मातृभाषा मराठी – Matrubhasha Marathi 2024

मातृभाषा मराठी

आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे मातृभाषा होय. बालपणापासून आई, वडील, आजी, आजोबा, शेजारी यांचे बोलणे आपल्या कानांवर पडत असते.

अनेक शब्द, वाक्ये आपल्या कानांवर पडत असतात. आजूबाजूच्या जगाची ओळख मातृभाषेतून आपल्याला होते. लहान मूल हजारो शब्दांतून या जगाची ओळख करून घेते. आईच्या सहवासातून, आईच्या शब्दोच्चारातून तिने म्हटलेल्या गाण्यांतून, संस्कारांतून मुलाची जडणघडण होते.

या अर्थाने मातृभाषा आणि बालपण यांचे नाते महत्त्वपूर्ण आहे. हे नाते हळुवार आहे, कोमल आहे, तसेच विचार, भावना, कल्पना यांचे भरणपोषण करणारेही आहे. मराठी आपली मातृभाषा आहे. लहानपणापासून मराठी या आपल्या मातृभाषेचे संस्कार आपल्या कानांवर व मनावर होतात.

महाराष्ट्रात मराठी या मातृभाषेचा वारसा आपल्याला लाभलेला आहे. महाराष्ट्रातील हजारो खेड्यांमधून व शहरांतून मराठी भाषा बोलली आहे. या महाराष्ट्राची आणि मराठीची परंपरा समृद्ध आहे. अनेक शेतकरी, कामकरी, अनेक व्यावसायिक बांधवांनी ही परंपरा समृद्ध केली आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

भाषेचे हे महान वैभव आपल्यापर्यंत येऊन पोहोचले आहे. महाराष्ट्राबद्दल व मराठीबद्दल आपण मनापासून कृतज्ञता बाळगली पाहिजे.मातृभाषा मराठी व मराठी भाषेचे व्याकरण हा आपल्या अभ्यासाचा विषय आहे. ‘मराठी’ वर प्रभुत्व मिळविणे, बिनचूक वाक्यरचना करणे, डोळसपणाने भाषेचा उपयोग करणे हे आपल्याला आवश्यक आहे. त्याशिवाय या विषयाकडे पाहाण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवला पाहिजे. विद्यार्थ्याने शालेय अभ्यासात मराठी या विषयाच्या अभ्यासाबरोबरच मराठी वाङ्मयाच्या वाचनाकडेही लक्ष दिले पाहिजे.

तुम्हाला हे आर्टिकल नक्कीच आवडले असेलच अशी मला खात्री आहे असेच मराठी आर्टिकल वाचण्यासाठी आमच्या >> maharashtraboardsolutions.net वेबसाईट ला नक्की भेट द्या इथे तुम्हाला सर्व Questions Paper, Digest, maharashtra board solutions, Marathi Books, Maharashtra Board Textbook Solutions आणि आणखी या संबंधी सर्व माहिती मिळेल.

Leave a Comment