाटेची वेळ लेखकास फार आवडते, कारण………………

उत्तर :पहाटेची वेळ लेखकास फार आवडते, कारण सारं जग साखरझोपेत असतं आणि साऱ्या चिंता-काळज्या मिटलेल्या, विरलेल्या असतात.

प्र. ३. स्वमत/ अभिव्यक्ती.

•रेशीमबंध या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर: (उत्तरासाठी प्र. ५. मधील (आ) चे उत्तर पहा.)

किंवा

•निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्परसंबंध तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. (सप्टें., २०२१)

उत्तर: (उत्तरासाठी प्र. ५. मधील (अ) चे उत्तर पहा.)

प्र. २. चौकटी पूर्ण करा.

(i)खरोखरीच अनुभवण्याजोगं अनोखं दृश्य-

उत्तर:पाण्याच्या थेंबाचा स्पर्श झाल्यावर पानं कशी तरारतात

(ii) खालील विधान पूर्ण करा.

•सकाळ होऊ लागते जेव्हा………

उत्तरः सकाळ होऊ लागते जेव्हा प्रकाश पसरू लागतो.

प्र. ३.स्वमत / अभिव्यक्ती.

•निसर्गाला समजून घेण्यासाठी संवेदनक्षम मनाची
‘आवश्यकता आहे’ यावर स्वमत लिहा.

उत्तर: निसर्ग व मानव यांचं नातं आदिमकाळापासून चालत आलं आहे. माणसाच्या थकल्या भागल्या जीवाला एक वेगळाच विरंगुळा व तजेला निसर्गाच्या सहवासात प्राप्त होतो. निसर्गातील नानाविध घटकांना समजून घेण्यासाठी संवेदनक्षम मनाची आवश्यकता असते. निसर्गाच्या जवळ गेल्याशिवाय निसर्गातील रंग, रूपाचा साक्षात्कार खऱ्या अर्थाने होत नाही. आपल्या भोवतालच्या निसर्ग घटकांची आपण योग्य प्रकारे काळजी घेतली, त्यांचे संगोपन व संवर्धन योग्य प्रकारे केले तर नेहमीच आपणाला आनंद मिळणार आहे.

झाडे लावणे सोपे. परंतु खरा प्रश्न संवर्धनाचा आहे. आपण लावलेल्या रोपट्याची आपण योग्य प्रकारे काळजी घेतली तर त्याची वाढ जोमाने होते. नानाविध रंगांची, आकारांची, गंधांची फुले फुलून येतात. काही झाडांची रसाळ, मधुर अशी फळेही आपल्याला खायला मिळतात. फुलझाडांची आवड प्रत्येकाच्या मनात असते.

बऱ्याचदा उत्साहाच्या भरात आपण आनंदाने फुलांची रोपे घराच्या परिसरात लावण्यासाठी आणतो. या रोपांची संवेदनक्षम मनाने जोपासना करणे आवश्यक आहे. रोपांच्या भोवती आळे करणे, योग्य वेळी पाणी देणे अशाप्रकारे या रोपट्याची योग्य प्रकारे काळजी आपण घेतली तर गोंडस फुलांचा नजराणा देऊन ती आपल्या मनाला तजेला देतात. थोडासा वेळ आपण काढला तर रूप, गंध, आकारांची एक वेगळीच दुनिया आपल्याला नक्की दिसते. इवली इवली ही झाडं नि वेलीसुद्धा भावूक असतात. संवेदनक्षम मनाने आपण त्यांच्यासाठी काही केले तर आपल्यापेक्षाही अधिक असे सौंदर्याचे विश्व घराच्या परिसरात नक्कीच साकारते.

किंवा

संत तुकाराम महाराज यांनी वृक्षवल्ली सोयरी असे म्हटले आहे. यामागील तुम्हांला समजलेली कारणे लिहा.
उत्तर: (उत्तरासाठी प्र. ६. मधील (इ) चे उत्तर पहा.)

{ कृतिपत्रिका – ३}. …( मार्च, २०२२)

प्र. १. (अ) खालील उताऱ्याच्या आधारे सुचनेनुसार कृती करा.

(१) ज्यावर बसून पाखरे कुजबुजतात ती झाडे

(अ)………………….. (आ)……………….

उत्तर: (अ) जॅक्रांडा (आ) गुलमोहोर

(२) लेखकाचा पहाट अनुभवण्याचा अनुभव

(अ)……………….. (आ)……………….
उत्तर: (अ) अनोखा. (आ) लोभसवाणा

प्र. ३. स्वमत / अभिव्यक्ती.
•पहाट आणि पाखरे यांचे लेखकाने वर्णन केलेले नाते तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर: ( उत्तरासाठी कृती – ३. (आ) चे उत्तर पहा.)

प्र. ३. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा व लिहा.
(१) मी हलकेच उठतो.
(२) बागेतली सारी झाडं, वेली यांचा डोळा लागलेला.
(३) मी डायनिंग टेबलजवळ येतो.
(४) पाण्याच्या थेंबाचा स्पर्श झाल्यावर पानं तरारतात.
(५) पहाटेच्या किरणांनी मोगरा न्हाऊन निघालेला असतो.
(६) बागेतल्या नळाला पाईप लावून मी वाफ्यांमध्ये पाणी घालू लागतो.

उत्तरे:
(१) कर्तरी प्रयोग (२) भावे प्रयोग (३) कर्तरी प्रयोग (४) कर्मणी

प्रयोग (५) भावे प्रयोग (६) कर्मणी प्रयोग

प्र. ४. वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

•वास्तपुस्त करणे – आपुलकीने चौकशी करणे.
• वाक्य: मावशीने घरात आल्याबरोबर सर्व सदस्यांची वास्तपुस्त केली.

उपक्रम:

•हिवाळ्यातील उत्तररात्री किंवा अगदी पहाटेच्या वेळी तुमच्या परिसराचे निरीक्षण करा. पाहिलेल्या निसर्गसौंदर्याचे वर्णन शब्दबद्ध करा. ते वर्गात वाचून दाखवा.

उत्तर : हिवाळ्याचे दिवस होते. थंडी चांगलीच जाणवत होती आणि मला एक दिवस अचानक उत्तररात्री जाग आली. म्हणून उबदार पांघरुण अंगावर घेऊन झोपण्याचा प्रयत्न केला. परंतु झोप मात्र येत नव्हती. अभ्यासाला बसण्याचीही इच्छा मनापासून होत नव्हती काय करावे तेच समजत नव्हते.

सहजच म्हणून खिडकी उघडली. दारे-खिडक्या बंद असणाऱ्या उबदार खोलीत बाहेरचा गारवा खिडकीवाटे आत शिरला. बाहेरच्या बोचऱ्या थंडीची व पारिजातकाच्या परिचयाच्या सुगंधाची जाणीव मनाला झाली. दैनंदिन नित्य, नैमित्तिक बाबी उरकल्या व दरवाजा उघडून घरापाठीमागच्या बागेत आलो. पक्ष्यांचा पहाटेचा रियाज कानांवर पडत होता. पहाटेच्या त्यावेळी अंधुक अंधुक असे दिसत होते. पारिजातकाच्या फुलांनी त्या छोट्याशा झाडाला सुंदर शोभा आली होती. हळूहळू अंधाराला भेटत उगवत्या सूर्याचे किरण गगनपटलावर रंगांची सुरेख नक्षी मांडत होते आणि मीही भान हरपून सगळे काही पाहात होतो. चित्रात आजवर जे पाहिले, कथा-कांदबऱ्यांत ज्यांची वर्णने वाचली ते आज प्रत्यक्ष अनुभवत होतो.

उगवतीच्या प्रकाशात बागेतील झाडांच्या पानावर,उमलणाऱ्या
फुलांवर, हिरवळीवरचे दवबिंदू मोत्यासारखे चमकत होते. बागेतील मोगऱ्याच्या कळ्या व जास्वंदाच्या कळ्या हळूहळू उमलण्याची तयारी करीत होत्या. सूर्याच्या साक्षीने उमलणाऱ्या फुलांच्या रंग, रूपाने एक वेगळीच शोभा बागेला आली होती. फुलांचा सुगंध मनाला एक वेगळीच उभारी देऊन जातो. हा निसर्ग, पाहण्यासाठी तसेच त्याच्या क्रीडेत सहभागी होऊन अनुभवण्यासाठीच आहे याची प्रचिती त्या दिवसाने मला दिली.

लेखक परिचय

डॉ. युसुफखान महंमदखान पठाण हे साहित्य, समीक्षा, संपादन व संशोधन क्षेत्रात डॉ. यु. म. पठाण या नावाने प्रसिद्ध आहेत. कथा, व्यक्तिचित्रे, ललितलेख अशा नानाविध साहित्यप्रकारांत डॉ. पठाण सरांनी लिलया लेखन केले आहे. संतसाहित्याचे व्यासंगी अभ्यासक, संशोधक, संपादक व नामवंत वक्ते अशी त्यांची विविधांगी ओळख आहे. विविध धर्म, पंथ, संप्रदाय यांवर सतत चिंतन, मनन व संशोधन करून विपुल लेखन त्यांनी केले आहे. महाविदयालयातील मराठी विषयाचा प्राध्यापक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विभाग प्रमुख, कुलगुरुपदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली आहे. विविध पुरस्कारांनी व भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे. १९९० साली पुणे येथे संपन्न झालेल्या त्रेसष्टाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही डॉ. पठाण यांनी भूषविले आहे. साहित्यिक, व्यासंगी अभ्यासक संशोधक, संपादक व वक्ता असे डॉ. पठाण यांचे व्यक्तिमत्त्व आहे.

डॉ. पठाण यांचे ललित लेखन बहुरंगी स्वरूपाचे आहे. त्यांचे ‘सय’, ‘पाऊलखुणा’, ‘अजून आठवतं’, ‘रेशीमबंध’, ‘साद-पडसाद’, ‘गंधवार्ता’ असे ललित लेखसंग्रह आजवर प्रकाशित झाले आहेत. ‘रेशीमबंध’ या ललित लेखसंग्रहात एकूण ३५ ललित लेख आहेत, ‘रेशीमबंध’ या पाठात उत्तररात्र, पहाट आणि सकाळ या प्रहराचे संवेदनक्षम मनाने अनुभवलेले सौंदर्य लालित्यपूर्ण भाषेत त्यांनी आपल्या समोर मांडले आहे.

पाठ परिचय

उत्तररात्रीचा प्रहर:

मध्यरात्र उलटून गेल्यावर अगदी हळुवारपणे येणारी उत्तररात्र. लेखकाच्या संवेदनक्षम मनाला जाणवणारी उत्तररात्रीची नाजूक स्पंदनं, पुरेशी झोप झाली आहे या जाणीवेतून उठलेला लेखक, डायनिंग टेबलाजवळची खिडकी उघडून पाहिल्यावर,

पहाटेच्या तीन-साडेतीनच्या सुमारास बाहेर फक्त अंधारच, सारं जग घरातील माणसांचं व बाहेरच्या निसर्गघटकांचं, साखरझोपत असणारं जग,

| लेखकाला आवडणारा उत्तररात्रीचा प्रहर. बाहेरच्या निसर्गातील झाडं, वेली, फुले, पाखरे यांतील रेशीमबंध, पहाट झाल्यावर होणाऱ्या भेटीची मनात निर्माण झालेली ओढ.

बागेतील अंधारात सायली, मोगरा व चाफ्याचा सुगंध शोधण्याची, जॅक्रांडा, बोगनवेल व गुलमोहोराचा रंग व सौंदर्य पाहण्याची लेखकाच्या मनाला लागलेली आस, त्यांच्या जागे होण्याबाबत वाट पाहणारा लेखक,

लेखकाची नात- अल्विशा

लेखकाची मुलगी अल्मासची, वर्षापेक्षाही लहान वयाची मुलगी. आजोबांच्या अंगाखांदयावर बिलगून बसते. अल्विशाही बाहेरच्या झाडे, वेलीसारखी निवांत झोपलेली. –

उत्तमात्रीची नीरवता व शांतता: |

निसर्ग व मानव यांच्यातील लेखकाला जाणवलेलं आश्चर्यकारक | साम्य. दोघेही एकाच विश्वातले दोन घटक. दोघांमध्येही असणारी मोहकता. दोघांविषयीची मनात असणारी आस.

पहाटेचा प्रहर:

चहा घेऊन लिहायला बसलेला लेखक बागेतल्या पाखरांना आलेली जाग, हलक्या आवाजातील लेखकाच्या कानांनी ऐकलेली पाखरांची कुजबूज, पाखरांचं व पहाटेचं लेखकाला जाणवलेलं नातं. पहाटेचा हा प्रहर पाहण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे याची लेखकाला झालेली जाणीव. पाखरांचा मंद मंद चिवचिवाट उजाडणाऱ्या पहाटेबरोबर एखादया उत्सवासारखा वाढत जातो. बागेतील बोगनवेलीची व गुलमोहोराची सळसळ, दोन चाफ्यांचे चाललेले एकमेकांशी हितगुज, क्रोटन्सची उमलणारी फुले, वीजॅक्रांडाचे पहाटवाऱ्यासोबतचे हसू व बोलणे, पहाट झाल्यावर निसर्गातील विविध घटकांना होणारा आनंद.

पहाटेच्या प्रहराचा लेखकाचा आनंद अनुभव:

दार उघडून बागेत आलेला लेखक, पहाट किरणांनी न्हाऊन | निघालेला मोगरा, सायलीच्या पानाची जाणवणारी वेगळीच | हिरवाई, गुलमोहोरानं स्वागतासाठी टाकलेला केशरी फुलांचा | सडा, जॅक्रांडाची निळी – जांभळी फुले, रक्तचंदनी चाफ्याची फुले, चाफ्याच्या फुलांचा एक मंद परंतु जाणवणारा गंध, | निशिगंध, बहरलेल्या मोगऱ्याच्या सुगंधाचा मनाला होणारा | मोह, सुगंधाचं व लेखकाचं एक आदिम नातं.

सकाळचा प्रहर:

| प्रकाश पसरू लागला की सकाळ सुरू होते. सकाळच्या | प्रकाशात आळे, वाफे कोरडेच असल्याची जाणीव होते. वाफे व कुंड्यांना लेखक पाणी देतो. पाण्याच्या स्पर्शाने पानं तरारतात, | गोंडस कळ्यांचे खुदूखुदू हसू उमटते. झाडांचे सौंदर्य खुलते. | इवली इवली झाडं नी वेली भावुक असतात. त्यांची थोडीशी | | वास्तपुस्त आपण केली, मायेनं हात फिरवला, तहानलेला जीव | शांत केला की गोंडस फुलं उमलतात, विरंगुळा व मनाला | तजेला देणारा हा अनुभव.

| संत तुकाराम महाराज वृक्ष व वेली यांना आपली सोयरीधायरी | |म्हणतात. निसर्गघटकांशी माणसाचं असलेलं आदिम | काळापासूनचं नातं. युगानुयुगाचे हे रेशीमबंध आहेत. म्हणूनच | एक अनिवार ओढ त्यांच्याबाबत मनात असते याचा लेखकाला | | साक्षात्कार होतो. निसर्ग व मानव यांच्यातील रेशीमबंधाची | जाणीव लेखकाला व लेखकाबरोबर आपल्यालाही होते.

कठीण शब्द :

मध्यरात्र -रात्रीचा मध्य (midnight), उत्तररात्र-मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंतचा काळ (the latter half of the night), मुलायम- मृदू, कोमल (soft, smooth), चाहूल- कानोसा, जवळ येत असल्याचा सुगावा (an indication of approach), स्पंदन -हलल्याची, थरथरायची क्रिया (throbbing, pulsation), नीरव- शांतता, जरासुद्धा आवाज नसलेले (noiseless), निद्रा – झोप (sleep), काळाकुळकुळीत – काळाभोर असा (pitch-black), चिवचिवाट पक्ष्यांचा मोठा किलबिलाट (a lot of twittering), नितळ स्वच्छ (clear), उमलणे विकसित होणे (bloom), साखरझोप सूर्योदयाच्या वेळी येणारी सुखकर प्रिय वाटणारी अशी –

झोप (pleasant early morning तांबडसर तांबुस लालसर असा | जांभुळसर – जांभळाच्या रंगासारखा दाट (dark purple), किरमिजी – शेंदरी (scarlet), निळसर रंग असलेला (bluish), पिवळसर (yellowish), इवलाल्या • खूप छोट्या आकाराच्या (very small), रक्तचंदनी- लाल रंगाच्या चंदनासारखे (red sandalwood), आदिम – मूळचा (primitive), निष्कपटी, प्रामाणिक (honest), सच्चा, ऋजू नात – मुलाची/ मुलीची मुलगी (a granddaughter), शैशव बालपण (childhood), निवांत शांत/ स्तब्ध (quiet), संभ्रम गोंधळ (hurry, flurry confused state of mind), किलकिल उघडलेले (half open and half closed), (whispering), पंखांचे झटकणे (flapping sound), अर्धवट कुजबूज हळूहळू बोलणे पखरण फडफड गंधवार्ता मागमूस, सुगावा (trace), हिरवाई निसर्गातील हिरवा रंग (greenery), हिरवळ, बहर वैपुल्याचा काळ (abundance), अनिवार अमर्याद, फार मोठी (extreme), आळे – झाडाच्या मुळाशी पाणी साचून राहण्यासाठी केलेला खळगा, मातीला घातलेला बांध | (a cavity around the food of a tree to receive water), तरारणे- टवटवीत होणे (swell exceedingly), फुलांचा सडा ( to lie strewed), खुदूखुदू आनंदाने हसणे (to chuckle), अबोला- बोलण्यास दिलेला नकार (refused to talk), वास्तपुस्त विचारपूस करणे (inquiring after one’s well-being), विरंगुळा- करमणूक / वेळ घालवण्याचे साधन ( a pastime), सोयरी नात्यागोत्यातील व्यक्ती ( a relative), खूण, अंतस्थ हेतू (sign, inner secret), तीव्र इच्छा, आकर्षण (attraction). दुधाळ – दुधाच्या रंगासारखा (milky). धायरी इंगित ओढ – – – snooze) (reddish) – फिकट निळ किंचित पिवळ्या – – – –

इंग्रजी भाषेतील शब्द:

डायनिंग टेबल (dining table) | जेवायला बसण्याचे टेबल स्वयंपाकघरातील

फारशी भाषेतील शब्द :

नजाकत वाकप्रचा डोळा लागणे वास्तपुस्त करणे अंगावर झेपावणे – नाजुकपणा (prellity) गाढ अशी झोप येणे, आपुलकीने चौकशी करणे. लडिवाळपणे जवळ येण्याचा प्रयत्न करणे. हर्षोल्हासाला अनावर भरती येणे -खूप जोराजोराने हसू –

येणे / लागणे.

टिपा:

: रेशीमबंध हवंहवंसं वाटणारं, आपुलकी व जिव्हाळ्याचं नातं. हे नातं प्रत्येक व्यक्ती हळुवारपणे जपत असते. रेशीमबंधाचं नातं हे शेवटपर्यंत निभावायचं असतं. बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक असणाऱ्या राखीचा रेशीमबंध, मुलायम धाग्याचं हे बंधन शेवटपर्यंत मनात जपलेलं असतं.

मन समेवर येणे : रागदारी वा शास्त्रीय संगीतातील एक महत्त्वाचा भाग. प्रारंभीच्या आवर्तनातील तालाचा शेवट व नव्या आवर्तनातील तालाची सुरुवात असणारी प्रारंभीची जागा, वरचा व खालचा स्वर हुकमीपणे लावता येणे / एक आनंददायक प्रचीती येणे. तृप्तीचे एक अनोखे समाधान मिळणे / मन शांत व एकरूप होणे.

वृक्षवल्ली आम्हा सोयरी :

संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध असा अभंगवृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। पक्षीही सुस्वरे आळविती ।। येणे सुख रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येत ।। पशुपक्ष्यांशी सोयरीक जोडणाऱ्या संत तुकाराम महाराजांना निसर्गाची एक जाण होती. देहूच्या डोंगरावरील झाडांशी, पशुपक्ष्यांशी ते इतके तादात्म्य पावत की, वृक्षवेली, पशुपक्षी त्यांना बंधू, सखा, भगिनी, माता, पिता वाटत. आपल्या मनातील सुखदु:ख ते त्यांच्यापाशी व्यक्त करीत असत. निसर्गाच्या सहवासात, एकांतवासात त्यांना परमसुख मिळत असे. संसारातील साऱ्या सुखदुःखांचा विसर पडत असे. मनापासूनच्या या संवादात एक वेगळाच आनंद संत तुकाराम महाराजांना मिळत असे. निसर्ग व मानव यांचं आदिम काळापासूनचं नातं.

Leave a Comment