मराठी : भाषा संवादाचे साधन – Marathi Bhasha

भाषा : संवादाचे साधन (मराठी)

आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल, तर ती गोष्ट आपण मागतो. ‘मला पाणी पाहिजे’, ‘मला पुस्तक हवे आहे’ असे आपण सांगतो. आपण बोलून दाखवतो किंवा खुणा करून दाखवतो.

आपल्या हातांची ओंजळ करून ती ओठांजवळ नेऊन दाखवतो. त्यावरून ‘पाणी हवे आहे’ असे आपण सांगतो. मित्राचा निरोप घेताना आपण हात हलवतो. आपल्या मनात अनेक विचार येतात, ते आपण शब्दांनी बोलून दाखवतो.

आपल्या मनात अनेक भावना येतात. कधी आपण आपुलकी दाखवतो. कधी आपणं रागावतो. अशा भावना आपण शब्दांनी बोलून दाखवतो. आपल्या मनात अनेक कल्पना येतात. त्याही आपण शब्दांतून व्यक्त करतो. आपण एकमेकांशी बोलतो. कधीतरी एखादी व्यक्ती समूहाला उद्देशून बोलते. अशा बोलण्यातून आपल्याला मन मोकळे केल्याचे समाधान मिळते.

पशुपक्ष्यांच्या जगात डोकावले तर काय दिसेल? चिमणी चिवचिव करते. कावळा काव काव करतो. गाय हंबरते. सिंह गर्जना करतो. घोडा खिंकाळतो. हे पशुपक्षीसुद्धा आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी विविध आवाज काढतात. ती पशुपक्ष्यांची भाषाच असते. .भाषा म्हणजे विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन असते.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

तुम्हाला हे आर्टिकल नक्कीच आवडले असेलच अशी मला खात्री आहे असेच मराठी आर्टिकल वाचण्यासाठी आमच्या maharashtraboardsolutions.net वेबसाईट ला नक्की भेट द्या इथे तुम्हाला सर्व Questions Paper, Digest, maharashtra board solutions, Marathi Books, Maharashtra Board Textbook Solutions आणि आणखी या संबंधी सर्व माहिती मिळेल.

Leave a Comment