Kolhapur marathi mahiti, Kolhapur Jilha Mahiti, Kolhapur Information In Marathi, Kolhapur District Information, Kolhapur pin code maharashtra
कोल्हापूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – Kolhapur Information in Marathi .
कोल्हापूर जिल्हा
पौराणिक दंतकथेनुसार महालक्ष्मीने हा प्रदेश आपल्या गदेने महापुरापासून वाचवला, म्हणून या परिसरास करवीर हे नाव पडले. इतिहासकारांच्या मतानुसार कोल्हापूर जिल्हा परिसरावर आंध्रभृत्य, सातवाहन, कदंब, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, देवगिरीचे यादव व बहामनी अशा अनेक राजवटींचा अंमल होता. कोल्हापूर परिसरावर विजापूरच्या आदिलशहाची अनेक वर्षे सत्ता होती. छत्रपती राजाराम यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराबाईंनी राज्याची सूत्रे हाती घेऊन स्वतंत्र गादीची स्थापना कोल्हापुरात केली. करवीर गादीची स्थापना करणाऱ्या सरदार राणी ताराबाईंची कारकीर्द १७०० ते १७६१ अशी प्रदीर्घ होती. १८१८ च्या दरम्यान बहुतांश महाराष्ट्र ब्रिटिशांच्या ताब्यात गेला होता. पण ब्रिटिशांनी कोल्हापूर संस्थान खालसा न करता त्याचे अस्तित्व कायम ठेवले. पुढे १९४९ मध्ये संस्थान भारतीय संघराज्यात विलीन होईपर्यंत कोल्हापूर संस्थान स्वतंत्र होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळात कोल्हापूर संस्थान भारतात नावारूपास आले.
कोल्हापूर जिल्हा संक्षिप्त=माहिती
१. भौगोलिक स्थान : कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्राच्या नैऋत्य पठारी भागावर वसलेला असून, कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तरेला सांगली जिल्हा, पूर्वेला व दक्षिणेला कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्हा व पश्चिमेला रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचा बहुतांश भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे.
२. उपविभाग व तालुके : कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले, पन्हाळा, करवीर, गडहिंग्लज, भुदरगड (गारगोटी) व राधानगरी असे सहा उपविभाग असून शाहूवाडी, हातकणंगले, पन्हाळा, शिरोळ, करवीर, गगनबावडा, आजरा, चंदगड, गडहिंग्लज, कागल, भुदरगड (गारगोटी), राधानगरी असे बारा तालुके आहेत.
३. प्रमुख पिके : कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य भागात तपकिरी रंगाची सुपीक जमीन असून या जमिनीमध्ये फॉस्फरसचे प्रमाण जास्त आहे. ही जमीन तंबाखू व उसाच्या पिकांकरिता उपयुक्त आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तंबाखू, ऊस व तांदूळ ही महत्त्वाची पिके आहेत.
४. नद्या व धरणे: या जिल्ह्यातील पंचगंगा, कृष्णा, दुधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा व वारणा या प्रमुख नद्या आहेत. त्यांपैकी पंचगंगा नदी महत्त्वाची असून, ही कासारी, कुंभी, भोगावती व तुळशी व गुप्त असलेली पाचवी सरस्वती या मिळून निर्माण झालेली आहे. याशिवाय या जिल्ह्यातून मलप्रभा, ताम्रपर्णी व तिल्लारी इत्यादी नद्या वाहतात. कोल्हापूर जिल्ह्यात फेजीवडे गावाजवळ भोगावती नदीवर राधानगरी धरण बांधण्यात
आले आहे. हे धरण राजर्षी शाहू महाराजांनी बांधले.
५. खनिज संपत्ती : या जिल्ह्यात प्रामुख्याने बॉक्साइट खनिजाच्या खाणी (शाहूवाडी, राधानगरी, चंदगड) आढळतात. याचबरोबर लोह व सिलिका ही खनिजेही मोठ्या प्रमाणात सापडतात.
६. उद्योग व व्यवसाय : कोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचे माहेरघर मानले जाते. कोल्हापूर संस्थानात सहकारी संस्था अधिनियम राजर्षी शाहू महाराजांनी लागू केला होता. याचाच परिणाम म्हणून आज कोल्हापूर जिल्ह्यात हजारो सहकारी संस्था उभ्या राहिल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर, जयसिंगपूर, इचलकरंजी, हुपरी, हातकणंगले, शिरोळ, शिरोली, हलकर्णी व गडहिंग्लज या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. इचलकरंजी येथील औद्योगिक वसाहत ही सहकारी तत्त्वावरील देशातील सर्वात मोठी वसाहत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहर महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हटले जाते. येथील यंत्रमाग व हातमाग उद्योग प्रसिद्ध आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत कोल्हापुरी चपला निर्मितीचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो. या चपलांची परदेशात निर्यात केली जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी हे गाव चांदीवरील कलाकुसरीच्या कामासाठी प्रसिद्ध आहे.
७. दळणवळण : या जिल्ह्यातून मुंबई-पुणे-बंगलोर-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ व रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २०४ गेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून मध्य रेल्वेचा मुंबईबंगळुरू रेल्वेमार्ग आणि लातूरह्नकोल्हापूर रेल्वेमार्ग गेलेला आहे.
कोल्हापूर जिल्ह्याची वैशिष्ट्ये
- पंचगंगेकाठी वसलेले कोल्हापूर शहर महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी म्हणून ओळखली जात असून, देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक पीठ श्रीमहालक्ष्मीचे मंदिर येथे आहे.
- पन्हाळा या जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असून, पर्यटन केंद्र म्हणून विकसित झाले आहे.
- बाजी प्रभूंच्या बलिदानाने पावन झालेली पावनखिंड (घोडखिंडीत ) याच जिल्ह्यात आहे.
- जैनधर्मीयांचे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून बाहुबली हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
- श्रेष्ठ कवी वामन पंडित ( संत तुकाराम, समर्थ रामदास यांच्या काळातील) हे हातकणंगले तालुक्यातील हुपरी या गावचे असून, त्यांनी गीतेवरील टीकात्मक ग्रंथ यथार्थ दीपिका लिहिला.
- प्रसिद्ध कवी पंडित मोरोपंत यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातीलच असून, त्यांनी १०८ प्रकारे रामायण लिहिले. त्यांनी आर्या हे वृत्त मराठीत रूढ केले.
- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे मुख्यालय व चित्रनगरी कोल्हापूर येथे आहे.
- तिल्लारी जलविद्युत प्रकल्प’ कोल्हापूर जिल्ह्यातील ‘चांदगड’ तालुक्यात आहे.
- साखर उत्पादनामध्ये कोल्हापूर हा राज्यातील प्रथम क्रमांकाचा जिल्हा आहे.
- ‘कुस्तीगिरांची पंढरी’ म्हणून कोल्हापूर जिल्हा प्रसिद्ध.
- कोल्हापूर ही शाहू महाराजांची जन्मभूमी व कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे.
सांख्यिकीक कोल्हापूर
(अ) भौगोलिक माहिती
१. क्षेत्रफळ= ७,६८५ चौ.किमी
२. जंगलाचे प्रमाण =१८.१८%
३. अभयारण्ये =राधानगरी अभयारण्य(गव्याकरीता) राखीव
४. राष्ट्रीय उद्याने =चांदोली राष्ट्रीय उद्यान (कोल्हापूर, सातारा, सांगली व रत्नागिरी मिळून)
५.व्याघ्र प्रकल्प =संह्याद्री व्याघ्र प्रकल्प
६. वनोद्याने =तबक (पन्हाळा) व आळते (हातकंगले)
आ) प्रशासकीय माहिती
१. आयुक्तालय= पुणे विभाग
२. जिल्ह्याचे मुख्यालय= कोल्हापूर
३. उपविभाग=६ हातकणंगले, पन्हाळा, करवीर, गडहिंग्लज, भुदरगड (गारगोटी) व राधानगरी.
४. तालुके= १२ शाहूवाडी, हातकणंगले, पन्हाळा, शिरोळ, करवीर, गगनबावडा, आजरा, चांदगड, गडहिंग्लज, कागल, भुदरगड (गारगोटी), राधानगरी.
५. पंचायत समित्या =१२
६. ग्रामपंचायत= १०२८
७.महानगरपालीका=०१ कोल्हापूर महानगरपालीका
८. नगरपालीका= १०
९. नगरपंचायत=१ आजरा
१०. पोलीस मुख्यालय =०१जिल्हा पोलीस अधिक्षक
११. पोलीस स्टेशनची संख्या =२६
(इ) लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनुसार)
१.लोकसंख्या =३८,७६,००१
२. साक्षरता= ८१.५%
३. लिंग गुणोत्तर =९५३
४. लोकसंख्येची घनता =५००
हे पण वाचा>>>>>>
तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्या संपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे अश्याच माहिती साठी MaharashtraBoardSolutions.Net ला नक्की भेट द्या.
Final Word: आम्हाला आशा आहे की तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Kolhapur District Information In Marathi तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीला हा लेख नक्की शेअर करा आणि Maharashtra Board Solutions.
Net ला भेट द्यायला विसरू नका.