Railway Teacher Recruitment 2025:रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) ने विविध शिक्षक पदांसाठी (Railway Teacher Recruitment) मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीत पोस्ट ग्रॅज्युएट टीचर्स (PGT), ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचर्स (TGT), ज्युनियर ट्रान्सलेटर (हिंदी), फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर, आणि इतर अनेक महत्त्वपूर्ण पदांचा समावेश आहे. एकूण 1036 रिक्त पदांसाठी अर्ज मागवले गेले असून, 7 जानेवारी 2025 पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होईल.
- महत्त्वाचे तपशील:
संस्था: रेल्वे भर्ती बोर्ड (RRB)
एकूण पदे: 1036
अर्जाची सुरुवात: 7 जानेवारी 2025
अर्जाची अंतिम तारीख: 6 फेब्रुवारी 2025
अधिकृत वेबसाईट: indianrailways.gov.in
- रिक्त पदांची माहिती:
या भरती प्रक्रियेत शिक्षक पदांसोबतच विविध तांत्रिक आणि प्रशासकीय पदांसाठीही अर्ज मागवले गेले आहेत. मुख्य पदांची माहिती खाली दिली आहे:
- पात्रता निकष:
PGT: संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी आणि B.Ed आवश्यक.
TGT: पदवीसह B.Ed आणि CTET उत्तीर्ण.
ज्युनियर ट्रान्सलेटर (हिंदी): इंग्रजी/हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी.
फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर: PT किंवा B.P.Ed पदवी आवश्यक.
- वयोमर्यादा:
PGT/TGT: 18–48 वर्षे
ज्युनियर ट्रान्सलेटर: 18–36 वर्षे
स्टाफ आणि वेल्फेअर इन्स्पेक्टर: 18–33 वर्षे
- निवड प्रक्रिया:
1. संगणक आधारित चाचणी (CBT): सर्व अर्जदारांसाठी मुख्य परीक्षा.
2. कौशल्य चाचणी: विशिष्ट पदांसाठी लागणारी चाचणी.
3. कागदपत्र पडताळणी: अंतिम टप्प्यात निवडलेल्या उमेदवारांची तपासणी.
- अर्ज कसा कराल?
1. वेबसाईटला भेट द्या: indianrailways.gov.in
2. नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा: मोबाईल नंबर व ईमेल आयडी वापरून रजिस्ट्रेशन करा.
3. अर्ज भरा: सर्व माहिती अचूक भरा.
4. कागदपत्र अपलोड करा: फोटो, सिग्नेचर आणि इतर आवश्यक दस्तऐवज जोडावेत.
5. अर्ज शुल्क भरा: ऑनलाईन पेमेंटद्वारे शुल्काचा भरा.
6. अर्ज सबमिट करा: सबमिट केल्यानंतर प्रिंटआउट घेऊन ठेवा.
🔗जाहिरात PDF पहा👉 येथे क्लिक करा
🔗अधिकृत वेबसाइट👉 येथे क्लिक करा
भारतीय रेल्वे शिक्षक भरती 2025:(FAQs)
1. भारतीय रेल्वे शिक्षक भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार आहे?
उत्तर: भारतीय रेल्वे शिक्षक भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 7 जानेवारी 2025 पासून सुरू होईल आणि अंतिम तारीख 6 फेब्रुवारी 2025 आहे.
2. या भरती प्रक्रियेमध्ये कोणत्या पदांसाठी अर्ज करता येणार आहे?
उत्तर: या भरती प्रक्रियेत पोस्ट ग्रॅज्युएट टीचर्स (PGT), ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचर्स (TGT), फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर, ज्युनियर ट्रान्सलेटर (हिंदी), सीनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर, स्टाफ आणि वेल्फेअर इन्स्पेक्टर, लॅब असिस्टंट आणि इतर विविध पदांचा समावेश आहे.
3. या भरतीसाठी पात्रतेचे निकष कोणते आहेत?
उत्तर: विविध पदांसाठी वेगवेगळी पात्रता आवश्यक आहे. उदा., PGT साठी संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी आणि B.Ed., तर TGT साठी पदवीसह B.Ed. आणि CTET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
4. वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी आहे. उदा., PGT आणि TGT साठी 18 ते 48 वर्षे, ज्युनियर ट्रान्सलेटर (हिंदी) साठी 18 ते 36 वर्षे आहे.
5. भरती प्रक्रियेतील निवड पद्धत काय आहे?
उत्तर: उमेदवारांची निवड संगणक आधारित चाचणी (CBT), कौशल्य चाचणी (जेथे लागू आहे), कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीच्या आधारे केली जाईल.