मराठी भाषेची अभिव्यक्ती – Abhivyakti

भाषेची अभिव्यक्ती

आपल्या मनात विचार येतात. आपल्या मनात भावना जागृत होतात. त्या दुसऱ्या व्यक्तीला आपण कळवतो, सांगतो. आपल्याला आश्चर्य वाटते तेव्हा आपण भुवया उंचावतो. आपल्याला नापसंती दाखवायची असते तेव्हा मान आडवी हलवतो किंवा हात हलवतो. आपल्याला रागवायचे असते तेव्हा डोळे वटारतो. अशी आपली ही ‘हावभावांची भाषा’ असते.

भाषा मुख्यतः दोन प्रकारची आहे – (१) स्वाभाविक किंवा नैसर्गिक (२) कृत्रिम किंवा सांकेतिक.

मनुष्यप्राण्याची बोलण्याची भाषा किंवा हावभावाची भाषा यांची गणना नैसर्गिक भाषेत होते. ‘भाषा‘ हा शब्द ‘भाष्’ या संस्कृत शब्दापासून

Telegram group मध्ये जॉईन व्हा

आला असून त्याचा अर्थ ‘बोलणे’ किंवा ‘बोलण्याचा व्यवहार करणे’ असा आहे. आपल्या मनातील विचार ‘बोलून दाखवणे’ हे भाषेचे महत्त्वाचे स्वरूप आहे. तसेच, आपले विचार आपण लिहूनही दाखवतो. ‘लिहिण्यासाठी’ आपण ‘लिपी’ वापरतो. लिपीचा शोध लागल्यामुळे ‘लेखन‘ शक्य झाले आहे.

तुम्हाला हे आर्टिकल नक्कीच आवडले असेलच अशी मला खात्री आहे असेच मराठी आर्टिकल वाचण्यासाठी आमच्या >>>> maharashtraboardsolutions.net वेबसाईट ला नक्की भेट द्या इथे तुम्हाला सर्व  Questions Paper, Digest, maharashtra board solutions, Marathi Books, Maharashtra Board Textbook Solutions आणि आणखी या संबंधी सर्व माहिती मिळेल.

Leave a Comment