नागपूर जिल्हा माहिती मराठी, इतिहास, वैशिष्ट्ये, तालुके, नागपुर मराठी माहिती | Nagpur Information In Marathi 2024

nagpur marathi mahiti, nagpur Jilha Mahiti , Nagpur Information In Marathi

नागपुर जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – Nagpur Information in Marathi 2024

नागपूर जिल्हा

नागपूर शहर तीनशे वर्षांपेक्षा जास्त प्राचीन आहे. या शहराची स्थापना गोंड राजा बख्त बुलंद शहा या राजाने १७०२ या वर्षी नाग नदीकाठी नागपूर शहर वसविले. मराठाशाहीचे सरदार रघुजी भोसले यांनी १७४१ मध्ये राजा चांद सुल्तानाकडून नागपूर शहर जिंकले व तेव्हापासून नागपूरवर भोसले घराण्याचे राज्य सुरू झाले.

Nagpur Information In Marathi
Nagpur Information In Marathi

नागपूर जिल्हा संक्षिप्त

1 . भौगोलिक स्थान : नागपूर जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागात असून, या जिल्ह्याच्या उत्तरेस मध्यप्रदेश, वायव्येस अमरावती जिल्हा, दक्षिणेस चंद्रपूर जिल्हा, पूर्वेस भंडारा, पश्चिमेस वर्धा जिल्हा आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

२. प्रमुख पिके: संत्री व कापूस जिल्ह्यातील प्रमुख पिके असून, महाराष्ट्रात तेलबियांच्या उत्पादनात या जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो. नागपूरची संत्री जगभरात प्रसिद्ध असून, हे शहर संत्र्यांचे किंवा नारिंगी शहर (आरेंज सिटी) म्हणून ओळखले जाते.

३. नद्या व धरणे : नागपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात वेणा, नांद, आंब या नद्या वाहतात. ईशान्य सीमेवर बावनथडी नदी वाहते. नागपूर जिल्ह्यात ५१ छोटे प्रकल्प असून, त्यामध्ये पेंच नदीवरील पेंच धरण, रामटेक हा मध्यम जलसिंचन प्रकल्प, कान्होजी, उमरी, कोलार इत्यादी जलसिंचन प्रकल्प आहेत. या जिल्ह्यात पेंच नदीवर जलविद्युत प्रकल्प आहे.

4 खनिज संपत्ती : नागपूर जिल्ह्यात मँगनीजच्या खाणी मोठ्या प्रमाणात असून, त्याचबरोबर या जिल्ह्यातील काही भागांत संगमरवर, चुनखडी, लोह खनिज, डोलोमाइट, टंगस्टन आणि दगडी कोळशाच्या खाणी आहेत.

५. उद्योग व व्यवसाय : या जिल्ह्यात सहकारी सूतगिरण्या, साखर कारखाने आहेत. वाडी, अंबाझरी येथे संरक्षण साहित्य म निर्मितीचा कारखाना आहे. नागपूर जिल्ह्यातील कन्हान, कामठी, नरखेड, कळमेश्वर, उमरेड, बुटीबोरी, रामटेक या सात ठिकाणी औद्योगिक वसाहती असून, बुटी बोरी येथे आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे. नागपूर जिल्ह्यात मिहान हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उदयास येत आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

६. राष्ट्रीय महामार्ग : नागपूर जिल्ह्यातून हजिरा-धुळे-कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६, वाराणसी-कन्याकुमारी हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ७, राष्ट्रीय महामार्ग क्रमांकह्न६९ आणि नागपूररत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ह्न २०४ गेलेला आहे.

नागपूर जिल्ह्याची वैशिष्ट्ये

  • नागपूर महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असून, येथे दरवर्षी राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरते.
  • नागपूर जिल्ह्यातील कोराडी व खापरखेडा ही ठिकाणे औष्णिक विद्युत निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत.
  • ‘केंद्रीय कापूस संशोधन केंद्र’ नागपूर येथे आहे.
  • नागपूर विद्यापीठाची स्थापना ४ ऑगस्ट १९२३ रोजी करण्यात आली असून, सध्या हे विद्यापीठ ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ’ या नावाने ओळखले जाते.
  • नागपूर जिल्ह्यात मोडतात. दगडी कोळसा मुबलक असलेले ‘कामठी’ व ‘उमरेड’ ही ठिकाणे
  • महाराष्ट्र राज्य खाण महामंडळाचे * नागपूर येथील दीक्षाभूमी प्रसिद्ध आहे. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या हजारो अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार करून दीक्षा घेतली. ,
  • नागपू येथे ‘अंबाझरीचा तलाव’ व ‘सीताबर्डीचा प्रेक्षणीय किल्ला आहे.
  • नागपूर जिल्ह्यात बोर अभयारण्य (नागपूर व वर्धा जिल्हा मिळून), पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प व बोर व्याघ्र प्रकल्प आहे.
  • नागपुरातील कामठी येथील सर्वदूर गाजलेले ड्रोन पॅलेस या बौद्ध धम्म मंदिराचे २३ नोव्हेंबर १९९९ ला उद्घाटन झाले. अतिशय सुंदर वास्तू असणारे हे मंदिर ड्रॅगन पॅलेस मंदिर म्हणून ओळखले जाते.
  • केंद्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेची (नीरी) स्थापना नागपूरमध्ये १९५८ मध्ये करण्यात आली असून, देशपातळीवर कार्य करणाऱ्या या संस्थेचे मुख्यालय नागपूर येथे आहे.
  • रामटेक येथील रामाचे मंदिर आणि संस्कृत विद्यापीठ प्रसिद्ध असून या ठिकाणी वाकाटक कालीन अनेक मंदिरे आहेत. ती वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहेत. या मंदिरांपैकी केवल नृसिंह मंदिरात दुसऱ्या चंद्रगुप्ताची मुलगी प्रभावती गुप्त या वाकाटक प्रवरसेनाच्या राणीचा शिलालेख आहे.
  • भारताचा मध्यवर्ती बिंदू झिरो माईल याच शहरात
  • महात्मा गांधीजींनी सन १९२० मध्ये असहकार आंदोलनाची सुरुवात याच शहरातून केली.
  • मराठीतील लोकप्रिय नाटककार राम गणेश गडकरी यांचे खिंडसी (तालुका सावनेर) येथे १९१९ मध्ये निधन झाले.
  • नागपूर येथील बुटीबोरी (तालुका हिंगणा) ही आशियातील सर्वांत मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे. ही वसाहतीची स्थापना १९९४ मध्ये करण्यात आली. येथे प्रामुख्याने कापड उद्योगातील कंपन्या (टेक्सटाईल युनिट्स) कार्यरत आहेत.
  • नागपूर जिल्ह्यात मिहान हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात आला असून या ठिकाणी भारतातील नामांकित कंपन्या आपले प्रकल्प उभारत आहेत.
  • नागपूर शहर हे संपूर्ण देशाचे मध्यवर्ती शहर असून या शहरातून देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेगाड्या जातात.
  • नागपूर जिल्ह्यात मार्च २०१९ मधे मेट्रो सेवा सुरु करण्यात आली.

सांख्यिकीक नागपूर – नागपुर जिल्हयातील तालुके

अ) भौगोलिक माहिती

१. क्षेत्रफळ = ९,८९७ चौ किमी.
२. जंगलाचे प्रमाण = २०.४५ % ३.
3.अभयारण्ये= बोर अभयारण्य (नागपूर व वर्धा जिल्ह्यामिळून) ४. राष्ट्रीय उद्याने= पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान
५. व्याघ्र प्रकल्प =पेंच व्याघ्र प्रकल्प व बोर व्याघ्र प्रकल्प

आ) प्रशासकीय माहिती

१. आयुक्तालय =नागपूर विभाग (कार्यालय नागपूर)
२. उपविभाग= ०७ काटोल, रामटेक, सावनेर, नागपूरह्न1
व नागपूरह्न२, मौदा व उमरेड

३. तालुके =१४ काटोल, रामटेक, सावनेर, हिंगणा,
नागपूर (शहर), नागपूर (ग्रामीण), उमरेड, कामठी, नरखेड, कळमेश्वरमौदा, भिवापूर, कुही, पारशिवणी.

४. पंचायत समित्या १४
५. महानगरपालिका ०१ =नागपूर महानगरपालिका
६. नगरपालिका १२
7 नगरपचायती ०६ =हिंगणा, मौदा, भिवापूर, कुही, महादुला पारशिवनी
८. ग्रामपंचायत ७७०
९. पोलीस मुख्यालय ०२ =नागपूर शहर पोलिस आयुक्तालय, नागपूर जिल्हा ग्रा. पोलिस अधिक्षक.
१०. पोलीस स्टेशनची संख्या शहर = २५, ग्रामीण २२

(इ) लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनुसार)

१. लोकसंख्या= ४६,५३,१७१
२. साक्षरता= ८९.५%
३. लिंग गुणोत्तर= ९४८
४. लोकसंख्येची घनता =४७०

तुम्हाला नागपुर जिल्ह्या संपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे अश्याच माहिती साठी MaharashtraBoardSolutions.Net ला नक्की भेट द्या.

Final Word: आम्हाला आशा आहे की तुम्हाला नागपुर जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Nagpur District Information In Marathi तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीला हा लेख नक्की शेअर करा आणि Maharashtra Board Solutions ला भेट द्यायला विसरू नका.

Leave a Comment