Maharashtra Board class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6: रंग माझा वेगळा ( rang maza vegla )

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 6. Solutions रंग माझा वेगळा ( Rang Maza Vegla Notes) Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6.रंग माझा वेगळा

12th Marathi Guide Prashn uttar Chapter 6.रंग माझा वेगळा Textbook Questions and Answers

कृती – ३. खालील ओळींचा अर्थ लिहा.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

(अ) रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा!

उत्तर : ‘रंग माझा वेगळा’ या अत्यंत गाजलेल्या गझलमध्ये सुरेश भट यांच्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होत .
‘रंग माझा वेगळा’ हा काव्यसंग्रहही वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यातील गझलांचे अवलोकन केल्यावर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे कवी आपल्या आयुष्याविषयी हृदय मोकळं करून उघड उघड बोलू लागला आहे. विशेषत: आपली तीव्र निराशा याविषयी तो भडभडून लिहितो. कवी जगापासून निश्चितच कुठेतरी तुटून पडला आहे. एकाकी झाला आहे. उद्ध्वस्तही झाला आहे. ‘रंग माझा वेगळा’ या गझलमध्ये कवी प्रत्यक्ष घटनांविषयी काहीच बोलत नाही. पण जीवनात घडलेल्या घटनांचे स्वत:वर झालेले सर्व परिणाम भेदक शब्दांत मांडतो. ज्या समाजात तो वावरतो त्या समाजाचा ढोंगीपणा, दांभिकता याचे चित्र तो परखडपणे, आंतरिक पोटतिडकीने रंगवतो.

एकीकडे आपल्या पराभवाची धारधार खंत व्यक्त करतो तर दुसऱ्या बाजूला स्वत:च्या वेगळेपणाचा रास्त गर्व प्रकट करतो. आपल्या दोषांचे वेडेवाकडे दर्शन घडवितो तर दुसरीकडे आपल्या सामर्थ्याविषयी अत्यंत अभिमानाने म्हणतो ‘रंग माझा वेगळा’.

या गझलेतील गझलकार हा स्वतः विषयी ठामपणे व्यक्त होतो. कवीने जीवनातील वेगवेगळी आव्हाने स्वीकारली. राजकीय कार्यकर्ता, झुंजार पत्रकार, हळवा कवी अशा रूपात वावरताना जीवनाचे अनेक रंग ते जगले. पण कोणत्याही एका रूपात कायमचे रमले नाहीत. त्यांनी जीवन सर्वांगाने पाहिले. विविध विचार, भावना, प्रतिक्रिया, प्रकृती अनुभवल्या. पण कोणत्याच विचारांच्या गुंत्यात, भावनेच्या गुंत्यात कवी अडकून पडला नाही. साऱ्या गोष्टींपासून त्यांनी स्वतःला अलिप्त ठेवले. गर्दीमध्ये वावरताना सुद्धा स्वतःचे वेगळे अस्तित्व जपले.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

(आ) कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों
अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा !

उत्तर: ‘रंग माझा वेगळा’ या अत्यंत गाजलेल्या गझलमध्ये सुरेश भट यांच्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होते. ‘रंग माझा वेगळा’ हा काव्यसंग्रहही वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यातील गझलांचे अवलोकन केल्यावर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे कवी आपल्या आयुष्याविषयी हृदय मोकळं करून उघड उघड बोलू लागला आहे. विशेषतः आपली तीव्र निराशा याविषयी तो भडभडून लिहितो. कवी जगापासून निश्चितच कुठेतरी तुटून पडला आहे.एकाकी झाला आहे. उद्ध्वस्तही झाला आहे. ‘रंग माझा वेगळा’ या गझलमध्ये कवी प्रत्यक्ष घटनांविषयी काहीच बोलत नाही. पण जीवनात घडलेल्या घटनांचे स्वत:वर झालेले सर्व परिणाम भेदक शब्दांत मांडतो. ज्या समाजात तो वावरतो त्या समाजाचा ढोंगीपणा, दांभिकता याचे चित्र तो परखडपणे, आंतरिक पोटतिडकीने रंगवतो.

एकीकडे आपल्या पराभवाची धारधार खंत व्यक्त करतो तर दुसऱ्या बाजूला स्वत:च्या वेगळेपणाचा रास्त गर्व प्रकट करतो. आपल्या दोषांचे वेडेवाकडे दर्शन घडवितो तर दुसरीकडे आपल्या सामर्थ्याविषयी अत्यंत अभिमानाने म्हणतो ‘रंग माझा वेगळा’.

कवी म्हणतो दुःख अनुभवताना मी सुखाला सामोरे गेलो. जीवन समरसून जगू लागलो. जगावर प्रेम करू लागलो. पण आयुष्याने मला दगा दिला. जगण्यास सुरुवात करत असतानाच आयुष्याने आपला विश्वासघात केला असे कवीला मनोमन वाटते. थोडक्यात जीवनात सुखाची सावली वाट्याला यावी म्हणून कवी तळमळत राहिला पण त्याच्यासाठी सुख म्हणजे कधीही हाती न येणारे क्षितिज ठरले.

कृती – ४. काव्यसौंदर्य.

माणसांच्या मध्यरात्रीं हिंडणारा सूर्य मी:
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !
या ओळींमधील भावसौंदर्य स्पष्ट करा.

उत्तरः सूर्य म्हणजे तेज, सूर्य म्हणजे प्रकाश. ज्याच्या तेजाने अवघी सजीवसृष्टी चैतन्यमय होते. तो नसेल तर मानवी आयुष्य अस्तित्वहीन होईल. जग अंधकारमय होईल. कवी स्वत:ला माणसांच्या ‘मध्यरात्री हिंडणारा सूर्य’ म्हणतो आहे. मी सूर्य आहे असे कवी ताठ मानेने सांगतो आहे. या शक्तीचा आविष्कार वरील काव्यपंक्तीत व्यक्त होतो. ज्यांचे आयुष्य नैराश्य, अंधकाराने व्यापलेले आहे, त्यांच्यासाठी कवी पेटून उठतो. जगाच्या विरोधात न्यायाच्या बाजूने उभा राहतो. कवी म्हणतो की सूर्य दिवसा प्रकाश देतो. पण मी रात्रीचा सूर्य आहे. इथे राग म्हणजे दुःख, नैराश्य! अशा दुःखाने पीडित लोकांसाठी कवीचे शब्द, त्याच्या कविता प्रेरणास्थान आहेत. शब्द, गीतं आणि कविता हीच आपली ताकद आहे, या शब्दांमध्ये समाजाला जागृत करण्याची शक्ती आहे असा कवीला विश्वास आहे.
म्हणूनच ‘उष:काल होता होता काळरात्र झाली’ या सुरेश भट यांच्या गीताने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अवघा महाराष्ट्र पेटून उठला होता. याची आठवण या ओळींच्या निमित्ताने होते. सुरेश भटांच्या गझलांतून प्रवास करता करता एखादया वणव्यात जळणाऱ्या जंगलामध्ये अडकल्यासारखे होते. ज्वालांप्रमाणे त्यांच्या ओळी जठर गिळून टाकायला येतात. शब्द आपल्याला झपाटून टाकतात. कवीच्या संवेदनशीलतेचे दर्शन होते आणि आपण स्तिमित होतो. वरील ओळी वाचतानाही हाच अनुभव येतो. उत्तर ध्रुव सोडला तर मध्यरात्री सूर्य अस्तित्वात नाही. पण नेमकी तीच उपमा कवी वापरतो आणि त्याच्या शब्दरचनेचे वेगळेपण आपल्याला जाणवते.

★ कृती. – ५. रसग्रहण.

खालील ओळींचे रसग्रहण करा.

(अ) रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा!
(सप्टें., २०२१)
उत्तर: ‘रंग माझा वेगळा’ या काव्यसंग्रहातील सुरेश भट यांची ही अत्यंत गाजलेली गझल. आयुष्याविषयीचे ‘सत्य’ या कवितेत कवी उघड उघड मांडतो आहे. आपली वंचना, आपले दु:ख, आपले पराभव याविषयी तो पोटतिडकीने लिहितो. तो जगापासून तुटून पडला आहे. एकाकी झाला आहे, किंबहुना जगाचा नेहमीच वाईट अनुभव त्याने घेतला आहे. त्यामुळे एक प्रकारची विरक्ती त्याच्या शब्दांत आली आहे. पत्रकार, संपादक, गीतकार, कवी अशा विविध रूपांत तो समाजात वावरतो.
पण माणसांचा दुटप्पी व्यवहार, स्वार्थी, ढोंगीपणा, लाचारी, समाजातील मूल्यहीनता, ‘मी’ ची समाजाने केलेली मानहानी हे पाहिल्यावर तो सर्वांपासून वेगळा होतो. एकप्रकारचा तटस्थपणा त्याच्यात येतो. त्यामुळे सगळ्यात असूनही कवी कोणातच नसतो. ही भावावस्था शब्दांत मांडताना कवी म्हणतो ‘रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा ! गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा!’ कारण तो कोणत्याच विचारांच्या गुंत्यात, भावनेच्या गुंत्यात अडकून पडला नाही.

(आ) कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा !
(सप्टें., २०२१)
उत्तर:’रंग माझा वेगळा’ या अत्यंत गाजलेल्या गझलमध्ये सुरेश भट यांच्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होते. वरील ओळींमध्ये कवी ऊन आणि सावली या प्रतीकांचा समर्पकपणे वापर करतो. कवी म्हणतो की सगळ्यांना उन्हाच्या झळा लागतात. त्याची दाहकता अवघ्या मानवजातीला त्रासदायक ठरते. म्हणून माणसं उन्हापासून दूर पळतात आणि सावलीच्या आश्रयाला जातात. तिथे बसून थंडावा शोधत निवांत शांततेचा अनुभव घेतात. पण कवी म्हणतो मी असा कलंदर माणूस की मला सावलीतही थंडावा मिळत नाही. दु:ख, नकार, निराशा या नकारात्मक गोष्टींमुळे कवी इतका निराश होतो की शोधूनही सुखाचा झरा त्याला सापडत नाही. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केला. आता विश्वास तरी कोणावर ठेवू? असा प्रश्न त्याला पडला आहे. जणू या ओळींत कवीच्या गांजून गेलेल्या मनाचे आर्त उद्गार उमटले आहेत. त्याला मदत करणाऱ्यांनी अशा प्रकारे मदत केली की त्या मदतीचाही कवीला त्रासच होतो.

(इ ) राहती माझ्यासवें हीं आसवें गीतांपरी;
हें कशाचें दुःख ज्याला लागला माझा लळा !

उत्तरः मनुष्याच्या जीवनात आनंद-दुःख या गोष्टी अमावस्या आणि पौर्णिमेप्रमाणे येतच असतात. दुःखाने जीवन भरलेलं असेल तरी उदया सुखाचे दिवस येतील या आशेवर माणूस जगत असतो. कवीचे जीवन मात्र दुःखाने भरून गेले आहे. त्याच्याबरोबर येणारे अश्रू हे त्याचे जणू मित्र झाले आहेत. तो म्हणतो मी सुखाच्या शोधात घराबाहेर पडलो पण दुःख रस्त्यात उभीच होती. मग त्यांना आयुष्यभरासाठी बरोबर घेतले आणि जीवनाची वाटचाल सुरू ठेवली. आता तीच दुःख माझ्यासोबत कायमसाठी वास्तव्याला आली आहेत. या दुःखांनाही माझा जणू लळाच लागला आहे असे कवी उपहासाने म्हणतो. आत्मिक संघर्ष हा कवीच्या गझलांचा प्राण आहे, तो वरील ओळींत स्पष्टपणे जाणवतो. कधी कधी मिळणारे सुखही त्याला अशा प्रकारे मिळाले की आनंद वाटायच्या ऐवजी त्याला दुःखच मिळाले.

(ई) कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों
अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा !

उत्तरः ‘रंग माझा वेगळा’ या गझलेमधील अत्यंत आर्त आणि काळजाचा ठाव घेणारी ओळ म्हणजे ‘अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा!’ कवीच्या मनातील अपार दु:खाची, त्याला सहन कराव्या लागणाऱ्या वंचनेची कल्पना येते आणि आपलेही काळीज पिळवटून जाते. कायम दुःखच वाट्याला आलेले असताना त्याच्याही नशिबी सुखाचा प्याला आला होता. तोही जीवन समरसून जगू लागला होता. पण मग मध्येच आपल्याच म्हणणाऱ्या लोकांनी असा दगा दिला की काळीजच उसवून गेले. श्वास अडकून पडला. दुःखाची रांग संपता संपत नाही. अशी मनाची भावावस्था कवी इथे आर्त शब्दांत प्रकट करतो. जीवनात सुखाची सावली वाट्याला यावी म्हणून कवी तळमळत राहिला पण त्याच्यासाठी सुख म्हणजे कधीही हाती न येणारे क्षितिज ठरले! पंख फाटलेल्या पक्ष्यासारखा तो तडफडतो आहे. जणू आयुष्यानेच त्याचा गळा कापला आहे.

(उ) सांगती ‘तात्पर्य’ माझें सारख्या खोट्या दिशा:
“चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा । “
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी:
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा ।
(मार्च, २०२२)
उत्तरः कविवर्य सुरेश भट यांच्या ‘रंग माझा वेगळा’ या काव्यसंग्रहातील ही एक प्रसिद्ध अशी गझलरचना आहे. मराठीत ‘गझल’ हा रचनाबंध लोकप्रिय करण्यात सुरेश भट यांचा सिंहाचा वाटा आहे. (काव्यप्रकार )
सगळ्या गुंत्यात गुंतूनही आपला पाय मोकळा ठेवणाऱ्या कलंदर व्यक्तिमत्त्वाचे जगावेगळे जीवनानुभव प्रस्तुत गझलेत गझलकाराने मांडले आहेत. जीवनाचे अनेक रंग ते जगले पण कोणत्याही एका रूपात ते कायमचे रमले नाहीत. विचारांच्या भावनेच्या गुंत्यात कवी अडकून पडला नाही. जीवनात ऊन-सावली, सुखदुःख इतरांप्रमाणे कवीच्याही वाट्याला आले. ऊनसावल्यांच्या, सुख-दुःखांच्या या खेळात सावल्यांच्या झळांचा, अनामिक दुःखाचा लळाच कवीला सहन करावा लागला. जीवनात सुखाची सावली वारंवार यावी म्हणून कवीमन सदैव तळमळत राहिले. जीवन जगताना कवीच्या वाट्याला प्रचंड निराशा आली. खोट्या अफवा पसरवून लोकांनी कवीला बदनाम केले. त्यामुळे अनेकदा एखादया पांगळ्या व आंधळ्या माणसाप्रमाणे कवीची स्थिती झाली. तरीही कवी स्वतःचा उल्लेख माणसांच्या विश्वातील मध्यरात्री हिंडणारा सूर्य असा करतो. काव्यनिर्मितीची प्रतिमा हीच कवीच्या अंतःकरणातील आग आहे आणि याच आगीमुळे कवीमधला ‘मी’ जिवंत आहे. (मध्यवर्ती कल्पना)
आजवरच्या आपल्या जीवनाचे तात्पर्य सांगताना कवी सुरेश भट म्हणतात की, जीवन जगताना कवीच्या वाट्याला प्रचंड निराशा आली. विश्वासघात, खोट्या अफवा पसरवून कवीला बदनाम करण्याची एकही संधी लोकांनी सोडली नाही. पांगळा मनुष्य उत्तमपणे चालू शकत नाही व आंधळा मनुष्य जसा पाहू शकत नाही असेच अनुभव कवीच्या वाट्याला आले. समाजातील सर्व स्वार्थी लोकांना कवी स्वतःचे वेगळेपण ‘मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी’ या शब्दांत व्यक्त करतो. जगाला प्रकाशमय, चैतन्यमय करण्याचे सामर्थ्य सूर्यात आहे. सूर्याची हीच ताकद कवीच्या शब्दांत आहे. ज्यांचे आयुष्य नैराश्याने व्यापलेले आहे त्यांच्यासाठी कवी पेटून उठणारा सूर्य आहे. (आशय सौंदर्य)
‘रंग माझा वेगळा’ या गझलमध्ये कविवर्य सुरेश भट यांच्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वाची ओळख आपल्याला होते. ज्या समाजात कवी वावरतो त्या समाजाचा ढोंगीपणा, दांभिकता यांचे चित्र ‘चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा’ यातून नेमकेपणाने रेखाटले आहे. ज्यांचे आयुष्य नैराश्य अंधकाराने व्यापलेले आहे त्याच्यासाठी कवी पेटून उठतो. आपल्या सामाजिक बांधिलकीचे भान ‘पेटण्याचा सोहळा’तून प्रकटले आहे. या गझलेतील प्रत्येक शब्द, जीवनानुभव व्यक्त करण्यासाठी वापरलेली प्रतिके लक्षणीय आहेत. सूर्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये का आहे याची नेमकी जाण कवीला आहे. ‘मध्यरात्रीचा सूर्य’ ही प्रतिमा कवीचे वेगळेपण आपल्यासमोर उभे करते. पांगळा, आंधळा, सोहळा सारख्या यमकांमुळे एक अंगभूत लय, ठेका निर्माण झाला आहे. वृत्तीचा प्रांजलपणा, उपरोधिक शैली या गुणांमुळे या गझलेचा रंग नक्कीच ‘वेगळा’ झाला आहे. (रसास्वाद)

★ कृती – ६. अभिव्यक्ती.

(अ) समाजात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न
‘करावेच लागतात’, सोदाहरण स्पष्ट करा.

उत्तर : माणूस जन्माला येतो तो मृत्यूचा शाप घेऊनच येतो. पण जन्म आणि मृत्यू यांमधील मनुष्याचे जे वास्तव आहे ते कसे जगावे हे मात्र पूर्णपणे मनुष्याच्या हातात आहे. ‘मरावे परि कीर्तीरुपी उरावे’ या उक्तिप्रमाणे आपल्या मृत्यूनंतरही समाज आपल्याला विसरता कामा नये यासाठी माणसाने सामान्य लोकांपेक्षा वेगळे कार्य करत राहणे रजेचे आहे. कलावंत आपल्या कलेमुळे समाजात वेगळे ठरतात. स्वातंत्र्यवीरांची देशभक्ती, सैनिकांची राष्ट्रनिष्ठा या गोष्टी त्यांना सामान्य माणसांपासून वेगळ्या उंचीवर नेतात. प्रकाश आमटे, डॉ. बाबा आमटे, डॉ. रविंद्र कोल्हे यांसारखी माणसे त्यांच्या वेगळ्या सामाजिक बांधिलकीमुळे समाजात सन्मानाला पात्र ठरतात. त्यामुळे जी माणसं मळलेली वाट सोडण्याचं धाडस दाखवतात, ती अजरामर ठरतात. कोणीतरी राईट बंधूंनी पक्ष्यासारखे उडण्याचं स्वप्नं बघितलं आणि विमानाचा जन्म झाला. असे अनेक संशोधक जगाच्या इतिहासात अजरामर झाले. जन्माला येऊन किड्यामुंग्यांप्रमाणे जीवन जगणे यात खरं कर्तृत्व नाही. ‘जन पळभर म्हणतील हाय, हाय, मी जाता राहिल कार्य काय?’ या भा. रा. तांबे यांच्या ओळींप्रमाणे स्वत: ला प्रश्न विचारला पाहिजे की मी असे कोणते चांगले काम केले आहे ज्यामुळे मी चारचौघात उठून दिसेन ? समाजात स्वतःचा वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवण्यासाठी अपार मेहनत व कष्टांची गरज असते. घणाचे घाव सोसल्याखेरीज दगडालाही देवपण मिळत नाही हेच खरे !

(आ) कवीच्या आयुष्याने केलेली त्याची फसवणूक तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

उत्तर : सुरेश भटांची गझल सामान्य माणसांसाठीच आहे. तिच्यातला आंतरिक जिव्हाळा, तिच्यातला दिलखुलासपणा, त्यातले दुःख, ‘मी’ ची समाजाने केलेली मानहानी हे सर्व सामान्य माणसांच्या जीवनाचेच प्रतिबिंब आहे.

कवीची भाषा, त्याचे शब्द, त्याची प्रतीके ही खास मराठी मातीची आहेत. प्रत्येक सामान्य शब्दांमागे त्यांनी आपले जिवंत अनुभव उभे केल्याने त्या शब्दांना त्यांच्या कवितेत नवे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. कवीच्या वाट्याला दुःख, पराभव आणि फसवणूक आली आहे. ‘रंग माझा वेगळा’ या गझलेत त्यांच्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होते. कवी त्याच्या आयुष्याविषयी मोकळेपणाने बोलत आहे. विशेषतः आपली वंचना, आपली फसगत, आपले पराभव यांविषयी तो भडभडून लिहितो. कवी जगापासून निश्चितपणे तुटून पडला आहे. एकाकी झाला आहे. उद्ध्वस्त झाला आहे. आयुष्यानेच जणू त्याचा घात केला आहे अशी निराशाजनक भावना त्याच्या मनात दाटून आली आहे. या गझलेमध्ये कवी प्रत्यक्ष घटनांविषयी काहीच बोलत नाही. पण जीवनात घडलेल्या घटनांचे स्वतःवर झालेले सर्व परिणाम भेदक शब्दांत मांडतो. समाजाकडून आलेल्या कटू अनुभवांमुळे तो समाजाचा ढोंगीपणा, दांभिकता यावर आसूड ओढतो. तो अत्यंत उद्विग्नतेने म्हणतो की ज्या सावल्यांनी शीतलता देऊन जनमानसाला थंडावा दयायचा त्या सावल्याही मला तापदायक ठरल्या. स्वकीयांनीच विश्वासघात केला. आता कोणावर विश्वास ठेऊ असा आर्त प्रश्न कवी विचारतो आणि म्हणतो, ‘माझा गळा’ आयुष्यानेच कापला आहे !

(इ) ‘मी मध्यरात्री हिंडणारा सूर्य आहे’, असे कवी स्वत: बाबत का म्हणतो ते लिहा.

उत्तर: ‘रंग माझा वेगळा’ हा सुरेश भट यांचा एक वैशिष्ट्यपूर्ण काव्यसंग्रह. याच संग्रहातील याच नावाची गझल कवीच्या आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देते. कवी या गझलेमध्ये स्वत:च्या आयुष्याचे दुःख उघडपणे समोर मांडतो.

ज्या समाजात तो वावरतो त्या समाजाचा ढोंगीपणा, दांभिकता यांचे चित्र तो परखडपणे व आंतरिक पोटतिडकीने रंगवतो.

एकीकडे तो आपल्या पराभवाची धारधार खंत व्यक्त करतो तर दुसऱ्या बाजूला स्वतःला सामर्थ्याविषयी भावना व्यक्त करताना तो स्वत:ला ‘मध्यरात्री हिंडणारा सूर्य’ म्हणून संबोधित करतो. सूर्य साऱ्या जगाला प्रकाश देतो. पण कवी म्हणतो मी रात्रीच्या अंधारात म्हणजे दु;खात प्रकाश देणारा सूर्य आहे. ज्याचे आयुष्य नैराश्य अंधकाराने व्यापलेले आहे त्यांच्यासाठी कवीचे शब्द · म्हणजे पेटणारा सूर्य आहे. सूर्याचे सामर्थ्य त्याच्या काव्यात, गीतांत, शब्दांत आहे याची कवीला जाणीव आहे. ‘काव्यनिर्मितीची प्रतिभा हीच माझ्यातील आग आहे. याच आगीमुळे मी जिवंत आहे’ अशी कवीची

रास्त भावना आहे. सूर्याच्या तेजाने अवघी सजीवसृष्टी चैतन्यमय होते. तो नसेल तर जग अंधकारमय होईल. जगाला प्रकाश देण्याची ताकद सूर्यामध्ये आहे. तीच ताकद कवीच्या शब्दांत आहे असे कवी अभिमानाने सांगतो. तो अन्यायाच्या विरोधात आवाज उठवतो. न्यायाच्या बाजूने नीडरपणे उभा राहतो. रात्रीचा सूर्य हा फक्त उत्तर ध्रुवावर आढळतो. इतरत्र मात्र तो दिवसा तळपतो. म्हणूनच नेमकी ‘मध्यरात्रीचा सूर्य’ ही संकल्पना कवी स्वत:साठी वापरतो आणि त्याच्या वेगळेपणाची जाणीव करून देतो.

कृतिपत्रिका

प्र. १. खालील पदयपंक्तींच्या आधारे दिलेल्या कृती सोडवा.

(अ) योग्य विधान निवडून वाक्य पुन्हा लिहा.
(१) कवीला उन्हाच्या झळा लागल्या.
(२) कवी रात्रीचा हिंडणारा चंद्र आहे.
(३) कवीचा पाय सगळ्या गुंत्यांत गुंतून पडला आहे.
(४) आयुष्याने कवीचा गळा कापला.
उत्तर : आयुष्याने कवीचा गळा कापला.

(आ) असत्य विधान ओळखा.
(१) कवी मध्यरात्री हिंडणारा सूर्य आहे.
(२) कवी सगळ्यांच्या रंगांत रंगून एकरंग झाला आहे.
(३) दुःखालाही कवीचा लळा लागला आहे.
(४) कवीला सावल्यांच्यांही झळा लागल्या आहेत.
उत्तर : कवी सगळ्यांच्या रंगांत रंगून एकरंग झाला आहे.

कविता : रंगुनी रंगांत . पेटण्याचा सोहळा ! (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. २८)

(इ) या काव्यपंक्तीतील यमक अलंकाराचे उदाहरण दर्शवणारे दोन शब्द लिहा.

(१)……………

उत्तर : (१) वेगळा

(२)…………….

उत्तर :(२) मोकळा

(ई) कंसातील योग्य शब्द वापरून कवितेच्या ओळी पूर्ण करा.

(मोकळा, झळा, लळा, गळा, आंधळा)

(१) अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा……!
(२) हें कशाचें दुःख ज्याला लागला माझा……!

उत्तर : (१) अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा!
(२) हे कशाचे दु:ख ज्याला लागला माझा लळा !

प्र. २. स्वमत/ अभिव्यक्ती.

•’चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा’, काव्यपंक्तीतील भावार्थ

स्पष्ट करा. : ‘रंग माझा वेगळा’ या गझलेमध्ये सुरेश भट यांनी अनेकदा परस्परविरोधी भावछटा वापरून काव्याला अनपेक्षित वेगळे वळण दिले आहे. वरील ओळ म्हणजे विसंगतीतून निर्माण होणारा भावार्थ याचे सार्थ उदाहरण आहे. पांगळा मनुष्य हा शारीरिकदृष्ट्या निसर्गतःच कमजोर असतो. तसेच आंधळ्या मनुष्याकडे पाहण्यासाठी निसर्गतः दृष्टी नसते. सामान्य माणसाच्या तुलनेत अशा व्यक्तीकडे काही शारीरिक कमतरता निसर्गानेच निर्माण केलेल्या असतात. नेमक्या याच कमतरतांचा कधी विरुद्ध अर्थाने वापर करून आपली भावावस्था प्रकट करतो. कवी म्हणतो, पांगळा मनुष्य सामान्य माणसांप्रमाणे धावू शकत नाही. आंधळा माणूस सामान्य माणसांप्रमाणे पाहू शकत नाही कारण त्यांच्याकडे त्या शारीरिक क्षमता नसतात. तशीच काही अपूर्णता असणारी माणसं माझ्या आयुष्यात आली. त्यांची मला समजून घेण्याची कुवतच नव्हती. या माणसांनी माझे अंतरंग न पाहता, न समजून घेता मला बदनाम केले. माझ्याविषयी खोट्या अफवा पसरवल्या. पण अशा व्यक्तींना मी फार किंमत देत नाही असे कवी या ओळींतून आवर्जून नमूद करतो.

कवी परिचय :

मराठी कवितेच्या इतिहासात आपल्या उत्कृष्ट गझलनिर्मितीमुळे ज्यांनी इतिहास निर्माण केला असे सुरेश भट, हे मराठी साहित्य प्रांगणातील एक श्रेष्ठ प्रतिभावंत कवी आहेत. पत्रकार, संपादक आणि कवी अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या सुरेश भट यांच्या गझलांमुळे अवघे मराठी काव्य समृद्ध झाले. ‘गझल’ हा रचनाबंध मराठी साहित्यात लोकप्रिय करण्यात त्यांचा सिहांचा वाटा आहे.
‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी’ असे अजरामर गीतकाव्य लिहिणारे सुरेश भट, मराठी मायबोलीचे सामर्थ्य त्यांच्या काव्यनिर्मितीत दाखवतात. मराठी भाषेच्या नजाकतीचा त्यांना रास्त गर्व आहे. मराठी गझलांमध्ये उर्दू गझलांची नजाकत, नखरा, ऐट, मोहकपणा, तेज आणि धारधारपणा त्यांनी अगदी जशाच्या तसा आणला आणि गझल या काव्यप्रकाराला अस्सल मराठी मातीचे रंग व रूप दिले. त्यांच्या मते ‘गझल ही एक जीवनशैली आहे, ते एक तत्त्वज्ञान’. यशाची गझल लिहिण्यासाठी लागणारी सगळी वैशिष्ट्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वात ठासून भरली आहेत. मस्ती, बेफिकीरी, फकिरी वृत्ती, बेदरकारपणा, प्रांजलपणा, मोकळेपणा, बंडखोरी, उपरोध असे गुण, जे जगाच्या दृष्टीने अवगुण ठरत असले तरी हेच गुण त्यांच्या काव्याला जिवंत, ज्वलंत आणि वास्तव अनुभूती देतात. माणसांचा दुटप्पी व्यवहार, स्वार्थ, ढोंगीपणा, लाचारी, समाजातील मूल्यहीनता, ‘मी’ ची समाजाने केलेली मानहानी याविषयी ते तीव्र संताप व्यक्त करतात. प्रेमकविता लिहितानाही त्यांची मृदू-हळूवार शब्दकळा कधीकधी तीक्ष्ण, धारधार, उपरोधिक बनते.
‘मेंदीच्या पानावर’, ‘तरुण आहे रात्र अजुनी’, ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी’, ‘मलमली तारुण्य माझे’, ‘चांदण्यात फिरताना माझा धरलास हात’, ‘मालवून टाक दीप’, ‘पहाटे पहाटे’, ‘केव्हा तरी पहाटे’, ‘सुन्या सुन्या मैफलित माझ्या’, ‘उष:काल होता होता’ या त्यांच्या काव्याला मराठी सिनेमासृष्टीत गाण्यांच्या रूपात स्थान मिळाले आणि ते जनतेचे लाडके कवी झाले. ‘रूपगंधा’, ‘रंग माझा वेगळा’, ‘एल्गार’, ‘झंझावात’ या त्यांच्या काव्यसंग्रहांनी त्यांच्या कवितेचे वेगळेपण निश्चित झाले.

कठीण शब्द व त्याचे अर्थ:

गुंता =एकात एक मिसळलेल्या वस्तू (complication), आसवे= अश्रू (Lears), तात्पर्य =सार (gist, moral), | लळा=
जिव्हाळा, नाद (affection), झळा= आगीचे चटके (flames of fire), हिंडणे =भटकणे (wondering), पांगळा= शारीरिकदृष्ट्या दुर्बल (lame), सोहळा =भव्य कार्यक्रम (festive ceremony, function)

कवितेचा भावार्थ :

‘रंग माझा वेगळा’ या अत्यंत गाजलेल्या गझलमध्ये सुरेश भट यांच्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होते. ‘रंग माझा वेगळा’ हा काव्यसंग्रहही वैशिष्टपूर्ण आहे. त्यातील गझलांचे अवलोकन केल्यावर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे कवी आपल्या आयुष्याविषयी हृदय मोकळं करून उघड उघड बोलू लागला आहे. विशेषत: आपली तीव्र निराशा याविषयी तो भडभडून लिहितो. कवी जगापासून निश्चितच कुठेतरी तुटून पडला आहे. एकाकी झाला आहे. उद्ध्वस्तही झाला आहे. ‘रंग माझा वेगळा’ या गझलमध्ये कवी प्रत्यक्ष घटनांविषयी काहीच |बोलत नाही. पण जीवनात घडलेल्या घटनांचे स्वत: वर झालेले सर्व परिणाम भेदक शब्दांत मांडतो. ज्या समाजात तो वावरतो त्या समाजाचा ढोंगीपणा, दांभिकता याचे चित्र तो परखडपणे, आंतरिक पोटतिडकीने रंगवतो.
एकीकडे आपल्या पराभवाची धारधार खंत व्यक्त करतो तर दुसऱ्या बाजूला स्वतःच्या वेगळेपणाचा रास्त गर्व प्रकट करतो. आपल्या दोषांचे वेडेवाकडे दर्शन घडवितो तर दुसरीकडे आपल्या सामर्थ्याविषयी अत्यंत अभिमानाने म्हणतो ‘रंग माझा वेगळा’.

रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा !

या गझलेतील गझलकार हा स्वतःविषयी ठामपणे व्यक्त होतो. | कवीने जीवनातील वेगवेगळी आव्हाने स्वीकारली. राजकीय कार्यकर्ता, झुंजार पत्रकार, हळवा कवी अशा रूपात वावरताना

जीवनाचे अनेक रंग ते जगले. पण कोणत्याही एका रूपात कायमचे रमले नाहीत. त्यांनी जीवन सर्वांगाने पाहिले. विविध विचार, भावना, प्रतिक्रिया प्रकृती अनुभवल्या. पण कोणत्याच विचारांच्या गुंत्यात भावनेच्या गुंत्यात कवी अडकून पडला नाही. साऱ्या गोष्टींपासून त्यांनी स्वत:ला अलिप्त ठेवले. गर्दीमध्ये वावरताना सुद्धा स्वतःचे वेगळे अस्तित्व जपले.

कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा !

कवी म्हणतो की सगळ्यांना उन्हाच्या झळा लागतात. म्हणून माणसं उन्हापासून दूर पळतात सावलीत थंडावा शोधतात. सावलीत नसून निवांत शीतलतेचा आनंद घेतात. पण मी हा असा जगावेगळा कलंदर माणूस की मला तर सावलीही थंडावा देऊ शकत नाही. तिच्याही झळा मला सहन कराव्या लागतात. याचाच अर्थ जीवनात ज्या ज्या गोष्टी आशादायक होत्या त्यांनीच कवीची निराशा केली. स्वकीयांनी विश्वासघात केला. त्यामुळे आता कोणावर विश्वास ठेवू असा प्रश्न कवीला पडलेला आहे. जणू या ओळीत कवीच्या गांजून गेलेल्या असह्य मनाचे आर्त उद्गार उमटले आहेत. मदत करणाऱ्यांनाही अशा प्रकारे मदत केली त्यांचाही कवीला त्रासच झाला.

राहती माझ्यासवें हीं आसवें गीतांपरी;
हें कशाचें दुःख ज्याला लागला माझा लळा !

कवी म्हणतो दुःख आणि त्याच्याबरोबर येणारे अश्रू हे जणू माझे मित्र बनले आहेत. मी सुखाच्या शोधात घराबाहेर पडलो पण रस्त्यात दुःख उभी होती. शेवटी तीच बरोबर घेतली आणि चालू पडलो. म्हणून माझ्या गीतांमध्ये, गाण्यांमध्ये अश्रू आहेत. तेच जीवनातील सत्य आहे. जणू या दुःखांना माझा लळा लागला आहे. त्यामुळे आयुष्यभराची सोबत त्यांनी माझ्याबरोबर जोडली आहे. आत्मिक संघर्ष हा कवीच्या गझलांचा प्राण आहे. तो वरील ओळींत स्पष्टपणे जाणवतो. तो म्हणतो कधी काळी मिळणारे सुखही अशा प्रकारे मिळाले की त्याचे दुःखच वाटले.

कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों
अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा !

कवी म्हणतो दुःख अनुभवताना मी सुखाला सामोरे गेलो. जीवन समरसून जगू लागलो. जगावर प्रेम करू लागलो.
पण आयुष्याने मला दगा दिला. जगण्यास सुरुवात करत
असतानाच आयुष्याने आपला विश्वासघात केला असे कवीला मनोमन वाटते. थोडक्यात जीवनात सुखाची सावली वाट्याला यावी म्हणून कवी तळमळत राहिला पण त्याच्यासाठी सुख म्हणजे कधीही हाती न येणारे क्षितिज ठरले.

सांगती ‘तात्पर्य’ माझें सारख्या खोट्या दिशा:
“चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा !”

जीवन जगताना कवीच्या वाट्याला प्रचंड निराशा आली आहे. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केला. कवीच्या जगण्याचा लोकांनी असा अर्थ काढला की तो जणू जगण्यास लायक नाही. त्या त्याच्याविषयी खोट्या अफवा पसरवून त्याला बदनाम केले. पण कवीला त्यांची चिंता नाही. तो म्हणतो पांगळा माणूस जसा सामान्य माणसाप्रमाणे उत्तम धावू शकणार नाही किंवा आंधळा मनुष्य जसा जग पाहू शकणार नाही. कारण त्यांच्याकडे धावण्याची व पाहण्याची क्षमता निसर्गत:च नव्हती. तशीच ही माणसं ज्यांच्याकडे मला समजून घेण्याची कुवत निसर्गातच नव्हती. ज्यांनी माझ्याविषयी वाईट अफवा पसरवल्या त्यांनी मुळातच माझा वापर करून घेतला आणि स्वार्थ संपल्यावर दूर लोटून उलट मलाच बदनाम केले.

माणसांच्या मध्यरात्रीं हिंडणारा सूर्य मी:
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !

कवी स्वत:ला माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य म्हणतो. सूर्य साऱ्या जगाला प्रकाश देतो. पण मी रात्रीच्या दुःखात प्रकाश देणारा सूर्य आहे असे कवी अभिमानाने म्हणतो. ज्यांचे आयुष्य नैराश्य, अंधकाराने व्यापलेले आहे, त्यांच्यासाठी मी पेटून उठणारा सूर्य आहे असे कवी नमूद करतो तेव्हा त्यांच्यातील सामाजिक बांधिलकी ठळकपणे अधोरेखित होते. सूर्याचे सामर्थ्य कवीमध्ये का आहे याचे उत्तर कवीला माहीत आहे. त्याचे सामर्थ्य त्याच्या गीतांमध्ये, कवितांमध्ये, शब्दांमध्ये आहे हे तो ओळखून आहे. हा काव्यनिर्मितीचा सोहळा हीच माझ्यातील आग आहे जिच्यामुळे मी जिवंत आहे अशी कवीची रास्त भावना आहे.

Leave a Comment