चंद्रपूर जिल्हा माहिती मराठी, इतिहास, वैशिष्ट्ये, तालुके | chandrapur Information In Marathi

chandrapur marathi mahiti, chandrapur Jilha Mahiti , chandrapur Information In Marathi

चंद्रपूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – chandrapur Information in Marathi

चंद्रपूर जिल्हा

प्राचीन काळी चंद्रपूर हा जिल्हा लोकापुरा व त्यानंतर इंद्रपूर या नावांनी ओळखला जात असे. गोंड राजाच्या काळात हा जिल्हा ‘चांदा’ या नावाने ओळखला जात असे. सन १९६४ मध्ये चांदा शहराचे नाव बदलून चंद्रपूर करण्यात आले. सन १९८२ पर्यंत हा जिल्हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा म्हणून ओळखला जात होता. सन १९८२ मध्ये या जिल्ह्याचा काही भाग वेगळा करून गडचिरोली हा वेगळा जिल्हा निर्माण करण्यात आला.

Telegram group मध्ये जॉईन व्हा
chandrapur Information In Marathi
chandrapur Information In Marathi

चंद्रपूर जिल्हा संक्षिप्त – माहिती

१. भौगोलिक स्थान : चंद्रपूर जिल्ह्याच्या उत्तरेस भंडारा व नागपूर हे जिल्हे व पूर्वेस गडचिरोली जिल्हा आहे. दक्षिणेस तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्हा व पश्चिमेस यवतमाळ जिल्हा व वायव्येस वर्धा जिल्हा आहे.

२. नद्या व धरणे : चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा, पैनगंगा व वैनगंगा या प्रमुख नद्या आहेत. या जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात आसोलामेंढा, नागभीड तालुक्यात नळेश्वर व घोडेझरी व तसेच राजुरा तालुक्यात अमलनाला येथे धरणे आहेत. तलावाच्या बाबतीत या जिल्ह्याचा भंडारा जिल्ह्यानंतर दुसरा क्रमांक लागतो. या जिल्ह्यात ताडोबा हा सर्वात मोठा तलाव असून, घोडेझरी तलाव व आसोलामेंढा तलाव प्रसिद्ध आहेत.

३ . प्रमुख पिके : चंद्रपूर जिल्ह्याचे ‘तांदूळ’ हे प्रमुख पीक असून,
संपूर्ण महाराष्ट्रात या जिल्ह्याचा तांदळाच्या उत्पादनात चौथा
क्रमांक आहे. वर्धा नदीखोऱ्यात कापूस पिकवला जातो. याशिवाय तिळाची लागवडही या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते.

४. खनिज संपत्ती : चंद्रपूर जिल्हा राज्यातील खनिज संपत्तीच्या दृष्टीने समृद्ध असा जिल्हा आहे. या जिल्ह्यात वर्धा नदीखोऱ्यात दगडी कोळशाचे सर्वाधिक साठे आहेत. चिमूर तालुक्यात पिंपळगाव, भिसी व असोला (गुंजेवाही) येथे आणि ब्रह्मपुरी तालुक्यात रत्नापूर व लोहारडोंगरी येथे लोहखनिजाच्या खाणी आहेत. या जिल्ह्यात मुख्यतः वरोरा तालुक्यात चुनखडक सापडतो. तसेच राजुरा तालुक्यातही बऱ्याच भागांत चुनखडकाचे पट्टे आहेत. तसेच तांबे, ग्रॅनाईट, वालुकाश्म, जांभा दगड इत्यादी
खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

५.उद्योग व व्यवसाय : चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर इंडस्ट्रीज (बिल्ट) या नावाने ओळखला जाणारा भारतातील सर्वात मोठा कागद कारखाना आहे. राज्यातील सर्वाधिक सिमेंट कारखाने चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. चंद्रपूर व भद्रावती येथे चिनी भांडी तयार करण्याचा उद्योग चालतो. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे
युद्धनिर्मिती साहित्याचा कारखाना आहे. नागभीड व सावली येथे कोशाच्या कापडाचा उद्योग चालतो. चंद्रपूर, घुगुस व मूल येथे औद्योगिक वसाहती आहेत.

६. वाहतूक : चंद्रपूर जिल्ह्यातून एकही राष्ट्रीय महामार्ग जात नाही. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातून दिल्ली-चेन्नई हा लोहमार्ग जातो. या चंद्रपूर, नागभीड, तडळी व मांजरी ही रेल्वेस्थानके आहेत.

सांख्यिकीक चंद्रपूर

 विषय  माहिती          

(अ) भौगोलिक माहिती
१. क्षेत्रफळ =११,४४३चौ किमी. %
२. जंगलाचे प्रमाण=३५.६४
३. अभयारण्ये =अंधारी अभयारण्य
४. व्याघ्र प्रकल्प=ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प
५. राष्ट्रीय उद्याने =ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान

(आ)प्रशासकीय माहिती

१. आयुक्तालय =नागपूर विभाग
२. जिल्ह्याचे मुख्यालय =चंद्रपूर
३. उपविभाग =०८ बल्लारपूर, ब्रह्मपुरी,चिमूर, सावली व मूल
वरोरा, चंद्रपूर, राजुरा
४. तालुके १५ =(गोंडपिपरी, ब्रह्मपुरी,सिंदेवाही, भद्रावती, वरोरा, चंद्रपूर, राजुरा, चिमूर, नागभीड, मूल, बल्लारपूर, पोंभुर्णा,
सावली, कोरपना, जिवती)
५. पंचायत समित्या= १५
६. महानगरपालिका =०१चंद्रपूर
७. नगरपालिका= ०९
८. ग्रामपंचायत =८२६
९, नगर पंचायत= ३ सिंदेवाही, पोंभूर्णा, सावली
१०. मुख्यालय =०१ पोलीस अधीक्षक
११.पोलिस स्टेशनची संख्या =३२

(इ) लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनुसार)
१. लोकसंख्या= २२,०४,४०७
२. साक्षरता =८०.०१%
३. लिंग गुणोत्तर =९७६
४. लोकसंख्येची घनता =१९२

चंद्रपूर जिल्ह्याची वैशिष्ट्ये

 • चंद्रपूर शहराची स्थापना १३ व्या शतकात खांडक्य बल्लाळ शाह या राजाने केली.
 • वनांच्या आकारमानात चंद्रपूर जिल्ह्याचा गडचिरोली व नंदुरबार या जिल्ह्यानंतर राज्यात तिसरा क्रमांक लागतो.
 • चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन -CSTPS हे देशातील सर्वात मोठे औष्णिक वीज निर्माण केंद्र असून, याची वीजनिर्मिती क्षमता २,३४० मेगाव्हॅट इतकी आहे.
 • चंद्रपूर जिल्ह्यात ‘ताडोबा’ येथे राष्ट्रीय उद्यान असून, ‘अंधारीयेथे अभयारण्य आहे. तसेच या जिल्ह्यात ताडोबा येथे मगर प्रजनन केंद्र आहे.
 • बाबा आमटे यांनी कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनासाठी स्थापन केलेला ‘आनंदवन’ प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा या ठिकाणी आहे.
 • ‘ताडोबा’ व ‘आसोलामेंढा’ ही धरणे चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. * *बल्लारपूर हे शहर काही काळ गोंड राजवटीत राजधानीचे ठिकाण होते.
 • वर्धा नदीकाठावर ४०० वर्षांपूर्वी बांधलेला येथील किल्ला प्रसिद्ध असून, तो बांधण्याचे श्रेय गोंड राजा
  खांडक्या बल्लारशाह यास दिले जाते.
 • भद्रावती येथे वाकाटककालीन अवशेष मिळालेअसून, येथील विजासन टेकडीवर बौद्धकालीन लेणी आहेत
 • वरोरा येथे कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनासाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेला आनंदवन प्रकल्प असून, या ठिकाणी रेफ्रिजरेट व पीव्हीसी पाईप निर्मितीचा कारखाना आहे.
 • चंद्रपूर येथे सेंट्रल फॉरेस्ट रेंजर्स महाविद्यालय कार्यरत आहे.या
 • वैशिष्ट्यपूर्ण महाविद्यालयात वन उत्पादने (लाकूड वगळता), वन संरक्षण, वन-धोरण, वन्यप्राण्यांचे जीवन व वनव्यवस्थापन या विषयांचे प्रशिक्षण दिले जाते.
 • चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३५ टक्क्यांहून
  अधिक भाग जंगलांनी व्यापला आहे. वनांचा विचार करता गडचिरोली व नंदुरबार या जिल्ह्यांनंतर चंद्रपूर हा राज्यात तिसऱ्या क्रमांकाचा महत्त्वाचा जिल्हा ठरतो. विविध प्रकारच्या
  वन उत्पादनांनी समृद्ध असा हा जिल्हा आहे.
 • राज्यातील तांब्याचे सर्वाधिक साठे या जिल्ह्यात आहेत. वर्धा खोरे दगडी कोळशाच्या दृष्टीने महत्त्वाचे क्षेत्र आहे. चंद्रपूर तालुक्यात घुगुस व बल्लारपूर ; राजुरा तालुक्यात साष्टी ; भद्रावती तालुक्यात मांजरी आणि वरोरा येथे दगडी कोळशाच्या खाणी आहेत.
 • चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे युद्धनिर्मिती साहित्याचा
  कारखाना आहे. नागभीड व सावली येथे कोशाच्या कापडाचा उद्योग विकसित होत आहे.

तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्या संपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे अश्याच माहिती साठी MaharashtraBoardSolutions.Net ला नक्की भेट द्या.

Final Word: आम्हाला आशा आहे की तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – chandrapur District Information In Marathi तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीला हा लेख नक्की शेअर करा आणि Maharashtra Board Solutions ला भेट द्यायला विसरू नका.

Leave a Comment