Maharashtra Board class 12 Marathi Yuvakbharati SolutionsChapter शोध (Shodh)

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter Solutions . शोध ( Shodh Notes ) Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter . शोध
12th Marathi Guide Prashn uttar Chapter . शोध Textbook Questions and Answers.

★ कृती

★ कृती – १. (अ) कारणे लिहा.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

(१) अनुने घर सोडलं, कारणl

उत्तर: अनुने घर सोडलं, कारण लग्न करण्यापूर्वी पाच वर्षे तिला फक्त स्वत:साठी जगायचं होतं.

(२) ‘जगाकडं पाहताना मला माझा चष्मा हवा’, असं अनु म्हणाली कारण

उत्तरः ‘जगाकडे पाहताना मला माझा चष्मा हवा’, असं अनु म्हणाली कारण जगाचं मूल्यमापन करायला तिला तिची स्वतंत्र नजर विकसित करायची होती.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

(३) अनुने डॉक्टर व्हावे असे आबांना वाटत होते, कारण

उत्तर: अनुने डॉक्टर व्हावे असे आबांना वाटत होते, कारण अनुची बुद्धी, कामावरची निष्ठा, स्टॅमिना या गोष्टी डॉक्टर होण्यासाठी पूरक होत्या.

कृती – ४. थोडक्यात उत्तरे लिहा.

(अ) घर सोडण्यामागचा अनुचा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

उत्तरः व. पु. काळे यांच्या ‘मी माणूस शोधतोय’ या कथासंग्राहातील ‘शोध’ ही कथा मानवी मनाचा थांग शोधण्याचा प्रयत्न करते. अनु हे या कथेतील प्रमुख पात्र. अनु ही काहीशी विक्षिप्त आहे. जगाच्या दृष्टीने वेडी असणाऱ्या अनुच्या हृदयात अपार मानवता ठासून भरली आहे. अफाट बुद्धिमत्ता, वैदयकीय क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी लागणारा पैसा, तुफान अभ्यास करण्याची तयारी एवढं भांडवल असतानाही डॉक्टर न बनता ती नर्स बनण्याचा निर्णय घेते. वडिलांच्या सुरक्षित घरात आरामात राहायचे आणि नंतर रीतसर लग्न करून संसार करणे हे तिला मान्य नाही. लग्नापूर्वीची पाच वर्षं ही तिला स्वत:ची म्हणून जगायची आहेत. या कालावधीत तिच्या आयुष्यात घडणाऱ्या

कोणत्याही निर्णयासाठी ती कोणालाही बांधिल नाही. तिच्या मते व्यक्ती नेहमीच स्वतःला स्वतः घडवत नाही. प्रत्येकावर कुणाचा ना कुणाचा पगडा असतो, कुणाच्या तरी विचारांची छाया पडलेली असते. अनुला असं वाटतं की स्वतःचा स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेला जीव जेव्हा दुसऱ्याचं ऐकतो त्याच क्षणी तो स्वतःचं अस्तित्व निसर्गानं जगाकडे पाहण्याची दिलेली स्वतंत्र नजर हरवून बसतो. म्हणूनच अनुला जगाकडं पाहताना स्वतः चा चष्मा हवा आहे. प्रत्येक वस्तूचं, घटनेचं व्यक्तीचं मूल्यमापन करण्यासाठी स्वतःची स्वतंत्र नजर विकसित करायची आहे. समाजात मिसळल्याशिवाय समाज कळत नाही अशी तिची धारणा आहे. तिच्या मते समाज एक व्यक्तीच आहे. या समाजव्यक्तीचं सत्य शोधण्यासाठी ती घरातून बाहेर पडते. नर्सचे प्रशिक्षण घेते आणि मुंबईत येऊन के. ई. एम. हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून रुजू होते आणि रुग्णसेवा करू लागते.

(आ) अनुला समाज कसा समजून घ्यायचा आहे, ते थोडक्यात स्पष्ट करा.

उत्तर : व. पु. काळे यांच्या ‘मी माणूस शोधतोय’ या कथासंग्रहातील ‘शोध’ ही एका अत्यंत संवेदनशील मुलीचे, भावविश्व, तिचा मनोव्यापार आपल्यापुढे उघडा करते. कथा नायिका आहे ‘अनु’ नावाची तरुण मुलगी. तिच्या हृदयात अपार मानवता ठासून भरली आहे. वडिलांचं सुरक्षित घर सोडून ती स्वत:ला शोधण्यासाठी घराबाहेर पडते. डॉक्टर बनण्यासाठी सगळ्याच गोष्टी पूरक असताना ती नर्स बनण्याचा निर्णय घेते. शाळा, शिक्षण, लग्न, संसार अशा चाकोरीत अडकण्यापूर्वी तिला समाजाकडे बघण्याची स्वतंत्र नजर विकसित करायची आहे. वडिलांच्या विचारप्रभावातून बाहेर पडण्यासाठी ती घर सोडते कारण जगाकडे पाहताना तिला स्वतःचा चष्मा हवा आहे. अनुला असं वाटतं की स्वतःचा स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेला जीव जेव्हा दुसऱ्याचं ऐकतो त्याच क्षणी तो स्वतंत्र नजर हरवून बसतो. तिच्या मते समाजात मिसळल्याशिवाय समाज समजतच नाही आणि व्यक्तीही कळत नाही. ती म्हणते समाज ही विशाल अर्थानं व्यक्तीच असते आणि व्यक्ती घटकरूपानं समाजच आहे. ती म्हणते या समाजाचं सत्य मला समजून घ्यायचं आहे. त्यासाठी ती नर्सिंगचा कोर्स करून के. ई. एम रुग्णालयात नर्स म्हणून रुजू होते.

(इ) कुतूहल, जिज्ञासा निर्माण करणाऱ्या कथेतील एका प्रसंगाचे वर्णन करा.

उत्तर: व. पु. काळे यांच्या ‘मी माणूस शोधतोय’ या कथासंग्रहातील ‘शोध’ ही कथा एका अत्यंत संवदेनशील मुलीचे भावविश्व आपल्यासमोर मांडते, या कथेची नायिका अनु ही मुंबईतील के. ई. एम. रुग्णालयात नर्स म्हणून सेवारत आहे. अनु ही स्वतंत्र विचारांची मुलगी आहे. घरातील सुरक्षित वातावरण सोडून ती समाजाचे सत्य जाणून घेण्यासाठी मुंबईत राहतेय. तिने स्वतःला मनापासून आपल्या कामात झोकून दिले आहे. आपल्या वर्तणुकीने तिने हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स, डीन, फिजिशीयन, मेटून या सर्वांचं मन जिंकलं होतं, अशा या मुंबईत राहणाऱ्या अनुकडे लेखक व त्याची पत्नी राहायला आलेले आहेत. लेखकाच्या या मुंबई मुक्कामात त्याचे स्नेही भिडे पती-पत्नी लेखकाला भेटायला येतात. घरी परत जाताना टॅक्सीसाठी सुटे पैसे गोळा करताना त्यांना एक रुपया कमी पडत असतो. लेखक स्वतःकडचे सुटे पैसे शोधतो. पण त्याच्याकडेही सुटे पैसे नसतात. अनुने स्वतःच्या टेबलावरच्या काचेखाली ठेवलेली एक रुपयाची नोट लेखकाची पत्नी भिडे दाम्पत्याला टॅक्सीसाठी देते. खरंतर एवढीशी ती एक रुपयाची नोट ! पण अनु त्या नोटेवरून रणकंदन माजवते. एका यः कश्चित नोटेसाठी ती एवढी का रागावली आहे हे लेखकाला कळत नाही.

या प्रसंगामुळे अनुच्या वागण्याविषयी प्रचंड कुतूहल वाचकांच्या मनात निर्माण होते. कारण एवढी समंजस असणारी अनु घरी आलेल्या पाहुण्यांवर केवळ एका रुपयाच्या नोटेसाठी अबोला का धरते याविषयी उत्कंठा वाढते आणि कथा पुढे वाचण्याची उत्सुकता निर्माण करते.

(ई) कथेला कलाटणी देणारा एक प्रसंग शब्दबद्ध करा.

उत्तर: ‘मी माणूस शोधतोय’ या कथासंग्रहातील ‘शोध’ ही कथा मानवी मनाचा थांग शोधण्याचा प्रयत्न करते. अनु हे या कथेतील महत्त्वाचे पात्र डॉक्टर बनण्यासाठी सगळ्या गोष्टी पूरक असतानादेखील वडिलांचे सुरक्षित घर सोडून, समाज समजून घ्यावा यासाठी ती मुंबईतील के. ई. एम. रुग्णालयात नर्सची नोकरी स्वीकारते. मुंबईत लेखक तिच्या घरी वास्तव्याला असताना लेखकाचे मित्र श्री. भिडे त्यांना सपत्नीक भेटायला
येतात. घरी जाताना टॅक्सीसाठी पैसे गोळा करताना एक लेखक अनुच्या टेबलावर रुपया कमी पडत असल्याने काचेखाली ठेवलेली नोट श्री भिडे यांना देतात. खरंतर ही क्षुल्लक गोष्ट! पण या सगळ्याची अत्यंत विक्षिप्त प्रतिक्रिया अनुकडून उमटते. ती त्या नोटेचा शोध घेण्याचे सुचवते आणि रात्री सगळ्यांबरोबर भिड्यांच्या घरी जायला निघते. भिड्यांनी जर ती नोट टॅक्सी ड्रायव्हरला दिली नसेल तर ती नोट परत घेता येईल हा विचार त्यामागे असतो. पण दुर्दैवाने भिडे यांनी ती नोट टॅक्सी ड्रायव्हरला दिलेली असते. त्यातल्यात्यात समाधानाची गोष्ट अशी की समोरच्या पोलीस स्टेशनमध्ये त्या ड्रायव्हरला लॉकअपमध्ये टाकण्यात आलेले असते, कारण त्याच्या गाडीखाली एक म्हातारा मनुष्य आलेला असतो. कदाचित ती नोट टॅक्सीवाल्याकडे तशीच असेल या आशेवर सगळेजण पोलीस स्टेशनला जातात. पण मधल्या कालावधीत टॅक्सी ड्रायव्हर समोरच्या हॉटेलात जाऊन मिसळ खाऊन आलेला असतो. मग सगळे हॉटेलवाल्याकडे जातात आणि तिथे ती नोट सापडते. संपतो आणि नाव नऊ इथे खरंतर कथेचा क्लायमॅक्स अनु त्या नोटेसाठी एवढे आकाशपातळ का करते याची उत्सुकता उरते. त्या नोटेवर सुनिता हे लिहिलेले असते. ही नोट म्हणजे एका आठ वर्षांच्या छोट्या पेशंटने अनुला दिलेली भेट असते. ती अत्यवस्थ असते. तिचा मृत्यू नक्की असतो. तिच्या शरीराला अनेक नळ्या जोडलेल्या असतात ज्याचा तिला प्रचंड त्रास होत असतो. जाणाऱ्या जीवाला निदान आयुष्याच्या शेवटच्या तासात तरी शांतपणे वेदनारहित राहता यावे या विचाराने अनु डॉक्टरांच्या परवानगीने त्या नळ्या काढते. अनुच्या या कृत्याची परतफेड म्हणून आपल्या खाऊच्या डब्यातील ती नोट अनुला तिच्या आईकडून मुलीच्या सांगण्यावरून भेटस्वरूपात मिळते. म्हणजेच या नोटेला भावनिक महत्त्व असते. अनुची ही संवेदनशीलता वाचक अनुभवत असताना अचानक टॅक्सी ड्रायव्हर अनुशी संवाद साधतो आणि म्हणतो, ‘ताई पेशंटमध्ये असं मन गुंतवणे त्रासदायक ठरू शकते. मी ही पॅसेंजरमध्ये कधी कधी मनाने गुतंतो पण

डेस्टिनेशन आल्यावर पॅसेंजर निघन जातो आणि मग

मग दुसऱ्या पॅसेंजरला सामोरे जायला मी तयार होतो आणि आधीच्या पॅसेंजरला विसरून जाण्याचा प्रयत्न करतो. ‘ यावर अनु प्रतिप्रश्न करते की, ‘सगळ्या गोष्टी विसरणं शक्य आहे का ?’ तेव्हा तो ड्रायव्हर खिन्नपणे म्हणतो, ‘तुझी एक नोट गेली तर ही अवस्था झाली. तू त्या नोटेचा | शोध घेत इथपर्यंत आली कारण तुझी वस्तू सापडण्याची शक्यता होती. पण माझी तर पोटची मुलगी हे जग सोडून कायमची निघून गेली. मी तिला कोठे शोधू ?’ कथेला इथे विलक्षण कलाटणी मिळते आणि इतका वेळ अनुभोवती फिरणारे कथेचे केंद्र ड्रायव्हर या पात्रावर केंद्रित होते. पोटच्या मुलीचे दुःख तटस्थतेने पचवणारा ड्रायव्हर वाचकांच्या अपार सहानुभूतीला पात्र ठरतो. वाचकांच्या काळजाला हात घालतो.

★कृती – ५. तुमच्या शब्दांत माहिती लिहा.

(अ) भिडे दाम्पत्याची सामाजिक बांधिलकी.

उत्तर : लेखकाचे मित्र असणारे भिडे दाम्पत्य लेखकाला भेटायला येतात. लेखक त्यावेळी मुंबईला कथा नायिका अनु हिच्या फ्लॅटवर थांबलेले असतात. रात्री घरी जाताना टॅक्सीला दयायला सुटे पैसे लागतील या विचाराने ते घरी परत जाताना आधीच सुटे पैसे गोळा करतात. इथेही त्यांचा सामाजिक बांधिलकीचा विचार स्पष्ट होतो की रात्री अपरात्री टॅक्सीवाल्याला सुटे पैसे देताना त्रास होऊ नये. खरंतर आधीच रात्रीचे साडे बारा झालेले असतात. घरी जाऊन निवांत झोप घेणे हे गरजेचे असते. अशा वेळी परतीच्या प्रवासात त्यांच्या टॅक्सीसमोर एक वृद्ध माणूस येतो. टॅक्सी ड्रायव्हरवर केस होते. त्याला लॉकअपमध्ये ठेवले जाते. इथे खरंतर दुसरी टॅक्सी करून घरी जाणे त्यांना सहज शक्य असते. पण या अपघाताला ड्रायव्हर जबाबदार नाही या गोष्टीचे ते एकमेव साक्षीदार असतात. म्हणून ते साक्ष देण्यासाठी एवढ्या रात्री ड्रायव्हरबरोबर पोलीस स्टेशनला जातात. तो ड्रायव्हर नवशिका आहे. सुशिक्षित आहे. हे त्यांचं निरीक्षण आहे. त्याच निरीक्षणाच्या आधारे टॅक्सी ड्रायव्हरच्या बाजूने ते पोलीस स्टेशनमध्ये खंबीरपणे उभे राहतात. आजच्या काळात माणुसकी अत्यंत दुर्मीळ झालेली

आहे. जो तो स्वकेंद्रित जीवन जगत आहे. टॉवर संस्कृतीत तर शेजारच्या घरी काय चाललंय हे ही माहीत नसते. अशा परिस्थितीत भिडे दाम्पत्य माणुसकीचे दर्शन घडवत अनोळख्या टॅक्सी ड्रायव्हरला मदत करण्यासाठी भर रात्री पोलीस स्टेशनला जातात यातून त्यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित होते.

(आ) टॅक्सी ड्रायव्हरचा स्वभावविशेष. :

‘शोध’ या व. पु. काळे यांच्या कथेतील अनु हे मध्यवर्ती पात्र आहे. पण तरीही कथेच्या शेवटी मात्र टॅक्सी ड्रॉयव्हरचे पात्र आणि त्याचे विचार हे कथेचा केंद्रबिंदू ठरतात. मृत्यूला काही तास शिल्लक असलेली लहान मुलगी, तिचा शारीरिक त्रास कमी केल्याबद्दल प्रेमाची भेट म्हणून एक रुपयाची नोट, आपल्या खाऊच्या डब्यातून काढून, अनुला देण्यासाठी आपल्या आईकडे देते. त्यामुळे अनुच्या दृष्टीने या नोटेला भावनिक मोल प्राप्त होते. नेमकी हीच नोट चुकून लेखक त्याच्या मित्राला टॅक्सीसाठी सुटे पैसे गोळा करून देतो. ही गोष्ट अनुला कळल्यावर मध्यरात्री ती जिवाचा आटापिटा करून नोटेचा शोध घ्यायला लेखकाबरोबर घराबाहेर पडते. त्या नोटेचा प्रवास लेखकाकडून मित्राकडे, तिकडून टॅक्सी ड्रायव्हरकडे आणि मग पुढे हॉटेलवाल्याकडे असा झालेला असतो. ती नोट ताब्यात घेतल्यावर अनु कृतकृत्य होते. लेखकही अपराधीपणाच्या भावनेतून मोकळा होतो. तेव्हा अत्यंत सामान्य वाटणारा टॅक्सी ड्रायव्हर लाखमोलाचे तत्त्वज्ञान अनुला सांगून जातो. तो म्हणतो, ‘पेशंटमध्ये एवढे मन गुंतवणे त्रासदायक ठरू शकते. मी ही पूर्वी मनाने एखादया पॅसेंजरमध्ये मन गुंतवायचो आणि तो पॅसेंजर टॅक्सीतून उतरून गेल्यावर प्रचंड पोकळी अनुभवायचो. आता मात्र कोणत्याही पॅसेंजरमध्ये मनाने न गुंतता कोऱ्या मनाने दुसऱ्या पॅसेंजरला सामोरे जातो आणि आधीच्या पॅसेंजरला विसरून जातो. ‘

अनु यावर त्याला प्रतिप्रश्न करते की, ‘सगळ्या गोष्टी विसरणे शक्य आहे का?’ तेव्हा टॅक्सी ड्रायव्हर म्हणतो, ‘तुझी एक नोट हरवली तर तू एवढी हवालदिल झालीस. नोट ही जड वस्तू, शोधली तर सापडणारी; पण माझी तर पोटची मुलगीच हे जग सोडून निघून गेली. मी तिला कुठे शोधू ? तुझा शोध तुलनेनं सोपा होता. माझ्या शोधाला यशच नाही.’

टॅक्सीड्रायव्हरच्या या उद्गाराने त्याच्या हृदयात लपलेलं दुःख :ख बाहेर पडते. एवढं मोठं दुःख पचवून त्याने वृत्तीमध्ये जोपासलेली तटस्थ वृत्ती पाहिली की तो एक साधा ड्रायव्हर न वाटता जगाचं सत्य उमगलेला तत्त्ववेत्ता वाटतो.

★ कृती – ६. स्वमत.

(अ) कथेच्या नायिकेचे स्वभावचित्र तुमच्या शब्दांत रेखाटा.
(सप्टें. २०२१; मार्च, २०२२ )

उत्तर: ‘मी माणूस शोधतोय’ या कथासंग्रहातील ‘शोध’ ही कथा मानवी मनाचा थांग शोधण्याचा प्रयत्न करते. अनु हे या कथेतील मध्यवर्ती पात्र ! अनु ही काहीशी विक्षिप्त आहे. मनस्वी

आहे. संवेदनशील आहे. जगाच्या दृष्टीने वेड्या असणाऱ्या अनुच्या हृदयात अपार करुणा आणि मानवता ठासून भरलेली आहे. अफाट बुद्धिमत्ता, वैदयकीय क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी लागणारा पैसा, तुफान अभ्यास करण्याची तयारी एवढ्या भांडवलावर डॉक्टर बनणे सहज शक्य असतानाही ती जाणीवपूर्वक नर्स बनण्याचा निर्णय घेते. वडिलांच्या सुरक्षित घराचा आश्रय सोडून प्रत्येक वस्तूचं, घटनेचं, व्यक्तीचं मूल्यमापन करायला स्वतःची ‘स्वतंत्र नजर’ विकसित करायची या विचारांनी ती भारलेली आहे. विचारांचा ठामपणा तिच्याकडे आहे. रीतसर लग्न करून तिला संसारात पडायचे नाही. लग्नापूर्वीची पाच वर्षे तिला फक्त स्वत:साठी जगायची आहेत. या पाच वर्षांत तिला एकूण समाजाचं सत्य समजून घ्यायचं आहे. या कालावधीत तिच्या आयुष्यात घडणाऱ्या कोणत्याही निर्णयासाठी ती कोणालाही बांधिल राहणार नाही असा तिचा निर्णय आहे. तिच्या मते व्यक्ती स्वत:ला घडवत नाही तर व्यक्तीच्या विचारांवर अनेकांच्या विचारांचा पगडा असतो. अनुला असं वाटतं की स्वतः चा स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेला जीव जेव्हा दुसऱ्याचं ऐकतो त्याच क्षणी तो स्वत:चं अस्तित्व, निसर्गानं जगाकडे पाहण्याची दिलेली स्वतंत्र नजर हरवून बसतो. समाजात मिसळल्याशिवाय समाज समजत नाही आणि समाज एक व्यक्तीच आहे. या समाजव्यक्तीचं सत्य शोधण्यासाठी ती घराबाहेर पडून मुंबईत येते. नर्सिंगंच प्रशिक्षण घेऊन के. ई. एम. रुग्णालयात नर्स म्हणून रुजू होते आणि रुग्णसेवा करू लागते. तिथेही आपल्या सेवाभावाने, सौहार्दवृत्तीने डॉक्टर्स, सर्जन्स, फिजिशिअन्स, डीन, मेटून आणि पेशंट अशा सगळ्यांची मने जिंकून घेते.

पेशंटमध्ये मनाने इतकी गुंतते की मरणाच्या दारात असणाऱ्या एक लहानग्या पेशंटने भेट म्हणून दिलेली एक रुपयाची नोट हरवते तेव्हा परत ती नोट शोधण्यासाठी भर रात्री घराबाहेर पडते. तिची ही संवेदनशीलता, स्वतंत्र विचारशक्ती, सामाजिक बांधिलकी, मनाचा हळुवारपणा, कामामध्ये असलेला प्रामाणिकपणा या सगळ्या गोष्टींमुळे ती सामान्य माणसांपेक्षा वेगळी ठरते.

(आ) एका रुपयाच्या नोटेव्यतिरिक्त कथेतील आणखी कोणकोणते शोध तुम्हाला महत्त्वाचे वाटतात, ते स्पष्ट करा.

उत्तरः ‘मी माणूस शोधतोय’ या कथासंग्रहातील ‘शोध’ ही कथा तिच्या वैशिष्ट्यपूर्ण शोध घेण्याच्या प्रक्रियेमुळे विशेष उल्लेखनीय ठरते. कथेमध्ये एकूण सात पात्र येतात. प्रत्येकजण कुठला ना कुठला तरी शोध घेताना आपल्याला दिसतो. याशिवाय प्रमुख पात्र अनु हिचे वडील ‘आबा’ यांचं एक वैशिष्ट्यपूर्ण पात्रही आहे. पूर्ण कथानक ‘अनु’ आणि ‘तिचा एक रुपयाच्या नोटेचा शोध’ याभोवती फिरत राहते. कथेच्या सुरुवातीला टॅक्सीसाठी सुटे पैसे शोधणारा लेखक व त्याची पत्नी यांचे वर्णन येते. अनुच्या घरी लेखकाला भेटायला आलेल्या भिडे दाम्पत्याला घरी जाताना सुटे पैसे नसतील तर त्रास होईल म्हणून लेखक पती-पत्नी यांचा भर रात्री घेतलेला हा सुट्ट्या पैशांचा शोध माणुसकीचे दर्शन घडवतो. अनु ही स्वतंत्र विचारांची नायिका समाजव्यक्तीचे सत्य शोधण्यासाठी घराबाहेर पडते आणि सुरक्षित घराचा आसरा सोडून मुंबईत नर्स म्हणून नोकरी करते. तिचा हा शोध थक्क करणारा आहे. भिडे दाम्पत्य आणि लेखक पती-पत्नी एक रुपयाच्या

नोटेच्या शोधात टॅक्सीवाल्याला शोधत पोलीस स्टेशन मध्ये जातात आणि इन्स्पेक्टरकडे टॅक्सी ड्रायव्हरच्या बाजूने साक्ष देऊन टॅक्सी ड्रायव्हरच्या निरपराधपणाची खात्री पटवतात हा माणुसकीचा शोध आहे.

(इ)कथेच्या ‘शोध’ या शीर्षकाची समपर्कता तुमच्या शब्दांत पटवून दया.

उत्तर:’शोध’ म्हणजे एखादया गोष्टीचा घेतलेला मागोवा मग हा शोध वस्तूचा असू शकतो किंवा मनाचा. ‘मी माणूस शोधतोय’ या कथासंग्रहाच्या शीर्षकातच शोध आहे. हा शोधच ‘शोध’ या कथेचा खरा नायक आहे. उत्तर:

कथेतील सगळीच पात्र कशाचा न कशाचा तरी शोध घेतात. पूर्ण कथानकच ‘अनु आणि तिचा एक रुपयाच्या नोटेचा शोध’ याभोवती फिरत राहते. कथेच्या सुरुवातीला टॅक्सीसाठी सुटे पैसे शोधणारा लेखक व त्याची पत्नी भेटतात. अनुच्या घरी वास्तव्य करणाऱ्या लेखकाला भेटायला आलेलं भिडे दाम्पत्य घरी जाताना सुटे पैसे नसतील तर टॅक्सी ड्रायव्हरला त्रास होईल म्हणून सुट्ट्या पैशाचा शोध घेताना आपल्याला भेटतात. कथेची नायिका अनु स्वत्वाचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडते. डॉक्टर बनणे शक्य असताना नर्स बनून रुग्णांमध्ये आनंद शोधते व जीवनाला परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करते.

अनुला एका मरणाच्या दारात उभ्या असलेल्या लहान मुलीने दिलेली नोट चुकून लेखकाकडून भिडे दाम्पत्याला दिली जाते. या नोटेचा भिडे, मग टॅक्सी ड्रायव्हर, मग हॉटेलवाला असा प्रवास होतो. या प्रवासात नोटेचा शोध घेणारी ही सगळी पात्र नकळतपणे चांगुलपणा, माणुसकीचा शोध घेत असतात. अशी ही कथा शोधाभोवतीच फिरते म्हणूनच ‘शोध’ हे कथानकाचे शीर्षक अतिशय सार्थक ठरते.

(ई )कथेतील टॅक्सी ड्रायव्हरने ‘जीवनातील वास्तव्याचा घेतलेला शोध’, तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर: (संदर्भासाठी प्रश्न ५ मधील ‘आ’ चे पहा)

कृती – ७. अभिव्यक्ती :

(अ) ‘स्वतःचा स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेला जीव दुसऱ्याचं ऐकतो त्याच क्षणी तो स्वतःचं अस्तित्व, निसर्गाने जगाकडं पाहण्याची दिलेली स्वतंत्र नजर हरवून बसतो’, या विधानाबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.

उत्तर : प्रत्येक माणूस जन्माला येतो तो स्वत:ची काही वैशिष्ट्य घेऊन. आई-वडिलांकडून मिळालेल्या जनुकानुसार त्याच्या शरीराची रचना घडलेली असते. माणसाची वर्तणूक जनुकांनुसार ठरते की त्याच्या भोवतालच्या सामाजिक वातावरणावरून ठरते; यावर अनेक संशोधकांनी संशोधन केले आहे. मानसशास्त्रात मानवी वर्तन निर्धारित करणाऱ्या सर्व घटकांचा सखोल अभ्यास केला जातो. उदा. मज्जासंस्था, अंतर्गत ग्रंथी, स्त्राव, प्रेरणा, भावना, विविध मानसिक प्रक्रिया इत्यादींच्या

अभ्यासातून एक सत्य बाहरे आले ते म्हणजे जन्मतः काही गुण माणसांत उपजत असले तरीही आजूबाजूच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रांचा प्रभाव माणसाच्या विचारांवर असतो. हा प्रभाव कधी कधी इतका जास्त असतो की मनुष्य स्वतःची विचारशक्ती हरवून बसतो. अशिक्षित समाजाच्या विचारांवर प्रभाव टाकणे म्हणूनच सहज शक्य असते. संपूर्ण दुनियेत याची उदाहरणे आढळतात. जेव्हा कोण्या एकाच्या विचाराने प्रभावित होऊन माणसं दृष्कृत्य करतात. उदा. हिटलरच्या विचारांनी प्रभावित होऊन नाझी हिंसाचार सगळ्या जगाने अनुभवला तर याच्या विरोधातील उदाहरण म्हणजे महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रभावित होऊन हजारो स्वातंत्र्यवीरांनी अहिंसेच्या लढ्यात उडी घेतली. रोजच्या जीवनातसुद्धा आपले गुरुजन, आपले माता-पिता, शेजारी-पाजारी यांच्या प्रभावाखाली येऊन आपण अनेक कृती करतो. कधी कधी तर अनेकांच्या प्रभावामुळे सारासार विचार करायची शक्तीच समाज हरवून बसतो आणि बुवाबाजी अंधश्रद्धा यात गुरफटत जातो. म्हणूनच माणूस विचार न करता जेव्हा दुसऱ्यांचे म्हणणं आंधळेपणाने स्वीकारतो तेव्हा समाजाचा स्वतंत्र बाणा संपुष्टात येतो.

(आ) कथेतील ‘टॅक्सी ड्रायव्हर’ हे पात्र तुम्हाला आवडण्याचे कारण स्पष्ट करा.

‘मी माणूस शोधतोय’ या व. पु. काळे लिखित कथासंग्रहातील ‘शोध’ या कथेची नायिका ही जरी अनु असली तरी दीर्घकाल लक्षात राहते ती एका सामान्य ड्रायव्हरची व्यक्तिरेखा, जीवनाचं खरं तत्त्वज्ञान त्याला उमगलं आहे. टॅक्सी चालवताना रोजच अनेक लोकांच्या तो संपर्कात येतो. काहींशी तो गप्पा मारतो. या गप्पांमधून स्वतःचं अनुभवविश्व तो समुद्घ करतो. कधी कधी एखादया माणसात तो मनाने इतका गुंतायचा की हा पॅसेंजर उतरूच नये असे त्याला वाटायचे. तो पॅ सेंजर उतरला की त्याला प्रचंड मानसिक पोकळी जाणवायची. पण या अवस्थेवर त्याने स्वअनुभवातूनच उपाय शोधला. त्याला उमगलं की असं भूतकाळात अडकणं म्हणजे भविष्यकाळ खराब करणे. तो सुशिक्षित आहे. विचारांची धार त्याच्याकडे आहे. एका मरणाऱ्या उत्तर:

पेशंटने दिलेली पण नंतर हरवलेली एक रुपयाची नोट शोधत शोधत कथा नायिका त्याच्यापर्यंत पोहोचते. तो नायिकेला समजावतो की तू नर्स आहेस, पेशंटमध्ये मन गुंतवणं योग्य नाही. तिला तो है ही सांगतो की माझ्याशी तुलना करता तुझा नोटेचा शोध सोपा होता. कारण माझी तर मुलगीच हे जग सोडून गेली आहे. तिचा शोध मी कुठे घेऊ ? काळीज कापणारे त्याचे हे शब्द मनाला सुन्न करतात. दुःखाला कवटाळून बसण्यापेक्षा जीवनात पुढची वाटचाल सुरू ठेवणे गरजेचे. हे सनातन सत्य त्याला उमगलेलं आहे. त्याच्या या तटस्थ मनोवृत्तीचे, खंबीर मानसिकतेचे भक्कम मनोबलाचे दर्शन घडते तेव्हा त्याच्या रूपात एका महान तत्त्ववेत्त्याचे दर्शन होते. म्हणून हा टॅक्सी ड्रायव्हर मला सामान्यातील असामान्य माणूस वाटतो.

(इ) ‘उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा, उत्तम नर्स होणं कठीण आहे.’ या विधानाबाबत तुमचे विचार लिहा.
(सप्टें., २०२१; मार्च, २०२२)

उत्तर: वास्तविक पाहता वैदयकीय क्षेत्रात कुशल डॉक्टरांइतक्याच प्रशिक्षित नर्सेसही आवश्यक असतात. व्याधीनं पिडलेल्या माणसांची, रुग्णांची सेवा वैदयकीय पेशात महत्त्वाची. रुग्णांची तपासणी करून रोगनिदान करण्याचे काम डॉक्टरांचे असते. डॉक्टरी पेशात ज्ञानाचा भाग महत्त्वाचा असतो, परंतु नर्सच्या पेशात मनाचा भाग अत्यंत महत्त्वाचा. औषधोपचार सुरू असताना सर्वात प्रथम नर्सला आपल्यासमोर असलेल्या रुग्णाला एक व्यक्ती म्हणून समजून घ्यावे लागते. त्याच्या आवडी-निवडी, स्वभावाची पारख करून नर्स पेशंटशी जवळीक साधते. हॉस्पिटलच्या वातावरणात नर्सचाच पेशंटला खूप मोठा आधार असतो. दररोज दहा किंवा त्यापेक्षा जास्त तास काम करणाऱ्या नर्सवर खूप ताण पडत असला तरीही ती नि:स्वार्थ भावनेने रुग्णसेवा करत असते.

समाजात मिसळल्याशिवाय समाज समजत नाही. समाजाच्या सर्वच स्तरातील व्यक्ती रुग्ण म्हणून हॉस्पिलटमध्ये असतात. पेशंटचा त्रास, त्याची तगमग, तळमळ समजून घेतल्यावर पेशंट व नर्समध्ये एक भावनिक नाते निर्माण होते. संवेदनशील कृतीने पेशंटला समजून घेण्याचे कार्य खऱ्या अर्थाने नर्सचे असते.

अंतःकरणात करुणा व मानवता असल्याखेरीज पेशंट खऱ्या अर्थाने समजत नाही. म्हणूनच उत्तम नर्स होणे हे उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा कठीण असते. डॉक्टरांचा स्टेथॉस्कोप रुग्णाच्या छातीपर्यंत पोहोचतो परंतु नर्सचा मायेचा हात काळजाच्या आत जातो. डॉक्टरचे कार्य संपले की नर्सचे कार्य सुरू होते. रुग्णसेवेचा खरा आनंद नर्सच्या पेशात अनुभवता येतो. पेशंटच्या औषधोपचाराबरोबर धीर देण्याचे आश्वासक कार्य तसेच पेशंटची वेदना समजून घेऊन त्याच्या मनावर हळुवारपणे मलम लावण्याचे कार्य नर्स करीत असते. पेशंटमध्ये मनाने न गुंतता डॉक्टर आपल्या ज्ञानाच्या आधारे उपचार करीत असतो. नर्स मात्र मनापासून रुग्णसेवा करीत एक वेगळा आनंद अनुभवत असते.

कृतिपत्रिका

प्र. १. खालील परिच्छेदाच्या आधारे दिलेल्या कृती सोडवा.

(अ) हॉस्पिटलमधील इमरजन्सी पेशंटसाठी वापरलेल्या जीवरक्षक प्रणाली

(१)……..

(२)……..

(३)………

उत्तर : ब्लड ट्रॅन्स्फ्यूजन, सलायन(सलाईन), ऑक्सिजन नळी

(आ) कारण लिहा.

● अनुने शेवटच्या घटका मोजत असलेल्या पेशंटच्या शरीरातील ऑक्सिजन नळी सोडून इतर नळ्या काढल्या, कारण••••••••••

उत्तरः उत्तरः अनुने शेवटच्या घटका मोजत असलेल्या पेशंटच्या शरीरातील ऑक्सिजन नळी सोडून इतर नळ्या काढल्या, कारण त्या नळ्यांमुळे पेशंटला असहय वेदना होत होत्या. असंही तिचा मृत्यू अटळ होता मग पृथ्वीवरील तिचे शेवटचे तास तरी वेदनारहित असावेत या विचाराने डॉक्टरांच्या सल्ल्याने अनुने त्या नळ्या काढल्या.

उतारा: एके दिवशी सकाळी एक आठनऊ
तुझ्यासाठी गंमत आणीन.’ तिनं मान हलवली.
(पाठ्यपुस्तक पृष्ठ. क्र. ७५)

प्र. २. कोण कोणास म्हणाले.

(१) ‘ताई थँक्यू’. •••••••••••••••••

(२)’ मी उदया भेटेन’.•••••••••••••••

(३) ‘फार तर तीन चार तास काढेल’. •••••••••••

(४) ‘शेवटचे काही तास तिला सुखानं तरी जगू दे ना’. •••••••••

प्र. ३. स्वमत.

●भारतातील आरोग्य व्यवस्था आणि सामान्य माणूस याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.

उत्तरः आपल्या देशात सरकारी वैदयकीय सेवांपेक्षा खाजगी दवाखाने व रुग्णालये जास्त आहेत. यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागांत खाजगी डॉक्टरांचाच प्रभाव अधिक आहे. त्याचबरोबर वैदयकीय क्षेत्रात विशेषीकरण म्हणजे स्पेशलायझेशन सुरू झाल्यापासून वेगवेगळ्या अवयवांसाठी वेगवेगळे डॉक्टर आहेत. बऱ्याच वेळेला सामान्य माणसांच्या मनात त्यामुळे प्रचंड संभ्रम निर्माण होतो. इतर राज्यांशी तुलना करता महाराष्ट्रात देशातील सर्वांत जास्त डॉक्टर्स आणि परिचारिका आहेत.

परंतु खाजगी इस्पितळात वैदयकीय सेवांसाठी प्रचंड फी आकारली जाते. हा खर्च सामान्य माणसाच्या कुवतीबाहेरचा ठरतो. आजही कुपोषण, फ्ल्यू, डेंगी यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव वरचेवर समाजात दिसून येतो. आता तर जोडीला करोनासारखा(कोविड-19) रोग आला आहे. सरकारी इस्पितळांची अवस्था म्हणजे अतिशय गर्दी आणि त्यामानाने डॉक्टरांची संख्या कमी अशी असल्याने आरोग्य सेवेवर प्रचंड ताण पडतो. शिवाय स्वच्छतेच्या बाबतीत एकूणच समाज उदासीन असल्याने ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसते. याचाच

परिणाम म्हणून सरकारकडून ‘स्वच्छ भारत’ अभियान
सारखे उपक्रम राबवण्यात आले आहेत. आपला समाज वैयक्तिक स्वच्छतेच्या बाबतीत विशेष काळजी घेत नाही त्यामुळे संसर्गजन्य रोग, अस्वच्छतेमुळे होणारे रोग यांचेही प्रमाण वाढले आहे. निकृष्ट दर्जाच्या अन्नाच्या सेवनामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत. या सगळ्यांचे दुष्परिणाम आज आपण कोविड 19 च्या काळात भोगतो आहोत. पसरत जाणाऱ्या या व्हायरलला थांबवणे विशेषतः झोपडपट्टीत वेगाने पसरणाऱ्या या रोगाला आळा घालण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. एकूणच भारतीय समाज स्वतःच्या आरोग्याविषयी उदासीन आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते. –

प्र. ४. अभिव्यक्ती :

● समाधानासाठी आणि नशिबाचा एक टक्का असतो त्याच्यासाठी’ या ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. उत्तरः समाज समजून घ्यायचा या ध्येयाने भारलेली कथानायिका ‘अनु’ ही शोध या कथेतील मध्यवर्ती पात्र होय. सेवाभावी वृत्तीने रुग्णांची सेवा करण्यासाठी तिने अवघं आयुष्य बांधून घेतलंय. ती मनाने पेशंटमध्ये गुंतलेली असते. अशा वेळी एके दिवशी तिच्या हॉस्पिटलमध्ये शेवटच्या घटका मोजणाऱ्या लहान ‘हे सगळे अर्थात नातेवाईकांच्या मुलीला भरती केलं जातं.

अत्यवस्थ पेशंट दवाखान्यात आल्यावर बऱ्याच वेळा डॉक्टरलासुद्धा माहीत असतं की याचा जीव वाचणं शक्य नाही. पण वैदयकीय पेशाला अनुसरून शक्य तितके उपाय रुग्णावर करणे हे डॉक्टरांचे कर्तव्य असते. या कथेतील या लहान पेशंटला ब्लड ट्रॅन्स्फ्यूजन, सलाईन, ऑक्सिजन या सर्व जीवरक्षक प्रणालींचा आधार दिला जातो. काही वेळेला नशीब बलवत्तर असेल तर मरणासन्न अवस्थेतून रुग्ण बाहेर आल्याची अनेक उदाहरणे आहेत. तर काही वेळेला या सर्वांचा काहीच उपयोग होणार नाही हे माहीत असतानाही पेशंटच्या समाधानासाठी हे करावेच लागते असे नायिका दु:खाने म्हणते.

● लेखक परिचय

व. पु. काळे उर्फ वसंत पुरुषोत्तम काळे हे मराठी भाषेतील सुप्रसिद्ध कथालेखक, निबंधकार, कादंबरीकार, नाटकककार होय. कथाकथनाचे त्यांचे अनेक कार्यक्रम अजरामर झाले. मरगळलेल्या मनाला नवऊर्जा देणारी त्यांची लेखनशैली त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळेपण अधोरेखित करते. कथा आकर्षकपणे सांगण्याची त्यांची कथनशैली विलक्षण होती. ‘वन फॉर द रोड’, ‘ऐक सखे’, ‘मायाबाजार’, ‘स्वर’,

गुलमोहर’, ‘वलय’, ‘मी माणूस शोधतोय’ यांसारखे त्यांचे कथासंग्रह सुप्रसिद्ध आहेत. ‘ही वाट एकटीची’, ‘पार्टनर’ या कादंबऱ्या तसेच ‘रात्र नको चांदणी’ हे नाटक ही त्यांची इतर साहित्य संपदा.

आकाशवाणीवर त्यांनी सादर केलेली नभोनाट्येही विशेष गाजली. महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, पु. भा. भावे पुरस्कार, फाय फाऊंडेशनचा पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे. वपुंच्या कथा-कांदबऱ्यांमधील काही वाक्ये इतकी भन्नाट आहेत की एकेक वाक्य कांदबरीचा अवघा अवकाश उलगडून जातात. उदा. ‘कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड हे रक्तात असावं लागतं कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही’. किंवा ‘माणूस अपयशाला घाबरत नाही पण अपयशाचं खापर फोडायला काहीच नाही मिळालं तर? याची त्याला भीती वाटत असते’. यांसारखी त्यांची वाक्ये भेटवस्तूंच्या दुनियेत, सुभाषितांच्या राज्यात, सुविचारांचा प्रांगणात अजरामर ठरली.

कथाशय:

‘मी माणूस शोधतोय’ या कथासंग्रहातील ‘शोध’ ही कथा मानवी मनाचा थांग शोधण्याचा प्रयत्न करते. ‘अनु’ हे या कथेतील प्रमुख पात्र. अनु ही काहीशी विक्षिप्त आहे. पण जगाच्या दृष्टीने वेडी असणाऱ्या अनुच्या हृदयात अपार मानवता आणि करुणा ठासून भरली आहे. अफाट बुद्धिमत्ता, वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी लागणारा पैसा, तुफान अभ्यास करण्याची तयारी एवढं भांडवल असतानाही ती डॉक्टर न बनता नर्स बनण्याचा निर्णय घेते.

| वडिलांच्या सुरक्षित घराचा आश्रय सोडून, प्रत्येक वस्तूचं, | घटनेचं, व्यक्तीचं मूल्यमापन करायला स्वतःची स्वतंत्र नजर | तयार करण्याच्या विचारांनी ती भारलेली आहे. समाजात मिसळल्याशिवाय समाज कळत नाही अशी तिची धारणा आहे. तिच्या मते समाज एक व्यक्तीच आहे. या समाजव्यक्तीचं | सत्य शोधण्यासाठी ती घरातून बाहेर पडते. मुंबईत येऊन के. ई. एम. हॉस्पिटलमध्ये नर्स बनून रुग्णसेवा करू लागते. | मुंबईत आल्यानंतर उतरण्यासाठी अनुची खोली हक्काने उपलब्ध असल्याने लेखक नेहमीच मुंबई मुक्कामात अनुच्या घरी उतरतो. अशाच एका भेटीत तो अनुकडे उतरला असतो. लेखकाच्या या मुंबई मुक्कामात त्याचे स्नेही; भिडे पती-पत्नी त्यांना भेटायला जातात. त्यांना घरी परत जाताना टॅक्सीसाठी सुटे पैसे गोळा करताना एक रुपयाची नोट कमी पडते. त्यामुळे |लेखक अनुच्या टेबलावरील काचेखाली ठेवलेली नोट त्या मित्राला देतो. एवढीशी ती एक रुपयाची नोट! पण अनु त्यावरून रणकंदन माजवते. ती एवढी का रागावली आहे हे लेखकाला कळतच नाही.

तिचा एकूण अवतार पाहता लेखक आणि त्याची पत्नी शेवटी | भिडे यांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतात. जर भिड्यांनी ती नोट टॅक्सीवाल्याला दिली नसेल तर ती परत घेता येईल असा त्या दोघांचा विचार होता. पण दुर्दैवाने भिड्यांनी ती नोट टॅक्सीवाल्याला दिली होती. त्या टॅक्सीवाल्याच्या गाडीसमोर एक म्हातारा आल्याने भिड्यांच्या घराशेजारी असणाऱ्या पोलीस स्टेशनमध्ये टॅक्सीवाल्याला ठेवण्यात आले होते. कदाचित त्याच्याकडे ती नोट तशीच असेल या आशेवर सगळे जण पोलीस स्टेशनला जातात. पण मधल्या कालावधीत टॅक्सीवाल्याने समोरच्या हॉटेलवाल्याला ती नोट दिलेली असते. मग पुन्हा एकदा सगळे हॉटेलवाल्याकडे जातात. सुदैवाने त्याच्याकडे ती नोट सापडते आणि सगळेजण निश्वास सोडतात. अनु अत्यंत प्रेमाने ती नोट घेते, त्या नोटेवर बॉलपेनने ‘सुनीता’ असं नाव लिहिलेलं असतं. सगळेच जण विस्मयचकित होतात. या नोटेत अनु एवढी भावनिकदृष्ट्या का गुंतली आहे हेच सगळ्यांना समजत नाही. तेव्हा अनु त्या नोटेची कहाणी उलगडते.

नर्स म्हणून काम करताना एकदा लहान मुलांच्या वॉर्डमध्ये | तिची ड्युटी लागलेली असते. तिथे आठ नऊ वर्षांची मुलगी अॅडमिट झालेली असते. तिच्या जगण्याची आशा सगळ्यांनीच सोडलेली असते. तिच्या पायाला हाताला अनेक नळ्या जोडलेल्या असतात. नाकात ऑक्सिजनची नळी असते. त्या अभागी लहान जीवाला या नळ्यांमुळे असह्य वेदना होत असतात. तिच्या यातना कमी व्हाव्यात म्हणून अनु ऑक्सिजनची नळी सोडून इतर नळ्या डॉक्टरांच्या परवानगीने काढून टाकते आणि त्या मुलीच्या चेहऱ्यावर अपार समाधान पसरते. ती कृतज्ञतेपोटी अनुला ‘थँक्यू ताई’ असे म्हणते. ती मुलगी अशीही जगणार नव्हतीच मग आयुष्याचे शेवटचे काही तास तरी तिने सुखाने जगावे म्हणून अनु ही कृती करते. –

दुसऱ्या दिवशी अनु ड्युटीवर जाते. पण तोपर्यंत ती मुलगी गेलेली असते. प्राण सोडताना त्या छोट्या मुलीने म्हणजे सुनीताने आपल्या खाऊचा रुपया अनुला दयावा अशी तिच्या आईला विनंती केलेली असते. हीच ती रुपयाची नोट परत मिळवायला अनुसकट सगळ्यांनी जीवाचा एवढा आटापीटा केलेला असतो. टॅक्सीवाला ही हकीगत ऐकून अनुला सल्ला देतो की, ताई असं पेशंटमध्ये मन गुंतून चालणार नाही. तो अनुला म्हणतो, ‘आमच्याही टॅक्सीत एखादा माणूस असा येतो की त्याने टॅक्सीतून उतरूच नये असं वाटतं पण डेस्टिनेशन आलं की माणसं निघून जातात. मग आम्ही नव्या पॅसेंजरचं स्वागत करायला सज्ज होतो. तृ ही अशीच वाग. फक्त कॉट नंबर लक्षात ठेव. कॉटेवर कोण झोपलंय याचा विचार करायचा नाही.’ अनुही त्या टॅक्सीवाल्याला विचारते ‘सगळ्याच गोष्टी विसरता येतात का ?’ त्यावेळी टॅक्सीवाला खिन्नपणे म्हणतो, ‘तुझी एक नोट गेली तर ही अवस्था झाली. तिला शोधत तू इथपर्यंत आलीस पण माझी तर पोटची मुलगी जग सोडून गेली तेव्हा मी काय केलं असेन ?’

अशी ही भावविभोर कथा आरंभापासून मनाचा ठाव घेते. विविध प्रसंगांतून कथानकाला कलाटणी मिळत कथेत एक भावस्पर्शी नाट्य तयार होते. ‘अनु आणि तिचा एक रुपयाच्या नोटेचा शोध’ याभोवती सगळे कथानक फिरत राहते आणि कथेच्या शेवटी रहस्याचा उलगडा होतो. कथेचा विषय, पात्रं, प्रसंग आणि रोजच्या जीवनव्यवहाराशी संबंधित संवाद हे सगळंच वैशिष्ट्यपूर्ण आहे.

कठीण शब्द :

इमानदार – प्रामाणिक (honest), स्नेह प्रेम (love, affection), बापडी बिचारी (helpless ) रिवाज प्रथा, रूढी ( custom, tradition), विक्षिप्त – तऱ्हेवाईक, विचित्र (strange, whimsical), लचांड कटकट (an impediment), सवलत आगमन सूट (discount), येणे (arrival), व्याधी आजार (a disease), खुंटणे संपणे, थांबणे (to stop, to be obstructed), पिडणे – त्रासणे (to give pain, to afflict), माफक – योग्य (moderate), पेशा व्यवसाय (an occupation), सालस स्वभावाचा (simple, modest), मनस्ताप होणारा त्रास (regret), नवशिका नुकतचं प्रशिक्षण घेतलेला (beginner), निमित्त कारण, सबब (reason), दगावणे – मरण पावणे (to be lost, dead), सतावणे – त्रास देणे (to harass) सरल मनाला – – – – –

संकल्पना :

| संस्कृत सुभाषित :

लालयेत पंच वर्षाणि दश वर्षाणि ताडयेत !
प्राप्तेषु षोडशे वर्षे पुत्रे मित्रवदाचरेत्

अर्थ: पाच वर्षांपर्यंत बालक घरात लाडका असतो, दहा वर्षांनंतर शिस्त लावण्यासाठी त्याला प्रसंगी मारही दयावा लागतो. परंतु बालक सोळा वर्षांचा झाल्यावर त्याच्याबरोबर मित्राप्रमाणे आचरण करावे.

वाक्प्रचारांचा अर्थः

जिव्हारी लागणे-मनाला लागणे.

रामराम ठोकणे -निरोपाचा नमस्कार करणे.

कलाने चालणे -एखादयाच्या मर्जीनुसार चालणे.

पगडा असणे- प्रभाव असणे.

अंतर असणे-फरक असणे.

बिऱ्हाड असणे-संसार मांडणे.

निवारण करणे- संकट दूर करणे, समस्या सोडवणे.

संकोच वाटणे -लाज वाटणे.

जबानी देणे-साक्ष देणे.

कीव येणे-दया येणे.

नक्षत्रासारखी-नक्षत्र, चांदणं, तारे यांच्याएवढी सुंदर.

पाठात आलेले इंग्रजी शब्दांचे अर्थ

| नर्स (nurse) – परिचारिका, स्टॅमिना (stamina ) ऊर्जा, शक्ती, कार्यक्षमता, स्टेथॉस्कोप (stethoscope)हृदयाचे ठोके मोजण्याचे यंत्र, कॅलिबर (caliber) – क्षमता, डीन (dean ) – अधिष्ठाता, मेट्रन ( matron)- हॉस्पिटल वैदय, व्यवस्थापक, फिजिशियन (physician)शिअर मॅडनेस (sheer madness ) – निव्वळ मूर्खपणा, आय अॅक्सेप्ट धीस कमेंट (I accept this comment)मला तुमचे म्हणणे मान्य आहे, व्हेंटिलेटर ( ventilator)ऑक्सिजन पुरवणारे जीवरक्षक यंत्र, होप ( hope ) – आशा, ऑब्लाईजड (obliged) – कृतकृत्य होणे, उपकृत होणे, ब्लड ट्रॅन्स्फ्यूजन (blood transfusion) – रक्त संक्रमण, सलायन (सलाईन) ( saline) – जीवरक्षक द्रव्य, मार्बल (marble)- संगमरवर, काऊंटर (counter) – हिशोब करण्याचे टेबल, पॅसेंजर (passenger) – प्रवासी, डेस्टिनेशन (destination) – इच्छित स्थळ, गंतव्य स्थान – 1

Leave a Comment