Amravati marathi mahiti, Amravati Jilha Mahiti , Amravati Information In Marathi
अमरावती जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – Amravati Information in Marathi
अमरावती जिल्हा
प्राचीन काळी अमरावती भागात उंबराची झाडे मोठ्या प्रमाणात होती. उंबराच्या झाडांना औदुंबर म्हणतात. औदुंबर या शब्दावरून उंदूबरावती, उमरावती व अमरावती असे नाव पडले असावे, अशी आख्यायिका आहे. महाभारत काळात विदर्भाचा भाग दक्षिणपथ म्हणून ओळखला जात असे. श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी ही कौडिण्यपूर राज्याची राजकन्या असून, तिचे कृष्णाने अपहरण केल्याची कथा महाभारतामध्ये रुक्मिणी स्वयंवर या नावाने प्रसिद्ध आहे. कुंतल देशाचा राजा नल याची पत्नी दमयंती हीसुद्धा कौडिण्यपूर येथील होती. अमरावती जिल्ह्याने मौर्य, गोंड, मोगल, मराठे व ब्रिटिश अशा अनेक राजवटी पाहिल्या आहेत. सन १८५३ पर्यंत निजामाच्या अधिपत्याखाली असणारा हा जिल्हा नंतरच्या काळात इंग्रजांच्या हाती आला. १ मे १९६० रोजी विदर्भासहित महाराष्ट्र राज्य स्थापन झाले तेव्हा या जिल्ह्याचा महाराष्ट्रात समावेश करण्यात आला.
अमरावती जिल्हा संक्षिप्त – माहिती
१. भौगोलिक स्थान : अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेला मध्यप्रदेश राज्याची सीमा असून, पूर्वेला नागपूर व वर्धा जिल्हा आहे. दक्षिणेला यवतमाळ ; नैऋत्येला व पश्चिमेला अकोला जिल्हा लागून आहे. अमरावती जिल्ह्याचा काही भाग मैदानी प्रदेशाचा असून, हा भाग पयनघाट म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील प्रामुख्याने मेळघाट भाग दाट जंगलांनी व्यापलेला आहे.
२. नद्या व धरणे : अमरावती जिल्ह्यात वर्धा, तापी आणि पूर्णा या महत्त्वाच्या नद्या असून, चुडामण, चारघड, माडू, विदर्भ बेमळा, कापरा, सिपना, गाडगा, पेढी, अर्णा, बोडी, चंद्रभागा, शहानूर व बोर्डी इत्यादी उपनद्या आहेत. अमरावती जिल्ह्यात अप्पर वर्धा प्रकल्प, शहानूर प्रकल्प आणि चंद्रभागा प्रकल्प इत्यादी धरणे आहेत. अमरावती शहराला पाणीपुरवठा करणारे छत्री तलाव, वडाळी तलाव याच शहरात आहेत.
३.प्रमुख पिके : अमरावती जिल्ह्यात कापसाचे पीक मोठ्या भाग संत्र्याच्या फळांकरिता प्रसिद्ध आहे. हा भाग विदर्भाचा प्रमाणात घेतले जाते. त्याचबरोबर ज्वारी, भुईमूग, सोयाबीन, तूर, चणा इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. विशेषतः अमरावती जिल्ह्यातील वरुड व मोर्शी या तालुक्यांचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जातो. चांदूरबाजार, बडनेरा व अंजनगावसुर्जी भागात विड्याच्या पानांचे
उत्पादन घेतले जाते.
४. उद्योग व व्यवसाय : अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती, अंजनगाव, वरुड, अचलपूर, दर्यापूर, मोशी येथे औद्योगिक वसाहती असून, सातुर्णा येथे सहकारी औद्योगिक वसाहत आहे. अमरावतीजवळील नांदगाव येथे नवीन औद्योगिक वसाहत सुरू करण्यात आली असून, तेथे इंडिया बुल कंपनीचे वीजनिर्मितीकेंद्र आणि कापड निर्मिती केंद्र सुरू झाले आहे. बडनेरा व अचलपूर येथे कापडगिरण्या आहेत.
(७) दळणवळण : अमरावती जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ गेला असून, मध्य रेल्वेचा कोलकाता-मुंबई रेल्वेमार्ग बडनेरा-नरखेड जोडणारा नवीन रेल्वेमार्ग गेला आहे. बेलोरा (बडनेराजवळील) या ठिकाणी धावपट्टी आहे.
अमरावती जिल्ह्याची वैशिष्ट्ये
- अमरावती येथे डॉ. पंजाबराव देशमुख यांनी सन १९३१ मध्ये स्थापन केलेली श्री शिवाजी शिक्षण संस्था आहे.
- सन १९४५ शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरुग्णांकरिता स्थापन केलेली तपोवन ही संस्था आहे.
- अमरावती येथील विद्यापीठाची स्थापना सन १९८३ मध्ये करण्यात आली असून, सध्या हे विद्यापीठ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ म्हणून ओळखले जाते.
- अमरावती येथे हनुमान व्यायाम शाळा या नावाने शारीरिक प्रशिक्षण देणारी राज्यातील सर्वात मोठी संस्था आहे.
- अमरावती शहरातील अंबादेवी व एकवीरा देवीचे मंदिर, संत गाडगे महाराजांची समाधी प्रसिद्ध आहे.
- चिखलदरा हे विदर्भातील थंड हवेचे एकमेव ठिकाण म्हणून प्रसिद्ध असून, हे ठिकाण ‘विदर्भाचे नंदनवन’ म्हणूनसुद्धा ओळखले जाते. या ठिकाणी कॉफीची व स्ट्रॉबेरीची लागवड यशस्वी करण्यात आली आहे.
- मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर हे तीर्थक्षेत्र महानुभावांची काशी म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहे.
- तिवसा तालुक्यातील मोझरी हे गाव संत तुकडोजी महाराजांची समाधी व गुरूकुंज आश्रमासाठी प्रसिद्ध आहे.
- तिवसा तालुक्यातील वर्धा नदीकाठावरील कौंडिण्यपूर येथे ताम्रपाषाण युगातील वसाहतीचे पुरावे मिळाले आहेत.
- मोर्शी तालुक्यातील सालबर्डी येथील डोंगरावरील गुहेत शिव मंदिर येथे आहे. शिवमंदिरात महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. सालबर्डीजवळच २ बौद्ध व ५ हिंदू लेणी आहेत. अलीकडच्या काळात पाशुपत पंथाच्या दोन लेण्यांचा शोध लागला. या लेण्या वाकाटककालीन आहेत.
- अमरावती जिल्ह्यातील तळेगाव (दशासर) हे गाव बैलांच्या शंकरपटासाठी प्रसिद्ध आहे.
- या जिल्ह्यातील ‘सातपुडा’ पर्वतरांगेस अमरावती जिल्ह्यात ‘गाविलगड’ या नावाने ओळखले जाते.
- अमरावती जिल्ह्यात गुगामल राष्ट्रीय उद्यान व मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे.
- मेळघाटला १९७२ मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केल्या गेले.
सांख्यिकीक अमरावती – सर्व माहिती
(अ) भौगोलिक माहिती
१. क्षेत्रफळ =१२२३५चौ किमी
२. जंगलाचे प्रमाण =२६.१०%
३. अभयारण्ये वान अभयारण्य(२१९ चौ. कि.मी.)
४. राष्ट्रीय उद्याने=मेळघाट व्याघ्र प्रकल्प
५. व्याघ्र प्रकल्प =मेळघाट व्याघ्र प्रकल्प
(आ)प्रशासकीय माहिती
१. आयुक्तालय=अमरावती
२. जिल्ह्याचे मुख्यालय =अमरावती
३. उपविभाग =७ (अमरावती, मोर्शी, धारणी , दर्यापूर,
अचलपूर, चांदूर रेल्वे, धामणगांव रेल्वे)
४. तालुके =१४ (अचलपूर, मोर्शी, अंजनगाव(सुर्जी),
दर्यापूर, अमरावती,नांदगाव (खंडेश्वर), चिखलदरा, धारणी,
चांदूरबाजार, भातकुली ,वरूड, चांदूर रेल्वे,धामनगाव रेल्वे व तिवसा)
५. पंचायत समित्या=१४
६. ग्रामपंचायत= ८४३
७. महानगरपालिका=०१ अमरावती महानगरपालिका
८. नगरपालीका =१०
९. पोलीस आयुक्तालय=०२ अमरावती शहर पोलीस आयुक्तालय व जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक
१०. पोलीस स्टेशनची संख्या =अमरावती पोलीस आयुक्त (९) व
जिल्हा ग्रामीण पोलीस (२८)
(इ) लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनुसार
१. लोकसंख्या = २८,८८.४४५
२. साक्षरता=८७.३८℅
३.लिंग गुणोत्तर=९३८
४.लोकसंख्येची घनता=२१३
तुम्हाला अमरावती जिल्ह्या संपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे अश्याच माहिती साठी MaharashtraBoardSolutions.Net ला नक्की भेट द्या.
Final Word: आम्हाला आशा आहे की तुम्हाला अमरावती जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Amravati District Information In Marathi तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीला हा लेख नक्की शेअर करा आणि Maharashtra Board Solutions ला भेट द्यायला विसरू नका.