Satara marathi mahiti, Satara Jilha Mahiti, Satara Information In Marathi, Satara District Information, Satara pin code maharashtra
सातारा जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – Satara Information in Marathi .
सातारा जिल्हा
या प्रदेशावर सातवाहनांचे समकालीन व कुरुवंशीय, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव, बहामनी व त्यानंतर आदिलशाही या राजवटींनी राज्य केले.सातारा परिसराचा इतिहास प्रामुख्याने मराठेशाहीशी जोडलेला आहे. सन १७०८ मध्ये संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांचा राज्याभिषेक सातारा गादीवर झाला होता. सन १९४२ च्या चले जाव आंदोलन काळात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी या जिल्ह्यात प्रतिसरकार स्थापन केले होते.
सातारा जिल्हा संक्षिप्त=माहिती
. १. भौगोलिक माहिती : सातारा जिल्ह्याच्या उत्तरेला पुणे जिल्हा असून ; पूर्वेला सोलापूर, दक्षिण व आग्नेयाला सांगली, पश्चिमेला रत्नागिरी व वायव्येस रायगड जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या रांगा व कोयना प्रकल्पाचा जलाशय असून, जिल्ह्याच्या उत्तरेकडील सीमेवर नीरा नदी आहे.
२. प्रमुख पिके: ज्वारी हे या जिल्ह्यातील प्रमुख पीक असून, हे पीक दोन्ही हंगामांत घेतले जाते. येथील खरीप हंगामातील जोंधळा व रब्बी हंगामातील ज्वारी शाळू म्हणून प्रसिद्ध आहे. कृष्णाकाठची वांगी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. माण, खटाव, फलटण या कमी पावसाच्या प्रदेशात प्रामुख्याने बाजरीचे पीक घेतले जाते. या जिल्ह्यात साखर कारखाने असल्यामुळे येथे उसाचेही उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
३. नद्या व धरणे: या जिल्ह्यातील कृष्णा, कोयना, नीरा, वेण्णा, उरमोडी, तारळा व माणगंगा या महत्त्वाच्या नद्या आहेत. या जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील प्रकल्पांतर्गत मोठ्या प्रमाणावर जलविद्युत निर्माण केली जाते. हा राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत निर्मिती (सुमारे १००० मेगावॅट) प्रकल्प आहे. पाटण तालुक्यातील कोयना प्रकल्पाच्या जलाशयास शिवाजी सागर असे म्हटले जाते. तसेच कृष्णा नदीवर धोम धरण, वेण्णा नदीवर कन्हेर येथील धरण व नीरा नदीवर वीर धरण आहे.
४.उद्योग व व्यवसाय : सातारा जिल्ह्यात सातारा, कन्हाड, वाई, मायणी व कोरेगाव या ठिकाणी औद्योगिक वसाहती असून, सातारा तालुक्यातील जरंडेश्वर येथील भारत फोर्जचा लोखंडी सामग्रीचा कारखाना आहे. महाबळेश्वर येथे मधुमक्षिका पालन केंद्र असून, येथील शुद्ध मध प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील खटाव, माण व फलटण या तालुक्यांमध्ये घोंगड्या विणण्याचा वैशिष्ट्यपूर्ण उद्योग केला जातो.
५. दळणवळण : सातारा जिल्ह्यातून मुंबई-ठाणे-पुणे-बंगळुरू- चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक ४) गेला असून, मुंबईहपुणे- बंगळुरू हा लोहमार्ग याच जिल्ह्यातून गेला आहे.
सातारा जिल्ह्याची वैशिष्ट्ये
- या जिल्ह्यातील सज्जनगडावर श्री समर्थ रामदास स्वामींची
समाधी आहे. - या जिल्ह्यातील वाई येथे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे संपादकीय कार्यालय आहे.
- या जिल्ह्यात महाबळेश्वर व पाचगणी हे एक प्रसिद्ध थंड हवेचे
ठिकाण असून, पाचगणीला भारतातील स्वित्झर्लंड म्हटले जाते . - महाराष्ट्रात सातारा व सांगली हे दोन जिल्हे हळदीच्या उत्पादनात अग्रेसर आहेत.
- ऑलिम्पिकमध्ये कुस्ती या क्रीडाप्रकारात भारताला पहिले पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव हे कहाड तालुक्यातील गोळेश्वर या गावचे होते.
- झांशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील धावदाशी येथील होय.
सांख्यिकीक सातारा
अ) भौगोलिक माहिती
१. क्षेत्रफळ= १०,८८४ चौ. किमी
२. जंगलाचे प्रमाण=१५.
३. अभयारण्ये= कोयना अभयारण्य
४. राष्ट्रीय उद्याने =चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा काही भाग या जिल्ह्यात आहे.
५. वनोद्याने= महाबळेश्वर व प्रतापगड
आ)प्रशासकीय माहिती
१. आयुक्तालय=पुणे विभाग (पुणे)
२. जिल्ह्याचे मुख्यालय= सातारा
३. उपविभाग=०७ फलटण, वाई, मान-खटाव, पाटन, सातारा व कराड.
४. तालुके =११ खंडाळा, फलटण, वाई, माण, जावळी(मेंढा), महाबळेश्वर, कोरेगाव, खटाव, सातारा, पाटण, कराड.
५.पंचायत समित्या= ११
६. ग्रामपंचायत= १५०२
७. नगरपालिका= ०८
८. नगरपंचायत =०८
९. पोलीस मुख्यालय=०१जिल्हा पोलीस अधीक्षक
१०. पोलीस स्टेशनची संख्या =२६
(इ) लोकसंख्या(सन २०११ च्या जनगणनेनुसार)
१. लोकसंख्या= ३०,०३,७४१
२. साक्षरता =८२%
४. लोकसंख्येची घनता= २०९
३.लिंग गुणोत्तर =९८८
हे पण वाचा>>>>>>>>>>
तुम्हाला सातारा जिल्ह्या संपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे अश्याच माहिती साठी MaharashtraBoardSolutions.Net ला नक्की भेट द्या.
Final Word: आम्हाला आशा आहे की तुम्हाला सातारा जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Satara District Information In Marathi तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीला हा लेख नक्की शेअर करा आणि Maharashtra Board Solutions ला भेट द्यायला विसरू नका.