Maharashtra Board class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11: आरशातील स्त्री ( Aarshatil Stree )

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 11. Solutions आरशातील स्त्री ( Aarshatil Stree Notes) Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11: आरशातील स्त्री

12th Marathi Guide Prashn uttar Chapter 11: आरशातील स्त्री Textbook Questions and Answers.

★ कृती २. (अ) वर्णन करा

Telegram group मध्ये जॉईन व्हा

(१) आरशातील स्त्रीला आरशाबाहेरील स्त्रीमधील जाणवलेले
बदल-

उत्तर: आरशातील स्त्रीला आरशाबाहेरील स्त्रीमध्ये बराच फरक जाणवतो. आरशाबाहेरील स्त्रीच्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग तिने
पाहिलेले आहेत. पावसाचे तरंग ऑजळीत धरून चैतन्याने उडवणारी बालिका आता मात्र मन उलगडून बोलत नाही. ओठ दाबून सारंच सहन करत असलेला तिचा ओढग्रस्त चेहरा आरशाच्या आतील स्त्रीला पहावत नाही. संसारातील दुःख परंपरेचे वरदान समजून पदरात घेतली आहेत. आजूबाजूला असलेल्या चांगल्या गोष्टींकडे तिला लक्ष दयावेसे वाटत नाही. अस्तित्वहीन पुतळीसारखे तिने स्वतःला बंधनात अडकवून घेतले आहे. अनेकदा रात्री आपले हुंदके दाबून टाकलेले तिने पाहिले आहेत. तिच्या फाटलेल्या हृदयाची जाणीव इतर कुणालाही ती होऊ देत नाही. शारीरिक, भावनिक पातळीवरील अनेक असह्य कळा ती सोसतेय. त्याचा तिच्या जगण्यावर विपरित परिणाम होतोय.

(२) आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीची काढलेली समजूत-

उत्तर : आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीला खूप पूर्वीपासून पाहिलेलं आहे. आरशाबाहेरील स्त्रीने आरशात पाहि तेव्हा आरशातील स्त्रीनं निरखून पाहिलं. तिच्या मानसिक परिस्थितीचा अंदाज घेऊन तिच्यातील पूर्वीच्या ती ची तिला आठवण करून दिली. आरशाबाहेरील स्त्रीवर असलेल्या प्रापंचिक जबाबदाऱ्या, बंधने, घरामधील अवहेलना, जाच या सगळ्यामुळे पूर्वीची ‘ती’ आता पार बदलून गेली. तिचा उत्साह, चेतना गोठून गेल्यासारख्या झाल्या होत्या. तिची ही अवस्था पाहून आरशातील स्त्रीने समजूत काढली की वेडे रडू नकोस, डोळ्यातली आसवं शेजारच्या तळ्यात सोडून दे. रडणं, कुढणं थांबव, तळ्यातील शुभ्र कमळाची प्रसन्न फुलं घेऊन ये. जग विस्तृत आहे. आपल्या दुःखाचा बोजा घेऊन न जगता मुक्त व्हायला शिकलं पाहिजे. शुभ्र सुंदर आयुष्य असतं आपल्या सभोवार. त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

(आ) खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा.

(१) बालपणातील तुझा उत्साह आणि तुझ्यातील चैतन्य
अवर्णनीय होते.
तारुण्यात नवउमेदीने भरलेली, सर्वत्र सहज संचारणारी अशी
तू होतीस.

उत्तर: पावसाचे तरंग ऑजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका
अंगणात दिवे लावावेत तसे सर्वत्र बहर लावणारी तू
नवयौवना

(२) आता मात्र तू स्वतःच स्वतःला संसारात इतकं गुंतवून घेतलं आहेस, की पारंपरिकपणे जगण्याच्या अट्टाहासात तू दिवसरात्र कष्ट सोसत आहेस.

उत्तरे : इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात जळतेस
मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून.

कृती ३. खालील ओळांचा अर्थ लिहा.

(अ) माझेच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली
किती बदललीस ग तू अंतर्बाह्य !

उत्तर: आरशातील स्त्री ही आरशाबाहेरील स्त्रीचेच रूप आहे. आरशातील स्त्री ही सकारात्मक विचार करणारी आनंदी स्त्री आहे. आपलं आरशाबाहेरचं रूप अनेक गोष्टींनी त्रस्त आहे याची तिला जाणीव होते. आरशाबाहेरच्या त्या ‘ती’ला समजावण्यासाठी आरशातील स्त्री म्हणजे, की तू माझंच दुसरं रूप, तरीही मी तुझ्यात सापडत नाही. घरातील दडपणामुळे तू आतून बाहेरून पूर्णतः बदलून गेलीस. तू तुझं मन पूर्णत: पोखरून काढलंस. तुझं अस्तित्व परंपरेच्या जोखडात बंदिस्त करून टाकलंस.

(आ) स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा

नि आज नखशिखांत तू… तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी !

उत्तर: आरशाबाहेरील स्त्रीला ती अगोदर कशी होती याची आठवण आरशातील स्त्री करून देत आहे. मनमुक्त असलेली पूर्वीची ती मात्र आता पूर्णतः बदलली आहे. तिचे पूर्वीचे असलेले रूप, आरशातील स्त्रीला माहीत आहे. म्हणून तिचे पूर्वीचे अस्तित्व काही आठवणींमधून सांगत आहे. स्वप्नाळू वयात अगदी मोरपिसासारखं तिचं जग होतं. आभाळाच्या झुल्यावर झुलून आपले ध्येयसाध्य करणारी ती ध्येयगंधा होती. आपल्या ध्येयातच आयुष्याचा रंग-गंध शोधणारी ती ध्येयवेडी होती, मुक्त होती. आज ती मात्र नखशिखांत बुडून गेली विविध जबाबदाऱ्यांमध्ये. घरात ती राणी असली तरी स्थितप्रज्ञ आहे. कोणत्याच गोष्टीला होकार – नकार देण्याचा तिला अधिकार नाही ही दुर्दैवी बाब आहे.

कृती -४. काव्यसौदर्य.

•अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळतेय तुझी वाट पाहून पाहून

पण तू, तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी,

या ओळींतून सूचित होणारा अर्थ उलगडून दाखवा.

(मार्च, २०२२)

उत्तर: आरशातील स्त्री या कवितेत कवयित्री हिरा बनसोडे यांनी स्त्रीच्या मनाचा वेध घेतला आहे. संसारात पूर्णत: अडकलेली स्त्री पूर्णत: संसारात गुंतून जाते. तिचं पूर्वीचं आयुष्य पूर्णतः बदलून जातं. त्या स्त्रीने आरशासमोर सुखाचे-दुःखाचे अनेक क्षण घालवलेले असतात. कधीतरी एखादया निवांत क्षणी जेव्हा ती आरशासमोर उभी राहते तेव्हा तिला तिच्याच भूतकाळाची आठवण होते. तिच्यातील पूर्वीची ती स्त्री तिला सांगू लागते की, तू ह्या संसारातील विवंचनेला किती त्रासून गेलीस. अनेक गोष्टी तुला प्रिय होत्या. त्या प्रिय गोष्टी तुझ्या अंगणापर्यंत देखील येऊन गेल्या. त्या सर्व प्रिय गोष्टी तुझ्या मनातील चांदण्यांना साद घालणाऱ्या होत्या. पण त्यांना दार उघडून आत घेण्याचे भान तुला राहिले नाही. इतकं तू स्वतःला बंदिस्त करून घेतलंस.

एकेकाळी निसर्गात रमणारी, बागडणारी तू आज घरातल्या बागेकडेही दुर्लक्ष करतेयस. बागेतील जाईपण तुझी वाट पाहून पेंगुळतेय. त्या जाईचा गंध तुझ्यापर्यंत पोहोचेल. पण त्याकरता दार उघडावं लागेल ना, तू तर जिवंत असूनही अस्तित्वहीन पुतळी झाली आहेस. तुझ्याकडे अनेक गोष्टींची क्षमता असूनही त्या क्षमतांचा विसर तुला पडला आहे. त्याचा विचार करायला हवा. दुःख कवटाळून काहीच साध्य होणार नाही. त्यापलीकडे जाऊन आपल्या मनातील आनंद शोधणं गरजेचं आहे.

कृती-५.रसग्रहण.

प्रस्तुत कवितेतील खालील पदयपंक्तींचे रसग्रहण करा.

तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंदकळतेय आणि अशातच, ती मला गोंजारीत, जवळ घेत अधिकारवाणीने म्हणाली –

रडू नकोस खुळे, उठ! आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात नि घेऊन ये हातात

नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले’

उत्तरः हिरा बनसोडे लिखित ‘आरशातील स्त्री’ ही कविता संसारातील अवहेलना सोसणाऱ्या स्त्रीला मनोबल देणारी कविता आहे.
आरशासमोर उभं राहून आपल्याला न्याहाळण्याचं आपण टाळत नाही. आरसा आपल्याला आपण कसे
दिसतो ते दाखवत राहतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याची सोबत असते.
आरशासमोर उभं राहिल्यावर भूतकाळातील आपण कधीतरी आपल्याला दिसतोही. तसंच ही आरशासमोरील स्त्री एकदा आरशासमोर उभी राहिली आणि आपल्याला निरखून पाहू लागली. आरशातील स्त्रीने तिचे पूर्वीचे सौंदर्य, अल्लडपणा, आनंदी राहण्याची वृत्ती, स्वप्नांना कवटाळण्याची सवय या गोष्टींची तिला आठवण करून दिली. तिची आजची अवस्था आरशातील स्त्रीलासुद्धा पहावत नाही. तिचं रडणं, उन्मळून पडणं, स्वतःला परंपरेच्या कैदेत बांधून घेणं यामुळे तिचं दिलखुलास व्यक्तिमत्त्व कोमेजून जाताना ती पाहू शकत नाही. या स्त्रीचे आत्मीयतेचे बोलणे ऐकून आरशाबाहेरील स्त्रीला आपल्याला जाणणारं, पाहणारं, समजून घेणारं कोणीतरी आहे याची सुखद जाणीव झाली. त्यामुळे तिचं बोलणं ऐकताच आरशाबाहेरील स्त्रीला आपल्यातल्या ‘ती’ ची जाणीव झाली.

त्यावेळेस ती पुन्हा स्वत:शीच संवाद करतेय की मी हिंदकळतेय की मी कोण आहे? कुठे आहे? तेवढ्यात आरशातील स्त्रीने अधिकारवाणीने आरशाबाहेरील स्त्रीला आंजारून गोंजारून सांगितले की, ‘असं रडत बसायचं नाही वेड्यासारखं, डोळ्यातली आसवं सोडून दयावीत शेजारच्या तलावात म्हणजे दुःख उगाळत बसू नकोस. त्या तळ्यात शुभ्र कमळाची फुले प्रसन्नपणे उमलली आहेत ती घेऊन ये. म्हणजे चिखलात असलेलं कमळ जसं चिखलात रुतून बसत नाही ते फुलून वर येतं तसंच आपणही दु:खाचा ससेमिरा जरी पाठी लागला तरी आयुष्याचं कमळ फुलवायचं असतं. इथे कमळाची उपमा घेऊन कवयित्री आयुष्य फुलवण्याचा संदेश देत आहे.

  • कृती ६. अभिव्यक्ती :

•आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीशी केलेला संवाद हा स्वत:शीच केलेला सार्थ संवाद आहे, हे विधान स्पष्ट करा.

उत्तर : कवयित्री हिरा बनसोडे यांनी आपल्या कवितेतून स्त्रीच्या मनातील घुसमट, वेदना मांडल्या आहेत. आरशातील स्त्री या कवितेत अशीच मूक वेदना हिराताई मांडत आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्यातले बदल आपण टिपत असतो.
हे बदल टिपताना बऱ्याचदा आरसा हे आपल्याला न्याहाळण्यासाठीचं माध्यम असतं.
स्त्री जन्माला आल्यानंतर तिला शिकवलेल्या संस्कारात वाढत असते. अनेक बंधनांची जाचकता सहन करताना तिच्याही मनात विचारांचे वादळ घोंगावत असते. ते पेलवून आपली स्वप्न, ध्येय पूर्ण करण्याकडेही तिची वाटचाल चालू असते. पण लग्न होतं आणि तिची स्वप्नं अर्धवट राहतात. मिळालेलं घर जर स्त्रीला माणूस म्हणून स्वीकारणारं नसेल तर मग तिला स्त्री म्हणून तिची अवहेलना करणं, तिला अनेक बंधनात ठेवणं हा सासरच्या परंपरेने दिलेला अधिकार आहे. आपली होणारी अवहेलना, होणारा त्रास हा फक्त आपल्याच वाट्याला नाही तर तो सर्वच स्त्रियांच्या बाबतीत होणारा अटळ भोग आहे असं समजून आरशाबाहेरील स्त्री हे सर्व त्रास सहन करत आहे.

सहज तिनेच आरशात पाहिलं तेव्हा तिचंच भूतकाळातील रूप तिला साद घालू लागलं. तिच्या पूर्वीच्या रंगरूपाची तीच तिला आठवण करून देऊ लागली.

लहानपणी ती एक चैतन्यमयी बालिका होती जी पावसाचे तरंग हातात धरायची. अंगणात दिवे लावावेत तसे तिचे बहर फुलत असायचे. आपल्या पंखांवर विश्वास ठेऊन ध्येयाना गाठण्याचे स्वप्नं बाळगणारी सुद्धा तीच होती. आता मात्र संसारातील हेवेदावे, स्त्री म्हणून होणारी अवहेलना, सासरी असणाऱ्या विवंचना यामुळे ती पूर्णत: कोलमडून गेली आहे. ती राणी आहे पण स्थितप्रज्ञ राणी जिला कोणताही अधिकार नाही. घरात, संसारात अस्वस्थ असलेली ती जेव्हा आरशासमोर उभी राहतेय तेव्हा तिलाच तिची अवस्था पाहवत नाही. आपण अनेक चांगल्या संधी घालवल्या याची बोचरी जाणीव तिला त्रास देतेय. अनेकदा मानापमानाचे चटके सहन केल्यामुळे तिला रात्री झोपेतही रडू येते, काही वेळेस ति शारीरिक इजाही केली जाते त्याच्या वेदना ती कोणाला दाखवू शकत नाही. हे सर्व तीच तिला समजावतेय, सांगतेय. आणि तीच तिला धीर देतेय. हे सर्व सहन करून पुढे जाण्याचं धाडस आपणच करायचं आहे हा विश्वास तिचा तीच मिळवतेय आपल्या आयुष्यात शुभ्र कमळं फुलवायची ताकद आपल्याला निर्माण करायला हवी असा तीच तिचा निर्धार करतेय. सगळी दुःख फेकून दयायची तर आपणच सक्षमपणे लढ्या हा या स्त्रीचा निर्धार
महत्त्वाचा आहे. आत्मसंवादातून आत्मपरीक्षण करून स्वआनंदासाठी जगण्याची प्रेरणा निर्माण तिनं केली म्हणून हा सार्थ संवाद म्हणता येईल.

प्र २.अभिव्यक्ती /स्वमत.

आरशाबाहेरील स्त्री ही अस्तित्वहीन पुतळी झाली आहे. याबाबत तुमची मते १०-१२ ओळीत लिहा.

उत्तर: आरशातील स्त्री ही आरशाबाहेरील स्त्रीशी संवाद साधत आहे. आरशाबाहेरील स्त्री स्वतःला आरशात पाहते तेव्हा तिला तिचे लहानपणीचे, यौवनातले आपले रूप दिसते. आपण कशा निरागस, ध्येयवेड्या होतो याची तिला जाणीव होते. विवाह झाल्यानंतर स्त्रियांना ज्या त्रासातून जावे लागते, त्या सर्वच त्रासातून, जबाबदाऱ्यांतून जाताना ती स्वत:चं जगणच विसरून गेली आहे. हिचं जगणं लाचारीचं झालं आहे. लग्न झालेल्या स्त्रीला मन मारत, सर्वांना सांभाळून घेत अपमान सहन करत जगावंच लागतं हीच आपली भारतीय परंपरा आहे. तिच्या मनावरही परंपरेने बिंबवलेले आहे. या सगळ्यात ती स्वतःच्या जगण्याचा आनंद घालवून बसलेली आहे. अनेकदा तिच्यासमोर काही चांगल्या संधीदेखील आल्या पण घरातले काय म्हणतील? विरोध करतील अशा विचारांमुळे आलेल्या संधींना तिनं नाकारले. बागेतील फुलांचा सुगंध घेऊन आपलंही जगणं सुगंधी करावं असा विचारच कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे तिने केला नाही. त्यामुळे परंपरेचे ओझे घेऊन स्त्री स्वतःचे अस्तित्व हरवून बसली आहे. आशेचे, चैतन्याचे. उत्साहाचे कोणतेही अंकुर तिच्या मनात नसल्यामुळे ती जणू अस्तित्वहीन पुतळी झाली आहे.

कवयित्री परिचय :

सुप्रसिद्ध कवयित्री म्हणून हिरा बनसोडे उल्लेख केला जातो. आपल्या काव्यलेखनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये त्यांचा अग्रेसर वाटा आहे. ‘अस्मितादर्श’, ‘युगवाणी’, ‘समुचित’सारख्या नियतकालिकातून त्यांनी लेखन केले. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील गराडे या खेडेगावी म्युनिसिपल कामगाराच्या घरात हिरा बनसोडे यांचा जन्म झाला. एका सामान्य बहुजन समाजात जन्माला आलेल्या एका मुलीचा कवयित्रीपर्यंतचा प्रवास अनेक काट्याकुट्यातून जाणारा आहे. आपल्याला समाजात मिळालेली अवहेलना, त्याच्या तीव्र जखमा खोलवर उमटल्या. त्यातून जन्माला आली त्यांची वेदनामयी कविता. त्यांच्या लेखनाला, शिक्षणाला बळ मिळावे म्हणून त्यांच्या सासऱ्यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. याबद्दलची कृतज्ञता त्या ‘फिर्याद’ या काव्यसंग्रहाच्या अर्पणपत्रिकेत करतात.

जात नाही ती जात’ अशी म्हण आपल्याकडे म्हटली जाते. जातीयवादाची पाळंमुळं ही समाजात खोलवर मुरलेली आहेत. या प्रस्थापित समाजव्यवस्थेच्या विरोधात बंड करणारी, प्रश्न विचारणारी कविता हिरा बनसोडे यांची आहे. समाजवास्तवाचे भान ठेवून मानवी मनाचे, वृत्ती-प्रवृत्तींचे, न्याय-अन्यायाचे विविधांगी दर्शन घडवणे ही साहित्यनिर्मितीची भूमिका त्यांनी आपल्या कवितेसाठी घेतली. स्त्रिया हा ही त्यांच्या कवितांचा जिव्हाळ्याचा विषय. स्त्रीच्या दुःखाचे बंध पौराणिक काळापासून आजतागायत तसेच आहेत. त्या दुःखाची तीव्रता स्वतः भोगत असताना त्या दुःखालाही कवितेतून त्यांनी वाट करून दिली. दुःख हे आयुष्याला समृद्ध करणारं रसायन आहे. त्यामुळे दुःखाला न घाबरता नव्या जाणिवा विकसित करायला हव्यात असा स्त्रियांना त्या वेळोवेळी भाषणातून सल्ला देत असतात.

स्त्रियांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या प्रवासात तिच्या वाट्याला येते ती अवहेलना ही अवहेलना विवंचना कोणास सांगता न येणारी पण कवितेतून मात्र ती व्यक्त करू शकतो असा आदर्श हिरा बनसोडे यांनी आपल्या कवितांतून तमाम

महिलांना दिला. ‘आरशातील स्त्री’ ही सुद्धा अशाच प्रकारचे | दुःख, वेदना प्रकट करणारी कविता. आरसा हा आपल्याला आपलं खरं रूप दाखवतो. आपल्या जीवनप्रवासातील अनेक गोष्टींचा साक्षीदारही आरसा असतो. या आरशालाच आपल्यातला आपलेपणा, बदल ओळखता येतो. संदर्भातील ही कविता आहे.

कवितेचा भावार्थ :

आपला भारतदेश आणि त्याच्या सामाजिक प्रथा, चालीरिती, संस्कृती, परंपरा या महान आहेत. इथे गार्गी, मैत्रेयी सारख्या विद्वान स्त्रियाही होत्या आणि युद्धकलेत निपुण असणारी सत्यभामाही होती. देवी अंबे, दुर्गेच्या या संस्कृतीत नंतरच्या काळात स्त्रीला घरातील देवी म्हणून वागणूक मिळू लागली. आर्थिकदृष्ट्या आधार देणारा पुरुष हा घराचा कर्ता मानला जाऊ लागला. स्त्रीवर घरातील, प्रापंचिक जबाबदाऱ्या लादल्या गेल्या. ती आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे मग कायम तिला घरातल्या अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आलं. लहानपणापासूनच तिच्यावर असे संस्कार करण्यात येतात की तिला नंतर संपूर्ण घर सांभाळायचे आहे. सासरच्यांची मने सांभाळायची आहेत. म्हणजे तिचा जन्म हा तिच्यासाठी आहे याची जाणीवच करून दिली जात नाही. लहानपणी बागडणारी, यौवनात रमणारी ती लग्न झाल्यानंतर खुलतच नाही. अशाच एका विवाहित स्त्रीची दुःख, वेदना ‘आरशातील स्त्री या कवितेत मांडली आहे.

सहज आरशात पाहिले •••••••••••• ••••••••• •••••••••

•••••••••••••••••••••••••••••• तू कशी होतीस ते!

आज सहज तिनं आरशात पाहिलं आणि आपल्या रूपाकडे पाहताच तिचे डोळे भरून आले. आरशातील स्त्री तिच्यासमोर उभी होतीच. ते तिचंच तर प्रतिबिंब होते. पण आज ती बोलू लागली. स्वत:ला पाहताच तिचे डोळे भरून आले. आरशातल्या स्त्रीने तिला आठवण करून दिली, ‘तू असलेली, माझेच रूप घेऊन असलेली तू, पण तरीही मी नाही ती, तू माझंच रूप असून किती अंतर्बाह्य बदललीस.’ तू कशी होतीस ठाऊक आहे का तुला? तुझ्या अंतरीचे रंग कसे होते आणि आता तू इतकी कशी बदललीस? मी सांगते तु कशी
होतीस ते असं म्हणून आरशातल्या स्त्रीने आरशासमोरील स्त्रीची पूर्वीची तिला भावलेली रूपे सांगायला
सुरुवात केली.

पावसाचे तरंग ओंजळीत •••••••••• ••••••••••• •••••••••

•••••••••• •••••••••••••• •••••••••फक्त स्थितप्रज्ञ राणी !

आरशातील स्त्री म्हणते, ‘पूर्वी तू इतकी अल्लड बालिका होतीस की तुला पाऊस, पावसाचे तुषार खूप आवडायचे. पावसाचे थेंब ओंजळीत धरून पाणी उडवणारी तू चैतन्यमयी बालिका होतीस. अंगणात दिवे लावावेत आणि त्याने घर उजळून निघावं तसं सर्वच कामात कर्तृत्वाचा बहर आणणारी तू नवयौवना होतीस. अनेक स्वप्नं होती तुझ्यापाशी त्यांचे पंख लावून आभाळाच्या झुल्यावर आपले स्वप्नं पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेणारी तू ध्येयवेडी होतीस. स्वतःला हवे असलेले साध्य करणारी तू ध्येयगंधा होतीस. पण आज तू नखशिखांत तू फक्त दुसऱ्याच्या तालावर नाचणारी, जगणारी, स्थितप्रज्ञा राणी झाली आहेस. जिला स्वतः ची मते नाहीत, घरात केवळ नाममात्र भूमिका बजावणारी तू स्त्री कशी बरं झालीस ?

आरशात भेटलीस तरी बोलत•••••••••••••••• •••••••••••

•••••••••••••••••• ••••••••••पारंपरिकतेचे वरदान समजून

नेहमी भेटतेस तू आरशामध्ये. पण इथे भेटलीस तरी मन उलगडून बोलत नाहीस. ओठ घट्ट मिटून घेतलेले असतात. ते पिळवटून घेऊन अनेक गोष्टी मनात ठेवत असतेस. खोड तोडलेल्या फुलांसारखे आयुष्य जगत आहेस. संसारात इतकी कशी स्वतःला विसरून गेलीस. संसारात कमी जास्त गोष्टी होतंच राहणार पण त्या परंपरेचे वरदान म्हणून सतत सहन करून कसं चालेल? अहोरात्र कुटुंब, पती, मुलं, घरदार यांची सेवा हेच तुझ्या आयुष्याचं ध्येय कसं बरं असू शकेल ?

अंगणात थांबलेल्या तुझ्या•••••••••••• •••••••••••• •••••

•••••••••••• ••••••••••••••• •••••प्राण हरवलेली पुतळी

तू तूझ्या स्वप्नांचे शिखर बांधू पहात होतीस. अनेकदा तुझी स्वप्नं साकार करण्यासाठी विविध संधीदेखील तुझ्या अंगणापर्यंत पोहोचल्या. तुझ्या स्वप्नांचे प्रिय चांदणे तुझ्या दारापर्यंत आले तरी त्याला आपल्या आयुष्यात स्थान न देता केवळ संसाराचा विचार करत राहिलीस. ती स्वप्नं तुझी होती. इतरांना त्यामुळे काहीही फरक पडणार नव्हता. बागेतल्या फुलांचाही गंध घ्यायचा सोडून दिलास. ते ही स्वातंत्र्य तू कसं बरं घालवून बसलीस? ती जाईही, बागही तुझ्या स्पर्शासाठी आतुरलेली होती. त्या फुललेल्या असताना तू त्यांच्याकडे पाहीलेसुद्धा नाहीस. तुझी वाट पाहून

त्या कोमेजूनही गेल्या. निर्जीव, अस्तित्व नसलेल्या एखादया पुतळीसारखी, आत्म्यासारखी का झाली आहेस? स्वतःचे प्राण कशात टाकून दिलेस? त्या संसारात, त्यांच्या विवंचनेत इतकी कशी गुरफटून गेलीस.

अनेकदा तुला मी अशी••••••••••••• •••••••• ••••••••••••

••••••••••••• ••••• ••••••••••ठिकठिकाणी फाटलेले हृदय

अनेकदा तू स्वतःला इतका त्रास करून घेतेस की काळीज हंबरतं माझं. कित्येक रात्री तू तुझा हुंदका कंठात अडकवून ठेवल्याचं मी पाहिलयं. त्याने मी देखील हतबल होते. आपला काही ‘दोष नसताना केवळ स्त्री जन्म लाभला म्हणून अनेक अपराध्यांची ओझी वाहताना तू दिसतेस. अनेकांची हृदये जोडत असताना स्वत:चे मन, भावना यांच्याकडे दुर्लक्ष करते आहेस. तुझ फाटलेलं हृदय, भावना तू स्वत:च जोडत बसतेस.

नि पदराखाली झाकतेस•••••••••••••••• •••••••••••••••

•••••••••••• ••••••••••••••••••अधिकारवाणी ने म्हणाली

अनेकदा मी पाहते घरातल्या त्रासांनी तू बेजार होतेस. कधी शारीरिक इजा, कधी प्रकृतीच्या तक्रारी असतात पण तुझ्या वेदनांकडे लक्ष दयायला कुणालाही वेळ नसतो. तशी गरजच कोणाला वाटत नाही. तुझ्या असह्य वेदनांची जाणीव मला होते. पण मी तर तुझ्यातच असते. मी पण त्या वेदना सहन करत असते. मी तुझ्याठायी असते.

आरशातल्या स्त्रीच्या या बोलण्यामुळे आरशाबाहेरील स्त्रीचे मन हिंदकळू लागते, दोलायमान होते. तिची दोलायमान स्थिती आरशातील स्त्रीच्या लक्षात आली. तिने आरशासमोरील स्त्रीला जवळ घेतले. तिला गोंजारत आरशातील स्त्री अधिकारवाणीने म्हणाली की,

‘रडू नकोस खुळे, उठ ••••••••••••• ••••••••••••••

••••••••••••••• •••••••••••शुभ्र कमळाची प्रसन्न फुले

‘रडत नको बसूस, उठ आणि डोळ्यातली आसवं पुसून टाक. ती आसवं शेजारच्या तळ्यात वाहून टाक आणि तळ्यामधील उमललेल्या शुभ्र कमळांकडे बघ. ती देखील चिखलात असून शुभ्रपणाने उमलतात, फुलतात. त्यामुळे ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हा मंत्र, स्वसामर्थ्याकरता लक्षात घे आणि रडून, कुढून कोणालाच तुझे महत्त्व लक्षात येणार नाही. त्याकरता तुझी दुःखे बाजूला सारून पुढे जायला हवं. हा एक प्रकारे या स्त्रीचा आत्मसंवाद आहे. सर्वच ठिकाणी अंधार असेल तर आपण
उठून प्रकाशाची वाट शोधली पाहिजे. आपल्याला आपलं जीवन उजळवाण्याचा, फुलवण्याचा पूर्ण अधिकार आहे.

कठीण शब्द :

आरसा – दर्पण (mirror), ल्यायलेली- धारण केलेली,

अंतर्बाह्य – आतून बाहेरून (inside and outside), अंतरी

हृदयी (in heart), तरंग हलक्या लाटा ध्येयाचा (waves),
ओंजळ – दोन पसे (the hollow of hands), नखशिखान्त –

डोक्यापासून पायापर्यंत (from top to toe), वरदान आशीर्वाद

(blessing), ध्येयगंधा गंध, स्थितप्रज्ञा – सुखदुःखात समतोल राखणारी (status quo), घनगर्द – घनासारखे दाट

(thickest), खसकन पटकन खेचून, प्रेयस – प्रिय (dear), अल्लड – निरागस (innocent), पेंगुळणे – डुलक्या काढणे (to

be affected by weariness), पुतळी – निर्जिव बाहुली (puppet), खुळे – वेडे (mad), शुभ्र पांढरी सफेद (white), आसू – अश्रू (tears), चांदणे – चंद्राचा प्रकाश (the

moonshine, the moonlight), चैतन्यमयी उत्साहाने परिपूर्ण (spiritual), हंबरणे गलबलून येते, आक्रोश करते, आरडाओरड करते (to bellow), एकांत निवांत – – – – –

नुकतीच जागा, गुजगोष्ट (loneliness), नवयौवना तारुण्यात प्रवेश केलेली (a girl who has just attained adolescence), हुंदका रडण्याचा उमाळा (a sob).

Leave a Comment