Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter Solutions गढी ( Gadhi Notes) Textbook Exercise Important Questions and Answers.
Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter गढी
12th Marathi Guide Prashn uttar Chapter गढी Textbook Questions and Answers.
(आ) खालील व्यक्तींतील नातेसंबंध स्पष्ट करा.
(१) बापू गुरुजी आणि परबतराव-•••••••
(२) बापू गुरुजी आणि संपती-••••••••••
(३) लक्ष्मी आणि बापू गुरुजी-••••••••••
(४) बापू गुरुजी आणि पाटील-•••••••••
उत्तरः
(१)बापू गुरुजी आणि परबतराव-मुलगा आणि वडील
(२) बापू गुरुजी आणि संपती-गुरुजी आणि शिष्य
(३) लक्ष्मी आणि बापू गुरुजी-पत्नी आणि पती
(४) बापू गुरुजी आणि पाटील-शिष्य आणि पालक
(आ) वैदर्भी बोलीत वापरलेल्या खालील वाक्प्रचारांचे अर्थ लक्षात घ्या, यासाठी तुमच्या बोलीत किंवा मराठीत वापरले जाणारे वाक्प्रचार लिहा.
(१)मन तिळतिळ दुखने –
(२) ठान मांडून उबी रायने –
उत्तर:
(१)मन तिळतिळ दुखने-जीव तिळतिळ तुटणे.
(२) ठान मांडून उबी रायने-ठाण मांडून बसणे.
कृती- ४. कारणे लिहा.
(अ) गावातला जो तो आनंदात होता, कारण•••••••••
उत्तर: गावातला जो तो आनंदात होता, कारण गावाला साजऱ्या गावाचा मान मिळाला होता.
(आ) शिक्षण आटोपल्यावर बापूंना गावाची ओढ लागली, कारण•••••••••
उत्तर: शिक्षण आटोपल्यावर बापूंना गावाची ओढ लागली कारण त्यांना गावातील मुलांना शिकवायचे होते.
(इ) गाववाले गढी खचण्याची वाट पाहत होते, कारण•••••••••
उत्तर: गाववाले गढी खचण्याची वाट पाहत होते, कारण तिथं मोठं मैदान करायचं होतं.
•कृती -५. थोडक्यात उत्तरे लिहा.
(अ) ‘पाखरानं पयले पखं पारखावं आन् मंग उळावं’
असे बापू गुरुजी का म्हणत असतील ते स्पष्ट करा.
उत्तर: बापू गुरुजी हे शिक्षणाचा तळमळीने प्रसार करणारे गुरुजी होते. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतल्यामुळे आपल्यासारख्या अनेक गरजू विठ्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी ते प्रयत्नशील होते. त्यांच्या बरोबरीने शिकलेली सर्व मंडळी शहरात नोकरीसाठी गेली होती. बापू गुरुजींच्या गावाला शिकवण्याच्या ध्येयाला त्यांचे मित्र हसत होते. पण जिद्दीने बापू गुरुजींनी शाळा उघडली. याच दरम्यान देश स्वतंत्र झाला. गावागावाचा विकास होण्याचे स्वप्नं साकार होत होतं. आपला स्वतःचा स्वार्थ साधणारी मंडळी होती. गुरुजींचे ध्येय, कार्य, कर्तव्य पाहून गावातील जाणकार मंडळींनी, गुरुजींच्या मित्रमंडळीनी गुरुजींना इलेक्शनला उभं राहण्याचा सल्ला दिला. पण गुरुजींना या सर्व मोहात पडायचे नव्हते. आज
ही सत्ता असेल उच्या नसेलही. सत्ता हातात असल्यावर खुशमस्करे असतील निंदकही असतील, हातात पैसा, प्रतिष्ठा आल्यावर कदाचित आपलं मन आपल्या ध्येयापासून ढळेल असं इतरांना पाहून वापू गुरुजींना वाटत होते. आपल्या आयुष्यात मुलांना युवकांना शिक्षणप्रवाहात जोडून घेणं हेच एकमेव ध्येय आहे. त्यात बाधा येता कामा नये. निवडणुकीत उभं न राहण्याचा निर्णय त्यांनी याच ध्येयाकरता घेतला होता. आपल्या ध्येयाचे समर्थन करण्याकरता ते म्हणत की, ‘पाखराने आपले पंखातील बळ ओळखून मग उडण्याचा प्रयत्न करावा.’
(आ) बोर्डिंगमधला ‘संपती’ नावाचा मुलगा गेल्यानंतर बापू गुरुजींच्या भावना तुमच्या शब्दांत लिहा.
बापू गुरुजी यांनी आपल्या गावातील मुलांना शिकवण्याचे व्रत घेतले होते. अखंड भारत छोट्या छोट्या खेड्यांनी बनलेला आहे. आपलं गाव शिकले सुधारले तर गावाचा विकास होईल हा विचार गुरुजींच्या मनात सतत असे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी शहरात न जाता गावात राहून शाळेची सेवा करायचे ठरवले होते. गावात त्यांनी प्रचंड खटपट करून शाळा सुरू केली. स्वतः शिक्षक म्हणून ते तिथे रुजू झाले. जी मुलं तालुक्यात शिक्षणासाठी जात होती ती आता आपल्या गावातील शाळेत शिक्षण घेऊ लागली. गुरुजींच्या या सत्कार्याचा परिणाम असा झाला की त्यांना आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळाला.
मिळालेल्या पैशातून गुरुजींनी खेड्यापाड्यातल्या मुलांसाठी एक बोर्डिंग सुरू केले. सरकारने दिलेल्या पैशाचा योग्य विनियोग केला. स्वतःसाठी एकही पैसा खर्च न करता त्यांनी हा भार उचलला खरा. पण वोडिंगच्या दरवर्षीच्या खर्चाचे ओझं भरून निघत नसे त्यामुळे गुरुजींनाच त्याच्या खर्चाची तरतूद करावी लागे. याच वोर्डिंगमध्ये अनेक मुलं रहात होती जी गुरुजींचा जीव की प्राण होती. गुरुजींवरही त्यांचा तितकाच जीव होता. त्यातील संपती याला तर गुरुजींनी वडिलांसारखा जीव लावला होता.
तो पटकीने आजारी होता तेव्हा गुरुजींना तो म्हणत होता की तुम्ही अकोल्याला जाऊ नका. तिथे गेल्यावर तुम्ही दोन-चार दिवस येत नाही. पण शिक्षणसमितीची बैठक असल्यामुळे गुरुजी अकोल्याला जातात. त्याच दिवशी संपतीचा पटकीनं मृत्यु होतो. संपतीच्या मृत्यूने गुरुजींच्या जीवाला चटका लागतो. आपल्या गावात दवाखाना नाही. दवाखाना असता तर संपती वाचला असता. आपल्या गावात दवाखाना असायलाच हवा अशी खूणगाठ त्यांनी बांधली. संपतीची आठवण होताच त्यांचा जीव गलबलून जाई. डोळ्यांत आसवं जमा होत. संपत्याचं जाणं त्यांच्या जिव्हारी लागलं होतं. त्याच्या जाण्यामुळेच बापू गुरुजींनी गावात दवाखाना बांधायचं ठरवलं होतं.
(इ) गुरुजींचा मुलगा वारल्यानंतर बोर्डिगातल्या मुलांच्या झालेल्या
अवस्थेचे वर्णन करा.
उत्तर:गुरुजींचे आपल्या घरापेक्षा शाळेकडे, बोर्डिंगकडे जास्त लक्ष होते. शाळेची सेवा ते मनापासून करत होते. शाळेबरोबरच त्यांनी गावात बोडिंग, वाचानलय सुरू केले. मुलांचे आरोग्य नीट रहावे याकरता तालीमखाना सुरू केला. मुलांकडे लक्ष देण्यामध्ये गुरुजींचा बराच वेळ जायचा. घरामधील अडचणी त्यांची पत्नी लक्ष्मी सांभाळून घ्यायची. संपती पटकीच्या रोगात गेल्यानंतर गावात दवाखाना असावा असं बापू गुरुजींना सतत वाटायचं पण गावची मंडळी मात्र त्यांच्या विरोधात होती. गावात होणाऱ्या सोईसुविधा यामध्ये गुरुजींचे श्रेय होते. त्यांचे नावही होते. त्यांच्या वाईटावर असलेली मंडळीही तितकीच होती. गुरुजींचा मुलगा
एकदा आजारी पडला, प्रचंड तापाने तो फणफणत होता. अकोल्याच्या डॉक्टरकडे ते मुलाला घेऊन गेले. त्यादिवशी संपूर्ण बोर्डिगमधील मुलांनी अन्नत्याग केला. पक्ष्यांसारखी मूक परिस्थिती मुलांची होती. अकोल्याला नेल्यामुळे गुरुजींच्या मुलाला बरं वाटलं नाही. त्या आजारपणात मुलाचा मृत्यू झाला. संपतीनंतर मुलाचा मृत्यू हे दुःख गुरुजी सहन करू शकले नव्हते. बोर्डिगमधील मुलंही त्यांच्या गळ्यात पडून पडून रडत होती. मास्तरांचे दुःख मुलंही पाहू शकत नव्हती.
कृती -६. स्वमत :
(अ) बोर्डिगात शिकत असलेल्या व शिकून गेलेल्या विद्यार्थ्याचे बापू गुरुजींबद्दल असलेले प्रेम तुमच्या शब्दांत लिहा. (मार्च, २०२२)
उत्तर :प्रतिकूल परिस्थितीतही बापू गुरुजींनी आपले शिक्षण पूर्ण केले. गावाच्या पाटलांनी त्यांना मदत केली. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते शहराकडे वळले नाहीत. आपल्या करियरसाठी त्यांनी ग्रामसेवा, शिक्षणसेवा महत्त्वाची मानली. गावच्या मुलांसाठी त्यांनी गावात शाळा काढली, खेड्यापाड्यातील मुले जागेमुळे शिक्षणापासून वंचित राहू नयेत याकरता बोर्डिंग सुरू केले. शाळा, बोडिंग यांमधील मुलं बापू गुरुजींचा जीव की प्राण होती. शाळेतल्या सर्व आघाड्यांवर ते लढत असायचे पण कधी मुलांना कंटाळले नव्हते. बोर्डिंगमधील मुले आपल्या घरापासून दूर आहेत याची त्यांना कल्पना असल्यामुळे या मुलांचाही तितकाच जीव त्यांच्यावर होता. मुलं त्यांची मते मनापासून ऐकायची. रोज रात्री गुरुजी मुलांना शिकवण्यासाठी रात्री बोर्डिंगमध्ये येऊन बसत होते. घरामध्ये न झोपता बोर्डिंगमधल्या मुलांबरोबर ते झोपत होते. त्यांच्या मुलाला पटकी झाली तेव्हा त्यांनी त्याला अकोल्याला डॉक्टराकडे नेले. त्यादिवशी पूर्ण बोडिंग भकास झालं होतं. बोर्डिंगमध्ये कोणीच त्यादिवशी जेवले नाहीत. पाखरागत मुकेपणा घेऊन मुलं वावरत होती. त्या आजारपणात मुलगा जगला नाही. मुलाच्या मरणामुळे गुरुजी पार हादरून गेले. डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंच्या धारा पुसत पुसत ते धीर धरत होते. गुरुजींच्या मुलाच्या जाण्याने बोर्डिगमधील मुले व्याकूळ झाली.
मुलांना गुरुजींसमोर काय बोलावं तेच सुचत नव्हतं. भेदरून गेलेली मुलं एकमेकांच्या गळ्यात गळे घालून रडत होती. गुरुजींना आधार देण्याचा प्रयत्न करत होती. आपल्या शाळेत शिकलेल्या मुलांना पोटापाण्याला लावणं हे पण आपलं कर्तव्य आहे असे बापू गुरुजींना वाटे. काही मुलांना त्यांनी मास्तर म्हणून काही शाळांत नोकरीला लावले होते. या मुलांनीही सरांबद्दलची कृतज्ञता मनी जपली होती. कधी कधी ते नारळ घेऊन बापू गुरुजींना भेटायला यायचे. गुरुजींच्या पाया पडून ते आशीर्वाद घेत असत. हा जिव्हाळा बापू गुरुजींमुळेच जपला जात होता.
(आ) गावातल्या उचापती करणाऱ्या लोकांबद्दल तुमचे मत स्पष्ट करा. (सप्टें.,२०२१)
उत्तर: बापू गुरुजी ज्या गावात रहात होते, त्या गावात शिक्षणाची सोय नव्हती. बापू गुरुजींचे लहानपण फारच हलाखीचे होते. रोजच्या जगण्यासाठी लागणारा पैसाही त्यांच्याकडे नव्हता. त्यांच्या शिक्षणासाठी पाटलांनी पैसा पुरवला म्हणून तालुक्याच्या ठिकाणी जाऊन ते शिक्षण घेऊ शकले. त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी आपल्या गावाचा विकास करायचा हे ध्येय ठरवले. आपल्या गावी खूप खटपटी करून त्यांनी शाळा उघडली. शाळेत मास्तर म्हणून ते रुजू झाले. शाळेची सेवा हीच ईश्वर सेवा असे त्यांनी मानले. विदयार्थी वर्गाचे ते चाहते होते, मुलांसाठी वाचनालय, तालीमखाना त्यांनी गावात सुरू केला. त्यासाठी त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. त्या मिळालेल्या रकमेतून त्यांनी खेड्यापाड्यातील मुलांसाठी बोडिंग सुरू केलं. त्याच्या या धडपडीमुळे गावाला चांगलं रूप मिळत होतं. गावाचं नाव होत होतं. पण ते गावातल्या काही लोकांना अजिबात आवडत नव्हतं. गुरुजींचा लाडका विद्यार्थी संपती पटकीने मृत्यूमुखी पडला. त्याला वेळेवर उपचार मिळाले नाहीत याची खंत बापू गुरुजींना वाटत होती. म्हणून त्यांनी गावात दवाखाना आणण्याची, खटपट केली पण उचापती करणाऱ्या लोकांनी गावात दवाखान्याची गरज नाही असं म्हणत गावकऱ्यांनी दिशाभूल केली. गावात बापू गुरुजींच्या महत्प्रयासाने पोस्ट आलं होतं पण या उचापती करणाऱ्या लोकांनी पोस्टाची गरज नाही असं म्हणून चक्क त्या पोस्टाकडे दुर्लक्ष केलं. गावात मराठी रस्ते बांधायची मोहीमही काढली गेली पण सडकेचा गावाला काही उपयोग नाही असंच ही उचापती करणारी मंडळी म्हणत राहिली. आपल्या गावाचा विकास होऊन ते समृद्ध गाव आदर्श गाव म्हणून नावाजलं जावं असं बापू गुरुजींना वाटे पण उचापती करणारी माणसं गावात काही चांगल्या गोष्टी, सोयी सुविधा आल्या की त्यांच्या विरोधात बोंबाबोंब करत असत. गावातील शाळा हायस्कूल होणार होते पण ते ही गावकऱ्यांना नको होतं. आपलं भलं कशात आहे हेच उचापती करणाऱ्यांना समजत नव्हतं. त्याचा दुष्परिणाम गावकऱ्यांनाच भोगावा लागत होता.
उचापती करणारी ही लोकं मनामध्ये अढी ठेऊन वागणारी असतात. जी स्वतः चे महत्त्व वाढवण्यासाठी अनेक लोकांना अंधारात ठेवतात. अशी उचापती माणसं मनाने कपटी असतात. सामाजिक हितापेक्षा वैयक्तिक हित यांना जवळचे वाटत असते. सकारात्मक दृष्टिकोनाने पुढे जाणाऱ्या लोकांसाठी अडथळे निर्माण करण्यात त्यांना आनंद वाटत असतो. बापू गुरुजींच्या गावातील उचापती करणारी ही माणसं याच पद्धतीने वागत. बापू गुरुजी स्वभावाने साधे असल्यामुळे त्यांनी उचापती करणाऱ्यांचा त्रास सहन केला.
(इ)’वान नदीले कदीमधी येनारा पूर आता पटावरल्या आकळ्याइले आला व्हता.’ यातून तुम्हांला समजणारा अर्थ स्पष्ट करा.
उत्तर: ‘खेड्याकडे चला’ या नायला खरंखुरं रूप आणण्यासाठी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेक सामाजसेवक पुढे आले. बापू गुरुजी हे स्वतः अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये असतानाही त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या गावात शाळा सुरू करून शिक्षणासाठी आयुष्य समर्पित केलं. ज्या काळात त्यांनी हे कार्य सुरू केलं त्यावेळेस गावात एकी होती. चांगल्या गोष्टींना सहकार्य करण्याची वृत्ती होती. गावातील माणसं एकोप्याने रहात होती. बापू गुरुजी जे करतायत ते देशासाठी गावच्या हिताकरता आहे हे समजून घेणारी लोकं होती. निसर्गाचा आदर, सांभाळ करणारी, प्रेम करणारी माणसं होती. वान नदी भरभरून वाहत होती. पावसाळा नियमित असायचा आणि सर्व ऋतूंचे सोहळेही त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या
त्यांच्या काळानुसार साजरे व्हायचे. काळ बदलला, प्रगती, विकास यांच्या व्याख्या बदलू लागल्या. गावाच्या सर्वांगीण विकासाऐवजी दिखाव्याच्या विकासावर लोकं विश्वास ठेवू लागली. अशा स्वार्थी लोकांनी आपल्या मतलबाकरता तात्पुरत्या विकासाकडे लोकांचे लक्ष केंद्रित केलं. गावात स्वतःला प्रतिष्ठा, प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न यशस्वी पण होऊ लागले. मूळात विकास कशाचा, कशासाठी, कशाप्रकारे हवाय याबाबतीत लोकांचा दृष्टिकोन बदलवला गेला. निसर्गाच्या बाबतीत निसर्गाचा उपभोग घेणं हा मानवी हक्कच आहे असं समजून मानवाने निसर्गाकडून बरंच काही ओरबाडून घेतलं पण निसर्गालाही संवेदना असतात या गोष्टी काळापरत्वे विसरल्या जाऊ लागल्या. नदी, पर्वत, वृक्ष, वारा, पाऊस या साऱ्यांचाच उपभोग करून घ्यावा पण त्याची लागवड जपणूक, संरक्षण करणं ही आपली पर्यावरणासंदर्भात जबाबदारी आहे हे लोक विसरून गेले. पूर्वी ज्या नदीला कधीमधी पूर यायचा त्या नदीला वरचेवर पूर यायला लागला होता. पूर्वी शाळेसाठी मुलं तालुक्याला जात होती. आता गावोगावी शाळा झाल्या. मुलं शाळेत येत होती. पटावरची संख्या वाढत होती. त्याप्रमाणे शिक्षणाचा दर्जाही खालावत चालला. नदीची मृदा, प्रवाह, किनारे पाणी प्रदूषित झालं. वातावरण, तापमानदेखील बदलू लागलं.
- कृती ७. अभिव्यक्ती.
(अ) ‘गढी’, ‘वान नदी’ आणि ‘वटवृक्ष’ या तीन प्रतीकांतून गावातील स्थित्यंतराचे दर्शन कशाप्रकारे घडवले आहे, ते प्रत्येकी एकेका उदाहरणाद्वारे स्पष्ट करा.
उत्तर: ‘गढी’ या कथेतून प्रतिमा इंगोले यांनी समाजातील चांगल्या वाईट स्थित्यंतराचे दर्शन घडवलं आहे. बापू गुरुजी या पात्रासोबत गढी, वान नदी, वटवृक्ष ही देखील पात्र अबोलपणे या कथेत येतात. खरंतर ही पात्रं बोलत नाहीत पण गावातील वातावरणातील प्रदूषणाचे परिणाम या तीन पात्रांना भोगावे लागतात. बापू गुरुजी यांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी आपलं अवघं जीवन वाहून घेतलं. ज्या पाटलांनी त्यांना शिक्षणासाठी साथ दिली. त्या पाटलांचे उपकार ते कधीही विसरले नाहीत.
आपल्या गावात राहून गावाचा, गावातील युवकांचा, गावातील मुलांचा विकास ते करत होते. त्यात त्यांचा कोणताही छुपेपणा दडलेला नव्हता, कोणताही स्वार्थ नव्हता. त्यांच्याही जन्माआधीपासून गावातील गढी, वान नदी, वडाचे झाड या गावाचा महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा होते. गावाच्या परिवर्तनाचे महत्त्वाचे साक्षीदार होते. वान नदीचे पाणी भरभरून वाहणारे होते. कधीमधी तिला पूर यायचा. आपल्या प्रवाहासोबत ती आपल्या गावची महती सर्वांना सांगत होती. गावातील जमीन काळीशार होती, गावातील अमाप पीक वान नदीमुळे होतं, गावकरी त्याबद्दल तिचे ऋण व्यक्त करायचे. वान नदीला आपल्या गावाचं फार कौतुक होतं, आपल्या नदीबद्दल गावकऱ्यांनाही कौतुक होतं. गावातील गढी ही तर पुराणवास्तू होती. ती गावचा अभिमान होती. वान नदीला पूर आला तरी ती ठामपणे उभी होती. तिच्या ठामपणामुळं वान नदीनंच माघार घेतली होती. असलेली ही ऐतिहासिक वास्तू पण तिची काळजी वा संवर्धन करावं असं कोणालाच वाटत नव्हतं. बुजूर्ग झालेल्या माणसाप्रमाणे तिच्याकडे, गावाचे, माणसांचे गावातील बदलांचे अनेक किस्से होते. बदलत्या परिस्थितीचे घाव तीही मूकपणे सोसत होती. बापू गुरुजींचे सोसणे आणि गढीचे सोसणे एकाच स्वरूपाचे होते. गावात नदीच्या कोपऱ्यावर असलेला वडाचा
एक नवा वृक्ष आपल्या कोवळ्या फांदया घेऊन उभा राहू पहात होता. त्याच्या फांदया आता पसरत होत्या. त्याच्या पारंब्या फुटू लागल्या होत्या पण गढी मात्र उन्हापावसाशी झुंजत होती. वादळाशी टक्कर देत पांढरी माती त्यांना मिळत होती त्यामुळे ती खचली की तिचा पूर्ण उपयोग त्यांना करायला मिळणार होता. वडाच्या पारंब्या मातीत रुजत होत्या. गुरं त्या वडाखाली विसाव्याला येत होती. मुलंबाळं पारंब्यांभोवती, पारंब्यांवर खेळायची. तरुण, वृद्ध माणसं वटवृक्षाच्या सावलीत बसायची. आता आता जन्माला आलेला वटवृक्ष फोफावत होता पण वान नदी, गढी मात्र दुर्लक्षित होत होती. गावातील ज्ञानी विद्वान, तपस्या करणाऱ्या लोकांचेही हेच होत होते आणि आता आता जन्म घेतलेल्या झाडांना धुमारे फुटत होते. त्यांचा आश्रय गावातील लोकं घेत होती.
अल्पकाळात प्रसिद्धी पावणाऱ्या लोकांसाठी वडाचा वृक्ष हे प्रतीक म्हणता येईल तर गढी, वान नदी जुन्या काळातील लोकांचे प्रतीक म्हणता येईल.
(आ) पाठाच्या शीर्षकाची समर्पकता पटवून दया.
(सप्टें., २०२१ ; मार्च, २०२२)
उत्तरः ‘गढी’ म्हणजे किल्लासदृश्य राजवाडा वा घर, संकटकाळी कोणाच्याही आक्रमणापासून बचाव व्हावा म्हणून ही वास्तू बांधली जात असे. ही वास्तू उंच जागेवर, टेकडीवर, पहाडावर बांधली जायची. या कथेतील गढी गावाचा एक ऐतिहासिक दस्ताऐवज आहे. कथेतील गावाचा प्रत्यक्ष उल्लेख न करता गढी, वान नदी, वटवृक्ष या प्रतीकांमधून गावात, समाजात होणारे बदल लेखिका प्रतिमा इंगोले यांनी टिपण्याचा प्रयत्न ‘गढी’ या कथेतून केला आहे.
गावातील गढी ही लोकांसाठी आधार आहे. ती गावची संस्कृती आहे. हे गाव बरंच जुनं. स्वातंत्र्यपूर्व काळात गावात शाळाही नव्हती. खेडेगावात असलेलं हे गाव गावातील संस्कृती, माणुसकी मात्र टिकवून होतं. म्हणून पाटलांनी स्वखर्चाने बापू गुरुजींना शिकायला तालुक्याला पाठवलं होतं. दुसऱ्याचं दुःख आपलं मानून ते हलकं करणं, त्याकरता त्याला आधार देण्याचं काम पाटलांनी केलं. गढीचंच ते एक प्रतीक म्हणता येईल. बापू गुरुजींनी तोच आदर्श उचलला, त्याचं पालन केलं. आपल्या गावात शाळा उघडून खंबीरपणे शिक्षणाचे कार्य, सेवा केली. वैचारिक, शारीरिक सक्षमीकरणाकरता वाचनालय, तालीमखाना सुरू केला. बाहेरून येणाऱ्या विदयार्थ्यांकरता बोर्डिंग सुरू केले. या प्रयत्नांमध्ये फक्त गावाची सुधारणा, सक्षमीकरण हाच विचार होता. गढी ज्याप्रमाणे रक्षण करण्याकरता उभारली गेली होती. ती गावच्या आधाराचा महत्त्वाचा भाग होती. तसंच शिक्षणाची कास धरून माणसं अज्ञानापासून स्वतःचे रक्षण करतील, गावातील विकासासाठी हातभार लावतील आणि गाव गढीसारखं मजबूत, भरभक्कम आधार देशाला देईल असं बापू गुरुजींचं स्वप्नं होतं. शैक्षणिक, सामाजिक, वैचारिक प्रगती होऊन आपल्या देशाची प्राचीन, ऐतिहासिक संस्कृती यांचे पालन करून आपल्या देशाला अधिक सक्षम करण्याचा विचार काही कुचकामी, स्वार्थी, मतलबी, लोकांमुळे मागे पडला त्यामुळे गढीसारखी भारताचीही खिळखिळी अवस्था झाली. हे या कथेतून लेखिका सुचवू पाहते.
(इ) या कथेतील वैदर्भी बोलीचे तुम्हांला जाणवलेले वेगळेपण लिहा.
उत्तर: ‘गढी’ ही डॉ. प्रतिमा इंगोले यांची कथा वैदर्भी बोलीतील आहे. या कथेतील, संवाद, निवेदन पूर्णतः वैदर्भी बोलीतूनच आलेले आहे. प्रमाणबोलीपेक्षा ही भाषा वेगळी असून त्याचे उच्चारही वेगळे आहेत. काही शब्दात ‘ह’ च्या उच्चारासाठी ‘य’ चा वापर, ‘वाहतवायत’, ‘पाहत- पायत’ असे शब्द पाहता येतील. ‘य’ ‘ड’ च्या ऐवजी ‘ळ’ शब्दाचा उच्चार ‘थ’च्या ऐवजी ‘त’ चा वापर ‘ओ’ ऐवजी ‘व’ चा वापर केला आहे. पेले/प्याले, नोतं/नव्हतं, अशी क्रियापदं त्यांच्या छोट्या बोलीरूपात आलेली दिसतात.
काही जोडाक्षरी शब्द पूर्णत: सुटेसुटे लिहिले जात आहेत. उदा. कारयकरमापासून कार्यक्रमापासून, पयसा -पैसा, फकत – फक्त, शिकसन – शिक्षण, वरगातले- वर्गातले अशामुळे अधिक सुलभ पद्धतीने ही बोली बोलली जाते असा अंदाज येतो.
प्र. ३. स्वमत / अभिव्यक्ती.
•’तिच्या कराळीवरला वड फुल पायात व्हता’ या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर: डॉ. प्रतिमा इंगोले लिखित ‘गढी’ या कथेत ग्रमीण भागातील समस्यांचे दर्शन घडवले आहे. कोणत्याही ठिकाणी विकासाची पावलं रुजवताना त्याचा त्रास विकास करू पाहणाऱ्यांना होतो. बापू गुरुजी आपल्या गावातील शैक्षणिक, सामाजिक विकासासाठी मनोभावे झटत होते. या गावातील संस्कृती इतर गावांसारखीच पण ऐतिहासिक वास्तूंचा ठेवा या गावाला लाभलेला होता. गढी ही ऐतिहासिक वास्तू या गावात होती. वान नदीची कृपा या गावाला लाभलेली होती. गावची जमीन सुपीक, काळीशार. एक वड अगदी काही वर्षांपासून जन्माला आला होता. त्याची हिरवी पानं गाववाल्यांना आकर्षित करत होती, पाच-सहा फुटाची त्याची उंची होती. पण तो आता स्वतःला त्या मातीत फुलवू पाहत होता. गावामध्ये प्रामाणिकपणे, निष्ठेने काम करणारी मंडळी आता वृद्धत्वाकडे झुकत होती. त्याचे गढी, वान नदी हे प्रतीक म्हणून पाहता येईल तर बापू गुरुजींना विरोध करणारी तरुण मंडळी हे वडाचे प्रतीक म्हणून या कथेत येतात.
(आ) उचापती करणाऱ्या माणसांचं धोरण-
उत्तरः मले पा अन् फुलं वहा.
प्र. २. (अ) बापू गुरुजींना सरकारकडून••••••••मिळालेला मान.
उत्तर: बापू गुरुजींना सरकारकडून आदर्श शिक्षक / आदर्श गुरुजी मिळालेला मान.
(आ) वाचनालयात / बोर्डिंगसाठी बापू गुरुजींनी वापरलेले पैसे
उत्तर: आदर्श गुरुजी पुरस्कारात मिळालेले पैसे
उतारा: गुरजीनं शायीत तालीमखाना….. ……………… गायीचे शिंगं गायीले भारी नसतातच. (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ८०)
प्र. ३. स्वमत / अभिव्यक्ती.
•बापू गुरुजींनी आपल्या गावच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांवरून बापू गुरुजींची तुम्हाला जाणवलेली वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर: बापू गुरुजींनी गावात शाळा सुरू केली. इतकंच नव्हे तर शाळेमध्ये त्यांनी तालीमखानासुद्धा सुरू केला. बापू गुरुजींचं गाव लहान असूनही त्यांनी तालीमखाना सुरू केला. शाळाही लहान होती पण बापू गुरुजींचे प्रोत्साहन, शाबासकी यांमुळे मुलं विविध स्पर्धांत सहभागी होऊन शाळेसाठी कप, ढाली जिंकून घेऊन येत असत. या शाळेचा नावलौकिक सर्वत्र होत होता. शिक्षणासाठी बापू गुरुजींनी केलेले प्रयत्न शासनाच्या लक्षात आले होते, म्हणून बापू गुरुजींना शिक्षणाविषयी, विद्यार्थ्यांविषयी इतकी आपुलकी की त्यांनी त्या पैशातून वाचनालय, बोर्डिंग सुरू केले. यातून त्यांची निस्वार्थी भावना दिसते. बापू गुरुजींनी सुरू केलेले उपक्रम, त्यांनी गावासाठी केलेल्या सोयी या गावातील उचापती करणाऱ्या लोकांना नकोशा वाटत होत्या. त्याकरता त्यांची बदनामीदेखील ते करत होते. पण या सर्व गोष्टींनी व्यथित न होता बापू गुरुजी आपल्या ध्येयापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत होते.
कृतीपत्रिका – ३
•खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती सोडवा.
प्र. १. कारण लिहा.
• बापू गुरुजींनी गावाचा विकास करायचा थांबवला त्याचे कारण•••••••••••
उत्तर: बापूगुरुजींनी गावाचा विकास करायचा थांबवला त्याचे कारण बापू गुरुजींनी केलेली कामे काही लोकांना पटत नव्हती, त्यांचे महत्त्व पटत नव्हते. ती उचापती करणारी लोकं गावातल्या लोकांना बापू गुरुजींना विरोध करण्यासाठी भडकवत होती, लोकंही त्यांचं ऐकत होती.
प्र. ३. स्वमत / अभिव्यक्ती.
समाजातील चांगल्या वाईट प्रवृत्तीबद्दल तुमचे मत स्पष्ट करा. –
उत्तर: बापू गुरुजींचा काळ भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा काळ होता. गावागावाचा विकास व्हावा यासाठी आव्हाने केली जात होती. त्याचा फायदा वैयक्तिक विकासासाठी न करता गावच्या विकासाकरता बापू गुरुजींनी केला. स्वतः शिकल्यानंतर गावात शिक्षणाचा उत्तम आरोग्याचा, वैचारिक विकास व्हावा याकरता ते प्रयत्नशील होते. त्यामुळे गावाचा विकास होत होता. त्याबरोबरीने बापू गुरुजींचे नावही होत होते. त्यांना सन्मान मिळत होता. पण हे गावातील समाजकंटकांना पहावत नव्हतं. गावात नवीन रस्ते तयार होणार होते, गावात दवाखाना आणण्यासाठी गुरुजी प्रयत्न करत होते, गावातील शाळेचे हायस्कूल होणार होते. परंतु गावच्या समाजकंटकांना हा विकास नको होता. वरवरच्या विकासाकडे त्यांचं लक्ष होतं. गावातील लोकांनाही वरवरच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करण्याकडे त्यांनी मन वळवले.
आज समाजामध्ये हीच परिस्थिती सर्वत्र दिसते. खरा विकास ज्या पद्धतीने मूळातून व्हायला हवा तसा होत नाही. परिणामत: हाती आलेली विकासाची कडवी फळं काही कालावधीतच आपल्याला चाखायला मिळतात. काही सोयी, सुविधा, उपक्रम, यांचा विकास मूळापासून म्हणजे अगदी सूक्ष्मापासून जर केला तर तो विकास तग धरून राहतो. तो विकास साखळी साखळीने पूर्ण केला की तो वरच्या पातळीपर्यंत पोहोचतो.
त्याचा फायदा सर्वसामान्यांपासून ते वरच्या स्तरातील लोकांपर्यंत होतो. शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी, वीज, घरं या सर्वसामान्यांच्या गरजा आहेत. त्या खेड्यातल्या माणसांना मिळाल्या की खेड्यातील माणसं आपल्या राहत्या ठिकाणी शेती, नोकरी, मजुरी करून दिवस काढतील. पण या सुविधांचा अभाव असल्यामुळे स्थलांतर, स्थानांतराचे प्रश्न उद्भवतात आणि शहरी विभागावर या सर्व स्थानांतरांचा ताण येतो. मुळातच खेड्यांचा विकास झाला की राष्ट्राचा विकास होईल ही संकल्पना ‘खेड्याकडे चला’ विचारामागे होती. पण ज्यांना स्वतःचा विकास प्रतिष्ठा महत्त्वाची वाटत होती अशांनी मात्र या विकासामध्ये अडथळे निर्माण केले. म्हणून प्राथमिक सोयी सुविधांचा फायदा अजूनही खेडेगावात पोहोचला नाही.
लेखिका परिचय:
डॉ. प्रतिमा इंगोले या मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यिका आहेत. कविता, कथा, ललित, विनोदी साहित्य, बालसाहित्य या साहित्यप्रांतात त्यांची मुशाफिरी आढळते. त्या स्वतः उत्तम कथाकथनकारदेखील आहेत. खेड्यातील वातावरण आपल्या लेखनातून त्या रेखाटित असतात. ग्रामीण भागातील स्त्रीजीवन हा त्यांच्या लेखनाचा आत्मा आहे. आपल्या वैदर्भी शैलीत त्या लेखन करतात त्यामुळे त्या बोलीचा, रंगही त्यांच्या लेखनात उतरतो.
ग्रामीण स्त्री-पुरुषी जीवन त्यांच्या कथांमधून प्रकट होते. ग्रामीण भागातील जीवनसंघर्ष, समस्या आणि ते सोडवण्यासाठी उपाययोजना यांचे चित्रण त्यांच्या लेखनात येते. आजवर दहा कथासंग्रह पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ‘अकसिदीचे दाने’, ‘अंधारपर्व’, ‘अमंगल युग’, ‘आक्रोश अन्नदात्याचा’, ‘उलटे झाले पाय’, ‘झेंडवाईचे दिवे’, ‘बाईची कहाणी’, ‘येळी माय’, ‘भंडाऱ्याचे नाव’ हे काही कथासंग्रह, ‘वसंत बंधारा’ (नाटक), ‘शेतकऱ्याच्या नारी’, ‘उद्कार’, ‘उदयसोहळा’, ‘भुलाई’, ‘लळा’ (कवितासंग्रह), ‘सख्यांच्या गोष्टी’, ‘सावित्रीबाई फुले’, ‘दृष्ट’, ‘जिजाऊ’, ‘करारी आजी’ (बालसाहित्य), ‘उजाड अभायारण्य'(प्रवासवर्णन), गंध’ (लेखसंग्रह), ‘आत्मघाताचे दशक’ (वैचारिक) अशी जवळ जवळ ९० पेक्षा जास्त साहित्यसंपदा त्यांच्या नावावर आहे. अनेक पुरस्कारांनी सन्मानित. ‘आस्वाद
पाठ परिचय:
देश स्वतंत्र झाला आणि खेड्यांचा विकास करण्याच्या दृष्टीने अनेक प्रयत्न सुरू झाले. विकासाच्या वाटचालीत सच्चेपणानं, प्रामाणिकपणानं काम करणारी मंडळी होती. त्यांच्या निष्ठा त्यांनी जपल्या आणि एकच ध्येय समोर ठेऊन आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा त्याग केला.
बापू गुरुजी हे देखील एक निष्ठावान समाजसेवक. कुणीही वंचित राहू नये याकरता ते प्रयत्नशील होते. आपल्या गावातील मुले तालुक्याच्या गावी शिक्षणासाठी जातात ही गोष्ट त्यांना व्याकूळ करणारी होती म्हणून त्यांनी खूप खटपटी करून
गावात शाळा सुरू केली. तिथे मास्तर म्हणून ते रुजू झाले. शिक्षणाकरता, मुलांकरता त्यांची अहोरात्र मेहनत पाहून सरकारने त्यांना आदर्श शिक्षकांचा पुरस्कार दिला. त्या पुरस्काराच्या. रकमेतून त्यांनी गावात बोर्डिंग सुरू केले. मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून वाचनालय सुरू केले व आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून तालीमखाना सुरू केला. त्यांच्या संपतीला पटकीचा रोग झाला, त्याच्यावर वेळेवर औषधोपचार न झाल्याने तो त्या आजारात दगावला. यामुळे व्यथित झालेल्या बापू गुरुजींना आपल्या गावात दवाखाना असावा असे वाटत होते. पण गावातील त्यांची वाढत असलेली प्रतिष्ठा काही लोकांना पहावत नव्हती. त्यामुळे गुरुजींनी ठेवलेल्या कोणत्याही प्रस्तावाला वा करत असलेल्या विकासाला बाधा आणण्याचा चंग विरोधकांनी बांधलेला होता. या सर्वांमुळे व्यथित झालेल्या गुरुजींचा आत्मविश्वास, अवसान ढासळत होते. गावात होणारे बदल त्यांनी पचवायला सुरुवात केली होती. गावात सडक नको, दवाखाना नको म्हणणारी मंडळी मात्र गावातील गढी कोसळताना पाहत होती, गावाच्या बाहेर दवाखान्यासाठी जात होती, उत्सव साजरे करीत होती. आपलं भलं कशात आहे तेच या पिढीला समजत नव्हतं. गावातील भक्कम गढी आता कोसळत होती. वान नदीचं पाणी आटत होतं आणि तिच्या कराळीवरल्या वडाच्या पारंब्या भूमीतच घुसत होत्या. आत्मिक, नैसर्गिक, वैचारिक, विकास न होता गाव देखाव्याच्या विकासाकडे झुकत होतं. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या बापू गुरुजींना मात्र या सर्व दिखाऊपणाचा त्रास होत होता.
शब्दार्थ :
| वसेल – वसलेलं (to colonize), गावासेजून- गावाशेजारून. झुममूय-झुळझुळ (slowly), वान कमतरता (deficiency, drawback), वायत- वाहत (to flow), कायीशार-1 काळीशार (intensely black), कराळी काठावर (on bank), आवतनं आमंत्रण (invitation), गोठी • गोष्टी (stories), उबा दान्याचा पूर येणे उभा (straight up, stand up), अमाप पीक येणे (flood of grain),
झाळ झाड (tree), काऊन कारण (reason), भरभरु भरभरून, कऱ्याचं करायचं, सनतान – मूल, संतती (children), सवतंतर स्वतंत्र ( independent), गढी ( a small fortress), आगरव्ह आग्रह गळी – – (importunity ), वळ वड (a fig tree), उळावं उडावं (to fly), सेल्याशेवटी – सरतशेवटी (at least), जेवायला (to have a meal), शाया – शाळा | ( school), सरपानं- शापान (curse), खळकुई पैसा जियाले – (money), आठोला – – आठवला (to remember), वाकय गोधडी (quilt), लळले – रडले (to cry ), | डोय डोळा (eye), कोशीस प्रयत्न ( an effort), तपेल तापलेल्या (to become hot), सईन – | (crow), कुठूठूल्ल | सहन ( suffering), झपत झोपता (to sleep), सेजून कावळा – – – – – – जवळून (by, from), सुदराले – सुधारायला कुठलं ( which), लोग बारीक माती, मऱ्याच्या – – to), फफूटा मृत्यूच्या (of पळीत death), गुळी जन्माची बातमी (news of born), झाकुळ्यात अंधारात (in darkness of dawn), पडीक (fallow,uncultivated), भारमसूरभारदस्त (weighty, dignified), भोंड – भोवळ, ग्लानी, चक्कर (dizziness), को कोऽ करणे आरडाओरडा करणे (shouting), पालट पळला नायी फरक पडला नाही, इरल्यावानी विरल्यासारखे, | उनायायल्या हळ्या (to improve ), पर्यंत (till, up – – उन्हाळ्यातल्या (in summer), कावूरल्यावनी चिंताक्रांत (anomalous, mentally troubled), एका दुकळीत -एका ढेंगेत – – –
म्हण :
●त्याइचा जीव अंदरल्या अंदर लोये- आतल्या आत व्याकूळ होतो. त्याचा जीव
●मले पा आन् फुलं वहा -कौतुक करा. माझीच री ओढा / माझंच
● चाल व्हयरे पोरा आन् वयरे ढोरा -किंमत न देता
कोणालाही कामाला लावणे.