Maharashtra Board class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9: समुद्र कोंडून पडलाय ( Samudra Kondun Padlay )

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 9. Solutions समुद्र कोंडून पडलाय ( Samudra Kondun Padlay Notes) Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 9 समुद्र कोंडून पडलाय

12th Marathi Guide Prashn uttar Chapter 9 समुद्र कोंडून पडलाय Textbook Questions and Answers

कृती

Telegram group मध्ये जॉईन व्हा

कृती- १. (अ) खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.

(१) उंचच उंच पण अरुंद बालपण –

उत्तर बत्तिसाव्या मजल्यावरील मुलाकडे पाहिल्यावर उंचावर असूनही त्याच्या बालपणाला असणारी मर्यादा कवीला अस्वस्थ करून सोडते. उंचच उंच इमारतींच्या विशिष्ट मर्यादेत अवखळ बाल्यही दिवसेंदिवस अरुंद होत चाललं आहे. बाहेरचे विश्वही खिडकीच्या गजाआडून त्याला पहावे लागत आहे.

(२)डोळ्यांत उतरलेलं थकव्याचं आभाळ-

Telegram group मध्ये जॉईन व्हा

उत्तर : महानगरातील जीवनाचं वास्तव कवीने आशयगर्भ शब्दांतून रेखाटले आहे. धावपळीच्या व्यस्त जीवनात
सायंकाळच्या वेळी प्रत्येकाच्याच डोळ्यात थकव्याचं आभाळ उतरलेलं आहे याची जाणीव कवीला होते. दिवसभराची धावपळ केल्यावर सायंकाळी प्रत्येकाची अवस्था थकल्यासारखी झाली आहे.

(३) स्टेशनवरल्या बाकाएवढं मुलाचं बालपण-

उत्तर : शहरातील गर्दीमध्ये रेल्वे स्टेशनवरच्या एवढ्याशा बाकावर झोपेसाठी बालकांना आश्रय घ्यावा लागत आहे. वयस्कांच्या कार्यव्यस्त जगात स्टेशनवरच्या ह्या बाकाएवढंच मुलाचं बालपण मर्यादित झालं आहे. खेळण्या-बागडण्याच्या दिवसांतील बालपण स्टेशनवरच्या बाकावर पाय दुमडून कसंबसं विसावलेलं आहे.

(आ) कारणे लिहा.

(१) कवीला समुद्र संत्रस्त वाटतो, कारण••••

उत्तर : कवीला समुद्र संत्रस्त वाटतो, कारण पिंजारलेली दाढी, झिंज्या.

(२) समुद्र अस्वस्थ होतो, कारण••••

उत्तर : समुद्र अस्वस्थ होतो, कारण शहरातील आयुष्याच्या विचाराने.

(३) समुद्र शिणून जातो, कारण••••

उत्तर : समुद्र शिणून जातो, कारण इमारतीच्या पलीकडच्या रस्त्यांवर थकलेल्या माणसांचे पाय, बसची चाकं दिसतात.

कृती – ३. खालील ओळींचा अर्थ लिहा.

समुद्र अस्वस्थ होऊन जातो .
शहराच्या आयुष्याच्या विचाराने.
तेव्हा तो मनांतल्या मनात मुक्त होऊन फिरूं लागतो
शहरातल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून
उशिरापर्यंत रात्रीं तो बसलेला असतो
स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्य
रुळांवरील रहदारी पाहत,
हातांवर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी.

उत्तर : प्रस्तुत कवितेतील समुद्र हा जीवनाचे प्रतीक आहे. प्रत्येक
शहरातील महानगरातील मानवी जीवन विशिष्ट अशा मर्यादांमध्ये अडकले आहे. शहरातील आयुष्याच्या, दैनंदिन जगण्याच्या विचाराने सारे मानवी जीवनच अस्वस्थ झाले आहे याची जाणीव कवीला झाली आहे. ठराविक, साचेबंद, कार्यव्यस्त आयुष्यात सर्वजणांची धावपळ सुरू आहे. शहरातल्या दैनंदिन धावपळ, गर्दीला कसलाच अंत नाही. सर्वजण दैनंदिन व्यापात मग्न आहेत. कधीतरी मनातल्या मनात मुक्त होऊन शहरातल्या प्रत्येक रस्त्यावर, वस्त्यांवर रात्री उशिरापर्यंत तो फिरतो. शेवटी थकवा आल्यानंतर स्टेशनवरच्या बाकावर जाऊन रात्री एकटाच बसतो. रात्र होऊनही समोरच रुळांवरील रहदारी (गाड्यांची व माणसांची) हातावर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी हताशपणे पहात बसतो. त्याचे अर्धमिटले डोळे थकवा व जागृतीचे प्रतीक आहेत. निवांत अशी झोपही रहदारीने त्याच्या वाट्याला आलेली नाही.

कृती – ४. काव्यसौंदर्य.

(अ) ‘त्याला आठवतं त्याच्याच शेजारी पाय मुडपून कसंबसं झोपलेलं एखादं मूल, ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाकाएवढं, आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी’ या ओळींमधील विचारसौंदर्य स्पष्ट करा. (सप्टें., २०२१)

उत्तर: मराठीतील सुप्रसिद्ध कवी वसंत आबाजी डहाके यांच्या ‘समुद्र कोंडून पडलाय’ या कवितेतील प्रस्तुत पंक्ती आहेत. महानगरातील मानवी जीवनाच्या मर्यादांची जाणीव कवीने या कवितेतून व्यक्त केली आहे. कार्यव्यस्त महानगरातील विश्वात प्रत्येकजण स्वतःमध्येच मग्न आहे. आजूबाजूच्या विश्वाचीही फारशी दखल न घेण्याची मानवाची वृत्ती आहे. स्टेशनवरच्या बाकड्यावर त्याच्याच शेजारी झोपलेल्या लहान मुलाकडे त्याचे लक्ष जाते. पाय मुडपून अगदी कमीतकमी जागेत ते मूल कसंबसं झोपलेलं आहे. त्याचं अवखळ बालपणही महानगराच्या वास्तवात होरपळून गेलं आहे. स्टेशनवरच्या त्या बाकाएवढं त्याचं बालपणही सीमित झालं आहे. मुक्तपणे खेळण्याबागडण्याच्या बालपणाचाही बहुधा त्याला विसर पडला आहे. कार्यव्यस्त जीवनात बहुधा त्याला आपल्या बालपणाच्या मर्यादांची जाणीव असावी.

म्हणूनच तो पाय मुडपून कमीतकमी जागेत बाकावर झोपलेला आहे. शहरातील या प्रखर वास्तवात त्याचे बालपण होरपळते आहे. परंतु तरीही जीवनाची गाडी रडत-रखडत सारखी धावत आहे. मुक्तपणे बागडायला अंगण नसणाऱ्या संस्कृतीत एवढ्याशा बाकावर झोपेसाठी बालकांना आश्रय घ्यावा लागत आहे. शहरी संस्कृतीत दिवसेंदिवस बालपणही बकाल होत चालले आहे याची जाणीव कवीला अस्वस्थ करून सोडते.

शहरातील वास्तवाच्या अनुभवातून आलेला अस्वस्थपणा मांडणे ही वसंत आबाजी डहाके यांच्या कवितेची खासियत आहे. ‘समुद्र कोंडून पडलाय’ या कवितेत समुद्राच्या प्रतीकातून मानवी जीवनाच्या मर्यादांना कवीने अधोरेखित केले आहे. शहरातील बालपणाची अस्वस्थ करून देणारी जाणीव प्रस्तुत कवितेत आहे. वाचता वाचता विचार करायला लावणारी अशी प्रस्तुत कविता आहे.

(आ) ‘समुद्र खिन्न हसतो आणि शिणलेल्या पापण्या मिटून घेतो.

त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची वयस्कांच्या शहरातील

या ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.

उत्तर : ‘समुद्र कोंडून पडलाय’ या वसंत आबाजी डहाके यांच्या कवितेतील प्रस्तुत पंक्ती आहेत. महानगरातील कार्यव्यस्त वयस्कांच्या जगात दिवसेंदिवस बालपणही बकाल होत चालले आहे याबद्दलची अस्वस्थ करणारी जाणीव प्रस्तुत कवितेत आहे.

समुद्र म्हणजे अथांग पाणी आणि पाणी म्हणजेच जीवन. प्रस्तुत कवितेतील ‘समुद्र’ हा मानवी जीवनाचे प्रतीक आहे. कवितेतील समुद्राच्या प्रतीकातून कवीने मानवी क्रियांकडे आपले लक्ष वेधले आहे. दैनंदिन जीवनातील धावपळीने या शहरातील प्रत्येकजण शिणलेला आहे. महानगरातील सर्वांची ही शिणलेली अवस्था पाहून मानवी जीवनाबद्दल समुद्र खिन्नपणाने हसला आहे. प्रत्येकाची जगण्यासाठीची ही धावपळ पाहून कवीचे मन दुःखी, कष्टी होते. वयस्कांच्या या शहरात अनेक मुलांचे बालपणही आक्रसून गेले आहे.

स्टेशनवरच्या बाकड्यावर पाय मुडपून कसंबसं झोपलेल्या त्या मुलासारखीच अनेकांच्या बालपणाची अवस्था झाली आहे. निरागस बाल्य वास्तवाच्या होरपळीत कुठेतरी हरवले आहे. इथल्या प्रत्येकाच्या मनात फक्त स्वतःचा आणि स्वतःचाच विचार सुरू आहे. इतरांचा किंचितही विचार न करणारी वृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मोठ्यांच्या कार्यव्यस्त जगात बकाल होत जाणारे बाल्य कवीला अधिकच व्यथित करते. शहरातील साऱ्यांच्याच बालपणाविषयीची काळजी, चिंता कविमनाला सतावते. शहरी जीवनातील मर्यादा, बालकांविषयीची बेदरकार वृत्ती कवीला अस्वस्थ करते.

★ कृती – ५. रसग्रहण.

प्रस्तुत कवितेतील खालील पदयपंक्तींचे रसग्रहण करा.

(अ) समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजांआड.

तो संत्रस्त वाटतो संध्याकाळीं : पिंजारलेली दाढी, झिंज्या.

हताशपणे पाहत असतो समोरच्या बत्तिसाव्या मजल्यावरील
हे मुलाकडे,

ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय आणि त्याची
त्याला कल्पनाच नाही.

समुद्राच्या डोळ्यांत थकव्याचं आभाळ उतरत येतं आणि
शिणून तो वळवतो डोळे.

इमारतीच्या पलीकडच्या रस्त्यांवर थकलेल्या माणसांचे पाय,
बसचीं चाकं.

उत्तर : मराठी साहित्यविश्वातील सुप्रसिद्ध कवी, वसंत आबाजी डहाके यांच्या ‘समुद्र कोंडून पडलाय’ या कवितेतील प्रस्तुत पंक्ती आहेत. ही कविता त्यांच्या ‘शुभवर्तमान’
या काव्यसंग्रहातून पाठ्यपुस्तकात घेतली आहे.
आज अनेक शहरांच्या महानगरांच्या कार्यव्यस्त जगात, अनेक मर्यादांमध्ये मानवी जीवन कोंडून पडले आहे. हे ‘समुद्रा’च्या प्रतीकातून कवीने मांडले आहे. प्रस्तुत कवितेत समुद्र हे मानवी जीवनाचं प्रतीक आहे. महानगरीय जीवनाचं वास्तव रेखाटताना कवी म्हणतो की, गगनचुंबी इमारतीच्या खिडक्यांच्या गजाआड मानवी जीवन कोंडून पडलं आहे. अडकलं आहे. इथला प्रत्येकजण जगण्यासाठीची धावपळ अव्याहतपणे करतो आहे. इथला प्रत्येकजण दिवसभराचे कामकाज संपवून जेव्हा संध्याकाळी घरी येतो तेव्हा तो कवीला संत्रस्त म्हणजेच त्रासलेला वाटतो.

दाढीचे अस्ताव्यस्त वाढलेले खुंट, विस्कटलेले केस त्याच्या दैनंदिन दगदगीच्या आयुष्याला अधोरेखित करतात. दिवसभर | उत्त तो कामाच्या व्यापात इतका गुंतलेला आहे की, स्वत:च्या शरीराकडे, व्यवस्थितपणाकडेही त्याचे फारसे लक्ष नाही. बत्तिसाव्या मजल्यावरील खिडकीच्या पलीकडे उभ्या असणाऱ्या लहान मुलाकडे कवीचे लक्ष जाते. खेळण्या बागडण्याच्या दिवसात अंगण नसणाऱ्या उत्तुंग इमारतीमध्ये त्या मुलाचे बालपण आक्रसून गेले आहे. त्या मजल्यावरील त्याच्या घराची, विशिष्ट अशा जागेची मर्यादा त्याच्या बालपणाला पडली आहे. उंचच उंच राहणाऱ्या त्या मुलाला मात्र याबाबत काहीच कल्पना नाही. महानगरात वास्तव्यास असणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात सायंकाळी मात्र थकव्याचं आभाळ उतरत येतं. दिवसभराची दगदग, नानाविध बाबींचा सहन करावा लागणारा त्रास, आलेला थकवा अशा अवस्थेतील सर्व माणसांची पावले घराबद्दलच्या ओढीने, घराच्या दिशेने पडत असतात. बसगाड्यांची चाकं अव्याहतपणे धावत असतात.

महानगरातील गर्दी, धावपळ, वयस्कांच्या कार्यव्यस्त जगाचं वास्तव प्रस्तुत कवितेतून नेमक्या शब्दरूपात प्रकटलं आहे. आशयघन शब्दांतून महानगरीय जीवनाचं वास्तव कवीने आपल्यासमोर उभं केलं आहे. उदा. ‘गगनचुंबी इमारतींच्या गजाआड’चं आक्रसलेलं बालपण, ‘बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय’ वास्तवाच्या प्रखरतेची जाणीव कवी आपल्याला करून देतात. ‘समुद्राच्या डोळ्यांत थकव्याचं आभाळ’, ‘रस्त्यांवर थकलेल्या माणसांचे पाय, बसची चाकं’ महानगरीय संध्याकाळची रूपे नेमकेपणाने व्यक्त करतात. सामाजिक वास्तवाचा टोकदार असा आविष्कार वसंत आबाजी डहाके यांच्या कवितेत आहे. महानगराच्या या वास्तवाला आक्रसलेल्या बालपणाच्या कारुण्याची किनार आहे. इथला प्रत्येकजण महानगराच्या गतिमान व्यवस्थेत ग्रासलेला, बराचसा एकाकी अशा प्रकारचा आहे. अस्थिरताच इथल्या जीवनात अधिक आहे. जो तो आपआपल्या धावपळीत मग्न आहे. मानवी जीवन अनेक मर्यादांमध्ये अडकून पडले आहे याची जाणीव या कवितेत आहे.

कृती-६. अभिव्यक्ती

(अ) ‘समुद्र तुमच्याशी संवाद साधत आहे’, अशी कल्पना करून
कल्पनाचित्र शब्दबद्ध करा.

उत्तर : माझ्या किनाऱ्याच्या जवळ राहणाऱ्या माणसांनो, मी तुमचा नेहमीचा सोबती समुद्र बोलतोय. बऱ्याच दिवसांपासून तुमच्याशी संवाद साधण्याची माझी मनापासूनची इच्छा आहे. मी माझ्या परीने तुम्हांला आजवर खूप काही भरभरून दिले आहे. खनिज तेल, मीठ, मासे, मौल्यवान मोती आणि बरंच काही तुम्हांला देत आलो आहे. जगाच्या अंतापर्यंत देत राहणार आहे. पण, तुम्ही मला काय दिलं? नाही ना आठवत तुम्हांला ! कसं आठवणार बरं…

माझ्याकडे पाण्याचा खूप मोठा साठा आहे. परंतु माझे पाणी खारट असल्याने ते माणसांना योग्य वाटत नाही. म्हणूनच प्लास्टिकचा कचरा, सांडपाणी, मलमूत्र, प्लास्टर ऑफ पॅरिसची माती, घातक रसायने तुम्ही राजरोसपणे माझ्यात आणून सोडतात. टाकाऊ गोष्टी कोठे टाकायच्या, नेऊन सोडायच्या तर समुद्रात. काय हे तुमचे वागणे. तुमच्या या वागण्याचा मला खूप त्रास होतोय. भविष्यात तुम्हालांही त्रास होईल बाळांनो.

तुमच्या दृष्टीला दिसणाऱ्या, दूरवरच्या क्षितिजापर्यंत पसरलेल्या माझ्या पाणीसाठ्यावरच विश्वातले जलचक्र आधारलेले आहे. जलचक्र सुरू ठेवण्यात माझी भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. माझ्याच माध्यमातून जगभर विविध कारणांसाठी जलवाहतूक चालत असते. माझी जैवविविधता तुमच्या टाकाऊ कचऱ्यामुळे आता धोक्यात आली आहे. मातीचा भराव टाकून मला मागे हटवण्याचे तुमचे प्रयत्न सर्वच महानगराच्या परिसरात सदैव सुरू असतात. काय म्हणावे तुमच्या या जमिनीच्या हव्यासाला!

‘रत्नाकर’ संबोधून तुम्ही माझा सन्मान करता आणि दुसरीकडे आपली घाण, कचरा माझ्यात का आणून सोडता ? बाळांनो, तुम्ही असे का वागता? आजवर नाही तर नाही, निदान या संवादानंतर तरी तुम्ही माझी योग्य प्रकारे काळजी घ्याल हीच एक अपेक्षा !

(आ) शहरातील बाल्याची अवस्था कवितेत कशा प्रकारे प्रकट झाली आहे, ते स्पष्ट करा.

उत्तर : ‘बालपण’ हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनप्रवासातील एक आनंददायकअसा कालखंड असतो. परंतु आज अनेक शहरांच्या महानगरांच्या कार्यव्यस्त जगात बालपण कसे आक्रसून गेले आहे याची जाणीव वसंत आबाजी डहाके यांच्या ‘समुद्र कोंडून पडलाय’ या कवितेत आहे.

आधुनिक जगात अनेक शहरे, महानगरांची बेसुमार वाढ होत आहे. शहरांमधील गगनचुंबी इमारतींच्या त्या खोलीमध्ये बालपण बंदिस्त झाले आहे. बत्तिसाव्या मजल्याच्या खिडकीतून ते मूल बाहेरचे विश्व पाहत आहे. आनंदाने खेळण्याचे, मुक्तपणे बागडण्याचे स्वातंत्र्यही शहरी संस्कृतीत त्याला लाभलेले नाही. शहरातील उत्तुंग इमारतीच्या, अंगण नसणाऱ्या या संस्कृतीत त्या मुलाचे बालपण विशिष्ट मर्यादांमध्ये अडकून पडले आहे. ‘बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय’ असं विदारक वास्तव शहरांमध्ये आहे.

वयस्कांच्या कार्यव्यस्त जगात बकालपणाच सर्वत्र कवीला जाणवत आहे. मोठ्यांना आपल्या घरातील बालकांसाठी वेळही देता येत नाही. वाहनांच्या माणसांच्या गर्दीत बालपण, त्यातील खेळण्या बागडण्याचा आनंद आक्रसून गेला आहे. जो तो स्वतः च्याच विचारात जगण्यासाठीची धावपळ करीत आहे. स्टेशनवरच्या बाकावरही ‘पाय मुडपून कसंबसं झोपलेलं मूल’ शहरी जीवनाच्या वास्तवाला अधोरेखित करणारे आहे. शहराच्या पसाऱ्यात त्याचं बालपणही ‘स्टेशनवरच्या बाकाएवढं’ च झालं आहे. शहरी संस्कृतीत अनेकांच्या बालपणातील ‘बाल्य’ बकाल होत चालले आहे. कोणालाच कोणाची पर्वा नाही. जो तो आपल्या मस्तीत विशिष्ट मर्यादांमध्ये जगण्याची धडपड करीत आहे.

(इ) ‘समुद्र कोंडून पडलाय’, या शीर्षकाचा अर्थ तुमच्या शब्दांत
उलगडून दाखवा.

उत्तर : मराठीतील सुप्रसिद्ध कवी, वसंत आबाजी डहाके यांची ‘समुद्र कोंडून पडलाय’ ही एक प्रतिकात्मक कविता आहे. ‘समुद्र’ म्हणजे अथांग पाणी आणि पाणी म्हणजे जीवन. या दृष्टीने या कवितेतील समुद्र हा मानवी जीवनाचेमर्यादांमध्ये अडकून पडली आहे.

मोठ्यांच्या कार्यव्यस्त जगात मोठी माणसे अडकून पडली आहेत. दैनंदिन जीवनातील धावपळ, दिवसभराच्या दगदगीमुळे सायंकाळी येणारा थकवा, घराच्या ओढीमुळे घराच्या दिशेने संध्याकाळी पडत असणारी थकलेली पावले हे वास्तव सर्वत्र आहे. प्रत्येकजण चाकोरीबद्ध जीवनात, विशिष्ट मर्यादांमध्ये अडकून पडला आहे. रस्त्यावरच्या वाहनांच्या व माणसांच्या गर्दीचा, रहदारीचा प्रत्येकजण

एक भाग झाला आहे. शहरे, महानगरांच्या गगनचुंबी इमारतींच्या विश्वात बालपण अडकले आहे. खेळण्या, बागडण्यासाठी अंगण नसणाऱ्या या संस्कृतीत उत्तुंग इमारतीत हे बालपण आक्रसून गेले आहे. वाहनांच्या माणसांच्या गर्दीमुळे रस्त्यांवर अजिबात मोकळी जागा राहिलेली नाही. रेल्वेस्टेशनवरच्या एवढ्याशा बाकावर झोपेसाठी बालकांना आश्रय घ्यावा लागत आहे. पाय मुडपून बाकावर कसाबसा झोपलेल्या मुलाला पाहून त्याचं बालपणही स्टेशनवरल्या बाकाएवढं’ झालं आहे याची जाणीव कवीला अस्वस्थ करून सोडते. वयस्कांच्या या शहरात बकाल होत जाणारे बाल्य पाहून कवी अत्यंत व्यथित होतो. मोठ्यांचे, बालकांचे जीवन महानगरांच्या मर्यादांमध्ये कोंडून पडले आहे, अडकून पडले आहे.

प्र. ३. खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण लिहा.

समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी •••••••••••••

•••••••••••••••••••••••••••वयस्कांच्या शहरातील

उत्तर : वसंत आबाजी डहाके लिखित ‘समुद्र कोंडून पडलाय’ या कवितेत मानवी जीवनातील असहाय्यता, साचलेपण, एकाकीपणा, अस्थिरता यांमुळे अस्वस्थ असलेले कविमन प्रकट होते. बंदिस्त असलेले महानगरी जीवन जगण्यातली मुक्तता हरवून बसलंय. या महानगराच्या मर्यादांमध्ये प्रत्येकाचं बालपण होरपळून निघतंय. त्या बालपणालाही जाणीव नाही त्याची यामुळे चिंताग्रस्त झालेला कवी आपली अस्वस्थता या कवितेतून प्रकट करतो.

समुद्र’ या प्रतीकातून कवी ती अस्वस्थता व्यक्त करू पाहतोय. ‘समुद्र’ हा या कवितेतील निवेदक असून तोच या महानगरी जीवनाविषयी माणसाच्या जगण्याविषयी

अस्वस्थता प्रकट करतोय असे जाणवते. हा समुद्र अस्वस्थ होऊन जातोय. शहराच्या आयुष्याच्या विचाराने त्याला ती अस्वस्थता व्यक्त करता येत नाही, सांगता येत नाही म्हणून तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो. इथे कवी समुद्राचं मुक्त असणं म्हणजे जीवन मुक्त असावं हे नमूद करतोय. मनातल्या मनात मुक्त होताना तो फिरतोय शहरातल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून उशिरापर्यंत. रात्री तो स्टेशनवरील बाकावर एकाकी बसतो. माणसाचं एकाकी असणं कवी इथे प्रकट करतो. शहरी भागात सर्वत्र गर्दी असतानाही जीवन आपलं एकाकी असतं हे अटळ दुःख आहे. डोक्यावर हात ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी स्टेशनवर बसून रुळांवरील रहदारी पाहत तो राहतो. इथे डोळेही अर्धमिटलेले असं कवी म्हणतो. यात कवी शहरातील कोणालाही जगणं पूर्णत: मोकळेपणाने जगता येत नाही हे सांगू पाहतोय.

या समुद्राला आठवतं त्याच्या शेजारी पूर्वी एखादं लहान मूल कसंबसं झोपलं गेलंय ज्यांच बालपण स्तेशांवरच्या बकायेवढच असतं. त्या मुलाची वाढही निकोप, निरागस पद्धतीनं होत नाही आक्रसून टाकणाऱ्या आयुष्याचा एक एक घोट ते लहान मूल बालपणापासूनच गिळत असतं. त्या लहान मुलाने जगण्यातलं मुक्तपण शहरातल्या वस्तीत कुठेच ना पाहिल्यामुळे त्यालासुद्धा आपलं मन मुडपलं जातंय याची कल्पना नाही. या सर्व परिस्थितीकडे पाहत समुद्र खिन्नपणे हसतो आणि त्याच्या थकलेल्या पापण्या मिटून घेतो. ही खिन्नता त्याला वाटणाऱ्या चिंतेतून प्रकट झालेली आहे. सर्वांचंच बालपण मुडपल्यासारखं झालंय आणि शहरातलं बालपण, जगणं वयस्क होत चाललंय. म्हणून हे शहरही वयस्क झालंय. शहराच्या विकासातील जगण्यातील अस्थिरता, दिखाऊपणा, एकाकीपणा वयस्कांच्या शहरातील या प्रतीकातून प्रकट होतो.

उपक्रम :

महानगरातील समस्या’ या विषयावर चर्चा करा.

उत्तर: आज अनेक महानगरांचा झपाट्याने विस्तार होत आहे. नवनवीन उदयोगधंदे, नवीन वसाहतीच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. परंतु पायाभूत सुविधांच्या योग्य नियोजनाअभावी नानाविध समस्याही महानगरात निर्माण होत आहेत.

दिवसेंदिवस शेतीतील घटते उत्पन्न व गावातील रोजगाराची कमतरता यांमुळे मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील लोक शहरे, महानगरांकडे धाव घेतात. पर्यायाने महानगरांची लोकसंख्या या स्थलांतरित व्यक्तींमुळे दिवसागणिक वाढत आहे. महानगराच्या या वाढत्या लोकसंख्येसाठी पायाभूत सुविधा कुठेतरी अपूर्ण पडू लागल्या आहेत. पिण्यालायक स्वच्छ पाणी, सार्वजनिक बागबगीचे, क्रीडा व मनोरंजनासाठी लागणारी मैदाने, शैक्षणिक केंद्रांना लागणाऱ्या आवश्यक जागा कुठेतरी कमी पडू लागल्या आहेत. सर्व महानगरांपुढे ‘कचरा डेपो’ची एक गंभीर समस्या आहे. महानगरात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्यप्रकारे विल्हेवाट कशी लावावी हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. कचराडेपोच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना आरोग्यविषयक अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

महानगरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाढत्या लोकसंख्येमुळे अपुरी पडत आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थाही कुठेतरी अपूर्ण पडत आहे. ‘ई-कचऱ्याच्या’ विल्हेवाटीचा प्रश्न प्रत्येक महानगराला सतावत आहे. महानगरात राहणाऱ्या अनेक लोकांना घराच्या किमती न परवडल्यामुळे झोपडपट्टीत निवारा शोधावा लागला आहे. गगनचुंबी इमारतींबरोबरच महानगरात नवनवीन झोपडपट्ट्यांचीही लक्षणीय अशी वाढ झाली आहे.

प्रत्येक महानगरात प्रदूषणाची समस्याही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. ध्वनी, जल, वायू, प्रदूषणाने आपली सरासरी कधीच ओलांडली आहे. जमिनीच्या हव्यासातून अनेक नदी, नाले बुजवून राहण्यासाठी, घरांसाठी जागा केली जात आहे. महानगरातील सोयीसुविधांसाठी रस्ते रुंदीकरणासाठी अनेक

झाडे तोडली गेली आहेत. काँक्रिटच्या रस्त्यांमुळे शहरीभागात भूजलपातळी खाली गेली आहे. पायाभूत सुविधांचा तुटवडा व दिवसागणिक वाढणारी लोकसंख्या यांमुळे अनेक महानगरांची व्यवस्था बऱ्याच अंशी कोलमडून पडली आहे. अनेक महानगरांतील लोक भविष्यकाळात चांगले दिवस येतील या आशेवर आजचे मरण उद्यावर ढकलत जगत आहेत. जगण्याचा प्रयत्न करीत आहेत.

तोंडी परीक्षा :

(अ) शब्द ऐका. त्याचा वाक्यात उपयोग करा.

(१) गगनचुंबी : अर्थ – उत्तुंग, टोलेजंग

वाक्य: शहराच्या वैभवात गगनचुंबी इमारतींनी चांगलीच भर घातली आहे.

(२) संत्रस्त : अर्थ – त्रासलेला

वाक्य: संत्रस्त अशा अवस्थेत तो घरात आला.

(३) वयस्क अर्थ- प्रौढ

वाक्यः वयस्कांचा सल्ला नेहमीच उपयुक्त ठरतो.

(४) खिन्न : अर्थ – दुःखी

वाक्य: थोडक्यात संधी हुकल्यामुळे मन खिन्न झाले.

(५) हताश: अर्थ – निराश

वाक्य: मनासारखे गुण न मिळाल्याने ती हताश झाली.

(आ) ‘वाढत्या शहरीकरणाचा जीवनावर होणारा परिणाम’, या
विषयावर भाषण दया.

उत्तर : शहरीकरण म्हणजे शहराच्या व लोकसंख्येची त्याच्या क्षेत्राची वाढ होय. शहरी भागातील वाढते औद्योगिकीकरण व ग्रामीण भागातून रोजगारासाठी शहरी भागात होणारे लोकांचे स्थलांतर यांमुळे दिवसेंदिवस शहरीकरण वाढत चालले आहे. अनेक शहरांच्या, शहरीकरणाच्या वेगाला कोठेतरी आवर घालणे आज कोणाच्याही हातात राहिलेले नाही.

कोणत्याही देशाचा आर्थिक विकास हा शहरीकरणावर अवलंबून असतो असे नेहमीच बोलले जाते. देशाच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत औदयोगिकीकरण व इतर सेवाक्षेत्रांवर अवलंबून असतो. आज अनेक शहरे वेगाने वाढत आहेत. शहरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या सोयीसुविधांवर प्रचंड ताण पडत आहे. शहरी वातावरणाचा समतोल कुठेतरी बिघडत चालला आहे. सर्वच शहरांमध्ये सध्याच्या लोकसंख्येला आवश्यक व्यवस्था, असलेला पाणीपुरवठा, मलनि:सारण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, आरोग्य व शिक्षण सुविधा, घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीची योग्य जागा असे अनेकविध प्रश्न गंभीररूप घेत आहेत.

मोठ्या शहरातील वाहतूक व्यवस्था घाईगर्दीच्या वेळेस नेहमीच कोलमडून पडते. उदारीकरणामुळे, सर्वसामान्यांची क्रयशक्ती क्रयशक्ती वाढल्यामुळे खाजगी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. चौपदरी रोडवरची वाहतूक कोंडीची समस्या अनेकदा जाणवते. शहरातील बहुतांश लोक हे लघू आणि मध्यम उत्पन्न गटातील असल्याने ‘निवास’ समस्या सर्वत्र आहे. शहरातील घरांच्या किंमती प्रचंड वाढल्यामुळे तेथे घर घेणे अनेकांना परवडत नाही. त्यामुळे अनेकांना झोपडपट्ट्यांचा आसरा घ्यावा लागतो. शहरीकरणाचा पर्यावरणावरही परिणाम झाला आहे. वृक्षतोड, हवा प्रदूषण, भूजलपातळीत घट यांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

शहरीकरणात एकत्र कुटुंबपद्धती जवळ जवळ लयाला गेली आहे. आत्मकेंद्रीत वृत्तीने प्रत्येकजण स्वतःच्याच कोशात मग्न झाला आहे. सामाजिक बांधिलकी, संकटकाळी धावून जाऊन मदत करण्याची वृत्ती कमी होत चालली आहे. वयोवृद्धांची अडचण झाल्याने वृद्धाश्रमांची आवश्यकता वाटू लागली आहे. मोठमोठी शहरे आर्थिक केंद्रे बनल्यामुळे गुन्हेगारीमध्येही वाढ

झाली आहे. शहरातील मोकळ्या जागा, मैदाने हळूहळू कमी होत आहेत. त्याचाच परिणाम लहान मुलांच्या मन:स्वास्थ्यावर व वाढीवर झाला आहे. जागेच्या कमतरतेमुळे शहरात गगनचुंबी इमारतींची संख्या वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे शाळा, महाविदयालये, सार्वजनिक दवाखाने यांची वानवा जाणवत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे शारीरिक स्वास्थ्य बिघ मोडले आहे. शहरीकरणामुळे होणारे संभाव्य दुष्परिणाम कमी करण्यासाठी सर्वांनी आतापासूनच विचार करणे आवश्यक आहे. शहरांजवळील गावांचा योग्यप्रकारे विकास केल्यास शहरांकडे येणारा माणसांचा लोंढा कमी होण्यास मदत होईल. स्मार्ट शहरांना अधिक स्मार्ट बनविण्यासाठी शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांना आपआपली जबाबदारी ओळखून योग्य पावले टाकण्याची आज आवश्यकता आहे. पायाभूत सुविधा योग्य प्रकारे उपलब्ध करून दिल्याशिवाय शहरातील’ बकालपणा ‘ कमी होणार नाही . स्वच्छ, सुंदर शहरासाठी सर्वांनी खारीचा वाटा उचलणे आवश्यक आहे.

कवी परिचय :

मराठी साहित्यप्रांतात सुप्रसिद्ध कवी, कादंबरीकार, समीक्षक, संपादक व भाषातज्ज्ञ म्हणून वसंत आबाजी डहाके सर्वपरिचित आहेत. चित्रकार म्हणूनही त्यांची विशेष ख्याती आहे.

डहाके सरांच्या वाङ्मयीन प्रवासाचा प्रारंभ काव्यलेखनाने झाला. ‘सत्यकथे’च्या (मे १९६६) अंकात त्यांची ‘योगभ्रष्ट’ ही पहिली दीर्घकविता प्रकाशित झाली. या कवितेने त्यावेळी अनेकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. ‘योगभ्रष्ट’, ‘शुभवर्तमान’, ‘शुन:शेप’, ‘चित्रलिपी’ हे काव्यसंग्रह, ‘अधोलोक’, ‘प्रतिबद्ध आणि मर्त्य’ या कादंबऱ्या, ‘यात्राअंतर्यात्रा’ सारखे चिंतनात्मक स्वरूपाचे ललितलेखन डहाके सरांचे आहे. त्यांच्या ‘योगभ्रष्ट’ या काव्यसंग्रहाचा ‘टेररिस्ट ऑफ द स्पिरिट’ हा इंग्रजी अनुवादही प्रकाशित झाला आहे. याशिवाय ‘शालेय मराठी शब्दकोश’, ‘संक्षिप्त मराठी वाङ्मय कोश’, ‘वाङ्मयीन संज्ञा-संकल्पना कोशा’चे संपादनही त्यांनी केले आहे.

चित्रलिपी’ या काव्यसंग्रहास ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ मिळालेला आहे. उत्कृष्ट साहित्यनिर्मितीचा ‘महाराष्ट्र राज्य पुरस्कार’, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ‘जनस्थान पुरस्कार’ असे अनेकविध सन्मान डहाके सरांच्या साहित्यसेवेस मिळाले आहेत.

वसंत आबाजी डहाके यांच्या ‘शुभवर्तमान’ या काव्यसंग्रहातील ‘समुद्र कोंडून पडलाय’ ही कविता पाठ्यपुस्तकात आहे.

कवितेची मध्यवर्ती कल्पना :

अनेक शहरांच्या महानगरांच्या मर्यादांमध्ये मानवी जीवन कवितेत आहे.
कोंडून पडले आहे हे ‘समुद्रा’च्या प्रतीकातून कवीने रेखाटले आहे. महानगरातील उत्तुंग इमारतीत, अंगण नसणाऱ्या संस्कृतीत, माणसांच्या व वाहनांच्या गर्दीत बालपण आक्रसून गेले आहे. आजच्या धावपळीच्या युगात, मोठ्या माणसांच्या कार्यव्यस्त जगात बकाल होत जाणारे बाल्य कवीला अस्वस्थ करते. महानगराच्या वास्तवाची विदारक अशी जाणीव प्रस्तुत कवितेत आहे.

कठीण शब्दार्थ:

समुद्र – सागर (the sea), कोंडून पडणे – चोहोबाजूंनी घेरून

बंदिस्त करणे (to close up), गगनचुंबी – उत्तुंग, टोलेजंग, आकाशाला भिडणाऱ्या (very tall), इमारत 1

घर, वास्तू, राहण्याची जागा ( a residence structure),
संत्रस्त – अतिशय त्रासलेला (troublesome), पिंजारलेली – अस्ताव्यस्त वाढलेली (to dishevel), झिंज्या डोक्यावरचे वाढलेले, विस्कटलेले केस (disorderly tress of hair), हताश – निराश, कसलीही उमेद मनात नसणारा (dispaired), मजला इमारतीचा गाळा (a floor), बालपण – बाल्यावस्थेतील काळ (childhood), अरुंद – अत्यंत तोकडे (narrow), कल्पना – मन:पटलावर उमटलेले भावचित्र (imagination), थकवा शीण, अतिश्रमाने येणारी ग्लानी (to be fatigued), शिणून थकून जाणे (to be exhausted), वळवतो – वळवणे, फिरवणे (to turn), अस्वस्थ बेचैन, अशांत असा (uneasy, restless), मुक्त कोणताही अडथळा न येता (without any restriction), वस्त्या माणसाच्या राहण्याच्या जागा (residence), एकाकी एकटा असा (lonely), वाहने, माणसे इत्यादींची ये-जा / वर्दळ रहदारी (traffic), खिन्न – दुःखी, कष्टी असा (distressed), पापण्या – डोळ्यांच्या वर असलेले केसांचे कातडी आच्छादन ( an eyelid), वयस्क – प्रौढ, मोठा (elderly).

इंग्रजी भाषेतील शब्द:

स्टेशन – Station गाडी थांबण्याचे ठिकाण / जागा
(stopping place of bus or train).

टिपा:

★’समुद्र’ जीवनाचे प्रतीक -समुद्र म्हणजे अथांग पाणी. पाणी म्हणजेच जीवन प्रस्तुत कवितेतील समुद्र हा जीवनाचं प्रतीक आहे. ‘समुद्र कोंडून पडलाय’ म्हणजेच महानगरांच्या मर्यादेत मानवी जीवनच कोंडून पडले आहे. निरागस अशा बालपणातील आनंदाचे, खेळण्याबागडण्याचे क्षण कुठेतरी हरवले आहेत. स्टेशनवरील रिकाम्या बाकाचाच आश्रय झोपण्यासाठी बालकाला घ्यावा लागला आहे.

बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय – महानगरातील वास्तव विदारक आहे. उंचच उंच इमारतीच्या विश्वात ३२ व्या मजल्यावरील घरात राहणाऱ्या बालकाला बाहेरच्या अनेक बाबी गजाआडून पहाव्या लागत आहेत. त्याच्या दृष्टीला, बालपणातील अवखळपणाला विशिष्ट मर्यादांचे बंधन पडले आहे. खेळण्या बागडण्याचे, बाहेरच्या विश्वातील त्याचे आनंददायी क्षण महानगराच्या वास्तवात हरवले आहेत.

डोळ्यात थकव्याचं आभाळ -धावपळीच्या युगात प्रत्येकाची जगण्यासाठीची धावपळ अविरतपणे सुरू असते. जीवनात धावाधाव केल्यानंतर प्रत्येकालाच कालांतराने थकवा हा येतोच. कार्यव्यस्त जगात, महानगरातील संध्याकाळी प्रत्येकाच्या डोळ्यात थकण्याचं आभाळ कवीला जाणवतं. –

पाय मुडपून कसं बसं झोपलेलं एखादं मूल – रेल्वे स्टेशनवरच्या एका रिकाम्या बाकावर एक लहान मूल पाय मुडपून म्हणजेच गुडघे पोटाशी घेऊन झोपी गेलं आहे. दिवसभर पायांनी धावाधाव केल्यामुळे ग्लानी येऊन, थोड्याशा जागेत ते झोपलेलं आहे.

कवितेचा भावार्थ :

समुद्र कोंडून पडलाय -प्रस्तुत कवितेत ‘समुद्र’ हा मानवी जीवनाचं प्रतीक आहे. समुद्राच्या प्रतीकातून कवीने महानगरीय जीवनाचे अस्वस्थ करणारे वास्तव मांडले आहे.

समुद्र कोंडून पडलाय°°°°°°°°°°°°° °°°°°°°°°°°°°°°°°°° °°°°°°°°°°

°°°°°°°°°°°°°°°°°°°° °°°°°°°°°°°°त्याची त्याला कल्पनाच नाही.

महानगरातील मानवी जीवन – महानगरातील प्रत्येक व्यक्तीचे जीवन गगनचुंबी इमारतींच्या खिडक्यांच्या गजाआड कोंडून पडले आहे. अडकले आहे. प्रत्येक घरातील कर्त्या व्यक्तीच्या जगण्याची धावपळ अविरतपणे सुरू आहे. प्रत्येकजण आपले दिवसभराचे कामकाज संपवून संध्याकाळी घरी येतो तेव्हा तो कवीला संत्रस्त म्हणजे त्रासलेला वाटतो. दाढीचे अस्ताव्यस्त वाढलेले खुंट, विस्कटलेले असे केस त्याच्या दैनंदिन दगदगीच्या आयुष्याबद्दल खूप काही सांगतात.

★महानगरातील बालपण -बत्तिसाव्या मजल्यावरील खिडकीतील मुलाकडे पाहिल्यावर कवी अधिकच अस्वस्थ होतो. खेळण्या बागडण्याच्या दिवसात त्याचं बालपण खूपच अरुंद झालं आहे याची जाणीव कवीला होते. उत्तुंग इमारतींच्या या विश्वात बालपणातील आनंदाचे क्षणही त्या बालकाला मिळत नाहीत. मानवी जीवनच जणू अत्यंत तोकडे, अरुंद झाले आहे. उंचच उंच इमारतींच्या या गर्दीत त्या मुलाचे हसण्या, बागडण्याचे, मुक्तपणे फिरण्याचे सारे क्षणच हरवले आहेत याची त्याला कल्पनाच नाही.

समुद्राच्या डोळ्यांत थकव्याचं°°°°°°°°°°°°°°°°° °°°°°°°°°°°°°°

°°°°°°°°°°°°°° °°°°°°°°°°°°°°°°°°माणसांचे पाय, बसचीं चाक.

★महानगरातील सायंकाळ- महानगराच्या या धावपळीने व्यस्त जीवनात सायंकाळच्या वेळी प्रत्येकाच्याच डोळ्यात थकव्याचं आभाळ उतरत येत असल्याची जाणीव कवीला होते. थकलेल्या स्थितीत तो आजूबाजूला पाहतो तर इमारतीच्या पलीकडच्या रस्त्यांवरही थकलेल्या माणसांचे पाय, घराबद्दलच्या ओढीने घराच्याच दिशेने पडताना दिसतात. बसची चाकंही त्याच रस्त्यावरून सारखी धावाधाव करून थकलेली असावीत. ( संध्याकाळची रस्त्यांवरील माणसांची, वाहनांची गर्दी, बसचा मंदावलेला वेग) असेही कवीला भासते.

समुद्र अस्वस्थ होऊन जातो°°°°°°°°° °°°°°°°°°°°°° °°°°°°°°°°

°°°°°°°°°° °°°°°°°°°°°त्याची कल्पना असावी किंवा नसावी.

★शहरातील जीवनाचे वास्तव- शहरातील प्रत्येक रस्त्यावरील माणसांची व वाहनांची गर्दी, रोजचे धावपळीचे आयुष्य, एक ठराविक चाकोरीबद्ध असे जीवन, हरवलेले बालपण या गोष्टी कवीला अस्वस्थ करून सोडतात.

धावपळीच्या आयुष्यातून मुक्त होण्याचा विचार –
रोजच्या या धावपळीच्या आयुष्यातून थोडावेळ बाजूला जाऊन मनातल्या मनात काहीसा मुक्त होऊन कवी फिरू लागतो. शहरातल्या अनेक रस्त्यांवरून, वस्त्यांमधून तो उशिरापर्यंत फिरतो आणि अखेर स्टेशनच्या बाकावर, समोरच्या रूळांवरील ये-जा करणाऱ्या गाड्या, प्लॅटफॉर्मवरील गाडी पकडणाऱ्या माणसांच्या गर्दीकडे पाहात एकटाच बसतो. हातावर डोकं ठेवून, अर्धमिटल्या डोळ्यांनी आपल्या अवती-भोवती पहात राहतो.

त्याच्याच शेजारी, स्टेशनवरील बाकड्यावर एक बालक पाय मुडपून कसं बसं झोपलेलं त्याला दिसतं.

★ वयस्कांच्या शहरातील अस्वस्थ करून सोडणारं बालपण – वयस्कांच्या कार्यव्यस्त शहरात स्टेशनवरच्या बाकड्यावर कसं-बसं झोपलेल्या मुलाला पाहून कवी अस्वस्थ होतो. वयस्क माणसांच्या कार्यव्यस्त जगात रेल्वे स्टेशनच्या एवढ्याशा बाकावर झोपेसाठी त्या बालकाला आश्रय घ्यावा लागतो. शहरी जीवनाच्या धावपळीत त्या बालकाचे बालपणही हरवत चाललं आहे याची जाणीव प्रकर्षाने होते. स्टेशनवरच्या बाकाचाच त्याच्या बालपणाला आधार आहे. त्याचं बालपणही त्या रिकाम्या बाकाएवढंच मर्यादित झालं आहे. आपल्या बालपणाची त्याला कल्पना असावी की नसावी हा प्रश्न कवीला अस्वस्थ करून सोडतोय.

समुद्र खिन्न हसतो°°°°°°°°°°°°°° °°°°°°°°°°°°°°° °°°°°°°°°°°

°°°°°°°°°°°°°°°°°° °°°°°°°°°°°°°°°°°°वयस्कांच्या शहरातील

शिणलेल्या विश्वाकडे पाहून समुद्र खिन्न हसतो. शहराच्या या वास्तवात दिवसेंदिवस त्याचं बालपण कसं बकाल होत चाललंय. वयस्कांच्या या शहरात त्याचं बाल्यही कोठेतरी हरवलं आहे याची जाणीव कवीला होते. खेळण्या बागडण्याच्या दिवसातलं बालपण स्टेशनवरच्या बाकावर कसं – बसं विसावलेलं आहे. ही बाब कवीला अस्वस्थ करून सोडते.

Leave a Comment